Skip to main content

" नवी क्रांती घडवायची आम्हाला "

लेखक Sanjay Kokare यांनी गुरुवार, 15/01/2015 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
———————————————— हवी आमच्या हक्काची भाकर, नकोय तुमची भिक आम्हाला !! हवय आमच्या मेहनतीच मोल, नकोय लाखोचे दान आम्हाला !! हवय शेतीला चांगल बी बियाणे, नकोय तुमची आश्वासने आम्हाला !! हवाय पिकाला योग्य हमीभाव, नको नावापुरत पॅकेजआम्हाला !! भरायच पोट आम्हा जगातील प्रत्येकाच, कारण जगाची काळजी आहे आम्हाला !! करायच भारताच नाव मोठ, नका करुडिवचण्याचा प्रयत्न आम्हाला !! आम्ही नाही करणार आत्महत्या, कारण मुलाबाळासाठी जगायच आम्हाला !! आमचीनका करुकाळजी तुम्ही, कारण नवी क्रांती घडवायची आम्हाला !! ————————————————— ————————————————— @@ कवी @@ संजयरा. कोकरे अमरावती मो. नं. 9561730189 Email: S.r.kokare1992@gmail.com
लेखनविषय:

वाचने 1725
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

संजयजी. दिवास्वप्ने रम्गवण्यापेक्षा प्रॅक्टीकली काहितरी करणे हेच महत्वाचे आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या बाजारपेठीय आणि सामाजीक अर्थव्यवस्थेमुळे / रुढींमुळे होतात त्याना तुम्ही कितपत बदलू शकता? भाजप किंवा काँग्रेस हे त्याबाबतीत एकाच माळेचे आहेत

@आमचीनका करुकाळजी तुम्ही, कारण नवी क्रांती घडवायची आम्हाला !! >>> बरं! घडवा! . . . . फ़क्त एक दहा कॉमेंट्स आल्या... , कीच घडवा!

कविता छान ! स्वाभिमानी शेतकर्‍याचा आवाज वाटतोय.. खरेच सबसिडी.. पॅकेज खरे तर हे शेतकर्‍यांपर्यंत पोहचतच नाही.. खरे तर त्याला ह्याची भुक नाहिये.. त्याला हवा एक प्रेमाचा मायेचा हक्काचा सहारा.. फुकटाचे त्याला देण्यापेक्षा .. त्याला योग्य मदत मिळाली पाहिजे .. जेनेकरुन त्याचा प्राण फुकट जाता कामा नये