आपण यांना का खाल्लंत ?
पूर्वी, दूरदर्शनवर संध्याकाळी, 'आपण यांना पाहिलत का ?' या नांवाचा हरवलेल्या व्यक्तींचे फोटो दाखवणारा कार्यक्रम असे. त्यांत काही चेहेरे इतके भेसूर असत की माझ्या एका मित्राने, या कार्यक्रमाचे नांव, 'आपण यांना का पाहिलंत ?' असे ठेवले होते. पुढे अनेकवेळा बेचव वा विचित्र चवीचे अन्न खाल्यावर माझ्या मनांत, आपण यांना का खाल्लं ?' असा प्रश्न उभा रहात असे. तर अशा काही आठवणी सांगायचा बेत आहे. वाचक त्यांत आपापली भर घालतीलच.
लहान असताना, आमच्या शेजारी एक ख्रिश्चन सदगृहस्थ रहात असत. एका ख्रिसमसला त्यांनी आमच्या घरी एक केक आणून दिला. पुस्तकाच्या आकाराचा तो केक, इतका छान सजवला होता की तो, एखाद्या डिक्शनरी एवढा जाड, केक पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले होते. लवकरांत लवकर तो केक खायला मिळावा म्हणून मी आईमागे सारखी भुणभूण लावली होती. शेवटी संध्याकाळी घरातले सगळे सदस्य हजर झाल्यावर आईने तो केक कापला आणि त्याचा एक भला मोठ्ठा तुकडा माझ्यासमोर ठेवला. पण पहिला घांस खाताच मी तोंड वेडेवाकडे केले. त्यांत संत्र्याची सालं घातल्यामुळे ती कडवट लागत होती. ती चव मला अजिबातच आवडली नाही. माझी झालेली फजिती पाहून माझ्या बहिणींना हंसु आवरत नव्हते. त्यानंतरही अनेक प्रसंगी, 'दिसते तसे नसते' या म्हणीचा मी अनुभव घेतला आहे.
एकदा, मुंबई आयआयटी मधे एका नातेवाईकांचा मुलगा रहात होता. मलाही लायब्ररीचे काम असल्याने तिथे जायचे होते. तर दुपारी वेळ ठरवून, मी त्याच्या होस्टेलवर जेवायला गेलो. बेत पावभाजीचा होता. पण बघून तरी ती पावभाजी वाटत नव्हती. त्याची चव घेतली मात्र! अरेरे! त्याला कसलीच चव नव्हती. नर्मदा परिक्रमेत, गोनिदा जसे, मिळालेले सर्व अन्न धोतरांत बांधून, नदीच्या पात्रांत तीनदा बुडवून मग खात असत, तशी षडरस विहीन पावभाजी होती ती! नंतर चौकशी केल्यावर असं कळलं की संस्था जरी नामांकित असली तरी व्यवस्थापन अगदीच ढिसाळ होते आणि मुलांचे खाण्यापिण्याचे हाल अनेक वर्ष चालूच होते. कदाचित अजूनही तशीच परिस्थिती असेल!
पुढे व्यवसायानिमित्त, अनेकदा पंचतारांकित हॉटेलांमधे जेवण्याची वेळ आली. पण तोपर्यंत मी अनुभवाने शहाणा झाला होतो. त्यामुळे बाह्यरुपावर न जाता आधी सर्व पदार्थांची चव घेतल्याशिवाय मी डिश भरतच नसे. कित्येक पदार्थ असे असतात की ते खाल्यावर पोट तर भरते पण चव नसल्यामुळे खाण्याचे समाधान त्यांत मिळत नाही. शिरा, उपमा, पोहे ह्याची रेसिपी जरी माहित असली तरी प्रत्येकाच्या हाताची चव वेगळीच. बाहेर कुठेही असे 'चवलेस' पदार्थ खाल्ले तर 'आपण यांना का खाल्लंत ?' असं म्हणू तरी शकतो. घरी मात्र, गंभीर प्रसंग टाळण्यासाठी, तो पदार्थ पुन्हा वाढून न घेणे, एवढेच आपल्या हाती असते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
रोचक विषय.. मनातली खदखद काढून
माझी मेस
बटाट्याचे पिठले
बटाट्याचा पिठलं : रेसिपी
दुर्मिळ.
भूक लागली म्हणून खाल्लं.
'चवलेस' पदार्थ खायची़ उत्तम
पावभाजीवरून आठवलं. मुंबईत
१) पुरणपोळी म्हणून पानात
चायना मध्ये (अथवा कुठेही
http://misalpav.com/node
फोटू
नर्मदा परिक्रमेत, गोनिदा जसे,
वांग्याची भाजी
बेचव जेवण
खमंग भाजलेल्या तिळाची वडी
गुजराती थाळी
आवडले तर घ्या की ...
धाडसी आणि
कँटीनवरुन आठवले.
ईईई.......
हा किस्सा वेगळ्या संदर्भात ऐकला होता.
हीच स्टोरी
+१
ते तरी ठीक!
शिवाय नावानेही..
मिष्टेक
चाउ चाउ बाथ
पिवळा पुलाव.
वा!
डिट्टेल रेशिपी द्या ना!
मस्त विषय.
अामच्या एक नातेवाईक आहेत
तिमांच लेखन पाहूनच फार आनंद
एकदा लग्न झाल कि 'अन्न हे
विट्ठल कामत आणि आकुर्डी सीसीडी
तुम्ही आकुर्डीला आलात आणि
कुठंय हे लिक्विड बिस्त्रो?
तुम्हाला प्राधिकरणातला संभाजी
चिटींग करता है... चिटींग चिटींग करता है तु.
फक्त सहा? ठिके
बाकी पदार्थ खूप छान मिळतात
वासु वडापाव सेंटर >>>>
च्यामारी, एवढी सगळी नावं
प्यायली नाही हो कधी. हे कुठे
नायडू
नाही....नाही....
ट्राय करीन. लोकमान्यकडे
राधिका आहे ना.. त्याच्या समोर
अहो ते होय. कँप एजुकेशन