✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(लेखणीने)

स — सूड, गुरुवार, 01/08/2015 - 15:19
काथ्याकुटास व्हावे तय्यार लेखणीने भक्षण घटीपळांचे करण्यास लेखणीने स्वविरोधी बोलण्याला मातीत लोळवावे माझे खरे म्हणावे नखदार लेखणीने मसीहा चितारण्याची अवगत कला करावी औक्षण जणू स्वत:चे करण्यास लेखणीने अफवादि निर्मितेला जेथे उभार तेथे पेरुन बीज यावे रुजण्यास लेखणीने भाकड-वृथा कथांच्या कक्षेमध्ये फिरावे अभिजात सृजनाला डसण्यास लेखणीने वाणी अरण्यरुदनि शिरजोर होई तेव्हा संपादकांनी यावे धरण्यास लेखणीने जेव्हा सदस्य करिति वादळ विराट तेव्हा द्यावे अभय म्हणावे पळण्यास लेखणीने -अंगावर उठे 'शबय शबय'

प्रतिक्रिया द्या
9220 वाचन

💬 प्रतिसाद (27)

सूड!! शब्द सामर्थ्य अप्रतिम!!

स्पंदना
गुरुवार, 01/08/2015 - 15:22 नवीन
सूड!! शब्द सामर्थ्य अप्रतिम!!
  • Log in or register to post comments

+++१११

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/08/2015 - 15:50 नवीन
+++१११ @'शबय शबय' >> हे काय ते कळ्ळं नै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

>>'शबय शबय' >>

सूड
गुरुवार, 01/08/2015 - 15:59 नवीन
>>'शबय शबय' >>
होळीच्या काळात गोव्यात वापरला जाणारा शब्द!! ;) कॉलिंग पैकाकू ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अर्थ माहीत नै

पैसा
गुरुवार, 01/08/2015 - 18:28 नवीन
पण सिंधुदुर्गात सुद्धा शिमग्याची सोंगे आणतात तेव्हा 'शबय शबय' म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मग मस्तच की..

नाखु
Fri, 01/09/2015 - 08:26 नवीन
"इथेही सोंग आणलं जातय दांभिक कळवळ्याचं,आणि मीच सर्वज्ञ असल्याच त्यामुळे ही मात्रा पण रूग्णाला लागू पडेल असे वाटते." बॅट्मन लिखित घरचा वैद्य आणि जालीम काढा या आगामी पुस्तकातील "दाख्वायचे दात" या प्रकरणातून साभार. *blum3* :-P :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

=))

पैसा
Fri, 01/09/2015 - 11:12 नवीन
त्यातलं एक प्रकर्ण वाचलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

@बॅट्मन लिखित घरचा वैद्य आणि

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/09/2015 - 11:46 नवीन
@बॅट्मन लिखित घरचा वैद्य आणि जालीम काढा या आगामी पुस्तकातील "दाख्वायचे दात" या प्रकरणातून साभार.>> Image removed. नाखु काकांचं आज पासून नवं नाव- ना"खून काका Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

वा!!

विटेकर
गुरुवार, 01/08/2015 - 15:27 नवीन
सुन्दरच ! जरा ओरिजनल लिवा की
  • Log in or register to post comments

जरा ओरिजनल लिवा की >>

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/08/2015 - 15:48 नवीन
जरा ओरिजनल लिवा की >> =)) अवांतर - आता लिही "वशाड मेलो"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

स्वतःची झायरात करत नाही, पण

सूड
गुरुवार, 01/08/2015 - 16:02 नवीन
स्वतःची झायरात करत नाही, पण हा ओरिगिनल चा एक प्रयत्न!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

स्कोर सेटलिंग ह्यालाच म्हणतात

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/08/2015 - 15:47 नवीन
स्कोर सेटलिंग ह्यालाच म्हणतात कि आणखी वेगळे असते ;)
  • Log in or register to post comments

अभ्यास वाढवा

सस्नेह
गुरुवार, 01/08/2015 - 16:06 नवीन
अभ्यास वाढवा *biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हे पण काव्य उत्तमच...

मुक्त विहारि
गुरुवार, 01/08/2015 - 15:51 नवीन
सुडांचे शाब्दिक आसूड झेलायला मनाचा मोठेपणा लागतो...
  • Log in or register to post comments

सूड(भावने)ला डिवचू नका, असे

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 01/08/2015 - 16:06 नवीन
सूड(भावने)ला डिवचू नका, असे म्हणतात ते यासाठीच की काय, असा विचार मनात आला ! ;) जरा ओरिजनल लिवा की ला दणकून अनुमोदन ! लै पावर दिसतिया लेखणीत :)
  • Log in or register to post comments

लै पावर दिसतिया लेखणीत....

मुक्त विहारि
गुरुवार, 01/08/2015 - 17:40 नवीन
फार कमी मिपाकर, योग्य शब्दांत, योग्य भाषेत, परखड मत व्यक्त करतात. सूड, त्यातलेच एक आहेत. आसूड ओढतात पण आणि योग्य ती दिशा पण दाखवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

काव्यरस: Khuni panja =))

अद्द्या
गुरुवार, 01/08/2015 - 17:06 नवीन
काव्यरस: Khuni panja
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

प्रत्ययकारी आणि जोरकस..

नाखु
गुरुवार, 01/08/2015 - 17:31 नवीन
स्वविरोधी बोलण्याला मातीत लोळवावे माझे खरे म्हणावे नखदार लेखणीने
हे फारच वृषभ-नेत्र-भेदन आहे !!! *OK*
  • Log in or register to post comments

+१

बहुगुणी
गुरुवार, 01/08/2015 - 18:05 नवीन
अगदी, अगदी! "नखदार लेखणीने" फारच भारी! (बाकी नाद-खुळा: तुमचं ते 'वृषभ-नेत्र-भेदन'ही आवडलंच :-) ) अवांतरः मसीहा चितारण्याची अवगत कला करावी औक्षण जणू स्वत:चे करण्यास लेखणीने या ओळी वाचून पॅरिसमधल्या व्यंगचित्रकारांच्या हत्येची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

खूपच जबरदस्त !!

खटपट्या
Fri, 01/09/2015 - 00:51 नवीन
खूपच जबरदस्त !! "माझे खरे म्हणावे नखदार लेखणीने" च्या ऐवजी "माझेच खरे म्हणावे नखदार लेखणीने" असे हवे होते (लहान तोंडी मोठा घास घेतोय. क्षमस्व)
  • Log in or register to post comments

नाही एक मात्रा जास्त होईल

वेल्लाभट
Fri, 01/09/2015 - 11:34 नवीन
नाही एक मात्रा जास्त होईल ''अपुलेच दामटावे नखदार लेखणीने'' कसं वाटतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

लै भारी ....

विशाल कुलकर्णी
Fri, 01/09/2015 - 08:55 नवीन
लै भारी .... :) हे वाचून आमचीबी येक जुनी कव्ता आटवली... म्हनलं चला आपणपण कविता पाडू तेनी म्हनले राग 'लय' नका तोडू नायतर शब्दांन्ला नसंल शब्दांचा पायपोस आम्ही म्हनू याला शब्दाचा लई सोस आशय नसेल तर कोणाचं काय जातं सुद्धलेखन करताना मन आमचं जळतं आम्ही इचारलं हेडर फुटर काय घालू त्येच्या नादात ते बेणं मिटर इसरलू त्ये दादां म्हणत्यात कुटं हाये रे यति यति विना काव्य हीच तं आमची नियती अशानं बघा कवितेचं माज्या बारा वाजलं क्कुणी वाचो न वाचो आमी तर वाचलं नवकवि ईशाल म्हमईकर
  • Log in or register to post comments

=))

पैसा
Fri, 01/09/2015 - 11:11 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

हायला !! गंडलंय का काय

सूड
Fri, 01/09/2015 - 11:24 नवीन
हायला !! गंडलंय का काय लिहीलंय त्यात?? माताय, हे आमचं नवकाव्याचं अपत्य अडणार बव्हतेक!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

वरिजनल पेक्षा खत्तरनाक भाऊ !

वेल्लाभट
Fri, 01/09/2015 - 11:31 नवीन
वरिजनल पेक्षा खत्तरनाक भाऊ ! क्या बात है !
  • Log in or register to post comments

करितो सूडकविता अशी ताकदीची

गवि
Fri, 01/09/2015 - 11:56 नवीन
करितो सूडकविता अशी ताकदीची आय लव्ह यू म्हणावे त्या खास देखणीने -चूड
  • Log in or register to post comments

घरी कमधेनू पूढे ताक मागे, हरी

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 01/10/2015 - 10:18 नवीन
घरी कमधेनू पूढे ताक मागे, हरी बोध सांडून विवाद लागे, करी सार चिंतामणी काचखंडे, तया मागता देत आहे उदंडे जय जय रघुवीर समर्थ पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

जबरी कविता रे सूड भावा.

गंगाधर मुटे
Mon, 12/11/2017 - 17:01 नवीन
जबरी कविता रे सूड भावा. छान सूड घेतलाय. :) :) कविता शोधत गुगलायला गेलो तर ही सूडकन्या गवसली. :D
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा