सायन - पनवेल - १० पदरी मार्ग
अंतर पार करण्यास लागणारा कालावधी - १ तास
अधिक टोल नाक्यावर लागणारा वेळ
वाशी टोल नाका - अर्धा तास
खारघर टोल नाका - अर्धा तास
एकूण वेळ - २ तास
एवढ्या वेळेत तर पूर्वी आम्ही लोणावळ्याच्या पुढे पोचायचो
कुठे नेऊन ठेवलात ' वेळ ' माझा … ।
सत्तेत आल्यावर आम्ही टोल बंद करू , खारघर टोल नाका कदापि चालू होऊ देणार नाही इ . आश्वासने देऊन निवडून आलेल्या भाजपा ( सेना ) सरकारने आज अखेर खारघर टोल नाका चालू केला . टोलनाक्याच्या पलीकडील ५ गावाना ( पनवेल, कळंबोली, कामोठे, कोपरा , खारघर ) सूट मिळणार असे कळते . मग अलीकडील गावाना ( सीबीडी, नेरूळ , उलवे) सूट का नाही दिली जाणार हा अनुत्तरीत प्रश्ण . असो आम्ही स्वत: सीबीडी बेलापूरला रहात असल्याने , आमच्या दृष्टीने हा टोल कसा बायपास करता येईल याचा विचार करता काही नवीन मार्ग सुचला तो असा .
खारघरटोल नाका बायपास करण्याचा मार्ग …….
१) पुणे / पनवेल कडे जाणा-यांसाठी ……
या मार्गाने गेल्यास पैशाची बचत होणार नाही ( जेवढे टोलचे पैसे वाचवाल तेवढेच डिझेल / पेट्रोलसाठी खर्च होतील ) मात्र टोल नाक्यावरची लांबच लांब रांग रांग वाचून वेळेची बचत होण्याची शक्यता . मुख्य करून विकेंडला / लागून आलेल्या सुट्ट्यांच्या वेळी जेंव्हा पुण्या कडे जाण्यासाठी वाहनांचा ओघ वाढलेला असतो त्यावेळी अवश्य या मार्गाचा उपयोग करता येऊ शकेल . तसेच सुट्ट्यासंपून मुंबईला परताना रविवारी रात्री हा बायपास रोड वापरता येईल . परत एकदा हा बाय पास मार्ग पैसे वाचवण्यासाठॆ नसून वेळ वाचवण्यासाठी आहे याची नोंद घ्यावी
खारघर उड्डाणपुलावर न जाता खालच्या बाजूने जाऊन खारघर सर्कलला डावीकडे वळावे. तसेच सरळ प्रसिध्द उत्सव चौका पर्यंत जाऊन त्या चौकाला वळसा मारून उजवीकडे जाणे. हा रस्ता सेंट्रल पार्क / पांडवकडा येथून जातो . तेथून तसेच सरळ जाणे जो रोड तुम्हाला तळोजा ( पनवेल - कल्याण रोडला ) इथे आणून सोडेल . त्या ठिकाणी ( जिथे पनवेल - कल्याण रोड, या रोडला मिळतो ) उजवीकडे वळल्यास तुम्ही कळंबोली कडे येता आणि तिथून परत एक्स्प्रेस हायवेवर जाण्यासाठी डाव्या बाजूने रस्ता दिला आहे. या बायापासमुळे साधारण ७ ते ८ किमी अधिक प्रवास होऊ शकतो मात्र सुट्टीत टोलनाकयावर लागणा-या रांगेचा विचार करता वेळेत बचत मात्र होऊ शकते
२) पेण/ अलिबाग/ कोकणात जाण्यासाठी …।
सायन - पनवेल महामार्गावर नेरुळ गेल्यानंतर उरण फाट्याचा उड्डाणपूल न वापरात खालच्या बाजून जाऊन उजवीकडे उरणला जाण्यासाठी वळावे किंवा वाशीहून येत असाल तर पाम बीच रोड ने येऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या नवीन इमारतीपासून उजवीकडे वळावे. उरणला जाणारा हा रोड पनवेल - उरण रोडला मिळतो. तिथे उजव्या बाजूस वळावे आणि लगेचच काही मिटर अंतरावर चिरनेर गणपती कडे असा फलक दिसेल तिथे डावीकडे वळावे . हा रस्ता मोठी जुई , चिरनेर मार्ग तुम्हाला सरळ पनवेल - पेण रस्त्यावर कर्नाळा पाशी आणून सोडेल
हा रस्ता मात्र नक्कीच पैसे आणि वेळ यांची बचत करणारा आहे.
अधिक माहितीसाठी गुगल नकाशाचा वापर करता येईल
धन्यवाद
अमोल केळकर
वाचने
9632
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
आम्ही टोलचे बांधकाम सुरु
आणखी पर्याय
छान..!!
कोल्हापुर पॅटर्न वापरता येईल
कोल्हापुर पॅटर्न वापरता येईल असे वाटत नाही.
In reply to कोल्हापुर पॅटर्न वापरता येईल by मराठी_माणूस
दुसरा रस्ता
मुख्य करून विकेंडला / लागून
नाही मरता येत
In reply to मुख्य करून विकेंडला / लागून by काळा पहाड
मला तर मुंबईत MH 12/ MH 14
In reply to नाही मरता येत by सुमीत
खळ-खट्याक!
हा टोल होणार नाही, म्हणून
.
आजच्या लोकसत्ता मधल या
http://m.loksatta.com/aghralekh-news/fadnavis-govt-u-turn-from-t
आपण एकत्र होतच नाही
उत्पन्नातले ३० टक्के शासनाला
In reply to आपण एकत्र होतच नाही by वेल्लाभट
हो तेवढं खोलात शिरलं तर मग
In reply to उत्पन्नातले ३० टक्के शासनाला by आदूबाळ