✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सरस कट्टा (अर्थात महालक्ष्मी सरसला भेट)

स
सविता००१ यांनी
Tue, 01/06/2015 - 12:25  ·  लेख
लेख
नेहमीप्रमाणेच टीपी करण्याकरता भगवान शंकर आणि पार्वती त्यांच्या स्पेशल चार्टर्ड विमानातून चालले होते. पार्वती आपली नेहमीप्रमाणेच निरागसतेने विचारती झाली- "भगवान, या कलियुगात स्त्रियांना चार घटका आनंदी, सुखी ठेवणारं असं काही व्रत आहे का?" भगवान ताबडतोब उत्तरले- "हो देवी. हल्लीच्या संगणक युगात या मिसळपाव नामे संस्थळाला फार महत्त्व आलय. आणि त्यात अनाहिता नामक एक अध्याय फक्त स्त्रियांसाठीच राखून ठेवलाय. तिथं त्या अगदी मनसोक्त गप्पा मारतात, नवीन मैत्रिणी करतात, त्यायोगे स्वतःचं ज्ञान वाढवतात आणि मनोरंजनही करून घेतात." पार्वती देवी म्हणाल्या - "भगवान, म्हणजे आताही स्त्री ने फक्त घरातूनच हे सारं करायचं का? तिने नाही बाहेर पडायचं?" भगवान गूढ हसले. - नेहमीप्रमाणेच. आपल्याला काय करायचंय? त्यांची ईस्टाईल. आणि म्हणाले- "खाली पहा देवी. हा मुंबईचा बहुचर्चित सरस प्रदर्शनाचा विभाग. इथे या अनाहितांपैकी मोक्षदा, सानिका, आरोही आणि सविता या चारच जणी आल्यात. पण कशा धुमाकूळ घालत आहेत ते बघ. आता या कलीयुगात त्याही चांगल्या चपळ झाल्यात. ही जी सविता दिसतेय ना, ती आणि तिची शेजारीण सानिका दोघींना वाटलं की त्यांची अजया ही मैत्रीण येत नाहीये तर आपण पण रहित करूया का आजचा बेत? तर नाही. आरोही नावाची मैत्रीण येतेय म्हटल्यावर या भल्या पहाटे मुलुंड नामक स्थानकावर फक्त १५ दिवसांच्या अंतराने भेटल्या असल्या तरी अशा काही भेटल्यात की जणू मागच्या जन्मानंतर आजच भेटतायत. बसल्या गाडीत, पुढे रिक्षा आणि सगळे स्टॉल उघडण्यासाठी या दोघी हजर. नंतर आरोहीला फोन करून कुठेशी आलीस, लौकर ये वगैरे सांगून त्या बिचार्‍या मोक्षदाताईंना कॅन्सल झाला असं वाटलेला बेत - या हो, आम्ही आहोत असं या दोघींनी सांगून त्यांनाही कामाला लावलं. बरं देवी... आता तुला मोक्षदाताईंची दया येतेय का? तर तसं काही नाही. सविताने फोन केल्याकेल्या - अगबाई- भेटतोय का आपण? ही आलेच मी अर्ध्या तासात म्हणून याच तिघींसाठी ताज्या चकल्यांचा घाणा तळायला घेतला.घरातल्यांसाठी दोन भाज्या दणादण फोडणीला टाकून या तिघींसाठी चकल्या घेऊन बाई हजर आहे बघ कट्ट्याला." पार्वतीदेवी: "भगवान, पण कट्टा?? तुम्हीतर प्रदर्शन आहे म्हणालात ना?" शंकर भगवानः "हो देवी. पण या साळकाया माळकाया जिथे भेटतात त्या ठिकाणाला त्या कट्टा असे संबोधतात." पार्वतीदेवी- "ओह, आय सी.. "(आता हे दोघे आधुनिक झालेत.उगीच काय च्या काय शंका काढू नयेत्,इंग्लीश कसे बोलतात वगैरे.. उत्तरे मिळणार नाहीत. Wink ) शंकर भगवान: "मी ऑटो गिरकी मोडवर ठेवलंय विमान. तू पहा आता खाली. मी निवांत बसतो आता." (लोगों- ये देखो टिपिकल नवरा- शॉपिंग सहन ही नहीं कर सकता!!!) पार्वतीदेवी: "बापरे-या सानिका, सविता तर बांगड्या, गळ्यातलं असं काही दिसलं तर जरा सोडत नाहीयेत. काय बाई तरी हा सोस..आमच्यावेळी नव्हतं बाई असं काही प्रदर्शन वगैरे.. अरेच्च्या- ही आरोही पण आली. झालं साड्या, ड्रेसेस, दागिने, मातीची भांडी, शोभेच्या वस्तू, मसाले, चटण्या, लोणची.. किती किती पहातायत.. घेणार आहेत की नाही कोण जाणे.. हं मोक्षदाताईंची वाट पहात होत्या होय? आल्या आल्या त्या. बाई बाई, किती ही लगबग? बरोबरच आहे पण. सख्यांना भेटायचंय ना.. हुश्श! भेटल्या चौघी जणी. अरे- हे काय? आधी पोटोबा. खमंग चकलीच फडशा पाडला आधी यांनी. आणि आता- ही खरेदीची धूमशान चालू झालीये. किती सुंदर बांगड्या, कानातली घेतायत या कारट्या!!! मस्तच. शिवाय कोकणी, कोल्हापुरी, मालवणी, खानदेशी मसाले, चटण्या, रोस्टेड ज्वारी, बाजरी, मँगो शेवया.. झाला वाटतं कट्टा! नाही नाही- या चौघी निघाल्या सोलकढी आणि ताक प्यायला. शिवाय हुरड्याचं थालीपीठ. एवढी खरेदी केल्यावरती लागणारच ना तहान? आता चालल्या या सगळे फूड स्टॉल धुंडाळत. कुठे काय मिळतं म्हणून. म्हणजे मेजवानी वाटतं आता.. अगबाई-या निघाल्या की परत खरेदीला. कित्ती एन्जॉय करतायत.. आणि टकळी चालू चौघींची. कमाल आहे. पाय दमलेत पण तोंड चालू गप्पांसाठी. आहा- आता ती सानिका साडी घेतेय, शो पीसेस घेतेय, पर्सेस घेतेय आणि जिला ढिम्म काटकसर करता येत नाही ती सविता तिला भाव कसे कमी कर याच्या टिप्स देतेय.वा रे वा- हे म्हणजे अजबच आहे आणि सानिकाला त्या भावात वस्तू मिळ्तायत पण. झकास. इकडे ही आरोही आणि मोक्षदाताईंच मातीच्या भांड्यांबद्द्ल मौकिल निरिक्षण चालू आहे. बाई बाई- सगळे लोक अलिकडे ते नॉन स्टीक घेतायत आणि या चालल्या अश्मयुगाकडे. पण सुधारताहेत हो माझ्या पोरी. आय अ‍ॅम फीलींग सो नाईस. आता चालल्या खादाडी प्रोग्रॅमला. वा वा- अगदी देशी मेनू घेताहेत. भाकरी, ठेचा, मासवडी - रस्सा, मटकी उसळ, मेथीची भाजी आणि नंतर चक्क वाफाळते उकडीचे मोदक. अगदी मस्त आनंदात चालू आहे प्रोग्रॅम. आणि सततचं वाक्य काय चौघींच? चला बाई- हात अगदी भरून आलेत. पोटात आणि पोतडीत अज्जिबात जागा नाही. आणि तरीही परत या खरेदीकडे.. आता मातीची भांडी घेतली. आता काही झालं तरी घरची आठवण ठेवतात हो माझ्या पोरी.. अगदी खमंग, गरमागरम खानदेशी मांडे घेतलेत पार्सल करून. कशा गुणाच्या आहेत. अरे- सकाळी १० ते संध्याकाळी ५ असा वेळ या चौघींनी किती सुंदर घालवयाय!! आय जस्ट एन्वी देम! गेल्या सगळ्या आपापल्या दिशेने.. भगवान, मी काय म्हणते, ऐकलं का??????? (टिपिकल बायको वाक्य)" शंकर भगवानः हं???????????? (टिपिकल नवरा वाक्य) पार्वती देवी: मी की नाही गडे, स्वर्गात गेल्यागेल्या एक कट्टा करावाच म्हणते आमच्या सगळ्या देवी ग्रूपचा. व्हॉट से??????? शंकर भगवान: ओह माय मॅन.........
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
कला
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
बातमी
अनुभव

प्रतिक्रिया द्या
20933 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

कचकून सहमत !!

खटपट्या
Wed, 01/07/2015 - 00:47 नवीन
कचकून सहमत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सविता छान लिहीले आहेस .. मजा

Maharani
Tue, 01/06/2015 - 15:00 नवीन
सविता छान लिहीले आहेस .. मजा आली वाचताना..
  • Log in or register to post comments

मस्त झाला कट्टा

विशाखा राऊत
Tue, 01/06/2015 - 15:14 नवीन
मस्त झाला कट्टा
  • Log in or register to post comments

छानच आहे

मनिमौ
Tue, 01/06/2015 - 15:43 नवीन
माझा मिसलयाने भारी जळजळ होते आहे. इनो पण नाही घरात.
  • Log in or register to post comments

मने ११ तारखेपर्यंत आहे सरस

आरोही
Fri, 01/09/2015 - 12:33 नवीन
मने ११ तारखेपर्यंत आहे सरस अजून ...येतेस काय ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिमौ

आरोही तु जाणारेस का? माझा

कविता१९७८
Fri, 01/09/2015 - 17:47 नवीन
आरोही तु जाणारेस का? माझा विचार आहे जायचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोही

अगं १२ तारखेपर्यंत आहे ना ,

कविता१९७८
Fri, 01/09/2015 - 17:44 नवीन
अगं १२ तारखेपर्यंत आहे ना , जाउन ये की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिमौ

मस्त लिहिले आहेस. झक्कास.

मधुरा देशपांडे
Tue, 01/06/2015 - 16:07 नवीन
मस्त लिहिले आहेस. झक्कास.
  • Log in or register to post comments

सविता, मस्त लिखाण!

अनन्न्या
Tue, 01/06/2015 - 17:18 नवीन
सरसहून सरस झालाय वृत्तांत!
  • Log in or register to post comments

मस्तच लिहिलय...

कौशी
Wed, 01/07/2015 - 06:01 नवीन
मज्जा,धम्माल अशीच सुरु असु द्या...
  • Log in or register to post comments

सविता००१, लिखाणाची स्टाईल

स्पंदना
Wed, 01/07/2015 - 08:04 नवीन
सविता००१, लिखाणाची स्टाईल आवडली. कट्टा व्रूतांत तर बरेच वाचतो आम्ही, पण ही जी शिव-पार्वती कथा आम्ही लहाणपणी कोणत्याही पोथ्या पुस्तकात वाचायचो त्याचा अतिशय चपखल वापर केला आहे येथे. अर्थात त्या शैलीला मनमोकळी दाद देण्याऐवजी, मुळातच झाड वाढु नये की काय अशी वृत्ती दिसली. कोणीही लिहो, जे शैलीदार, कल्पनात्मक असे येइल त्याचे कौतुकच आहे.
  • Log in or register to post comments

+ १ अपर्णा ताई

आरोही
Fri, 01/09/2015 - 12:31 नवीन
+ १ अपर्णा ताई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

सविता

मोक्षदा
Wed, 01/07/2015 - 10:33 नवीन
शब्दच नाही वृतांत उत्तमच झाला आहे चांगल्या च झाला आहे तुमच्या बरोबर खूपच मज्ज्जा आली परत नक्की दुसर्कात्त्याचा मी विचार केला आहे मार्च मधेय
  • Log in or register to post comments

मज्ज्जा आली >> हि कोण मज्ज्जा

टवाळ कार्टा
Wed, 01/07/2015 - 11:05 नवीन
मज्ज्जा आली >> हि कोण मज्ज्जा दुसर्कात्त्याचा >> दुश्कृत्याचा??? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोक्षदा

फारच आवडलेला दिसतोय विनोद

अजया
Wed, 01/07/2015 - 11:39 नवीन
फारच आवडलेला दिसतोय विनोद.लोळुन हसतांय ते!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

म्हणजे काय?

सविता००१
Wed, 01/07/2015 - 11:40 नवीन
अजून शंका आहे की काय विनोद बद्दल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

छान वृत्तांत आवडला. मस्त. इंजॉय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 01/07/2015 - 11:01 नवीन
फक्त वृत्तांत फोटो टाका प्लीज. नै तर आम्हाला पुन्हा कथा लिहावी लागेल. मिसळपाव जनहिताय कथा. श्री गणेशाय नमः ! भारतदेशीय परमपवित्र ! मिसळपाव नामे एक नगर ! तेथे जनहिताय स्त्रीयांचं माहेर महाथोर ! जे का अपूर्व त्रिभूवनी !!१!! तेथे कोणे एके वेळी ! शिवपार्वती एक स्थळे ! चर्चा करितसे मिसळपावी. ! उभयता येऊनी चक्कर मारुनी स्थळी ! शिव कपाळावर हात मारुनी ! वृत्तांतात फोटो कुठे दिसेनाशी ! तव पार्वती म्हणे ----- असो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

डॉक्टर..

सविता००१
Wed, 01/07/2015 - 11:34 नवीन
हा पण फॉर्मॅट मस्त आहे. आवडेश एकदम. फोटो नाही हो.. शॉपिंग आणि खादाडी. वेळच नाही. काय करणार??????? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असं नाय हो...

सूड
Wed, 01/07/2015 - 15:19 नवीन
मिसळपाव नाम संस्थळी। कलियुगी अधुनकाळी। गोष्ट कैसि वर्तली। ऐकावी सज्जनहो॥१॥ पंचाननाचि अंबिका। सारीपाट खेळूनि फुका। म्हणे 'वाज आयलो माका'। बैसलिसे विमानि ॥२॥ तेणे भांबावे शिवाचि मति। देव असला तरी शेवटी पति। पिशव्या-ब्यागा घेउनि हाति। मागुति चालला॥३॥ विमान आणिले अधांतरी। उमा पाहे पृथ्वीवरी। वस्तु दिसति नानापरि। सेल जणू लागलासे॥ ४॥ तव दिसल्या साळका-माळकाया। अनाहिता म्हणवति आपणा या। ना ना ष्टॉलांवरि जावूनिया। धुडगुस असे मांडला॥५॥ शिवासि पडलि चिंता। म्हणे कैसे करावे आता। भार्याही खरेदी करु जाता। खिसा कैसा सांभाळू॥६॥ तत्क्षणी भोळा पशुपति। धावा म्हणे श्रीपति। वाचवाया मम हरि पत्ति। उपाय काही सांगावा॥७॥ श्रीहरि म्हणे सदाशिवा। मजतरि उपाय कैसा ठावा। शिवरात्र जणू आली एकादशीचे गावा। ऐसि गत झालीसे॥८॥ .....तूर्तास येवढंच !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

__/\__

सस्नेह
Wed, 01/07/2015 - 15:24 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

जब्ब्राट

टवाळ कार्टा
Wed, 01/07/2015 - 15:29 नवीन
जब्ब्राट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

भारी !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 01/07/2015 - 15:30 नवीन
भारी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आईशप्पत

सविता००१
Wed, 01/07/2015 - 16:17 नवीन
सूड......... केवळ भारी दंडवत ____/\____
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हाहा भारी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 01/07/2015 - 16:53 नवीन
आवडले. *good* -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

याचं

चौकटराजा
Wed, 01/07/2015 - 19:04 नवीन
याचं पारायण ओला पंचा नेसून करायचं काय सुड्राव ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

किती त्या पंचायती !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 01/07/2015 - 19:20 नवीन
किती त्या पंचायती ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

>>याचं पारायण ओला पंचा नेसून

सूड
Wed, 01/07/2015 - 19:38 नवीन
>>याचं पारायण ओला पंचा नेसून करायचं काय सुड्राव ?
आमचेकडे गिरगाव पंचे डेपोतून आणलेला कद आहे, आम्ही तो वापरतो. इतरांनी आपापल्या आवडनिवड, वकुबानुसार ठरवावे. ज्यांना ओला पंचाच वापरायचा आहे पण तो मिळणार नाही असं असेल त्यांनी 'आमचे येथे पंचा ओला करुन मिळेल' अशी पाटी पुण्यात कोठे दिसते का शोधावे, कसें? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

आमचे येथे पंचा ओला करुन मिळेल

बॅटमॅन
Wed, 01/07/2015 - 19:43 नवीन
आमचे येथे पंचा ओला करुन मिळेल
काय एकेक हस्तकला तरी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पंचा.

नाखु
Fri, 01/09/2015 - 09:14 नवीन
इथेच नीट तपासून पहावा नंतर तो कोरडा होता असा ओरडा चालणार नाही. ;-) ;) ^_~ सूचना संपली.. ============= आम्चे येथे "धागे" उसवून मिळतील घाऊक मागणीला आकर्षक पॅकेज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/09/2015 - 09:17 नवीन
=)))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

जबराट सूड

खटपट्या
Wed, 01/07/2015 - 23:12 नवीन
जबराट सूड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

_/\_

असंका
Fri, 01/09/2015 - 10:40 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

देव असला तरी शेवटी पति।

आदूबाळ
Fri, 01/09/2015 - 17:53 नवीन
देव असला तरी शेवटी पति। पिशव्या-ब्यागा घेउनि हाति। मागुति चालला
तत्क्षणी भोळा पशुपति। धावा म्हणे श्रीपति। वाचवाया मम हरि पत्ति। उपाय काही सांगावा॥७॥
ब्याक्कार! :)) :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

भारी लिहिलाय..

पिशी अबोली
Wed, 01/07/2015 - 15:24 नवीन
भारी लिहिलाय.. फलश्रुती: या कथेचे भक्तिभावाने जो श्रवण करील त्याला भरपूर कट्टे करता येतील. जो अवमान करेल त्याला सगळे ठरवलेले कट्टे ऐनवेळी चुकतील...
  • Log in or register to post comments

सूड

मदनबाण
Wed, 01/07/2015 - 15:38 नवीन
सूड ज ब रा ट.... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)
  • Log in or register to post comments

मस्त व्रुत्तांत

हाहा
Wed, 01/07/2015 - 16:11 नवीन
छान मजा केलीये की सगळ्यांनी.
  • Log in or register to post comments

ये हुई न बात !!

स्पंदना
Wed, 01/07/2015 - 17:25 नवीन
ये हुई न बात !! बिरुटे सर आणि सुड बहोत खूब!!
  • Log in or register to post comments

असेच म्हणते ...

आरोही
Fri, 01/09/2015 - 12:29 नवीन
असेच म्हणते ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

सवी,सर,सुड मस्तच.

भाग्यश्री कुलकर्णी
Wed, 01/07/2015 - 17:35 नवीन
सवी,सर,सुड मस्तच.
  • Log in or register to post comments

+१

सखी
Wed, 01/07/2015 - 18:04 नवीन
हेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री कुलकर्णी

मस्त व्रुत्तांत !!

सुप्रिया
Wed, 01/07/2015 - 17:51 नवीन
सरस झालाय वृत्तांत!
  • Log in or register to post comments

खरंच सरस झालाय

कविता१९७८
Fri, 01/09/2015 - 17:48 नवीन
खरंच सरस झालाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुप्रिया

सूड

विटेकर
Wed, 01/07/2015 - 18:08 नवीन
दन्डवत स्वीकारा ! कट्टा झाला असेल बरा असे म्हणायला भरपूर वाव आहे. वृत्तांत मस्तच !
  • Log in or register to post comments

नविन आहे. मदत हवि

पदम
Wed, 01/07/2015 - 18:59 नवीन
नुकतच लोगिन केलय मलाहि आवडेल तूमच्या दालनात यायला पदम
  • Log in or register to post comments

स्वागत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 01/07/2015 - 19:44 नवीन
आपलं नुकतंच लगीन झालंय तेव्हा आपलं मनःपूर्वक स्वागत. कंच्या पार्टीत सामील व्हायचंय तुम्हाला ? ह.घ्या. हं. मिपावर नवीन सदस्याला अशीच सलामी द्यायची असते. :) लेखनासाठी काय मदत हवी सांगा मदत तयार आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पदम

पण सदस्य काळ तर १ वर्श ३

त्रिवेणी
Wed, 01/07/2015 - 23:07 नवीन
पण सदस्य काळ तर १ वर्श ३ महिने असा दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पदम

आभार

पदम
गुरुवार, 01/08/2015 - 17:55 नवीन
आभारि आहे आपलि. मला स्त्रियान्साथि जो धागा आहे म्हन्जे दालनात जायला आवडेल. मे गेल्या चार वर्षापासुन मिपा वाच्तेय. पण लिह्न्यासाठि पहिल्यान्दाच प्रयत्न करतेय. भिति वाटायचि पण शेवटि जो होगा सो देखा जायेगा अस्स ठरवुन लिहायला सुरवात कर्तेय. लिह्ताना चुका झाल्यास माफि अस्सावि. पदम
  • Log in or register to post comments

अनाहिताला सदस्यत्वासाठी

अजया
Fri, 01/09/2015 - 17:29 नवीन
अनाहिताला सदस्यत्वासाठी विनंती पाठवा.लिहायचा प्रयत्न करताय, छान वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पदम

ऑल द बेस्ट

कविता१९७८
Fri, 01/09/2015 - 17:46 नवीन
ऑल द बेस्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पदम

कट्ट्याची कल्पना व वृ लेखनाची

रेवती
Fri, 01/09/2015 - 04:30 नवीन
कट्ट्याची कल्पना व वृ लेखनाची ष्टाईल आवडली.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा