✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सरस कट्टा (अर्थात महालक्ष्मी सरसला भेट)

स
सविता००१ यांनी
Tue, 01/06/2015 - 12:25  ·  लेख
लेख
नेहमीप्रमाणेच टीपी करण्याकरता भगवान शंकर आणि पार्वती त्यांच्या स्पेशल चार्टर्ड विमानातून चालले होते. पार्वती आपली नेहमीप्रमाणेच निरागसतेने विचारती झाली- "भगवान, या कलियुगात स्त्रियांना चार घटका आनंदी, सुखी ठेवणारं असं काही व्रत आहे का?" भगवान ताबडतोब उत्तरले- "हो देवी. हल्लीच्या संगणक युगात या मिसळपाव नामे संस्थळाला फार महत्त्व आलय. आणि त्यात अनाहिता नामक एक अध्याय फक्त स्त्रियांसाठीच राखून ठेवलाय. तिथं त्या अगदी मनसोक्त गप्पा मारतात, नवीन मैत्रिणी करतात, त्यायोगे स्वतःचं ज्ञान वाढवतात आणि मनोरंजनही करून घेतात." पार्वती देवी म्हणाल्या - "भगवान, म्हणजे आताही स्त्री ने फक्त घरातूनच हे सारं करायचं का? तिने नाही बाहेर पडायचं?" भगवान गूढ हसले. - नेहमीप्रमाणेच. आपल्याला काय करायचंय? त्यांची ईस्टाईल. आणि म्हणाले- "खाली पहा देवी. हा मुंबईचा बहुचर्चित सरस प्रदर्शनाचा विभाग. इथे या अनाहितांपैकी मोक्षदा, सानिका, आरोही आणि सविता या चारच जणी आल्यात. पण कशा धुमाकूळ घालत आहेत ते बघ. आता या कलीयुगात त्याही चांगल्या चपळ झाल्यात. ही जी सविता दिसतेय ना, ती आणि तिची शेजारीण सानिका दोघींना वाटलं की त्यांची अजया ही मैत्रीण येत नाहीये तर आपण पण रहित करूया का आजचा बेत? तर नाही. आरोही नावाची मैत्रीण येतेय म्हटल्यावर या भल्या पहाटे मुलुंड नामक स्थानकावर फक्त १५ दिवसांच्या अंतराने भेटल्या असल्या तरी अशा काही भेटल्यात की जणू मागच्या जन्मानंतर आजच भेटतायत. बसल्या गाडीत, पुढे रिक्षा आणि सगळे स्टॉल उघडण्यासाठी या दोघी हजर. नंतर आरोहीला फोन करून कुठेशी आलीस, लौकर ये वगैरे सांगून त्या बिचार्‍या मोक्षदाताईंना कॅन्सल झाला असं वाटलेला बेत - या हो, आम्ही आहोत असं या दोघींनी सांगून त्यांनाही कामाला लावलं. बरं देवी... आता तुला मोक्षदाताईंची दया येतेय का? तर तसं काही नाही. सविताने फोन केल्याकेल्या - अगबाई- भेटतोय का आपण? ही आलेच मी अर्ध्या तासात म्हणून याच तिघींसाठी ताज्या चकल्यांचा घाणा तळायला घेतला.घरातल्यांसाठी दोन भाज्या दणादण फोडणीला टाकून या तिघींसाठी चकल्या घेऊन बाई हजर आहे बघ कट्ट्याला." पार्वतीदेवी: "भगवान, पण कट्टा?? तुम्हीतर प्रदर्शन आहे म्हणालात ना?" शंकर भगवानः "हो देवी. पण या साळकाया माळकाया जिथे भेटतात त्या ठिकाणाला त्या कट्टा असे संबोधतात." पार्वतीदेवी- "ओह, आय सी.. "(आता हे दोघे आधुनिक झालेत.उगीच काय च्या काय शंका काढू नयेत्,इंग्लीश कसे बोलतात वगैरे.. उत्तरे मिळणार नाहीत. Wink ) शंकर भगवान: "मी ऑटो गिरकी मोडवर ठेवलंय विमान. तू पहा आता खाली. मी निवांत बसतो आता." (लोगों- ये देखो टिपिकल नवरा- शॉपिंग सहन ही नहीं कर सकता!!!) पार्वतीदेवी: "बापरे-या सानिका, सविता तर बांगड्या, गळ्यातलं असं काही दिसलं तर जरा सोडत नाहीयेत. काय बाई तरी हा सोस..आमच्यावेळी नव्हतं बाई असं काही प्रदर्शन वगैरे.. अरेच्च्या- ही आरोही पण आली. झालं साड्या, ड्रेसेस, दागिने, मातीची भांडी, शोभेच्या वस्तू, मसाले, चटण्या, लोणची.. किती किती पहातायत.. घेणार आहेत की नाही कोण जाणे.. हं मोक्षदाताईंची वाट पहात होत्या होय? आल्या आल्या त्या. बाई बाई, किती ही लगबग? बरोबरच आहे पण. सख्यांना भेटायचंय ना.. हुश्श! भेटल्या चौघी जणी. अरे- हे काय? आधी पोटोबा. खमंग चकलीच फडशा पाडला आधी यांनी. आणि आता- ही खरेदीची धूमशान चालू झालीये. किती सुंदर बांगड्या, कानातली घेतायत या कारट्या!!! मस्तच. शिवाय कोकणी, कोल्हापुरी, मालवणी, खानदेशी मसाले, चटण्या, रोस्टेड ज्वारी, बाजरी, मँगो शेवया.. झाला वाटतं कट्टा! नाही नाही- या चौघी निघाल्या सोलकढी आणि ताक प्यायला. शिवाय हुरड्याचं थालीपीठ. एवढी खरेदी केल्यावरती लागणारच ना तहान? आता चालल्या या सगळे फूड स्टॉल धुंडाळत. कुठे काय मिळतं म्हणून. म्हणजे मेजवानी वाटतं आता.. अगबाई-या निघाल्या की परत खरेदीला. कित्ती एन्जॉय करतायत.. आणि टकळी चालू चौघींची. कमाल आहे. पाय दमलेत पण तोंड चालू गप्पांसाठी. आहा- आता ती सानिका साडी घेतेय, शो पीसेस घेतेय, पर्सेस घेतेय आणि जिला ढिम्म काटकसर करता येत नाही ती सविता तिला भाव कसे कमी कर याच्या टिप्स देतेय.वा रे वा- हे म्हणजे अजबच आहे आणि सानिकाला त्या भावात वस्तू मिळ्तायत पण. झकास. इकडे ही आरोही आणि मोक्षदाताईंच मातीच्या भांड्यांबद्द्ल मौकिल निरिक्षण चालू आहे. बाई बाई- सगळे लोक अलिकडे ते नॉन स्टीक घेतायत आणि या चालल्या अश्मयुगाकडे. पण सुधारताहेत हो माझ्या पोरी. आय अ‍ॅम फीलींग सो नाईस. आता चालल्या खादाडी प्रोग्रॅमला. वा वा- अगदी देशी मेनू घेताहेत. भाकरी, ठेचा, मासवडी - रस्सा, मटकी उसळ, मेथीची भाजी आणि नंतर चक्क वाफाळते उकडीचे मोदक. अगदी मस्त आनंदात चालू आहे प्रोग्रॅम. आणि सततचं वाक्य काय चौघींच? चला बाई- हात अगदी भरून आलेत. पोटात आणि पोतडीत अज्जिबात जागा नाही. आणि तरीही परत या खरेदीकडे.. आता मातीची भांडी घेतली. आता काही झालं तरी घरची आठवण ठेवतात हो माझ्या पोरी.. अगदी खमंग, गरमागरम खानदेशी मांडे घेतलेत पार्सल करून. कशा गुणाच्या आहेत. अरे- सकाळी १० ते संध्याकाळी ५ असा वेळ या चौघींनी किती सुंदर घालवयाय!! आय जस्ट एन्वी देम! गेल्या सगळ्या आपापल्या दिशेने.. भगवान, मी काय म्हणते, ऐकलं का??????? (टिपिकल बायको वाक्य)" शंकर भगवानः हं???????????? (टिपिकल नवरा वाक्य) पार्वती देवी: मी की नाही गडे, स्वर्गात गेल्यागेल्या एक कट्टा करावाच म्हणते आमच्या सगळ्या देवी ग्रूपचा. व्हॉट से??????? शंकर भगवान: ओह माय मॅन.........
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
कला
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
बातमी
अनुभव

प्रतिक्रिया द्या
20933 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

मस्त खुसखुशीत व्रुतांत....

मुक्त विहारि
Tue, 01/06/2015 - 12:31 नवीन
आवडला...
  • Log in or register to post comments

+१

दिपक.कुवेत
Wed, 01/07/2015 - 17:27 नवीन
सहिच्च आहे लिखाणाची ईस्टाईल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

वा मस्तच

कविता१९७८
Tue, 01/06/2015 - 12:32 नवीन
काही कारणास्त्व मी मिसला कट्टा पण छानच झालेला दिसतोय.
  • Log in or register to post comments

आई ग्ग!! जळजळ झाली आहे.

स्पंदना
Tue, 01/06/2015 - 12:33 नवीन
आई ग्ग!! जळजळ झाली आहे. कधी मिळणार अस खायला आणी हुंदडायला?
  • Log in or register to post comments

लय भारी आवडेश

पियुशा
Tue, 01/06/2015 - 14:38 नवीन
लय भारी आवडेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

उम्म्म

इरसाल
Tue, 01/06/2015 - 16:37 नवीन
फोटो नाय काय नाय. कसली जळ्जळ झाली. तुमचं आपलं काय तरीच ब्वॉ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

वृत्तांत आवडला; शैली मस्त आहे

आतिवास
Tue, 01/06/2015 - 13:01 नवीन
वृत्तांत आवडला; शैली मस्त आहे!
  • Log in or register to post comments

सव्या ss कस्सला भारी वृ

सस्नेह
Tue, 01/06/2015 - 13:07 नवीन
सव्या ss कस्सला भारी वृ पाडलायस *smile*
  • Log in or register to post comments

आता कट्टाप्रेमी बाजीराव

कंजूस
Tue, 01/06/2015 - 13:13 नवीन
आता कट्टाप्रेमी बाजीराव डोळ्यात जीवदया नेत्रप्रभा अथवा जाई काजळ घालून भोलेनाथास तीर्थाभिषेक करवणार. आम्हाला पाव.
  • Log in or register to post comments

सवि भीमथडीला खाऊन झाले बरेच.

त्रिवेणी
Tue, 01/06/2015 - 13:30 नवीन
सवि भीमथडीला खाऊन झाले बरेच. सो कमी जळजळ झाली.
  • Log in or register to post comments

मस्त वॄत्तांत सविता.मस्त

इशा१२३
Tue, 01/06/2015 - 13:31 नवीन
मस्त वॄत्तांत सविता.मस्त खादाडि,मज्जा केलीत.
  • Log in or register to post comments

सवि मस्त लिहिलयेस ग वृत्तांत

आरोही
Tue, 01/06/2015 - 13:33 नवीन
सवि मस्त लिहिलयेस ग वृत्तांत ..जेवढी मज्जा कट्ट्याला आली त्यापेक्षा जास्त वृत्तांत वाचताना आली ........जबरदस्त !!
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

पैसा
Tue, 01/06/2015 - 13:37 नवीन
मस्त लिहिलंय! हे सगळे कट्टे बहुगुणींच्या जिओ मिपावर पण अपडेट करा!
  • Log in or register to post comments

चकलीसारखा खुसखुशित आणि खमंग

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 01/06/2015 - 13:38 नवीन
चकलीसारखा खुसखुशित आणि खमंग वृत्तांत ! :)
  • Log in or register to post comments

ओ शंकर राव

चौकटराजा
Tue, 01/06/2015 - 13:56 नवीन
त्यायोगे स्वतःचं ज्ञान वाढवतात ओ, शंकरराव हे काय बोलताय म्हणे ज्ञान वाढवतात ? बाकी आमच्या सौ ला सुद्धा अशा कट्ट्याला पाठविले पाहिजे म्हणजे ज्या बांगड्या, पिना, लिपस्टीका,,,,,,अन पाच पन्नास आणखी काही काही प्रकार ! तिची किंवा माझी " तुला" करायला मस्त मटीरियल ! ,
  • Log in or register to post comments

छान !

मदनबाण
Tue, 01/06/2015 - 13:59 नवीन
छान ! टिपीकल अनाहिती लेखन ! *LOL* तरी अशा काही भेटल्यात की जणू मागच्या जन्मानंतर आजच भेटतायत. बरं एव्हढं घट्ट प्रेम आहे की काही वाक्यातल आपापसातल प्रेम दिसुन येतच.... { प्रेम अस लिहुन ठेवतो बरं का त्या प्रत्येक वाक्या समोर} *LOL* अगबाई कॉमण फ्रेज विथ आउट थीस दे कॅन नॉट स्टार्ट एणी कम्युणिकेशन यू नो ! *LOL* बांगड्या, गळ्यातलं असं काही दिसलं तर जरा सोडत नाहीयेत { प्रेम } काय बाई तरी हा सोस { प्रेम } किती किती पहातायत एव्हरी वर्ड ट्वाइस दॅट इज स्पेश्यल खासियत बरं का मंडळी ! *LOL* सुंदर बांगड्या, कानातली घेतायत या कारट्या!!! { प्रेम } टकळी चालू चौघींची. कमाल आहे. { प्रेम } पाय दमलेत पण तोंड चालू गप्पांसाठी. { प्रेम } जिला ढिम्म काटकसर करता येत नाही ती सविता तिला भाव कसे कमी कर याच्या टिप्स देतेय { प्रेम } सानिकाला त्या भावात वस्तू मिळ्तायत पण. { प्रेम } आय अ‍ॅम फीलींग सो नाईस इंग्रजीचा वापर केल्या शिवाय कम्युणिकेशनला हुच्च्भ्रू टच नाही देता येत हे यावरुन सिद्ध होत ! *LOL* पॉइंट टु नोट :- "ए मुलींनो इज रिप्लेस्ड बाय "हो माझ्या पोरी" चला आता कलटी मारावी... :P

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India will have to be prepared for a two-front war: Air Marshal PP Reddy
  • Log in or register to post comments

अरे भाई कहना क्या चाहते हो???

पिलीयन रायडर
Tue, 01/06/2015 - 14:23 नवीन
अरे भाई कहना क्या चाहते हो???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

माई अपको सच्च्ची-मुच्ची

मदनबाण
Tue, 01/06/2015 - 14:29 नवीन
माई अपको सच्च्ची-मुच्ची समझ्या नयं ? की समझ के भी नयं समझ्या ऐसा दिखाने का हयं ? :P यह एक लिखावट की टेंप्लेट हय.. इस में थोडा-फार इधर उधर शब्द बदल्या की नया लेखन हो सकता हयं... अरे मुलांनो... वाचतायना तुम्ही ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India will have to be prepared for a two-front war: Air Marshal PP Reddy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

सगळ्याचंच टेम्प्लेट असतय हो..

पिलीयन रायडर
Wed, 01/07/2015 - 11:27 नवीन
सगळ्याचंच टेम्प्लेट असतय हो... जसं की... १. ब्लाह ब्लाह ब्लाह.... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- असंच काय बाय २. फोटो टाकले असते तर काही हरकत नव्हती... ख्या ख्या ख्या.... बाकी छान झालाय कट्टा... ख्या ख्या ख्या... ३. फोटो नाहीत? मग खयाली पुलावच म्हणायचा की काय हा... वगैरे वगैरे टेम्प्लेट प्रतिक्रिया नै का देत लोक अनाहितांच्या धाग्यावर?!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

हि तुमची "टिपीकल" प्रतिक्रिया

टवाळ कार्टा
Wed, 01/07/2015 - 11:40 नवीन
हि तुमची "टिपीकल" प्रतिक्रिया म्हणायची का :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

जीभ बाहेर काढणारी स्मायली ही

पिलीयन रायडर
Wed, 01/07/2015 - 12:16 नवीन
जीभ बाहेर काढणारी स्मायली ही जशी "टिपीकल" प्रतिक्रिया तुमची.... तशीच आमची....!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अनाहितामध्ये अस्से सगळ्ळे

टवाळ कार्टा
Wed, 01/07/2015 - 10:30 नवीन
अनाहितामध्ये अस्से सगळ्ळे गोग्गोड बघून ड्वाळे पाणावळे...म्हैला जर इतक्या गोडीगुलाबीने वागतात तर हा कट्टा म्हणजे नक्कीच "मनाचे श्लोक" आहे :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अय्या हो?????????

सविता००१
Wed, 01/07/2015 - 11:06 नवीन
कुणाच्या मनाचे???? तुम्हाला लग्गेच कळलं हो अगदी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

(No subject)

कविता१९७८
Wed, 01/07/2015 - 12:51 नवीन
*lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता००१

'चोराच्या मनात चांदणे' ही

सस्नेह
Wed, 01/07/2015 - 14:53 नवीन
'चोराच्या मनात चांदणे' ही म्हण आठवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता००१

वूमन!

एस
Tue, 01/06/2015 - 14:00 नवीन
ओह माय वूमन असं म्हणायचं का मग आम्ही? :-) काय मस्त लिहिलंय. वा!
  • Log in or register to post comments

भारी लिहिलाय वृत्तांत!मजा आली

अजया
Tue, 01/06/2015 - 14:01 नवीन
भारी लिहिलाय वृत्तांत!मजा आली वाचायला.सव्या भाई जोमात शंकर भगवान कोमात =)) रच्याकने:पूणे कट्टा मिसलात त्याची जळजळ अशी मजा करुन कमी करताय काय!!इनो घेऊन घरी गप पडुन राहायचं ते नाही.गेल्या लगेच मला जळवायला *beee*
  • Log in or register to post comments

मस्त लिहिला आहे वृ! काही

यशोधरा
Tue, 01/06/2015 - 14:09 नवीन
मस्त लिहिला आहे वृ! काही जणांची भलतीच जळजळ झालेली दिसते! बिना टारगेट बाण मारत सुटलेत ते! =))
  • Log in or register to post comments

यशो बाडिस

अजया
Tue, 01/06/2015 - 14:22 नवीन
यशो बाडिस =))
  • Log in or register to post comments

बाण अचूक लागले की मगच त्याचा

मदनबाण
Tue, 01/06/2015 - 14:23 नवीन
बाण अचूक लागले की मगच त्याचा उल्लेख करावासा वाटतो... असो चालु ध्या हाय हॅल्लो ! :P

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India will have to be prepared for a two-front war: Air Marshal PP Reddy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

बलं, बलं. आपण सव्यातैचं घर

यशोधरा
Tue, 01/06/2015 - 14:29 नवीन
बलं, बलं. आपण सव्यातैचं घर बांधू हं सरसच्या उन्हात. जाते ती जाते आणि वर वृ लिहिते म्हंजे काय? वाऽऽ गं सव्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

उगी ! उगी ! अशं हट्टी पणा नै

मदनबाण
Tue, 01/06/2015 - 14:30 नवीन
उगी ! उगी ! अशं हट्टी पणा नै करायच,,, *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India will have to be prepared for a two-front war: Air Marshal PP Reddy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

तेच तर सांगतेय तुला.

यशोधरा
Tue, 01/06/2015 - 14:32 नवीन
तेच तर सांगतेय तुला. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आरशात पाहुन स्वतःशी बोलायची

मदनबाण
Tue, 01/06/2015 - 14:34 नवीन
आरशात पाहुन स्वतःशी बोलायची सवय गेलेली दिसत नयं वाट्ट ! *LOL* :P

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India will have to be prepared for a two-front war: Air Marshal PP Reddy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

स्वतःवरुन जगाची परीक्षा करु

यशोधरा
Tue, 01/06/2015 - 14:37 नवीन
स्वतःवरुन जगाची परीक्षा करु नकोस रे बाणा. तुला असणार्‍या सवयी इतरांना नसतात आरशात बघून बोलायच्या. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

स्वतःवरुन जगाची परीक्षा करु

मदनबाण
Tue, 01/06/2015 - 14:39 नवीन
स्वतःवरुन जगाची परीक्षा करु नकोस रे बाणा. तुला असणार्‍या सवयी इतरांना नसतात आरशात बघून बोलायच्या. जरा नविन विनोद सांगा हो काकू... हा जुना झाला बरं का ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India will have to be prepared for a two-front war: Air Marshal PP Reddy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

विनोद नव्हताच. तुला विनोद

यशोधरा
Tue, 01/06/2015 - 14:40 नवीन
विनोद नव्हताच. तुला विनोद वाटला म्हंजे.. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बरं बॉ... तुमचच खरं...

मदनबाण
Tue, 01/06/2015 - 14:43 नवीन
बरं बॉ... तुमचच खरं... बास्स्स्स... :P उगा शब्दाला शब्द वाढवत नाय म्या... जराशी टिंगली केली एव्हढच ! :P

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India will have to be prepared for a two-front war: Air Marshal PP Reddy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

ओक्के. :)

यशोधरा
Tue, 01/06/2015 - 14:46 नवीन
चालायचंच की बाण्या. तुला काय आज ओळखते काय? :) तुला जे जमतं तेच तू करणार की नै... :P (पळाऽऽऽ)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

इथे उगाच कशाला बोलत आहात समजत

विशाखा राऊत
Tue, 01/06/2015 - 14:57 नवीन
इथे उगाच कशाला बोलत आहात समजत नाहि. चांगले बोलायला जड जाते का???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

म्हैलांची क्यॅसेट एकाच जागी

टवाळ कार्टा
Wed, 01/07/2015 - 10:31 नवीन
म्हैलांची क्यॅसेट एकाच जागी अडकलेली असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

तुमची क्येसट्च अडकत आहे हल्ली

विशाखा राऊत
गुरुवार, 01/08/2015 - 04:08 नवीन
तुमची क्येसट्च अडकत आहे हल्ली सगळीकडे त्याचे जरा बघा नीट.. मग उपदेश चालु करा... बाकी विनोद आवडला ना???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

इस्कटून सांगा की जरा...माझी

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/08/2015 - 09:36 नवीन
इस्कटून सांगा की जरा...माझी क्यॅसेट कशी आणि कुठे अडकली आहे ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा राऊत

म्हैला म्हणता तेव्हाच अडते

विशाखा राऊत
Fri, 01/09/2015 - 04:06 नवीन
म्हैला म्हणता तेव्हाच अडते तुमची क्यॅसेट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

इथे पण विनोद. अरे देवा.

त्रिवेणी
Tue, 01/06/2015 - 14:55 नवीन
इथे पण विनोद. अरे देवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

थांब थांब!

पैसा
Tue, 01/06/2015 - 17:47 नवीन
विनोदचा सख्खा मित्र फिरकला नाय अजून इकडे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

कोण ग तायडे?

त्रिवेणी
Tue, 01/06/2015 - 17:57 नवीन
कोण ग तायडे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

यशो,

सविता००१
Tue, 01/06/2015 - 14:23 नवीन
येउदेत गं हव्वे तेवढे बाण!!!! त्यात काय एवढं????? :)
  • Log in or register to post comments

सविता

कविता१९७८
Tue, 01/06/2015 - 14:52 नवीन
येउच देत गं , असे खोचक प्रतिसाद आल्याने तुझे लेखन कीती उत्कृष्ट झालंय याला सहमती मिळतीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता००१

रोचक चर्चा!!

सूड
Tue, 01/06/2015 - 14:49 नवीन
रोचक चर्चा!!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा