✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सहज..

अ — अत्रुप्त आत्मा, गुरुवार, 01/01/2015 - 11:40
https://lh4.googleusercontent.com/-SlYwf_I5qkM/VKKOxOhFBGI/AAAAAAAAGoo/bWGXNKJWhdU/w326-h580-no/https%253A%252F%252Flh6.googleusercontent.com%252F3Il92l88Ww_O5tbjFoNYzLAkiCz4u-_2HvN22m-XOe0%253Ds0-d जाळ्यावर विणले जाळे शब्दांनी कसंरतं केली. मी काहि केले नाही अन्,सहजी कविता झाली. ना शब्द रंग रस गंध ना प्रतिकांचे प्रतिबंध. तालातून जुळता सांधा लाभला तिला स्वच्छंद! मी आशा का ठेवावी? की कविता ऐशिच व्हावी! जाणून अलंकारांची का प्रीती मी तीज द्यावी??? तिज वहात जाणे आहे त्या संथ नदीच्या काठी. शब्दांच्या लाटा येता मग पडती सहजी गाठी. भेटेल तिलाही कधितरि.. तो समुद्र..वहाता वहाता.. कवितेचा सिंधूसागरं शब्दांचा प्राक्तन दाता. तोवरी तिच्याही नशिबी हे वहाणे निश्चित आहे. या वाहात्या शाश्वततेचा मी सहप्रवासी आहे. ============== . अतृप्त..

प्रतिक्रिया द्या
12616 वाचन

💬 प्रतिसाद (37)

तिज वहात जाणे आहे

सस्नेह
गुरुवार, 01/01/2015 - 12:17 नवीन
तिज वहात जाणे आहे त्या संथ नदीच्या काठी. शब्दांच्या लाटा येता मग पडती सहजी गाठी. सुंदर !
  • Log in or register to post comments

गुर्जी आता तांब्या-संप्रदाय

सस्नेह
Fri, 01/02/2015 - 10:43 नवीन
गुर्जी आता तांब्या-संप्रदाय सोडून इकडेच स्थायिक व्हावे ही इणंति ! *biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

अता काही हरकत नाही तशीही.

प्रचेतस
Fri, 01/02/2015 - 10:58 नवीन
अता काही हरकत नाही तशीही. त्यांचा बॅटन आता टवाळजी कार्टा यांजकडे आहे म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

दू...दू...दू

टवाळ कार्टा
Fri, 01/02/2015 - 15:24 नवीन
दू...दू...दू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

दूदू चितळे मध्ये हां बाळा,

सूड
Fri, 01/02/2015 - 15:45 नवीन
दूदू चितळे मध्ये हां बाळा, इथे फक्त मिसळ!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

विनंती स्विकारण्यात येत आहे.

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/02/2015 - 11:49 नवीन
विनंती स्विकारण्यात येत आहे. :) __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

बुवांचे "प्रतिमा पुनर्निमाण"

सतिश गावडे
Fri, 01/02/2015 - 11:57 नवीन
बुवांचे "प्रतिमा पुनर्निमाण" यशस्वी झाले आहे असे म्हणावयास अत्ता हरकत नसावी. त्यांच्या "तांब्या"ला जो उत्तराधिकारी लाभला आहे तोही आपल्या गुरुच्याच तोडीचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अरेच्या

नाखु
Fri, 01/02/2015 - 12:40 नवीन
आपल्या गुरुच्याच तोडीचा आहे. मी चूकून ताडीचा असे वाचले (कंपनीला सांगून मानिटर बदलू काय?) मूळ अवांतर. भ्रमर कवीचा शब्द-गुलकंद "छान" आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

मी चूकून ताडीचा असे वाचले

टवाळ कार्टा
Fri, 01/02/2015 - 15:26 नवीन
मी चूकून ताडीचा असे वाचले (कंपनीला सांगून मानिटर बदलू काय?)
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

नाय ब्बॉ...गुर्जींनी लाईन

टवाळ कार्टा
Fri, 01/02/2015 - 15:25 नवीन
नाय ब्बॉ...गुर्जींनी लाईन बदलली...आता मी पण :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अस्सं कस्सं अस्सं कस्सं.

प्रचेतस
Fri, 01/02/2015 - 15:27 नवीन
अस्सं कस्सं अस्सं कस्सं. अता एखादा नविन उत्तराधिकारी मिळाल्याशिवाय हे होणे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सदर चर्चेची गरज भागविण्यासाठि

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/02/2015 - 16:11 नवीन
सदर चर्चेची गरज भागविण्यासाठि आता ट.का. यांचेच धाग्यावर जाण्याचे करावे,अशी नम्र विनंती! ___/\___/\___/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

व्वा बुवा मस्त....

मुक्त विहारि
गुरुवार, 01/01/2015 - 12:19 नवीन
"तोवरी तिच्याही नशिबी हे वहाणे निश्चित आहे. या वाहात्या शाश्वततेचा मी सहप्रवासी आहे." झक्कास
  • Log in or register to post comments

वाह!सहज सुन्दर!

चुकलामाकला
गुरुवार, 01/01/2015 - 15:16 नवीन
वाह!सहज सुन्दर!
  • Log in or register to post comments

वा! बुवा!

पैसा
गुरुवार, 01/01/2015 - 16:58 नवीन
फारच सुंदर जमलीय कविता!
  • Log in or register to post comments

फार छान कविता.अावडली.

अजया
गुरुवार, 01/01/2015 - 17:32 नवीन
फार छान कविता.अावडली.
  • Log in or register to post comments

छान कविता !!!

सतिश गावडे
गुरुवार, 01/01/2015 - 17:37 नवीन
छान कविता !!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम

प्रचेतस
गुरुवार, 01/01/2015 - 20:05 नवीन
कविता अतिशय आवडली. खूप सहज लिहिता तुम्ही.
  • Log in or register to post comments

मीटरमंदी

तिमा
गुरुवार, 01/01/2015 - 20:12 नवीन
____/\____ सुंदर.
  • Log in or register to post comments

काय मस्त जमवता कवितासुद्धा

कंजूस
गुरुवार, 01/01/2015 - 21:39 नवीन
काय मस्त जमवता कवितासुद्धा
  • Log in or register to post comments

तिज वहात जाणे आहे

यशोधरा
Fri, 01/02/2015 - 05:48 नवीन
तिज वहात जाणे आहे त्या संथ नदीच्या काठी. शब्दांच्या लाटा येता मग पडती सहजी गाठी. तोवरी तिच्याही नशिबी हे वहाणे निश्चित आहे. या वाहात्या शाश्वततेचा मी सहप्रवासी आहे.
वा! वा!
  • Log in or register to post comments

मस्तं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/02/2015 - 08:23 नवीन
मस्तं
  • Log in or register to post comments

सुंदर...

मदनबाण
Fri, 01/02/2015 - 10:54 नवीन
सुंदर...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- China builds lighter tanks for Tibet border Pakistan should be ready for collateral damages if they fire: BSF Russia looks to boost defence ties with India Final tally: Taxpayers auto bailout loss $9.3B Auto bailout cost the US goverment $9.26B Analysts foresee bad year for U.S. government bonds Google Fiber services may launch in India soon Telcos to make tough calls as spectrum war heats up
  • Log in or register to post comments

वाह वाह ! असच लिहत राहा

पियुशा
Fri, 01/02/2015 - 11:03 नवीन
वाह वाह ! असच लिहत राहा :)
  • Log in or register to post comments

तिज वहात जाणे आहे

स्पंदना
Fri, 01/02/2015 - 11:08 नवीन
तिज वहात जाणे आहे त्या संथ नदीच्या काठी. शब्दांच्या लाटा येता मग पडती सहजी गाठी.
हॅटस ऑफ आत्मुस!!
  • Log in or register to post comments

ताम्रपात्रजनित तैलपक्व

बॅटमॅन
Fri, 01/02/2015 - 11:44 नवीन
ताम्रपात्रजनित तैलपक्व शर्करावगुंठित पाकचक्रिका बनवण्याऐवजी अशा कविता जास्त आवडतात. (याचा अर्थ त्या तैलपाकचक्रिका बनवू नयेत असा नाही ;) )
  • Log in or register to post comments

अग्गाग्गाग्गा !

सस्नेह
Fri, 01/02/2015 - 12:04 नवीन
ताम्रपात्रजनित तैलपक्व शर्करावगुंठित पाकचक्रिका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तैलपक्व आवडत नाहीत तूपपक्व

स्पंदना
Fri, 01/02/2015 - 13:46 नवीन
तैलपक्व आवडत नाहीत तूपपक्व आवडतात. :)))) बॅटॅ.....आर्र्र कुट नेउन ठिवली जिल्बी माजी??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

चला मग घृतपाकचक्रिका. कढईत

बॅटमॅन
Fri, 01/02/2015 - 13:57 नवीन
चला मग घृतपाकचक्रिका. कढईत काही तळताना दिसले की 'तैल'बुद्धीच होते, त्याला इलाज नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

दिसले जर काही तळताना

सतिश गावडे
Fri, 01/02/2015 - 14:41 नवीन
दिसले जर काही तळताना मला तेल नेहमी आठवते झाली सवय मना माझ्या अहो त्याला इलाज नाही दिसता कविता हो बुवांची मज वाटे तसली जिलबी जरी असे ती सुंदर कविता अहो त्याला इलाज नाही तुम्ही कितीही नाके मुरडा अन ठेवा कितीही नावे थांबे न तांब्या संप्रदाय अहो त्याला इलाज नाही जोडी र ला र, ट ला ट पाडीती कितीतरी जिलब्या मजसारखे ते "रटा"ळ कवी अहो त्याला इलाज नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सुर्सुरी सुर्सुरी!!!!!!!!

बॅटमॅन
Fri, 01/02/2015 - 14:50 नवीन
सुर्सुरी सुर्सुरी!!!!!!!! दाबणे जरा अवघड होत चालले आहे आता हे प्रतिभाविष्कार पाहून ;) मस्त रे धन्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

धनाजिराव का जव्वाब नहीं!

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/02/2015 - 15:15 नवीन
धनाजिराव का जव्वाब नहीं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काय?

टवाळ कार्टा
Fri, 01/02/2015 - 15:27 नवीन
काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(No subject)

अजया
Fri, 01/02/2015 - 16:20 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

वाह, क्या बात है गुर्जी

विशाल कुलकर्णी
Fri, 01/02/2015 - 11:54 नवीन
वाह, क्या बात है गुर्जी :)
  • Log in or register to post comments

वा बुवा !!

बाळ सप्रे
Fri, 01/02/2015 - 15:20 नवीन
वा बुवा !!
  • Log in or register to post comments

छान कविता गुरूजी

प्यारे१
Fri, 01/02/2015 - 16:30 नवीन
छान कविता गुरूजी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा