Skip to main content

सहज..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 01/01/2015 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
https://lh4.googleusercontent.com/-SlYwf_I5qkM/VKKOxOhFBGI/AAAAAAAAGoo/bWGXNKJWhdU/w326-h580-no/https%253A%252F%252Flh6.googleusercontent.com%252F3Il92l88Ww_O5tbjFoNYzLAkiCz4u-_2HvN22m-XOe0%253Ds0-d जाळ्यावर विणले जाळे शब्दांनी कसंरतं केली. मी काहि केले नाही अन्,सहजी कविता झाली. ना शब्द रंग रस गंध ना प्रतिकांचे प्रतिबंध. तालातून जुळता सांधा लाभला तिला स्वच्छंद! मी आशा का ठेवावी? की कविता ऐशिच व्हावी! जाणून अलंकारांची का प्रीती मी तीज द्यावी??? तिज वहात जाणे आहे त्या संथ नदीच्या काठी. शब्दांच्या लाटा येता मग पडती सहजी गाठी. भेटेल तिलाही कधितरि.. तो समुद्र..वहाता वहाता.. कवितेचा सिंधूसागरं शब्दांचा प्राक्तन दाता. तोवरी तिच्याही नशिबी हे वहाणे निश्चित आहे. या वाहात्या शाश्वततेचा मी सहप्रवासी आहे. ============== . अतृप्त..
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 12694
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

तिज वहात जाणे आहे त्या संथ नदीच्या काठी. शब्दांच्या लाटा येता मग पडती सहजी गाठी. सुंदर !

In reply to by अत्रुप्त आत्मा

बुवांचे "प्रतिमा पुनर्निमाण" यशस्वी झाले आहे असे म्हणावयास अत्ता हरकत नसावी. त्यांच्या "तांब्या"ला जो उत्तराधिकारी लाभला आहे तोही आपल्या गुरुच्याच तोडीचा आहे.

In reply to by सतिश गावडे

आपल्या गुरुच्याच तोडीचा आहे. मी चूकून ताडीचा असे वाचले (कंपनीला सांगून मानिटर बदलू काय?) मूळ अवांतर. भ्रमर कवीचा शब्द-गुलकंद "छान" आहे

In reply to by प्रचेतस

सदर चर्चेची गरज भागविण्यासाठि आता ट.का. यांचेच धाग्यावर जाण्याचे करावे,अशी नम्र विनंती! ___/\___/\___/\___

"तोवरी तिच्याही नशिबी हे वहाणे निश्चित आहे. या वाहात्या शाश्वततेचा मी सहप्रवासी आहे." झक्कास

कविता अतिशय आवडली. खूप सहज लिहिता तुम्ही.

तिज वहात जाणे आहे त्या संथ नदीच्या काठी. शब्दांच्या लाटा येता मग पडती सहजी गाठी. तोवरी तिच्याही नशिबी हे वहाणे निश्चित आहे. या वाहात्या शाश्वततेचा मी सहप्रवासी आहे.
वा! वा!

मस्तं

तिज वहात जाणे आहे त्या संथ नदीच्या काठी. शब्दांच्या लाटा येता मग पडती सहजी गाठी.
हॅटस ऑफ आत्मुस!!

ताम्रपात्रजनित तैलपक्व शर्करावगुंठित पाकचक्रिका बनवण्याऐवजी अशा कविता जास्त आवडतात. (याचा अर्थ त्या तैलपाकचक्रिका बनवू नयेत असा नाही ;) )

In reply to by स्पंदना

चला मग घृतपाकचक्रिका. कढईत काही तळताना दिसले की 'तैल'बुद्धीच होते, त्याला इलाज नाही. ;)

In reply to by बॅटमॅन

दिसले जर काही तळताना मला तेल नेहमी आठवते झाली सवय मना माझ्या अहो त्याला इलाज नाही दिसता कविता हो बुवांची मज वाटे तसली जिलबी जरी असे ती सुंदर कविता अहो त्याला इलाज नाही तुम्ही कितीही नाके मुरडा अन ठेवा कितीही नावे थांबे न तांब्या संप्रदाय अहो त्याला इलाज नाही जोडी र ला र, ट ला ट पाडीती कितीतरी जिलब्या मजसारखे ते "रटा"ळ कवी अहो त्याला इलाज नाही

In reply to by सतिश गावडे

सुर्सुरी सुर्सुरी!!!!!!!! दाबणे जरा अवघड होत चालले आहे आता हे प्रतिभाविष्कार पाहून ;) मस्त रे धन्या.