शरिराला आपण बरेच वेळा "कसले काय? " समजून -टेकन फॉर ग्रॅंटेड समजून-नकळत त्या शरिरावर अत्याचार करीत असतो.परिणाम ज्याचे त्याला भोगावे लागतात.समजून उमजून हे असं होतच असतं.त्याची केव्हा उमज येणार?
आपण करतो वेळेची वसुली
वेळच करते आपुली वसुली
घेतो श्रम विसरुनी विश्रांती
करते वेळ वसुली विश्रांतीची
श्रम आणि विश्रांतीचा हा लपंडाव
करितो आपुल्या प्रकृतीचा पाडाव
देते शरिर इशारा अधून मधून
घेऊ काळजी शरिराची
त्या इशार्या मधून
ज्याच्या शरिरावर
होतो जो अत्याचार
त्याचा त्यालाच भोगावा
लागतो परिणाम
केल्यामुळे अविचार
सोडूया मोह आता
वेळेच्या वसुलीचा
आणि
विश्रांती विना श्रमाचा
अथवा पस्तावू
आनंद सुखाने जगण्याचा
श्रीकृष्ण सामंत
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2116
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवश्यक
आभार
In reply to आवश्यक by विसोबा खेचर
यंत्र
सहमत
In reply to यंत्र by अरुण मनोहर