Skip to main content

मराठी कविता

लेखक पुस्तकमित्र यांनी रविवार, 28/12/2014 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! थोड्याच शब्दात मोठा आशय सांगण्याची किमया फक्त कवितेत असते. मराठी भाषेला काव्याची अतिशय सुंदर परंपरा आहे. अमृतानुभव असू दे, तुकारामाची संतवाणी, अभंग पंत तंत काव्य ते केशवसुत, रे. टिळकांचा जमाना. त्या नंतरचा सावरकर, पुढे कुसुमाग्रज, बोरकर, बापट, विंदा, पाडगावकर, इंदिरा संत, नारायण सुर्वे ते ढसाळ, नायगावकर, म्हात्रे, संदिप खरे अश्या अनेक प्रकारच्या कवींनी मराठी वाङमय समृध्द केलंय. त्यातल्या तुम्हाला आवडणार्‍या कविता कोणत्या ते या भागात सांगायचंय. जमलं तर का आवडली कविता हे पण. आणि हो, नुसतेच कवितेचे नाव न देता थोड्या ओळी लिहु शकलात तर उत्तम! चला तर मग काव्यास्वाद घेऊ या. हा धागा मिपावरची कवितांची मैफल होऊन जाऊ द्या.
लेखनविषय:

वाचने 40956
प्रतिक्रिया 78

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

कवी मंगेश पाडगावकर! या निमित्ताने त्यांची अजून एक कविता: डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी कामांत गुंतलेले असतील हात दोन्ही तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी कळणार हाय नाही दुनिया तुला मला ही मी पापण्यांत माझ्या ही झाकिली विराणी

कोमेजून निजलेली एक परी राणी, उतरलेले तोंड, डोळां सुकलेले पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत, निजेतच तरी पण येशील खुशीत सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला.. दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला ! आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी रोज सकाळीस राजा निघताना बोले, गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले जमलेच नाही काल येणे मला जरी, आज परी येणार मी वेळेतच घरी स्वप्‍नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खर्‍याखुर्‍या परी साठी गोष्टीतली परी बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला.. दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला ! ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून तास-तास जातो खालमानेने निघून, एक-एक दिवा जातो हळूच विझून अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, आठवांसोबत पाणी डोळ्यांतून दाटे वाटते की उठुनिया तुझ्यापास यावे, तुझ्यासाठी मीही पुन्हा लहानगे व्हावे उगाचच रुसावे नी भांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी उधळत, खिदळत, बोलशील काही, बघताना भान मला उरणार नाही हासुनिया उगाचच ओरडेल काही, दुरूनच आपल्याला बघणारी आई तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा, क्षणा क्षणावर ठेवू खोडकर ठसा सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला.. दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला ! दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई, मऊमऊ दूधभात भरवेल आई गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी कुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही, सदोदित जरी का मी तुझ्या पासनाही जेवू-खाऊ न्हाऊ-माखू घालतो ना तुला, आई परी वेणीफणी करतो ना तुला तुझ्यासाठी आईपरी बाबा सुद्धा खुळा, तो ही कधी गुपचूप रडतो रे बाळा सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला.. दमलेल्या बाबाची या कहाणी तुला ! बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा लुटूलुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरचं पहात राहिलो फक्‍त, जवळ पहायचंच राहिलं असा गेलो आहे बाळा पुरा अडकून, हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून असा कसा बाबा देव लेकराला देतो, लवकर जातो आणि उशिरानं येतो बालपण गेले तुझे गुज निसटून, उरे काय तुझ्यामाझ्या ओंजळी मधून जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग ? मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग ? सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये, बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये ?

सदर धाग्यात (पुस्तकमित्र) खंड पडलेला दिसतो.पुन्हा सुरु व्हावा असे मनापासून वाटते.

सदर धाग्यात (पुस्तकमित्र) खंड पडलेला दिसतो.पुन्हा सुरु व्हावा असे मनापासून वाटते.

सदर धाग्यात (पुस्तकमित्र) खंड पडलेला दिसतो.पुन्हा सुरु व्हावा असे मनापासून वाटते.

सदर धाग्यात (पुस्तकमित्र) खंड पडलेला दिसतो.पुन्हा सुरु व्हावा असे मनापासून वाटते.

सदर धाग्यात (पुस्तकमित्र) खंड पडलेला दिसतो.पुन्हा सुरु व्हावा असे मनापासून वाटते.

अशाच एका तप्त दुपारी रोजच उठणाऱ्या अगणित प्रश्नांच्या मोहोळातून एक प्रश्न अल्लाद निसटला आणि तरंगत तरंगत एका निवांत पहुडलेल्या उत्तराशेजारी जाऊन विसावला (अपूर्ण) हा धागा वाचता वाचता सहज सुचलं. कोणाला पूर्ण करायचं असल्यास स्वागत . :-)