उ ठ तरुणा उठ आता
घडवु या नव भारता
गड्या रे घडउ या नवभारता
ही बघ भारत जननी
का अश्रु तिच्या त्या नयनी..?
ना कळे तुला रे अजुनी..?
का रडते वीरांगिनी...?
निर्लज्जा परी स्वस्थ कसा तू..?
तव मातेचे दुखः जाण तू
अश्रु आईच्या नयनीचे
चल उठ पुसू आता..
उठ तरुणा उठ आता
घडवू या नवभारता
याद कर भगतसिंगांची तू
आठव राजगुरु
धेय्या साठी आपण आपुल्या
मरु पुन्हा अवतरु
कुठे गेले ते गांधी आणिक
कुठे गेले ते नेहरु....?
हल्लीचे हे नव्हेत नेते
हे तर माथेफिरु
नकोत आम्हा उपदेश
किंवा नकोच कोणी नेता
अखंड भारत धेय्य आमुचे
आम्हा हवी एकता..!
उठ तरुणा उठ आता
घडवू या नवभारता
गड्यारे घडवू या नवभारता.....
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2245
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
उठ तरुणा उठ आता
उठ तरुणा उठ आता
सुरेख कविता
कसं जमतं ब्वॉ लिहायला हे असं
छान आहे .
तुम्ही ते मी माझा वाले
हेच म्हन्तो
In reply to तुम्ही ते मी माझा वाले by काळा पहाड