उ ठ तरुणा उठ आता
घडवु या नव भारता
गड्या रे घडउ या नवभारता
घडवु या नव भारता
गड्या रे घडउ या नवभारता
ही बघ भारत जननी
का अश्रु तिच्या त्या नयनी..?
ना कळे तुला रे अजुनी..?
का रडते वीरांगिनी...?
निर्लज्जा परी स्वस्थ कसा तू..?
तव मातेचे दुखः जाण तू
अश्रु आईच्या नयनीचे
चल उठ पुसू आता..
उठ तरुणा उठ आता
घडवू या नवभारता
याद कर भगतसिंगांची तू
आठव राजगुरु
धेय्या साठी आपण आपुल्या
मरु पुन्हा अवतरु
कुठे गेले ते गांधी आणिक
कुठे गेले ते नेहरु....?
हल्लीचे हे नव्हेत नेते
हे तर माथेफिरु
नकोत आम्हा उपदेश
किंवा नकोच कोणी नेता
अखंड भारत धेय्य आमुचे
आम्हा हवी एकता..!
उठ तरुणा उठ आता
घडवू या नवभारता
गड्यारे घडवू या नवभारता.....
वाचने
2261
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
उठ तरुणा उठ आता
तुमची कविता मला तरी आवड्ली. जरा उशिराने वाचली ,या कवितेला चाल लावयला हरकत नाही
उठ तरुणा उठ आता
तुमची कविता मला तरी आवड्ली. जरा उशिराने वाचली ,या कवितेला चाल लावयला हरकत नाही
सुरेख कविता
सुरेख कविता :)
कसं जमतं ब्वॉ लिहायला हे असं
कसं जमतं ब्वॉ लिहायला हे असं !!
छान आहे .
छान आहे .
पण लाल का केलं आहे ?
तुम्ही ते मी माझा वाले
तुम्ही ते मी माझा वाले चंद्रशेखर गोखले नाही ना?
हेच म्हन्तो
In reply to तुम्ही ते मी माझा वाले by काळा पहाड
आं