मौल्यवान खडे, त्यांचे दागिन्यांतील महत्व वा वापर, त्यांची पारख, खरेदी, व इतिहास याच्या ज्ञानाविषयी आपला आनंदी आनंदच आहे. म्हटलं इथे काही मर्गदर्शन मिळाले तर मदत होईल. हिरे सोडले तर बाकीच्या खड्यांबद्दल अंतरजाळावर सुद्धा वाचण्याची काही सोय नाही कारण त्यांचे विंग्रजी नावे माहित नाहीत, आणि जर अंदाजाने काही शोधले तर नेमके तेच शोधत आहोत याचा भरोसा नाही.
माझ्या मनात सध्या असलेले प्रश्नः
इथे कुणी खड्यांच्या मराठी नावासोबत त्यांचे विलायती नावे देऊ शकेल का?
हिरे घ्यायला गेल्यावर ते कारखाण्यात बनवलेले नाहीत (खाणीतून मिळवलेले अस्सल आहेत) यासाठी काय परिक्षा असते?
सोने/चांदी/तांबे त्वचेला स्पर्ष होईल असे पावरल्यावर त्याचे अमुक काही फायदे होतात असे म्हटले जाते. खड्यांच्या बबतीतही तसे ऐकायला मिळते. त्यावर काही माहिती कुठे मिळेल?
माणिक - यांची पारख कशी करावी? यांचा वापर कोणत्या दागिण्यांमध्ये होतो?
पोवळा - लाल तांबड्या रंगाचे असतात. असे ऐकुन आहे की काही श्रद्धाळू लोक वेगवेवेगळी
यंत्रे, तबकड्या गळ्यात घालताना याचा वापर करतात. तसेच नवीन घरात गृहप्रवेशावेळी सुद्धा यांचा मान आहे असे ऐकून आहे. याबद्दल कुणाला माहिती अधिक माहिती आहे का?
मोती - मोती जर शिंपल्यातून काढावे लगातात तर रस्त्याच्या कडेला किलोच्या भावात विकायला कसे काय परवडतात. ते खोटे (म्हणजे कारखाण्यात बनवलेले) असतात काय?
अशा प्रकारचे लेखन अगोदरच मिपावर झालेले असतील तर इथे धागे चिटकवले तरी उत्तम.
बरेच वर्षांनी लिहित आहे तेव्हा कृपया चु भू द्या घ्या.
वाचने
17351
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
अग्गाग्गा...ज्याम मूड आलाय
एक जेमोलजीचा कोर्स करून टाका.
पोवळे वापरात होते.
GEMMOLOGICAL INSTITUTE OF INDIA
तुमचे प्रतिसाद बरेचदा पैशाची मागणी करणारे असतात बुवा !
In reply to GEMMOLOGICAL INSTITUTE OF INDIA by आयुर्हित
बरीच लोकं भ्रमात जगतात नाही का!
In reply to तुमचे प्रतिसाद बरेचदा पैशाची मागणी करणारे असतात बुवा ! by धर्मराजमुटके
असो
In reply to बरीच लोकं भ्रमात जगतात नाही का! by आयुर्हित
जाऊ द्या हो
In reply to बरीच लोकं भ्रमात जगतात नाही का! by आयुर्हित
पारख कशी करावी
मला वाटतं रामदास या(ही) विषयातले तज्ञ असावेत...
यावर काही डिस्कवरी चानेलचा
तू नळीवर पहा...
जबरा प्रतिसादाबद्दल आभार
पोवळे (प्रवाळ) म्हणजे red coral ..
खडा.