✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बाइक कुठली घेवू?

म
मुक्त विहारि यांनी
Sat, 12/20/2014 - 11:47  ·  लेख
लेख
मुलाला नविन बाइक घेवून द्यायची आहे. मला त्यातले काही समजत नाही. त्यामुळे नेहमी प्रमाणे "कठीण समय येता, मिपाकर मदत करतात" हा अनुभव असल्याने, विचारणा करत आहे. बजेट : ७० ते ८० हजार वापरण्याचा कालावधी : जास्तीत जास्त ५ वर्षे. मायलेज : जितके जास्त तितके उत्तम रोजचा प्रवास : जास्तीत जास्त १०-१५ किमी. सलग ५-६ किमी. वापरणार : आकुर्डी (पुणे) शक्यतो सेकंड हँड नको आहे, पण कुणा मिपाकराची असली तर नक्कीच प्राधान्य.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28170 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

आपला पास...

जेपी
Sat, 12/20/2014 - 11:53 नवीन
आपला पास... ( शिडी डॉन प्रेमी) जेपी.
  • Log in or register to post comments

ओके...

मुक्त विहारि
Sat, 12/20/2014 - 11:54 नवीन
तू पण माझ्या सारखाच दिसतोस...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

मैलेज वाली हवी आहे कि जोरात

अद्द्या
Sat, 12/20/2014 - 11:54 नवीन
मैलेज वाली हवी आहे कि जोरात पळवायला . हे ठरवा . ७० हजार म्हणताय म्हणून म्हटलं . तरी या बजेट मध्ये सध्या पल्सर (१८० बसेल ७० हजारात , . अवेंजर ८० च्या आसपास ) अपाचे १८० सुद्धा साधारण ८४ पर्यंत येईल . ह्या बाइक्स आज ब्येष्ट आहेत . .
  • Log in or register to post comments

बाप म्हणतो ---मायलेज तर, पोरगा म्हणतो स्पीड...

मुक्त विहारि
Sat, 12/20/2014 - 12:01 नवीन
पिढ्यान पिढ्यांचा हाच वाद... आता तुम्हीच काहीतरी सुवर्ण-मध्य काढलात तर उत्तम... तसेही मुलाला एक स्पष्टपणे सांगीतले आहेच की, हेल्मेटशिवाय बाइक चालवतांना दिसलास तर, सायकल घेवून देईन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

ह्हाहा . . मी हि हाच वाद

अद्द्या
Sat, 12/20/2014 - 12:09 नवीन
ह्हाहा . . मी हि हाच वाद घातला होता वडिलांशी . . शेवटी चालवणार तो आहे . त्याला आवडत असेल . आणि हेल्मेट आणि इतर सुरेक्षेचे नियम पाळत असेल . तर बघा मी सांगितलेल्या पैकी एखादी घ्या . ४० - ४५ मैलेज मिळेल . जे शहरात भरपूर आहे . हैवे वर ५५ पर्यंत जाऊ शक्त्म. तुम्ही खुश . पळवायला जबरदस्त आहे . तो हि खुश . क्या बोलते !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मी हि हाच वाद घातला होता वडिलांशी....

मुक्त विहारि
Sat, 12/20/2014 - 12:16 नवीन
अहो, तरूण रक्त सळसळणारच...किंबहूना तेच नैसर्गिक आहे. पण स्वसुरक्षा आणि इतरांची सुरक्षा सांभाळत वाहन चालवणे जास्त योग्य. मुलगा पण पल्सरच म्हणत आहे. शेवटी बाइक त्याची आणि चालवणार पण तोच.. आम्ही फक्त दमड्या मोजणार. (नाही म्हटले तरी बाइक ही तरुणांची पहिली प्रेयसी असते. त्याची त्यालाच निवडू देणे इष्ट.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

बाइक ही तरुणांची पहिली

अद्द्या
Sat, 12/20/2014 - 12:33 नवीन
बाइक ही तरुणांची पहिली प्रेयसी असते. त्याची त्यालाच निवडू देणे इष्ट. ^^^^^^^^^^^^^^ अगदी हेच म्हणतो . . फक्त वेळच्या वेळेला गाडीची सर्विसिंग / इन्शुरन्स इत्यादी करवून घ्या . आणि हे त्यालाच करायला लावा . . बाकी काळजी तो घेइलच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

बाकी . . "अहो" नका म्हणू . .

अद्द्या
Sat, 12/20/2014 - 12:34 नवीन
बाकी . . "अहो" नका म्हणू . . उगाच मोठं झाल्या सारखं वाटत :P . . आत्ता कुठे २५ लागलंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

१००/१५०सीसी?

तुषार काळभोर
Sat, 12/20/2014 - 11:55 नवीन
मोटरसायकलः १०० सीसी: स्प्लेंडर १२५सीसी: शाईन १५०सीसी: युनिकॉर्न स्कूटरः होंडा डिओ (टीव्हीएस ज्युपीटर पण चांगली आहे, असं ऐकलंय. पण जवळपास कोणाकडे वापरताना पाहिलेली नाही) (उत्तम मायलेज, कमीत कमी मेंटेनन्स, इ.इ.) अवांतरः होंडाच्या १००सीसी बाईक्स्चा कोणाला अनुभव आहे का?)
  • Log in or register to post comments

जुने लेख चाळत असतांना...

मुक्त विहारि
Sat, 12/20/2014 - 12:05 नवीन
http://www.misalpav.com/node/24396 डॉ.खर्‍यांकडे होंडा १०० सीसीचा अनुभव आहे आणि त्यांनी पण त्या बाइकला पहिली पसंती दिली आहे.. http://www.misalpav.com/comment/reply/24396/475555
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

"हीरो होंडा" सीडी १०० एस् एस्

तुषार काळभोर
Sat, 12/20/2014 - 12:15 नवीन
"हीरो होंडा" सीडी १०० एस् एस् मी कॉलेजला वापरली आहे. शेलचं पेट्रोल टाकून अन् ४० ला चालवून ७८चं मायलेज काढलंय. मला "होंडा"च्या १००सीसी बाईकबद्दल विचारायचं होतं. (ड्रीम युगा/ ड्रीम निओ)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ओ भाउ

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 12/22/2014 - 15:14 नवीन
युगा आणि निओ ११० सी.सी. च्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

..माझ्या मते 'YAMAHA - FZS'

विनोद१८
Sat, 12/20/2014 - 12:02 नवीन
सध्या मी वापरीत आहे, 'उत्तम मोटरसायकल', तुमच्या बजेट्मध्ये बसेल. दुसरा पर्याय 'होंडा युनिकोर्न'. शक्यतो सेकंड हँड नकोच.
  • Log in or register to post comments

ओके...

मुक्त विहारि
Sat, 12/20/2014 - 12:07 नवीन
मुलाला तुमच्या कडे पाठवतो... माझा मोबाइल नंबर तुमच्याकडे आहे का? मी नेमका सौदीत असल्याने आणि सिम कार्ड बलल्याने, तुमचा मोबाइल नंबर माझ्याकडे नाही. बादवे, आपण रामदासांना भेटायला ह्याच गाडीवरून गेलो होतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८

मी युनिकोर्न वापरतोय

संचित
Sat, 12/20/2014 - 12:59 नवीन
मैलेज मध्ये ठीक आणि पळतेही जोरात. हाच काय तो मला सुवर्णमध्य वाटला. बघा तुम्हाला काय जमतेय ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८

भस्सकन कुठुन गर्दी वाढली

जेपी
Sat, 12/20/2014 - 13:07 नवीन
भस्सकन कुठुन गर्दी वाढली पाहायला आलतो. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संचित

मैलेज पटकन वाढले

मदनबाण
Sat, 12/20/2014 - 13:08 नवीन
मैलेज पटकन वाढले ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजा तू बन जा मेरा दादला... ;) { Vaishali Samant composed by Avadhoot Gupte }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

चला एक सल्ला भावाकडे होंडा

जेपी
Sat, 12/20/2014 - 12:11 नवीन
चला एक सल्ला भावाकडे होंडा शाईन आहे.एकदम मस्का आहे.
  • Log in or register to post comments

होय त्याच गाडीवरुन गेलेओ होतो आपण.

विनोद१८
Sat, 12/20/2014 - 12:12 नवीन
माझा नंबर व्यनी करतो. त्याला येउदे.
  • Log in or register to post comments

ओके

मुक्त विहारि
Sat, 12/20/2014 - 12:17 नवीन
डन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८

इथे जे सल्ले दिले आहेत

जेपी
Sat, 12/20/2014 - 12:54 नवीन
इथे जे सल्ले दिले आहेत त्यापेक्षा चांगला सल्ला देईन.पण त्यासाठी मला व्यनी करा.कुठलही चांगली गोष्ट फुकट नसते. कळावे लोभ असावा. आपला दोडका..हे चिडका..सॉरी लाडका. -फायरहिट
  • Log in or register to post comments

ही लाईट स्पोर्टीणी पल्सरणी

मदनबाण
Sat, 12/20/2014 - 13:06 नवीन
ही लाईट स्पोर्टीणी पल्सरणी सुद्धा पहा... मी "मस्त रगडवतो" रोज अगदी भरपुर मनसोक्त ! ;) ६० पर्यंत देते... १२५ सीसी आणि १५० सीसी याचा सुवर्णमध्य असलेली ही १३५ सीसीची आहे. :) फक्त जमल्यास मागचा टायर ट्युबलेस टाकुन घ्यावा. मी हल्लीच टाकला आहे, कारण पंक्चरचा शॉट डोक्याला बर्‍याच वेळा लागला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजा तू बन जा मेरा दादला... ;) { Vaishali Samant composed by Avadhoot Gupte }
  • Log in or register to post comments

याबद्दलच साण्गणार होतो.

अनुप ढेरे
Sat, 12/20/2014 - 15:16 नवीन
याबद्दलच साण्गणार होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

होंडा घ्या कोणतीही, युनिकॉर्न

ग्रेटथिंकर
Sat, 12/20/2014 - 14:25 नवीन
होंडा घ्या कोणतीही, युनिकॉर्न बेस्ट ,युगा पण चांगलीए.
  • Log in or register to post comments

ह्म्म

इरसाल
Sat, 12/20/2014 - 15:34 नवीन
होंडा शाइन मस्त गाडी आहे २००७ पसुन वापरत आहे लै भारी.
  • Log in or register to post comments

गेल्या महिन्याभरापासून

नांदेडीअन
Sat, 12/20/2014 - 19:27 नवीन
गेल्या महिन्याभरापासून मीसुद्धा हाच विचार करतोय. लहान भावासाठी घ्यायची आहे. Suzuki Gixxer चा बराच बोलबाला सुरू आहे सध्या. या रेंजमध्ये असलेली Yamaha FZS ची मक्तेदारी मोडून काढली आहे Gixxer ने. गेल्या आठवड्यात दोन नवीन गाड्या लॉंच झाल्यात. Hero Xtreme Sports आणि Honda Unicorn 160 दोन्ही गाड्या चांगल्या आहेत. महिनाभर गुगलवर रिसर्च करून सध्या Gixxer आणि Unicorn वर येऊन गाडी अडकली आहे. Unicorn चे मायलेज थोडेसे जास्त आहे Gixxer पेक्षा. पण बाकी सगळ्या बाबतीत Gixxer वरचढ आहे.
  • Log in or register to post comments

होंडा युनिकॉर्न

श्रीरंग_जोशी
Sat, 12/20/2014 - 20:18 नवीन
नऊ वर्षांपूर्वी मी माझी पहिली बाइक विकत घेतली होती - होंडा युनिकॉर्न. अजूनही व्यवस्थित चालत आहे सव्वा लाख किमीहून अधिक चालली असावी. अवांतर - भारतातील दुचाकी ड्रायव्हिंग या प्रकारात बेदरकारपणे गाडी चालवण्याला रूढ करण्यामागे बजाज पल्सरचा सिंहाचा वाटा आहे असे माझे निरीक्षण आहे.
  • Log in or register to post comments

+१

अवतार
Sat, 12/20/2014 - 23:19 नवीन
बेदरकारपणे गाडी चालवण्याला रूढ करण्यामागे बजाज पल्सरचा सिंहाचा वाटा आहे
सत्यवचन ! माझ्या पल्सरवाल्या मित्रांचेच जास्त अपघात झाले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

...हेच म्हणतो या गाडीच्या बाबतीत.

विनोद१८
Sun, 12/21/2014 - 08:05 नवीन
..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवतार

अपघात चालवणार्यांच्या चुकीने

टवाळ कार्टा
Sun, 12/21/2014 - 11:58 नवीन
अपघात चालवणार्यांच्या चुकीने होतात बाईकमुळे नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवतार

हे बरोबरे !!

खटपट्या
Sun, 12/21/2014 - 14:22 नवीन
हे बरोबरे !! ---गेली १० वर्षे पल्सर चालवणारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ह्या ! ह्या !

धर्मराजमुटके
Sat, 12/20/2014 - 22:19 नवीन
ह्या ! ह्या ! आमी सांगणार, आणि ते तुम्ही ऐकणार ? आणि तुम्ही ऐकलं तरी तुमचा मुलगा तुमचं ऐकणार ? मुवी तुस्सी ग्रेट हो ! :) या जगात कोणी सांगून शिकवून शहाणा होत नसतो. शिवाय जेव्हा दिल आ गया गधी पे तो परी क्या चीज है म्हणत झक मारत मुलगा सांगतो तीच बाईक तुम्ही त्याला घेऊन देणार. बाईक घेतल्यावर नक्की कळवा.
  • Log in or register to post comments

+ १... प्रत्येक वाक्य परफेक्ट...

मुक्त विहारि
Sat, 12/20/2014 - 23:00 नवीन
"मुलगा सांगतो तीच बाईक तुम्ही त्याला घेऊन देणार." सहमत... बाइक आणि बायको, ज्याची त्याने निवडावी.... आणि खरं सांगायचे म्हणजे माझा, माझ्या दोन्ही मुलांच्या निर्णय क्षमतेवर विश्र्वास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

सुझूकी जी एस १५० आर.

काळा पहाड
Sat, 12/20/2014 - 23:13 नवीन
सुझूकी जी एस १५० आर.
  • Log in or register to post comments

युनिकॉर्न घेउन टाका. पॉवर,

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 12/20/2014 - 23:43 नवीन
युनिकॉर्न घेउन टाका. पॉवर, मायलेज, स्पीड आणि रिलायबलिटी साठी अतिउत्तम. माझ्याकडे स्वतःकडे आहे (व्हायब्रंट स्पोर्टस ४५,००० कि.मी.) आणि गाडी अजुनही मक्खन आहे. बर्‍याच लांब लांब सहली केल्यात ह्या गाडीवर. मला सिटीमधे ५५ आणि हायवे ला ५७-६२ पर्यंत आरामात देते. शेल चं पेट्रोल टाकुन बघायचयं एकदा. बजाज ची गाडी शक्यतो नको. नवीन असेपर्यंत चांगल्या चालतात. एकदा २-३ वर्ष झाली की गाडीचा खुळखुळा होतो (वापरण्यावर अवलंबुन आहे काही मित्रांच्या अजुन चांगल्या आहेत पण होंडा एवढ्या कंडीशन ला नाही).
  • Log in or register to post comments

सध्या तरी मुलगा...

मुक्त विहारि
Sun, 12/21/2014 - 01:50 नवीन
ह्या https://www.youtube.com/watch?v=9PrvxCr1Vi0 बाइकच्या प्रेमात पडला आहे... बादवे... नविन होंडा युनिकॉर्न १६० सी.सी. कशी आहे?खाली लिंक देत आहे. http://auto.ndtv.com/news/new-honda-unicorn-160cc-launching-on-december-18-2014-713131
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

..पल्सर नकोच.

विनोद१८
Sun, 12/21/2014 - 08:09 नवीन
..होंडा युनिकोर्न १६० नक्कीच चांगली त्यापेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

युनिकॉर्न डोळे बंद करुन घ्या.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 12/21/2014 - 09:48 नवीन
युनिकॉर्न डोळे बंद करुन घ्या. पण गाडीला वेटींग असेल ह्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

बघू या...

मुक्त विहारि
Sun, 12/21/2014 - 09:58 नवीन
मुलाचा निर्णय अंतिम... आणि तशीही अशा गोष्टीत घाई करण्यात जास्त अर्थ पण नसतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी खरं. त्याला आवडत असेल तर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 12/21/2014 - 10:21 नवीन
अगदी खरं. त्याला आवडत असेल तर २०० पल्सर एन.एस. घेतलीत तरी चालेल. पण लाईफ लाँगॅटीव्हिटी आणि रिसेल व्हॅल्यु इल्ले!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मोटरसायकल ही फक्त बुलेटच ! बाकी सगळी मुलाची खेळणी !

सामान्यनागरिक
Sun, 12/21/2014 - 14:01 नवीन
मुलाला एखादी बुलेट चालवुन बघायला सांगा तसेच बुलेट ही पहिली प्रेयसी तर मागे बसणार्या अनेक मिळतील हेही सांगा. जरा पैसे जास्त लागतील पण मागे बसणार्यांची आयुष्यभराची बेगमी होईल. बघा विचार करुन !
  • Log in or register to post comments

तो जमाना गेला...आजकालच्या

टवाळ कार्टा
Sun, 12/21/2014 - 14:03 नवीन
तो जमाना गेला...आजकालच्या पाखरांना बुलेट नाय पसंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक

माझ्याकडे युनिकोर्न आहे सात

सुबोध खरे
Sun, 12/21/2014 - 22:35 नवीन
माझ्याकडे युनिकोर्न आहे सात वर्षे जुनी. पहिली ब्याटरी आत्ता बदलली. सकाळी चालू व्हायला त्रास नाही. एकंदर ३ वेळा किक मारलेली आहे. दोन वेळा किक कशी ते चालते पाहण्यासाठी आणि एकदा ब्याटरी गेल्यामुळे. टफ अप तयार असल्याने सहजासहजी पंक्चर होत नाही. गाडी अतिशय उत्तम चालते. कोणताही झगमगाट नाही पण अजिबात कोणतीही कटकट न करता चालते. सर्व्हिसिंग वर्षात एकदा जवळच्या तंत्रज्ञाकडेच करतो. पहिल्या फुकट सर्व्हीसिंग नंतर कंपनीकडे गेलो नाही. मुलाला माझ्याकडे पाठवा. त्याला गाडी चालवून पाहु द्या. आवडली तर निश्शंकपणे विकत घ्या.सात वर्षे जुनी गाडी जवळ जवळ कोणतीही देखभाल न करता गाडी कशी चालते ते पहा. १५ वर्षे विना तक्रार चालेल. फेब्रुवारी नंतर मुलाला द्यावी लागणार आहे( १८ वर्षाचा होतो आहे). अगोदर cd १०० होती १५ वर्षे आणि १. लाख च्या वर चालवून झाली. होंडा कंपनीची सर्व्हिस सेंटर भारतभर बेकार आहेत. पण मूळ वस्तू उत्तम आहे म्हणू निश्शंक पणे घ्या. इंजिनबद्दल होन्डाचा हात कोणीही धरू शकणार नाही. होंडा पसंत नसेल तर यामाहा घ्या जी गाडी पसंत आहे ती पाचसात वर्षे जुनी गाडी चालवून पहा म्हणजे गाडी टिकायला आणि चालायला कशी आहे ते लक्षात येईल.
  • Log in or register to post comments

ओके..

मुक्त विहारि
Sun, 12/21/2014 - 22:47 नवीन
"जी गाडी पसंत आहे ती पाचसात वर्षे जुनी गाडी चालवून पहा म्हणजे गाडी टिकायला आणि चालायला कशी आहे ते लक्षात येईल." हा महत्वाचा मुद्दा लक्षांत आणून दिल्याबद्दल धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

+१०००

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 12/21/2014 - 23:01 नवीन
+१०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मग काय ठरलं?

सतिश गावडे
Sun, 12/21/2014 - 23:03 नवीन
मग काय ठरलं? :)
  • Log in or register to post comments

इथली चर्चा मुलाला वाचायला दिली...

मुक्त विहारि
Mon, 12/22/2014 - 00:23 नवीन
बाइक त्यांची तेच निवडणार.आम्ही दिडक्या मोजणार. तरूण रक्त पल्सरच्या मागे तर अनुभवी माणसे होंडाला प्राधान्य देत आहेत. माझा कल पण होंडाकडेच आहे. आणि मुलाचा कल पल्सरकडे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तरुण आणि अनुभवी अशी एक कॉमन

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 12/22/2014 - 13:48 नवीन
तरुण आणि अनुभवी अशी एक कॉमन कॅटेगरी टाका ओ...उगीच अनुभवी म्हणल्यावर डोक्यावर चंदेरी छटा आल्याचा आणि छप्पर अर्धवट उडाल्याचा भास झाला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तरुण आणि अनुभवी अशी एक कॉमन

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 12/22/2014 - 13:48 नवीन
तरुण आणि अनुभवी अशी एक कॉमन कॅटेगरी टाका ओ...उगीच अनुभवी म्हणल्यावर डोक्यावर चंदेरी छटा आल्याचा आणि छप्पर अर्धवट उडाल्याचा भास झाला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

गीच अनुभवी म्हणल्यावर

मदनबाण
Mon, 12/22/2014 - 13:52 नवीन
गीच अनुभवी म्हणल्यावर डोक्यावर चंदेरी छटा आल्याचा आणि छप्पर अर्धवट उडाल्याचा भास झाला याचा मला समजलेला अर्थ जर डोक्यावर चंद्र म्हणजे डोक्यावरचे उडलेले केस असा असेल तर... पाखरामच्या कोड-वर्ड भाषेत या स्थितीला "चिवड्यात लाडू" असे संबोधले जाते. { इति पाखरु गुजगोष्टी शब्दकोष व्हर्जन १.०१ विथ अपडेट } ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा