साधारणपणे भात कापणीनंतर कोकणात लाल माठ, मुळा, नवलकोल, गावठी मिरच्या इत्यादी भाज्या लावल्या जातात. याच सिझनला त्या मिळतात. ज्यांनी नवलकोलची भाजी पाहिली नाही, त्यांच्यासाठी हा फोटो आंतरजालावरून साभार.
साहित्यः दोन जुड्या नवलकोल, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, दोन/तीन सुक्या लाल मिरच्या, तिखट, मीठ, गूळ, ओले खोबरे(ऐच्छीक).
कृती: नवलकोलच्या कांद्यांवरील कोवळी पाने काढून धुऊन बारिक चिरावीत. कुकरला दोन शिट्या करून घ्याव्या. नवलकोलच्या कांद्याची साले काढून आपल्या आवडीप्रमाणे फोडी कराव्या. नेहमीप्रमाणे फोडणी करावी, फोडणीत सुक्या मिरच्या घालाव्या. त्यावर चिरलेल्या फोडी टाकून थोडे पाणी घालून शिजवून घ्याव्या. फोडी शिजल्या की चवीनुसार तिखट, मीठ, गूळ घालावे. शिजलेली पाने मिक्स करावीत. आवडत असल्यास थोडे ओले खोबरे घालावे. गरमागरम पोळीबरोबर भाजी फस्त करावी. या भाजीत फोडीबरोबर पानेही घातल्याने भाजी छान लागते.

वाचने
31827
प्रतिक्रिया
87
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद. स्वगताशी सहमत.
In reply to ओके... by मुक्त विहारि
माझ्या नावडत्या भाज्यांपैकी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dard Dilo Ke Kam Ho Jaate, Main Aur Tum Agar Hum Ho Jaate..मला बै अज्जिबात आवडत नाही ही
छान सोपी पाककृती अनन्न्या
छान प्रकार वाटतोय करुन पहायला
मस्त ग अनन्या
आज नवलकोल अाणलेत.त्याचं काही
एक आयडीया देतो...
In reply to आज नवलकोल अाणलेत.त्याचं काही by अजया
अर्रर्र !!आमच्यासारख्यांच्या
In reply to एक आयडीया देतो... by मुक्त विहारि
अहो ते ओपन शिक्रेट आहे...
In reply to अर्रर्र !!आमच्यासारख्यांच्या by अजया
अनन्या, आज केलीय ही भाजी.
हुम्म्म्म
ओके...मुद्दा लक्षांत आला...
In reply to हुम्म्म्म by इरसाल
आज आमच्याकडेही नवलकोल...
आज बहीणीने तिच्या घरी करुन
आज केली होती ही भाजी. मस्त
आठवणी..