झुळकी सोबत येई तरंगत
रांगोळीची नक्षी दाखवित
कुठे चालले, नाही माहित
फुलपाखरु, फुलपाखरु, चला चला रे धरू
बघा कसे ते थोडे दमले
पाकळीवरी थकून बसले
लिपझिप लिपझिप पंख हलवले
फुलपाखरु, फुलपाखरु, चला चला रे धरू
परागातला मधू चोखते
सावध आजूबाजू बघते
सुंदर, रंगीत अन् नाजुकते
फुलपाखरु, फुलपाखरु, चला चला रे धरू
हळूच जाउन जवळ पाहिले
अलगद बोटांमधे पकडले
बाटलीत मग सोडुन दिले
फुलपाखरु, फुलपाखरु, चला चला रे खेळू
कसे बिचारे निपचित पडले
रंग पंखांचे बोटांवर आले
असेल का ते घाबरलेले?
फुलपाखरु, फुलपाखरु, चला रे सोडून देऊ
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4001
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
अगदी
वा .. कविता
खर आहे
In reply to वा .. कविता by लिखाळ
अजुन एक
वेलदोडा,
फुलपाखरु
अरुण मनोहर...
लहान मुले!
In reply to अरुण मनोहर... by येडा खवीस
अरुणराव
सुरेख
एकदम सुटसुटीत बालगीत..
सुरेख
धन्यवाद
खुप आवडले.
कविता