प्रसंग १-
वेळः २ महिण्यापुर्वीची.
स्थळ:एका बँक मॅनेजरची केबिन.(मॅनेजर रिटायमेंटला वर्ष कमी असताना नागपुरातुन थेट बदली होऊन लातुरात आलेला)
ग्राहक-आत येउ का सायेब
मॅ- या
ग्रा- सायेब आपल्याला ते हे पीक कर्ज पायजे.
...मॅनेजर कागदपत्र पाह्तो.
मॅ- किती कर्ज पाहिजे ?
ग्रा- द्या कि एक लाख काय.
मॅ- एक लाख !! काय करणार एवढ कर्ज घेउन ? फेडण होणार आहे का ?
ग्रा- सायेब आता तुमच्या पासुन काय लपवायच,एका लाखापेकी ३६,००० ची म्हस घ्याची. १४,००० चा कडबा घ्याचा.
आन राहीलेला पन्नास तुमच्या बँकेत यफडी करु. काय !!
मॅ- आहो पण हे परवडणार आहे का तुम्हाला.पिककर्ज वर्षभरात फेडाव लागेल ७% व्याजासहित कळतय का ?
ग्रा- ते कळतय ओ आपल्याला. आता तुमास्नी कळत नसेल तर सांगतो.
आता ३६,००० ची म्हस घेतली.म्हस २०० दिवस रोज ५ लिटर दुध देते. दुधाचा भाव ४० रु.लिटर.
मंजे रोजचे २०० रु.झाले. २०० दिवसाच उत्पन्न ४०,००० झाल,
नंतर म्हस गाभण राहील,तीला रेडकु झाल तर ईकुन टाकायच ५,००० ला.मंजे वर्सभरात म्हसन ४५,००० दिल कमवुन.
आता तुमच्या बँकेतील यफडी केलेल्या पयशाच बोलु.बँक ९ % याज दिल.मंजे ५०,००० ला ४,५०० याज मिळल. बाजपता करा ठोक हिसोब,काय!!!
मॅ- आता ते पण तुमीच सांगा.
ग्रा-सायेब म्हसीन ४५,००० दिले.बँकेच्या यफडी ने ५४,५०० दिले टोटल झाली कि ९९,५०० काय.
वरुन म्ह्स बि राहिली कि घरात बोनस म्हनुन,काय!!
मॅनेजर - पण तुम्हाला व्याज भराव लागेल कि पिककर्जावर ७,००० त्याच काय?
ग्रा- ह्यां... नियमीत कर्ज फेड केली तर सरकार निम्म याज भरतय की.. आणी..
मॅ- आणी काय आता ?
ग्रा- आणी दुस्काळ जाहीर झाला तर याज बी माफ व्हईल.आन प्यॅकेज आल तर संमद कर्ज बी माफ व्हईल. काय!!!!!
मॅ-*shok*
==========================================================================
प्रसंग २-
स्थळ-तलाठी कार्यालय
वेळ-पंधरा दिवसापुर्वीची..
शेतकरी-मालक नुस्कान लय जास्त झालय आन तुमी पंचनामा लय कमी केलाय जरा वाढवा की पिकवीम्याची रोक्कम ?
तलाठी-अरे धोंडीबा,मी काय करणार सरकारी निकषात ६०००/- मिळतील तुला. सरकार ठरवल ते घ्याच.
शेतकरी- तेच म्हणतो आहे..सरकार काय बांधावर येऊन बघणार हाय का किती नुस्कान झाल ते,तुमीच आमच सरकार
बघा काय तरी करा..जरा चार पयशे सुटु द्या गरीबाला.
तलाठी- हम्म.. हे बघ आता मी काय सांगतो ते आईक.. तुझ्या पीकाच्या नुकसानीचा पंचनामा मी बदलुन देतो.
६,०००/- च्या जागी १०,०००/- करतो पण ८,०००/- तुझे आणी २,०००/- माझे. पटतय का बोल ?
शेतकरी- मालक २ मंजे जास्त झाल जरा कमी करा..
तलाठी-हे बघ धोंडीबा, हे पीकविम्याची रक्कम आहे. पुढे दुष्काळ जाहीर झाला तर आणखीन मदत मिळेल.
त्या पॅकेज मधे करु कमी जास्ती.....
.
.
.शेतकरी गपचुप १०,०००/- पंचनामा घेऊन बाहेर पडतो.
============================================================================
प्रसंग ३-
स्थळ - आमचा नेहमीचा कट्टा.
वेळ - विधानसभेत ४ दिवसापुर्वि दुष्काळावर चर्चा चालु होती तो दिवस.
एक- देवा काय वाटत...यावेळेस कितीच पॅकेज जाहीर व्हईल ?
दुसरा- आर सरकारी तिजोरित खडखडाट हाय म्हन..काय जास्त अपेक्षा नाय ठेवाच्या आपण..सोयाबीनं माती खाल्ली यंदा.
तिसरा- आर चांगल पाच धा हाजार कोटीच जाहीर व्हायला पायजे..म्या तर लाईट बिल भरला नाय आजुन
यावर्सीच..च्या आयला....दणकुन पॅकेज नाय मीळाल तर आपुन हाय आन हे सरकार हाय बघुन घ्यु..
=============================================================================
( लेखाद्वारे कुणाच्या भावना दुखावायचा हेतु नाही..गावपातळीवर परिस्थीति भिषण आहे..)
वाचने
51938
प्रतिक्रिया
106
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो नाही हो.
In reply to गाडीवाला शेतकरी नाही by बाबा पाटील
ते हे असावेत
In reply to गाडीवाला शेतकरी नाही by बाबा पाटील
हा माणूस रांजणगाव MIDC च्या
In reply to ते हे असावेत by श्रीरंग_जोशी
शेतीच्या उत्पन्नावर आयकर
याच कारणामुळे शेतीमधून बराच
In reply to शेतीच्या उत्पन्नावर आयकर by सुबोध खरे
शेतकर्याला व्होट बॅंक कोण
लवकर आणि विस्ताराने लिहा
In reply to शेतकर्याला व्होट बॅंक कोण by जेपी
शेती उत्पन्न हा स्टेट लिस्ट
वरती खरडणारे .....
मी अजिबात नाही.....
In reply to वरती खरडणारे ..... by बाबा पाटील
त्याने नक्की काय होणार?
In reply to वरती खरडणारे ..... by बाबा पाटील
आणि उद्या बॅट्या शेती करायला
In reply to त्याने नक्की काय होणार? by बॅटमॅन
बॅटमॅन नांगर हाकतोय असे
In reply to आणि उद्या बॅट्या शेती करायला by प्रसाद१९७१
@ बाबा साहेब
In reply to वरती खरडणारे ..... by बाबा पाटील
@मुवि-
@ जेपी...
In reply to @मुवि- by जेपी
बाकी किस्से पन येउदे की
अनुमोदन
In reply to बाकी किस्से पन येउदे की by टवाळ कार्टा
आणि स्कोअर किती करायचा तेही
In reply to अनुमोदन by मुक्त विहारि
आणि स्कोअर किती करायचा तेही
In reply to आणि स्कोअर किती करायचा तेही by खटपट्या
आणि स्कोअर किती करायचा तेही सांगा !!नर्व्हस नाईंटी चा शिकार होणार नाही एवढे पाहा *wink*अग्गाग्गा...कित्ती ती काळजी
In reply to आणि स्कोअर किती करायचा तेही by जेपी
डोंट वरी..
In reply to अग्गाग्गा...कित्ती ती काळजी by टवाळ कार्टा
अति अवांतर -- आमची काही
द्राक्ष निर्यातीतून १६६० कोटींचे परकीय चलन
पण नाशीक म्हणजेच अख्खा
In reply to द्राक्ष निर्यातीतून १६६० कोटींचे परकीय चलन by अभिजित - १
मला वाटतं या माहितीचा संदर्भ
In reply to पण नाशीक म्हणजेच अख्खा by टवाळ कार्टा
माझा प्रतिसाद बाकी चर्चेसाठी
In reply to मला वाटतं या माहितीचा संदर्भ by थॉर माणूस
देशी पिणार्या लो़कांना
In reply to माझा प्रतिसाद बाकी चर्चेसाठी by टवाळ कार्टा
तेच ना...दारु बदलली आणि
In reply to देशी पिणार्या लो़कांना by जेपी
चायला वाईन चांगली की वाईट हा
In reply to तेच ना...दारु बदलली आणि by टवाळ कार्टा
+१००
In reply to चायला वाईन चांगली की वाईट हा by टवाळ कार्टा
"परकिय चलन मिळवून दिले" या
In reply to द्राक्ष निर्यातीतून १६६० कोटींचे परकीय चलन by अभिजित - १
असे परकिय चलन अनिवासी भारतीय
In reply to द्राक्ष निर्यातीतून १६६० कोटींचे परकीय चलन by अभिजित - १
तेच ना...दारु बदलली आणि
तेच ना...दारु बदलली आणि सांगितले बघा तुमचे रहाणीमान उंचावले...ज्जे बात आता समजत लो़कांना नेमक कुठ चुकलय.घंटा समजते....ते सगळे वाईन
In reply to तेच ना...दारु बदलली आणि by जेपी
घंटा समजते....ते सगळे वाईन
घंटा समजते....ते सगळे वाईन पिण्यातच धन्यता मानतात आणि पुढल्यावर्षी जर पिकपाणी व्यवस्थित नाही आले तर रडतातपुन्हा भरकटलास..बचतीचे महत्व जर नीट समजले तर शेतकर्यांच्या ३०% आर्थिक समस्या तरी सुटायला हव्यातुला कळत ते त्यांना सागांयचा प्रयत्न कोण करत नाही..