✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दुकानदाराकडून अपमान..

य
योगी९०० यांनी
Tue, 12/09/2014 - 12:42  ·  लेख
लेख
गेल्या वर्षभरात दोन प्रसंग असे आले की दुकानदाराने अतिशय अपमान केला.. दोन्ही प्रसंग बोरीवलीच्या एकाच मॉल मधील दोन वेगवेगळ्या दुकानात घडले.. प्रसंग एक : हिच्यासाठी ड्रेस मटेरीयल घ्यायचे होते. मला तितका उत्साह नव्हता. कारण म्हणजे १०-१५ मिनिटाचे काम नव्हते तर चांगले दोन-तीन तास जाणार हे ओळखून होतो. त्यामुळे बोरीवलीच्या मॉलमधील एका चांगल्या दुकानात शिरल्या-शिरल्या एक मोक्याची जागा बसायला पकडली आणि शांतपणे मोबाईलवर गेम खेळू लागलो. अर्थात अगदीच निरूत्साही नव्हतो. मध्ये मध्ये तिला हा ड्रेस बघ, तो बघ तुला चांगला दिसेल असे सांगत सुद्धा होतो. हिला माझा हा स्वभाव माहित होता म्हणून तिने माझे मध्ये मध्ये बाजूला जाऊन बसणे तितके काय मनावर घेतले नव्हते (असे मला वाटले). अशीच १०-१२ मिनिटे गेल्यावर तिने चला म्हणून मला सांगितले. मी आश्चर्याने खरेदी झाली का असे विचारला. त्यावर तिने नजरेनेच दुसर्‍या दुकानात बघू या असे सांगितले. मी लगेच "इथले ड्रेस मटेरीयल नाही का आवडले?" असे तिला विचारले. यावर लगेच दुकानदार माझ्यावर डाफरला " कसे आवडेल ड्रेस मटेरीयल? आख्खे दुकान जरी दाखवले तरी त्यांना आवडणार नाही. तुम्हीच इंटरेस्ट घेत नाही मग त्या कितीही भारी कापड दाखवले तरी नाहीच म्हणणार...आमच्या दुकानात एसी खायला, आराम करायला आलात तुम्ही. तुम्ही काय खरेदी करणार?" असे इतक्या मोठ्यांनी म्हणाला. की मी एकदम अवाक झालो. दुकानातले सर्वजण माझ्याकडे पहायला लागले. त्यातल्या काही बायका माझ्याकडे विचित्र नजरेने आणि काही माझ्या मिसेसकडे सहानभुतीने पहात आहेत असे वाटले. खरतरं मला माझ्यावर कोणी असे ओरडेल असे मुळीच वाटले नव्हते त्यामुळे दुकानदाराच्या त्या अचानक झालेल्या शाब्दीक हल्याने माझी बोलती बंद झाली होती. मदतीसाठी मी तिथल्या एका पुरूषाकडे पाहिले पण त्याने माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले. आणि आपल्या बायकोच्या खरेदीकडे लक्ष घातले. माझ्या बाजूला बसलेला एकजण हळूच उठला आणि त्याच्या बायकोच्या बाजूला उभा राहीला. मी पण मग मुकाट्याने उठलो आणि खाली मान घालून हिच्याबरोबर बाहेर पडलो. नंतर घरी दुकानदाराने केला नसेल त्याच्या शतपटीने आमचा पाणउतारा केला गेला पण बाहेरची कोणी मंडळी पहात नसल्याने त्याचे तितके काही वाटले नाही. दुकानदाराला "अरे बाबा तुला तुझ्याकडच्या कापडाचे मार्केटींग करता येत नाही किंवा तुझ्याकडे तितकी variety नाही याचा दोष मला का देतोस? किंवा मी काय तुझा नोकर आहे काय की तुझ्या कापडांचे मार्केटींग करावे?" असे काहीतरी म्हणायला पाहिजे होते असे वाटत राहीले. पण हे त्यावेळी अजिबात सुचले नाही. प्रसंग दोन: वरील प्रसंग घडल्यानंतर साधारणपणे एक वर्षानंतर त्याच मॉलमध्ये हिच्याबरोबर जायचा योग लादला गेला. यावेळी साडी खरेदी होती. आधीचा अनुभव मॉलमध्ये शिरल्या-शिरल्या डोळ्यासमोर आला आणि उगाचच उसना उत्साह चेहर्‍यावर आणला. एका साडीच्या दुकानात गेलो. तिथे १०-१५ मि. साड्या बघण्यात गेली. एखादी साडी हिला जरा आवडत आहे असे दिसल्या-दिसल्या घे घे तुला छान दिसेल, एकदम सुरेख साडी आहे असे बोलून तिला पटवायचा प्रकार चांगला दोन-तीन वेळा केला. दुकानातल्या साड्या दाखवणार्‍या माणसाला आम्ही आता काहीतरी घेणारच अशी आशा लागली. त्याने लगेच आणखी साड्या दाखवायचे थांबवले आणि तो ही दोन-तीन जरा बर्‍यापैकी आवडलेल्या सांड्यांमधली साडी घ्या असा मागे लागला. पण हिला आणखी variety पहायची होती आणि दुकानातल्या माणसाला अजुन दाखवायचा कंटाळा आला होता. त्या दोघांचा थोडा-फार वाद सुरू झाला. मी सुद्धा थोडा दमल्याने बाजूला बसलो आणि झाले. हिने एकदम निर्णय घेतला की दुसर्‍या दुकानात पाहून घेऊ. तसेच पहिल्याच दुकानात साडी काय घ्यायची चांगले दोन-तीन दुकानात पाहून काय ते ठरवू असाही विचार तिने केला. पण या मुळे तो दुकानातला माणूस माझ्यावर एकदम ओरडला, "टाईमपास करायला आलात काय? काही घ्यायचे नाही तर कशाला उगाच बसून राहीलात?". मी यावेळी हिच्यावर जरा ओरडलो," तुला आवडली असेल तर घे ना साडी. कशाला यांचे शिव्याशाप ऐकतेस?". हिचा मात्र दुसर्‍या दुकानात जायचा ठाम निश्चय होता. त्या माणसाच्या अशा बोलण्याने हीने भडकून सांगितले की एक तर अजुन variety दाखवत नाही आणि वर असे बोलता. आता काही झाले तरी तुमच्या दुकानात परत येणार नाही. मग निघालो तेथून. परत घरी आमचे भांडण झालेच. मी थोडावेळ बाजूला बसलो आणि त्या दुकानातल्या माणसाला variety दाखवायला नाही सांगितली याचा राग माझ्यावर निघाला. मी उसना उत्साह चेहर्‍यावर आणला होता हे सुद्धा हिने बरोबर ओळखले होते. (हा राग त्यानंतर दोन-तीन दिवसांनी नल्ली साडी घेतल्यावर कमी झाला). वरील दोन्ही प्रसंगात मला एक गोष्ट सारखी वाटली की दोन्ही वेळेस दुकानदारांनी नवर्‍यास (म्हणजे मला) दोषी ठरवले. ही त्यांची Strategy असावी काय? दोन्ही वेळेस "एसीची हवा खायला किंवा टाईमपास करायला आलात" अशा प्रकारची अपमान होईल अशी वाक्ये बोलली गेली. खरे तर दोन्ही प्रसंगात आम्ही दुकानदाराचा १०-१५ मिनीटांपेक्षा जास्त वेळ घेतला नव्हता. उगाच एखादा तास-दीड तास घालवला आणि असे वागलो तर समजण्यासारखे आहे. पण असे त्यांचे बोलणे बरोबर नाही वाटले. नवर्र्‍यांना हुसकवून किंवा त्यांचा पुरूषी अहंकार जागवून त्यांनी बायकोला खरेदी करण्यास भाग पाडावे असे त्यांचा हेतू असावा काय? असा अनुभव आपल्याकडील कोणाला आला आहे काय? तसेच बायकोबरोबर उत्साहाने खरेदीस कसे जावे? काय करावे म्हणजे उत्साह टिकून राहील किंवा उत्साही आहोत असे दिसेल. यावरही जाणकारांनी प्रकाश टाकावा.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
101941 वाचन

💬 प्रतिसाद (313)

प्रतिक्रिया

ह्म्म.. ते पण खरंच म्हणा.

हाडक्या
Fri, 12/19/2014 - 18:17 नवीन
ह्म्म.. ते पण खरंच म्हणा. तसं या वर्षी यांच्या शहरी मतात (ग्रामीण भागाचा नक्की विदा नाही) भरपूर घट झाली आहे. त्यांचा चुलत-भाऊ (तो बराच सभ्य आहे) जो विधानसभेस निवडून येतो त्याच्याही शहरी मतांमध्ये भरपूर घट आलीये या वर्षी. म्हणून आशावाद फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कहर व्हीडो आहे तो. हावभाव,

अनुप ढेरे
Mon, 12/15/2014 - 12:17 नवीन
कहर व्हीडो आहे तो. हावभाव, हात-वारे, कॉलर ताठ करण... सगळच राजेशाही थाटात =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

भावावस्था

प्यारे१
Mon, 12/15/2014 - 15:38 नवीन
ते बर्‍याचदा त्याच 'भावावस्थे'त असतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

अजून एक किस्सा

तिमा
Tue, 12/09/2014 - 16:59 नवीन
नुकतेच मुंबईतल्या, मरीन लाईन्सच्या एका मोठ्या दुकानात, लग्नाच्या खरेदीसाठी जाण्याचा योग आला. सर्व बायका एकीकडे खरेदीत मग्न होत्या. आम्ही पुरुष, एकाबाजूला उभे होतो.दुकानातील एक वरिष्ठ सेल्समन, सारखा, थोड्या थोड्या वेळाने,'काय चाललंय काय?' असे म्हणत होता. आधी आम्हाला वाटलं की तो आम्हाला उद्देशूनच बोलतोय. पण नंतर त्याला तसे बोलायची संवयच असावी, हे लक्षांत आले. त्यामुळे आम्हीही दुर्लक्ष केले.
  • Log in or register to post comments

डोक शांत ठेउन त्याला सतावुन काढा

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 12/09/2014 - 17:01 नवीन
अशावेळी डोक शांत ठेउन नडायचे असते. माझ्या घराजवळ असलेल्या एका हार्डवेअर दुकानदाराने असाच माझा अपमान केला होता. मी त्याच्या दुकानातून खुर्चीला बसवायची रबरी बुचं घेतली होती. त्याची साईज चुकीची निघाली म्हणुन बदलायला गेलो तर त्याने माझी अक्कल काढली होती. त्या वेळी तर मी त्याला चांगले सणसणीत उत्तर दिलेच पण त्या नंतर जवळ जवळ महिना दोन महिने मी त्याच्या दुकानात जाउन विचारायचो "लोणी आहे का?" सुरुवातीला तो वैतागला. नाही म्हणायचा. मग नंतर नंतर तो भडकायला लागला. मी दुकानात येताना दिसलो तरी ओरडा अरडा करायला लागायचा. "पोलीस कंप्लेंट करेन असे म्हणायचा" तो भडकला तरी मी त्याला शांत पणे म्हणायचो "तुला माहित आहेना मला अक्कल नाहीये ते? मग कशाला चिडतोस. नाहिये लोणी तर नाही म्हणुन सांग" नंतर नंतर तर मी त्याच्या दुकानावरुन जाताना नुसते "लोणी" असे मोठ्यांदा म्हणुन पुढे जायचो आणि तो मला शिव्या देत बाहेर यायचा. हळु हळु गल्लीतल्या सगळ्या पोरांना पण हे कळले. मग तो दुकानदार कुठेही दिसला तरी "लोणी" असा आवाज यायचा. आणि तो दुकानदार वेड्यासारखा दिसेल त्याला शिव्यागाळ करत सुटायचा. बरेच दिवस हा प्रकार चालला होता. त्याने माझ्या घरी सुध्दा तक्रार केली होती व माझ्या बाबांनी पण मला या वरुन ताकीद दिली होती पण तो पर्यंत फार उशीर झाला होता, त्या तक्रारीचा काहिही उपयोग झाला नाही, मी चिडवायचा बंद झालो तरी बाकिचे बरेच दिवस त्याला चिडवतच होते. तुम्ही पण असेच काहीतरी करा. त्या दुकानात जाउन "लंगोट आहेत का" अशी चौकशी त्याच माणसाकडे करा. तो नाही म्हणाला की कसले फालतु दुकान आहे म्हणुन त्याचा जमेल तेवढा पाणउतारा करायचा. शेवटी त्याने समजा कंटाळुन लंगोट मागवले तर "हे असे नको रेशमी हवेत" किंवा "पांढरे नकोत लाल हवे" असे सांगायचे. पाणउतारा करण्याचा कार्यक्रम चालुच ठेवायचा. वाटल्यास तुमच्या मित्रमंडळींना सुध्दा या मज्जे मधे सामिल करुन घ्या. त्याचा संताप एनजॉय करा आणि चिकाटीने त्याला सतावत रहा. बघा एक दिवस तो तुमची बिनशर्त माफी मागेल. निदान परत अशा पध्दतीने कोणाशी बोलायची हिम्मत तरी करणार नाही. (एका रिक्षावाल्यालाही असाच एकदा धडा शिकवला होता पण ते पुन्हा केव्हा तरी) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

__/\__

सस्नेह
Tue, 12/09/2014 - 17:03 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

__/\__ __/\__ __/\__

मदनबाण
Tue, 12/09/2014 - 17:06 नवीन
__/\__ __/\__ __/\__

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

अल खराब!!!!!!!!!!

लॉरी टांगटूंगकर
Tue, 12/09/2014 - 17:47 नवीन
_/\__/\__/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

_/\_

प्रसाद गोडबोले
Tue, 12/09/2014 - 20:33 नवीन
=))
"हे असे नको रेशमी लंगोट हवेत"
=)) रेशमी लंगोट 'इमॅजिन' करुन पहायला पाहिजे एकदा ... फंडा भारी आहे , आपण व्हिक्टोरीया सिक्रेटच्या धर्तीवर "बाबुराब सिक्रेट" नावाची मेन्स लिंगर चेन सुरु करु ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

"बाबुराब सिक्रेट"

टवाळ कार्टा
Tue, 12/09/2014 - 20:38 नवीन
"बाबुराब सिक्रेट"
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मॉडेलिंग करणार का रे टवाळ

प्रसाद गोडबोले
Tue, 12/09/2014 - 20:41 नवीन
मॉडेलिंग करणार का रे टवाळ कार्ट्या ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

नाय बा ... माझ्याकडे ६/७

टवाळ कार्टा
Tue, 12/09/2014 - 20:45 नवीन
नाय बा ... माझ्याकडे ६/७ प्याक नायत स्पाला विचार त्येच्याकडे हायेत म्हन्त्यात लोक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

प्रॉडक्ट आणि

vikramaditya
Tue, 12/09/2014 - 22:12 नवीन
मॉडेलच्या अंगभुत गुणांचा मिसमॅच होत आहे. ईथे पॅक्सचे काय काम?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

+१

बॅटमॅन
Tue, 12/09/2014 - 22:19 नवीन
तुमच्या मॉडेलला काही पॅक? असे कुणी विचारले नाही उद्या म्हणजे झाले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vikramaditya

मॉडेलच्या अंगभुत गुणांचा

टवाळ कार्टा
Wed, 12/10/2014 - 08:42 नवीन
मॉडेलच्या अंगभुत गुणांचा मिसमॅच होत आहे
असे कोणते कोणते "अंगभूत" गुण लागतात जे आपल्या स्पा कडे नाहित =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vikramaditya

अगायायायायाया =))

बॅटमॅन
Tue, 12/09/2014 - 22:20 नवीन
अगायायायायाया =)) =)) बाकी मेन्स लिंगर चेन म्हणजे नाव लिटरली आणि फिगरेटिव्हली देखील कसं चपखल बसतंय नै ;) तदुपरि जुन्या काळी राजेमहाराजे लहान असताना रेशमी लंगोट वापरत असतील की. जरा पाहू काही जुन्या ग्रंथांत वा पत्रांत तसा उल्लेख सापडतोय का ते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

समजा जर उल्लेख नाहीच मिळाला

टवाळ कार्टा
Tue, 12/09/2014 - 22:24 नवीन
समजा जर उल्लेख नाहीच मिळाला तर मग ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

समजा जर उल्लेख नाहीच मिळाला तर मग ???

दिपक.कुवेत
Wed, 12/10/2014 - 00:35 नवीन
तर मग बॅट्या हे रेशमी लंगोट घालून एक नवा ईतिहास रचेल....(बॅट्या हलके घेशीलच हो...खात्री आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तर तर...आणि मग बॅटमॅनला

टवाळ कार्टा
Wed, 12/10/2014 - 08:44 नवीन
तर तर...आणि मग बॅटमॅनला त्याच्या गणवेशाच्या बाहेर घालायला रेशीमवस्त्र मिळेल =)) रच्याकने...बॅट्याचा "तसा" फोटो मचाकवर लावून त्याला मचाकचा "ब्रँड अँबेसेडोर" करायचा का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

मचाकवर 'आनंदी' लोक किती आहेत

बॅटमॅन
Wed, 12/10/2014 - 12:49 नवीन
मचाकवर 'आनंदी' लोक किती आहेत ते माहिती नाही. समजा बहुसंख्य असले तरी त्यांच्यापुढे माझा बळी का म्हणून? जोकरादि व्हिलन माझं डोकं खातात ते पुरेसं नाय वाटतं. की तुमचाच फटू लावू तिथे ;) काय राव, एखादा चांगला फटाका लावायचा सोडून हे काय चालवलंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

लँजरी (डिक्शनरी उच्चार) अ‍ॅड साठी जिंगल

vikramaditya
Wed, 12/10/2014 - 09:58 नवीन
रेशमी .... बनियन जालीका, रुप सहा नही जाये .... वालेका. (ओ पीं ची क्षमा मागुन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ते जुने झाले आता... ये तो बडा

टवाळ कार्टा
Wed, 12/10/2014 - 11:07 नवीन
ते जुने झाले आता... ये तो बडा टॉईंग है ही जास्त चालेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vikramaditya

+१ सॉल्लीडच पैजार बुवा

दिपक.कुवेत
Tue, 12/09/2014 - 18:59 नवीन
हे सतवायचे उपाय नक्कि ध्यानात ठेवीन आणि योग्य त्या ठिकाणी त्याचा जरुर वापर करीन. लंगोटाची आयडिया तर मस्तच!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

__/\__

मोदक
Tue, 12/09/2014 - 17:10 नवीन
__/\__ :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

(No subject)

अजया
Tue, 12/09/2014 - 17:52 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

__/\०_ पैजारबुवा.

विजुभाऊ
Tue, 12/09/2014 - 18:24 नवीन
__/\०_ पैजारबुवा. लैच्च भारी....... एकदम हुच्च
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

___/\____

टिवटिव
Tue, 12/09/2014 - 20:45 नवीन
___/\____
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

:))))

स्पंदना
Wed, 12/10/2014 - 04:13 नवीन
:)))) :)))) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

न्युसन्स वॅल्यू!! अफलातून!!

असंका
Wed, 12/10/2014 - 10:20 नवीन
न्युसन्स वॅल्यू!! :-)) अफलातून!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

_/\_

योगी९००
Wed, 12/10/2014 - 10:51 नवीन
_/\_ रिक्षावाल्याच्या किस्साही टाका सेपरेट धाग्यात.. आमचाही अनुभव टाकतो तेथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

एका रिक्षावाल्यालाही असाच

मोदक
Wed, 12/10/2014 - 12:23 नवीन
एका रिक्षावाल्यालाही असाच एकदा धडा शिकवला होता हा किस्सा टाकाच.!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

माझा एक मित्र प्रथमच पुण्यात

मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 12/11/2014 - 15:25 नवीन
माझा एक मित्र प्रथमच पुण्यात आला होता. त्याला रिक्षावाल्याने मुद्दामून फिरव फिरव फिरवला. मग मित्र ज्या इमारतीत जायचं होतं तिथे पोहोचल्यावर म्हणाला इथेच थांबा मी पाच मिनिटात येतो असं म्हणून इमारतीत शिरला. आणि त्याच्या मित्राच्या घरी काम झाल्यावर घराला मागून दार होतं तिथून सटकला. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

पैजारबुवा - रिक्शावाल्याचा

मोदक
Tue, 10/27/2015 - 13:57 नवीन
पैजारबुवा - रिक्शावाल्याचा किस्सा टाका!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

लै म्हणजे लईच लक्षात ठेवता राव तुम्ही…

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 10/27/2015 - 15:10 नवीन
लै म्हणजे लईच लक्षात ठेवता राव तुम्ही… चारएक वर्षांपूर्वी डेक्कन क्वीन ने स्टेशनला उतरलो आणि रिक्षावाल्याला विचारले सिंहगडरोडला येणार का? तो म्हणाला अडिचशे रुपये होतील. मी नेहमीच सगळ्या रिक्षावाल्यांना मठ्ठ आणि बावळट वाटत असेन बहुतेक कारण प्रत्येक वेळी अशीच् सुरुवात होते. पण या वेळी मला तिकडे हुज्जत घालायचा कंटाळा आला होता. मी हो नाही काही म्हणालो नाही आणि सरळ रिक्षात बसलो. त्याने मिटर टाकलेच नाही. मी मनात म्हणालो चला बरेच झाले. घराजवळ आल्यावर मी त्याला रिक्षा सोसायटीच्या आवारात घ्यायला सांगितली. खाली उतरलो बॅग वॉचमनच्या केबीन मधे ठेवली आणि वॉचमनला सोसायटीचे गेट लाउन टाकायला सांगीतले. रिक्षावाल्याला ऐकु जाईल अशा आवाजात वॉचमनला म्हणालो “मी सांगेपर्यंत ही रिक्षा सोसायटीच्या बाहेर गेली नाही पाहिजे.” आमचा त्या वेळाचा वॉचमन पण जरा टग्याच होता. त्याने घाईघाईने दार लावले आणि माझ्या मागे येउन उभा राहिला. मग रिक्षावाल्याला विचारले किती पैसे झाले. तो म्हणाला “आपले अडीचशे रुपये ठरले होते.” मी खिशातुन सत्तर रुपये काढुन त्याच्या हातात ठेवले आणि सांगीतले “मिटर प्रमाणे एवढेच होतात तेवढेच मिळतील” तो माझ्याशी जोरजोरात ओरडाआरडा करत वाद घालायला लागला. “ते आधिच ठरवायचे होते’ “आता जेवढे ठरले तेवढे दे नाहीतर बघुन घेइन” वैगेरे धमक्या द्यायला लागला. “मी त्याला म्हणालो जास्त शहाणपणा केलास तर तुझी रिक्षा रात्रभर सोसायटी बाहेर जाउ देणार नाही. बघ तुला काय परवडतय ते.” आमचा वॉचमन पण माझ्या बरोबरीने रिक्षावाल्याशी हुज्जत घालु लागला. तो पर्यंत सोसायटी मधेही लोकं जमायला सुरुवात झाली होती. जशी गर्दी जमा होउ लागली तसा त्याचा स्वर नरम् पडत गेला. कारण गर्दीमधल्या कोणीच त्याला सहानुभुती दाखवत नव्हत. मग तो दिडशे रुपयां पर्य्ंत खाली आला, त्यानंतर मग शंभर तरी द्या असे म्हणायला लागला. पण मी सत्तर रुपयांवर ठाम होतो. शेवटी अर्धापाउण तासा नंतर त्याल बहुतेक ते सगळे असहाय्य झाले. त्याने रागारागाने माझे सत्तर रुपये पण परत केले आणि म्हणाला “जा भिकारड्या तुला फुकट सोडल अस समज.” मी शांतपणे सत्तर रुपये खिशात टाकले. वॉचमनला गेट उघडायला सांगीतले. गेट उघडल्या बरोबर तो घाईघाईने रिक्षा घेउन निघुन गेला मी त्या सत्तर रुपयातले पन्नास रुपये वॉचमनला बक्षीस म्हणुन दिले, माझ्या पाठीमागे येउन उभा राहिला म्हणुन आणि घरी गेलो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अरे बापरे.. बरंच डेअरिंग केलत

पिलीयन रायडर
Tue, 10/27/2015 - 15:27 नवीन
अरे बापरे.. बरंच डेअरिंग केलत की!! मी पण एका रिक्षावाल्याने असं वाट्टेल त्या गल्ली बोळातुन फिरवल्यानंतर त्याला "पैसे देत नाही जा" असं सांगितलं होतं. तो ही रागारागाने निघुन गेला होता!! तरी मी त्याला १५०/- देत होते.. त्याला २५० हवे होते. मी तर मीटर वगैरेपण वाद घातला नाही. फक्त तू इतकं का फिरवत होतास हेच विचारलं. तर येडं आहे ते १५०/- पण न घेता गेलें. वर म्हणे ओवाळणी तुम्हाला. मी धन्यवाद म्हणाले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

अच्छा 'सत्तर रुपये'

प्यारे१
Tue, 10/27/2015 - 15:57 नवीन
अच्छा 'सत्तर रुपये' तेव्हापासून अखिल भारतात फेमस आहेत तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

माने, हा शुध्ध हलकटपणा आहे

टवाळ कार्टा
Tue, 10/27/2015 - 17:25 नवीन
माने, हा शुध्ध हलकटपणा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

लै म्हणजे लईच लक्षात ठेवता

मोदक
Tue, 10/27/2015 - 18:11 नवीन
लै म्हणजे लईच लक्षात ठेवता राव तुम्ही… ह्या ह्या ह्या... बाकी तुमचा लोणीवाला किस्सा जबरदस्त स्ट्रेसबर्स्टर आहे. त्यामुळे रिक्शावाल्याचा किस्सा पेंडींग आहे ते लक्षात राहिले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

लोणीवाला

रुस्तम
Tue, 10/27/2015 - 19:41 नवीन
"लोणीवाला " कोणता किस्सा ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ठोssss

प्रमोद देर्देकर
Wed, 12/10/2014 - 13:29 नवीन
ठोssss :)) ज्ञा. पै. जबरा किस्सा तुम्हाला सा. /\___/@@\. तुमच्या चरण पादुका पाठवुन द्या जरा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

__/\__ __/\__ __/\__

मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 12/11/2014 - 15:18 नवीन
__/\__ __/\__ __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

लय भारी

निलीमा
Fri, 12/12/2014 - 11:59 नवीन
लय भारी आइडिया हाये बघा ही... *clapping* *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

पुरूषांनी बायकांबरोबर दुकानात

कंजूस
Tue, 12/09/2014 - 17:07 नवीन
पुरूषांनी बायकांबरोबर दुकानात गेल्यास सर्व सुत्रे आपल्या हातात ठेवावीत म्हणजे मनस्ताप होत नाही. आपल्या चपला /पादत्राणे बघून दुकानदारास खरेदीशक्तीचा अंदाज आलेला असतो. मुख्यगोष्ट सर्व साड्या सूरतहून येतात. तिथे मिळणारी पाचशेची (लेबल किंमत)साडी येथे घासाघीस करून १९००ची पंधराशेला मिळते वर नवऱ्याला एसीची हवा फुकट. आणखी माहिती हवी आहे का ?
  • Log in or register to post comments

अनाहिता

कपिलमुनी
Tue, 12/09/2014 - 17:28 नवीन
अजून माहिती दिलीत तर तुम्हाला अनाहिताची मेंबरशिप पण मिळेल ! येउ द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

+१

सूड
Tue, 12/09/2014 - 17:35 नवीन
असेच म्हणतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

बांद्रा-सूरत इंटरसिटी १२९३५

कंजूस
Tue, 12/09/2014 - 19:05 नवीन
बांद्रा-सूरत इंटरसिटी १२९३५ साडेसात बोरिवलीहून आहे. सवा अकरा सूरतला जाते. परत चारला निघते(तिकीट सेकंड सीटिंग रु १२०.) मधल्या चार तासात खरेदी जमवायची. येताना सुतरफेणी, घारी आणि अडदियोपाक वगैरे मिठाई आणता येते.(हीच मिठाई दादरच्या अग्रवाल क्लास जवळच्या मधुर ड़्रायफ्रुटसमध्येही मिळते.) ऑटोने पाचसात मिनीटांत 'बॉम्बे मार्केट'(शंभरेक दुकाने आहेत, रविवारी बंद असते.) गाठायचे. फैन्सी साड्या असतात. आजूबाजूला अशीच मोठी मार्केटस आहेत. सुती साड्या आता महागच असतात.मदुराई, कोचि, कन्याकुमारीला, तिरुपतीला इथूनच माल जातो. वर्षातून एखादी ट्रीप नोव्हेँबर डिसेंबरला करता येईल. संक्रांतीच्या काळात नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बांद्रा-सूरत इंटरसिटी १२९३५

कविता१९७८
Wed, 12/10/2014 - 09:58 नवीन
बांद्रा-सूरत इंटरसिटी १२९३५ साडेसात बोरिवलीहून आहे. सवा अकरा सूरतला जाते. परत चारला निघते
रीझर्वेशन करुन गेल्यास उत्तम ,बांदा टर्मिनस हुन सुटणारी ईंटरसिटी बोरीवली, बोईसर, वापी, वलसाड, नवसारी नंतर सुरत ला जाउन थांबते. सुरतहुन उतरल्यावर स्टेशनबाहेर रिक्षा मिळतात , शेअरींग ने १० रु. पर्यंत जाता येते पण रीक्षाचालक नवीन लोकांना लगेचच ओळखतात, मग ३०-४० रु. भाडे आकारतात. दोन बॉम्बे मार्केट आहेत, एक जुने आणि दुसरे नविन. आधी जुने बॉम्बे मार्केट लागते नंतर नवीन , दोघांमधे १ की.मी. चे ही अंतर नसेल, नवीन बॉम्बे मार्केट समोर गार्डन सिल्क मिल चे ऑफीस आहे. बाकी सुरत ला अगदी एकाबाजुला एक असे हजारो मार्केट्स आहेत. सुरत टेक्स्टाईल मार्केट ही चांगले आहे, सुरत ला खुप मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे एकाच रंगाच्या एकाच डीझाईनच्या ७-८ वेगवेगळ्या वरायटी पाहायला मिळतात, डुप्लिकेसी पण असते. आम्हाला एका दुकानदाराने डुप्लिकेट साडी कशी ओळखावी हे सांगितले होते. एक साडी होती तिच्यावर जो स्टँप लावला होता त्यावर साधारण कंपनीचे नाव , पत्ता, साडीचे मटेरीयल, लांबी, आणि नकल से सावधान अशी चेतावनी होती तश्याच कलर मधे सेम डीझाईन मधे एक साडी होती त्यावर फक्त कंपनीचे नाव आणि नकल से सावधान इतकंच छापलं होतं. येताना प्लॅटफॉर्म न. ४ वरुन ४ वाजुन १० मिनिटांनी ईंटरसिटी सुटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

रु १२० तिकीट रेझ॰चेच आहे.

कंजूस
गुरुवार, 12/11/2014 - 14:56 नवीन
रु १२० तिकीट रेझ॰चेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

नवऱ्याने बायकोबरोबर

कंजूस
Tue, 12/09/2014 - 17:10 नवीन
नवऱ्याने बायकोबरोबर साडीखरेदीला जाताना असे कृपया वाचावे.
  • Log in or register to post comments

वाद घालणे

सिरुसेरि
Tue, 12/09/2014 - 17:25 नवीन
तुम्ही दुकानदाराशी वाद घातला नाही हे योग्यच केले . कारण त्या तसल्या फालतू दुकानदारांची तितकीही लायकी नसते . त्यांना चपलेने मारले तर आपलीच चप्पल खराब होते . त्यापेक्षा अशा दुकानदारांची दखल न घेणे , त्यांना वाद घालण्याइतपतही जास्त भाव न देणे हेच तुम्ही योग्य केले . असे मॉल , दुकाने यापुढे टाळनेच उत्तम . यांवरुन प्रेटी वुमन मधला जुलिया रोबेर्ट्सचा ड्रेस खरेदीचा प्रसंग आठवला . इतर दुकानात भरपुर ड्रेस खरेदी करुन जिथे अपमान झाला त्या दुकानात जाउन खिजवायचे - वेरी बिग मिस्टेक ...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा