दुकानदाराकडून अपमान..
गेल्या वर्षभरात दोन प्रसंग असे आले की दुकानदाराने अतिशय अपमान केला.. दोन्ही प्रसंग बोरीवलीच्या एकाच मॉल मधील दोन वेगवेगळ्या दुकानात घडले..
प्रसंग एक :
हिच्यासाठी ड्रेस मटेरीयल घ्यायचे होते. मला तितका उत्साह नव्हता. कारण म्हणजे १०-१५ मिनिटाचे काम नव्हते तर चांगले दोन-तीन तास जाणार हे ओळखून होतो. त्यामुळे बोरीवलीच्या मॉलमधील एका चांगल्या दुकानात शिरल्या-शिरल्या एक मोक्याची जागा बसायला पकडली आणि शांतपणे मोबाईलवर गेम खेळू लागलो. अर्थात अगदीच निरूत्साही नव्हतो. मध्ये मध्ये तिला हा ड्रेस बघ, तो बघ तुला चांगला दिसेल असे सांगत सुद्धा होतो. हिला माझा हा स्वभाव माहित होता म्हणून तिने माझे मध्ये मध्ये बाजूला जाऊन बसणे तितके काय मनावर घेतले नव्हते (असे मला वाटले). अशीच १०-१२ मिनिटे गेल्यावर तिने चला म्हणून मला सांगितले. मी आश्चर्याने खरेदी झाली का असे विचारला. त्यावर तिने नजरेनेच दुसर्या दुकानात बघू या असे सांगितले. मी लगेच "इथले ड्रेस मटेरीयल नाही का आवडले?" असे तिला विचारले. यावर लगेच दुकानदार माझ्यावर डाफरला " कसे आवडेल ड्रेस मटेरीयल? आख्खे दुकान जरी दाखवले तरी त्यांना आवडणार नाही. तुम्हीच इंटरेस्ट घेत नाही मग त्या कितीही भारी कापड दाखवले तरी नाहीच म्हणणार...आमच्या दुकानात एसी खायला, आराम करायला आलात तुम्ही. तुम्ही काय खरेदी करणार?" असे इतक्या मोठ्यांनी म्हणाला. की मी एकदम अवाक झालो. दुकानातले सर्वजण माझ्याकडे पहायला लागले. त्यातल्या काही बायका माझ्याकडे विचित्र नजरेने आणि काही माझ्या मिसेसकडे सहानभुतीने पहात आहेत असे वाटले.
खरतरं मला माझ्यावर कोणी असे ओरडेल असे मुळीच वाटले नव्हते त्यामुळे दुकानदाराच्या त्या अचानक झालेल्या शाब्दीक हल्याने माझी बोलती बंद झाली होती. मदतीसाठी मी तिथल्या एका पुरूषाकडे पाहिले पण त्याने माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले. आणि आपल्या बायकोच्या खरेदीकडे लक्ष घातले. माझ्या बाजूला बसलेला एकजण हळूच उठला आणि त्याच्या बायकोच्या बाजूला उभा राहीला. मी पण मग मुकाट्याने उठलो आणि खाली मान घालून हिच्याबरोबर बाहेर पडलो. नंतर घरी दुकानदाराने केला नसेल त्याच्या शतपटीने आमचा पाणउतारा केला गेला पण बाहेरची कोणी मंडळी पहात नसल्याने त्याचे तितके काही वाटले नाही. दुकानदाराला "अरे बाबा तुला तुझ्याकडच्या कापडाचे मार्केटींग करता येत नाही किंवा तुझ्याकडे तितकी variety नाही याचा दोष मला का देतोस? किंवा मी काय तुझा नोकर आहे काय की तुझ्या कापडांचे मार्केटींग करावे?" असे काहीतरी म्हणायला पाहिजे होते असे वाटत राहीले. पण हे त्यावेळी अजिबात सुचले नाही.
प्रसंग दोन:
वरील प्रसंग घडल्यानंतर साधारणपणे एक वर्षानंतर त्याच मॉलमध्ये हिच्याबरोबर जायचा योग लादला गेला. यावेळी साडी खरेदी होती. आधीचा अनुभव मॉलमध्ये शिरल्या-शिरल्या डोळ्यासमोर आला आणि उगाचच उसना उत्साह चेहर्यावर आणला. एका साडीच्या दुकानात गेलो. तिथे १०-१५ मि. साड्या बघण्यात गेली. एखादी साडी हिला जरा आवडत आहे असे दिसल्या-दिसल्या घे घे तुला छान दिसेल, एकदम सुरेख साडी आहे असे बोलून तिला पटवायचा प्रकार चांगला दोन-तीन वेळा केला. दुकानातल्या साड्या दाखवणार्या माणसाला आम्ही आता काहीतरी घेणारच अशी आशा लागली. त्याने लगेच आणखी साड्या दाखवायचे थांबवले आणि तो ही दोन-तीन जरा बर्यापैकी आवडलेल्या सांड्यांमधली साडी घ्या असा मागे लागला. पण हिला आणखी variety पहायची होती आणि दुकानातल्या माणसाला अजुन दाखवायचा कंटाळा आला होता. त्या दोघांचा थोडा-फार वाद सुरू झाला. मी सुद्धा थोडा दमल्याने बाजूला बसलो आणि झाले. हिने एकदम निर्णय घेतला की दुसर्या दुकानात पाहून घेऊ. तसेच पहिल्याच दुकानात साडी काय घ्यायची चांगले दोन-तीन दुकानात पाहून काय ते ठरवू असाही विचार तिने केला. पण या मुळे तो दुकानातला माणूस माझ्यावर एकदम ओरडला, "टाईमपास करायला आलात काय? काही घ्यायचे नाही तर कशाला उगाच बसून राहीलात?". मी यावेळी हिच्यावर जरा ओरडलो," तुला आवडली असेल तर घे ना साडी. कशाला यांचे शिव्याशाप ऐकतेस?". हिचा मात्र दुसर्या दुकानात जायचा ठाम निश्चय होता. त्या माणसाच्या अशा बोलण्याने हीने भडकून सांगितले की एक तर अजुन variety दाखवत नाही आणि वर असे बोलता. आता काही झाले तरी तुमच्या दुकानात परत येणार नाही. मग निघालो तेथून. परत घरी आमचे भांडण झालेच. मी थोडावेळ बाजूला बसलो आणि त्या दुकानातल्या माणसाला variety दाखवायला नाही सांगितली याचा राग माझ्यावर निघाला. मी उसना उत्साह चेहर्यावर आणला होता हे सुद्धा हिने बरोबर ओळखले होते. (हा राग त्यानंतर दोन-तीन दिवसांनी नल्ली साडी घेतल्यावर कमी झाला).
वरील दोन्ही प्रसंगात मला एक गोष्ट सारखी वाटली की दोन्ही वेळेस दुकानदारांनी नवर्यास (म्हणजे मला) दोषी ठरवले. ही त्यांची Strategy असावी काय? दोन्ही वेळेस "एसीची हवा खायला किंवा टाईमपास करायला आलात" अशा प्रकारची अपमान होईल अशी वाक्ये बोलली गेली. खरे तर दोन्ही प्रसंगात आम्ही दुकानदाराचा १०-१५ मिनीटांपेक्षा जास्त वेळ घेतला नव्हता. उगाच एखादा तास-दीड तास घालवला आणि असे वागलो तर समजण्यासारखे आहे. पण असे त्यांचे बोलणे बरोबर नाही वाटले. नवर्र्यांना हुसकवून किंवा त्यांचा पुरूषी अहंकार जागवून त्यांनी बायकोला खरेदी करण्यास भाग पाडावे असे त्यांचा हेतू असावा काय? असा अनुभव आपल्याकडील कोणाला आला आहे काय?
तसेच बायकोबरोबर उत्साहाने खरेदीस कसे जावे? काय करावे म्हणजे उत्साह टिकून राहील किंवा उत्साही आहोत असे दिसेल.
यावरही जाणकारांनी प्रकाश टाकावा.
वाचने
102506
वाचनखूण
प्रतिक्रिया
313
मुळात बायकोबरोबर खरेदीला
In reply to मुळात बायकोबरोबर खरेदीला by बोका-ए-आझम
क्या बात है.
माज आला आहे
आम्ही २ घेतल्या
In reply to आम्ही २ घेतल्या by मनिमौ
छ्या
In reply to छ्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(No subject)
दुकानदार
अश्या प्रसंगात माझी जाम गोची
In reply to अश्या प्रसंगात माझी जाम गोची by कानडाऊ योगेशु
प्रतिसाद आवडला, हेही खरं आहे.
शॉपिंगची फारशी आवड नसल्याने
पुणेरी बाणा
In reply to पुणेरी बाणा by सत्याचे प्रयोग
तुमच्या एटीएम कार्डात एवढे
आयला,तुम्ही गप्प का बसलात ?
In reply to आयला,तुम्ही गप्प का बसलात ? by बाबा पाटील
बाबौ !! _/\_
In reply to आयला,तुम्ही गप्प का बसलात ? by बाबा पाटील
हांगश्शी!!
In reply to आयला,तुम्ही गप्प का बसलात ? by बाबा पाटील
१८० च्या कोनात
In reply to १८० च्या कोनात by काळा पहाड
धोनीचा हेलिकॉप्टर शॉटचा जसा फुल स्विंग बॅक लिफ्ट असतो तसा
In reply to धोनीचा हेलिकॉप्टर शॉटचा जसा फुल स्विंग बॅक लिफ्ट असतो तसा by बाबा पाटील
हे वाचून हा प्रसंग आठवला:
In reply to हे वाचून हा प्रसंग आठवला: by काळा पहाड
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
In reply to *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol: by बाबा पाटील
च्यामारी
आयुष्यात कधी ही बायको बरोबर
हे बोरिवलीचे दोन्ही दुकानदार
चला, एक कट्टा त्याच मॉल मध्ये
In reply to चला, एक कट्टा त्याच मॉल मध्ये by विश्वनाथ मेहेंदळे
_/\_
In reply to चला, एक कट्टा त्याच मॉल मध्ये by विश्वनाथ मेहेंदळे
+१
In reply to +१ by सस्नेह
डन
In reply to डन by ज्ञानोबाचे पैजार
(No subject)
In reply to डन by ज्ञानोबाचे पैजार
त्याआधी सगळ्या अनाहितांना
In reply to त्याआधी सगळ्या अनाहितांना by टवाळ कार्टा
टका,
In reply to टका, by ज्ञानोबाचे पैजार
आणि नख्या काढून अंगावर आली तर
In reply to टका, by ज्ञानोबाचे पैजार
अग्गागा
In reply to त्याआधी सगळ्या अनाहितांना by टवाळ कार्टा
ह्या उदाहरणासाठी/ ऐवजी
In reply to डन by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा मी पण आनंदाने भाग घेईन
In reply to चला, एक कट्टा त्याच मॉल मध्ये by विश्वनाथ मेहेंदळे
सुन्दर .. नक्कि करु ...
खरेदी हा प्रसंग माझ्या बाबतीत
In reply to खरेदी हा प्रसंग माझ्या बाबतीत by स्पंदना
बरय ब्वॉ तुमचं!
In reply to बरय ब्वॉ तुमचं! by रेवती
साडी घ्यायला गेलं की मी
In reply to साडी घ्यायला गेलं की मी by काळा पहाड
मक्काय! तेच जास्त
वाचनखुण साठवण्यापलीकडे फार
दुकानदाराचा अपमान ! सूड घ्या !
कमाल आहे. पुण्यातले दुकानदार
In reply to कमाल आहे. पुण्यातले दुकानदार by मृत्युन्जय
कमाल आहे. पुण्यातले दुकानदार
काय हे?
मुळात परिस्थिती काय आहे हे लक्षात घेतलं की मनस्ताप संपतो!
In reply to मुळात परिस्थिती काय आहे हे लक्षात घेतलं की मनस्ताप संपतो! by संजय क्षीरसागर
व्वा
In reply to व्वा by मी-सौरभ
संक्षींना संक्षी ष्टाईल उत्तर
In reply to संक्षींना संक्षी ष्टाईल उत्तर by प्रसाद गोडबोले
अगदी अगदी
In reply to व्वा by मी-सौरभ
संवाद छानच आहे.
इतका पंचनामा झाला आहे तर त्या
चडचणचे कापड दुकान
सर्वांचे आभार...
In reply to सर्वांचे आभार... by योगी९००
राहीली गोष्ट ते फेसबूक,
राहीली गोष्ट ते फेसबूक, वॅट्सअॅप या माध्यमातून दुकानाची माहिती देण्याची किंवा इथे त्यांची नावे देण्याची.. अशामुळे काय होणार आहे?बरेच काही होते. आणि काही झाले नाही तरी "ग्राहक असे असे वागू शकतो" हे त्या दुकानाच्या (आणि जर फ्रँचाईसी असेल तर मुख्य कंपनीच्या) लक्षात आले तरी बस्स आहे. अवांतर - एकदा एअरटेलचे त्यांच्याच वेबसाईटवरून ऑनलाईन रिचार्ज केले. साधारण २०० रूपयांचे. मला हवा असलेला आणि वेबसाईटवर नोंदवलेला प्लॅन मिळण्याऐवजी भलताच (आणि नको असलेला) प्लॅन मिळाला. कस्टमर केअर सोबत बोलून वाद न घालता त्यांच्या वेबसाईटचा स्क्रीनशॉट, ट्रँन्झॅक्शन आयडी आणि माझे डिटेल्स इ-मेलने कस्टमर केअरला पाठवले. मी लिहिलेला मेल आणि त्यांचा आलेला रिप्लाय याचा दूर दूर तक संबंध नव्हता. त्यांच्या दुसर्या तिसर्या मेल रिप्लायला "मी लिहिले आहे ते तुम्हाला समजले असेल तर तुमच्या भाषेत तेच मला लिहून पाठवा" असाही एक खवचट प्रतिसाद दिला. या सगळ्यामध्ये दोन दिवस गेले. कस्टमर केअरकडून हे असेच लांबत जाणार अशी खात्री पटल्यावर शांतपणे हे सगळे उचलून फेसबुकवर टाकले - अर्थात मेल जसाच्या तसा कॉपी पेस्ट केला नाही पण कुणाशी काय बोलणे झाले आहे ही साधारण माहिती टाकली. पुढच्या अर्ध्या तासात "इश्यू एस्कलेट" झाला. कस्टमर केअर आणि फेसबुकवरच्या त्यांच्या अकाऊंटचा माणूस फोन कर करून सगळे समजावून घेवू लागले. आणखी १५ मिनीटांनी मला हवा तो प्लॅन मिळणार नाही पण मी केलेल्या रिचार्जच्या रकमेचा टॉकटाईम मिळाला. यामध्ये एक अनपेक्षीत गोष्ट झाली - कस्टमर केअर आणि फेसबुक वाले वेगवेगळ्या पातळ्यांवरून माझ्याशी बोलत होते आणि मला वाटत होते ते एकाच टीममधून आहेत. कारण दोघांनीही "मला हवा तो प्लॅन मिळणार नाही" आणि "मी केलेल्या रिचार्जच्या रकमेचा टॉकटाईम मिळेल" हेच सांगीतले होते. मला एकूण ४०० रूपयांचा टॉकटाईम मिळाला. फेसबुकवाल्याला हे सांगीतले व २०० रू रिव्हर्स करून घे म्हणून सांगीतल्यावर त्याने त्या गोष्टीला नकार दिला (कारण माहिती नाही) व तुम्हाला आमच्यातर्फे कॉम्प्लीमेंट समजा असे सांगीतले. :)In reply to राहीली गोष्ट ते फेसबूक, by मोदक
हम्मम..
In reply to हम्मम.. by योगी९००
कृपया त्या दुकानाचे नाव आणि
(आपल्याच)?
In reply to (आपल्याच)? by ज्ञानोबाचे पैजार
आपल्याच लिहीला कारण..
In reply to आपल्याच लिहीला कारण.. by योगी९००
बायकोबरोबर खरेदीला जाताना
In reply to आपल्याच लिहीला कारण.. by योगी९००
उत्साहाचं ना आत्मविश्वासा सारखं आहे
In reply to उत्साहाचं ना आत्मविश्वासा सारखं आहे by दिपक.कुवेत
तो आपला आपणच कमवावा लागतो..
In reply to तो आपला आपणच कमवावा लागतो.. by योगी९००
अहो... असे हो काय तुम्ही?
अजून एक
आमच्या बाबतीत असा किस्सा झाला
In reply to आमच्या बाबतीत असा किस्सा झाला by शिद
आणखी अवांतरः Shopping men versus shopping women
अजिबात सोडायचा नव्हता त्याला.
In reply to अजिबात सोडायचा नव्हता त्याला. by कॅप्टन जॅक स्पॅरो
+ १०००
In reply to + १००० by सुबोध खरे
गायकवाड साहेबांनी त्या वेटर
गायकवाड साहेबांनी त्या वेटर ची कडक शब्दात सर्वांसमोर हजेरी घेतलीया प्रकाराच्या अनुषंगाने माझा अनेकदा गोंधळ उडतो. वेटर, सेल्समन किंवा आपण ज्याची तक्रार करत असतो त्या व्यक्तीचे "या प्रसंगामुळे पुढे काय होणार..?" असा विचार केला तर.. १) त्यांना वॉर्नींग मिळेल किंवा जास्तीत जास्त आपण गेल्यानंतर आणखी एकदा मॅनेजर झाडेल.. असे.. किंवा २) त्यांच्या नोकरीवर गदा येईल अथवा आर्थिक दंड होईल (इन्सेंटीव्ह मधून कापून अथवा एखादे इन्क्रीमेंट कमी % ने झाल्याने...) पहिला मुद्दा असेल तर ठीक आहे.. पण जर या प्रकारामुळे जर आर्थिक दंड किंवा नोकरीवर गदा येत असेल तर विनाकारण वाईट वाटत राहते. उदा. - आमच्या कंपनीच्या कॅब ड्रायव्हर्सना AC कायम ऑन ठेवावा अशी सूचना असताना (आणि AC हा ३ किंवा ४ वरच असावा, २ वर असू नये इतक्या स्पष्ट सूचना असताना) एखादा ड्रायव्हर मुद्दाम २ वर AC चालवतो. त्यामुळे किती फरक पडतो हा वेगळा प्रश्न पण "कंपनीने आखून दिलेला नियम पाळला जात नाहीये हे उघड असते." (कंपनीचे सगळे नियम आपण पाळतो का हा एक मुद्दा आहेच!) याची तक्रार केली तर या ड्रायव्हरला पहिल्यावेळी ५००/- रू नंतर ७००/- रू असा दंड होतो. अनेकदा सांगूनही भरधाव वेगाने आणि धोकादायकरीत्या गाडी चालवणे हाही असाच एक प्रश्न. तक्रार केली तर त्याची कॅब काढून टाकतात तक्रार नाही केली तर आपण जीव मुठीत धरून प्रवास करत असतो.. व्यवस्थीत न वागणारा वेटर - जेवणाच्या कितीतरी आधी मागवलेला मसाला पापड जेवण सुरू झाल्यानंतर आणून देणे, कांदा लिंबू किंवा टिश्यू पेपर्स आणण्यास वेळ लावणे, चाट मसाला मागितला असताना तिखट आणून देणे आणि चाट मसाला संपला असे सांगणे.. अशा वेळी तक्रार करणे योग्य असते परंतु आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून त्याची शिकार होईल ही भावना टोचत राहतेच. :(In reply to गायकवाड साहेबांनी त्या वेटर by मोदक
अशा अनेक प्रसंगात...आधी एकदा
In reply to अशा अनेक प्रसंगात...आधी एकदा by टवाळ कार्टा
१ शंका...हे असे प्रसंग
१ शंका...हे असे प्रसंग चितळ्यांकडच्या दुकानांत होतात काय?हेच नाही पण एक दोनदा असे प्रसंग झाले होते. सध्याचे माहिती नाही. आपण पैसे देवून त्यांचा माज सहन करणे जमत नसल्याने चितळ्यांच्याऐवजी काका हलवाईला पसंती दिली जाते.In reply to अशा अनेक प्रसंगात...आधी एकदा by टवाळ कार्टा
१ शंका...हे असे प्रसंग
१ शंका...हे असे प्रसंग चितळ्यांकडच्या दुकानांत होतात काय?कोणत्या ग्रहावरून आला आहात ? चितळ्यांच्या दुकानांत असे प्रसंग झाले नाही तर सूर्य पश्चिमेला उगयला सुरूवात करेल! "ग्राहक येथे स्वतःवर तुमच्या कडून उपकार किंवा अपमान करून घ्यायला येत नाहीत. ग्राहक यायचे बंद झाले तर इथल्या मालकाचा धदा बंद होईल आणि कर्मचार्यांची नोकरी जाईल." असे दोन-तीनदा तेथिल कर्मचारी, व्यवस्थापक आणि मालक यांना सांगून झाले आहे. प्रत्येक वेळेला त्या सगळ्यांच्या चेहर्यावर "कायच्या काय बोलतात बुवा माणसे" असाच आश्चर्यमिश्रित भाव दिसला आहे !In reply to १ शंका...हे असे प्रसंग by डॉ सुहास म्हात्रे
प्रत्येक वेळेला त्या
In reply to प्रत्येक वेळेला त्या by टवाळ कार्टा
परंपरा...
In reply to परंपरा... by डॉ सुहास म्हात्रे
पैजारबुवांना चितळेंची सुपारी
In reply to पैजारबुवांना चितळेंची सुपारी by मोदक
आयड्याची कल्पना ब्येष्ट आहे !
In reply to पैजारबुवांना चितळेंची सुपारी by मोदक
आख्खी मिपाग्यांग घेउन आत
In reply to प्रत्येक वेळेला त्या by टवाळ कार्टा
आग बुझवायला
In reply to आग बुझवायला by हाडक्या
"आग बुझवणे" हे कदाचित
In reply to "आग बुझवणे" हे कदाचित by टवाळ कार्टा
>>> एकदा दुपारी ११:५५ am
In reply to >>> एकदा दुपारी ११:५५ am by प्यारे१
आय माय स्वारी... १ ते ४ असेच
In reply to आय माय स्वारी... १ ते ४ असेच by टवाळ कार्टा
रच्याकने पुण्याचा तो वल्डफेमस
In reply to रच्याकने पुण्याचा तो वल्डफेमस by टवाळ कार्टा
असाच रजनीकांतचा किस्सा वाचला
In reply to असाच रजनीकांतचा किस्सा वाचला by प्यारे१
तुमची चिवचिव समझली
In reply to >>> एकदा दुपारी ११:५५ am by प्यारे१
आग विझवण्यासाठी अग्निशमन
In reply to "आग बुझवणे" हे कदाचित by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to १ शंका...हे असे प्रसंग by डॉ सुहास म्हात्रे
तरी पण चितळे ची सर्व दुकाने
In reply to तरी पण चितळे ची सर्व दुकाने by प्रसाद१९७१
शेवटी ते "चितळे" आहेत. सोने
शेवटी ते "चितळे" आहेत. सोने घेताना "गाडगीळ", घर बूक करताना "परांजपे" लोक डोळे झाकुन घेतात.मान्य आहे पण म्हणून मालकांनी डोळे झाकून बसू नये असे वाटते. गाडगीळांच्याकडे असा कधीही अनुभव येत नाही - कोणाला आला असल्यास वाचण्यास उत्सुक.In reply to शेवटी ते "चितळे" आहेत. सोने by मोदक
दादूस +१
In reply to दादूस +१ by नाखु
जागो ग्राहक जागो वर टाका
In reply to तरी पण चितळे ची सर्व दुकाने by प्रसाद१९७१
सोने घेताना "गाडगीळ", घर बूक
In reply to सोने घेताना "गाडगीळ", घर बूक by बॅटमॅन
डोळे झाकुन म्हणजे भरलेले पैसे
In reply to डोळे झाकुन म्हणजे भरलेले पैसे by प्रसाद१९७१
डोळे झाकुन म्हणजे भरलेले पैसे
In reply to डोळे झाकुन म्हणजे भरलेले पैसे by बॅटमॅन
मराठी कळते ओ आम्हांला.
In reply to सोने घेताना "गाडगीळ", घर बूक by बॅटमॅन
पुण्यनगरीतले पुण्यवान काय
In reply to पुण्यनगरीतले पुण्यवान काय by काळा पहाड
जिथे बाजूला काहीच नाही तिथे
In reply to जिथे बाजूला काहीच नाही तिथे by प्रसाद१९७१
प्रतिसादा बद्दल धन्यवाद..
In reply to जिथे बाजूला काहीच नाही तिथे by प्रसाद१९७१
नंतर ती स्कीम चे बांधकाम चालू
In reply to नंतर ती स्कीम चे बांधकाम चालू by थॉर माणूस
पर्फेक्ट पकडलाय!
In reply to पर्फेक्ट पकडलाय! by आनंदी गोपाळ
एकमेकांची लाल करणे
In reply to पर्फेक्ट पकडलाय! by आनंदी गोपाळ
फक्त डॉक्टर साहेबांना खरा
In reply to १ शंका...हे असे प्रसंग by डॉ सुहास म्हात्रे
ग्राहक येथे स्वतःवर तुमच्या
In reply to ग्राहक येथे स्वतःवर तुमच्या by अनुप ढेरे
चला त्या दुकानात सरळ साधे
In reply to चला त्या दुकानात सरळ साधे by डॉ सुहास म्हात्रे
कित्ती नशीबवान आहे मी!
In reply to कित्ती नशीबवान आहे मी! by पैसा
त्याला पाटी नाही, टोकन
In reply to कित्ती नशीबवान आहे मी! by पैसा
काय हे ! आज मागोमाग दोन धक्के
In reply to चला त्या दुकानात सरळ साधे by डॉ सुहास म्हात्रे
आम्हाला तर ब्वॉ चितळ्यांच्या
आम्हाला तर ब्वॉ चितळ्यांच्या दुकानातल्या बाकरवडी, आंबाबर्फी, काजू कतली, साखरी पेढे या वस्तू मिळाल्यावर त्यांनी या अशा चीजा तयार करून आपल्याला उपकृत केलेलं आहे अशीच भावना असते.आम्ही स्वकष्टाने कमावलेले पैसे देऊन कोणतीही सेवा/वस्तू खरेदी करत असल्याने कोणताही दुकानदार/सेवा देणारा आमच्यावर कृपा करत नाही. अर्थात, प्रत्येकाला ज्याचा त्याचा योग्य तो मान मिळालाच पाहिजे या तत्वाशी आमची बांधिलकी असल्याने कोणाबरोबर शिरजोरी करत नाही आणि दुसर्या कोणी केली तर त्याच्या पदरात त्याचे माप घातले नाही असे सहसा होत नाही. दुकानदाराने माजाने दुकान बंद केले तरी आम्हाला काही फरक पडेल इतके कोणत्याच दुकानदारावर अवलंबून न राहण्याएवढे मनोबल राखून आहोत :) ;)बाकी त्यांच्या दुकानात 'बाकरवडी ताजी आहे का?' सारखे निर्बुद्ध प्रश्न विचारले नाहीत तर शेलकी उत्तरे (ज्याला काही पामर अपमान म्हणतात !) मिळत नाहीत असे निरीक्षण आहे.असा प्रश्न विचारणे म्हणजे एखाद्या दुकानदाराची अब्रू वेशिवर टांगली जाते असे समजण्याएवढे आम्ही कोणत्याच दुकानदाराच्या आहारी गेलेलो नाही ;) :) छे, छे, किती ते परावलंबित्व ?... बाकरवडी, आंबाबर्फी, काजू कतली, साखरी पेढे अश्या गोष्टींची आवड असणे ठीक... पण ते विकत देणार्याचे उपकार वाटण्याइतके त्यांचे व्यसन ??? *dash1* (वरचे सगळे खरोखरच खरे आहे... पण तरीसुद्धा ह घ्या ;) )In reply to अशा अनेक प्रसंगात...आधी एकदा by टवाळ कार्टा
चितळ्यांचा प्रसंग लिहॆन. आज
In reply to चितळ्यांचा प्रसंग लिहॆन. आज by रेवती
चितळ्यांकडून पुपो विकत
In reply to चितळ्यांकडून पुपो विकत by रेवती
धंधा वाढला की 'बाहेरून
In reply to धंधा वाढला की 'बाहेरून by कंजूस
हो. ते आहेच!
In reply to गायकवाड साहेबांनी त्या वेटर by मोदक
मोदक साहेब
वस्तू घेतांना त्याची किंमत,
योगीराज!
In reply to योगीराज! by संजय क्षीरसागर
_/\_
In reply to _/\_ by योगी९००
दुनिया किसी के प्यारमें जन्नतसे कम नही,
In reply to दुनिया किसी के प्यारमें जन्नतसे कम नही, by संजय क्षीरसागर
योगीराज, ज्यांना जमत नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा!
In reply to योगीराज, ज्यांना जमत नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा! by संजय क्षीरसागर
आणि आता पहिला मुद्दा किती योग्य होता ते पण पाहा!
In reply to आणि आता पहिला मुद्दा किती योग्य होता ते पण पाहा! by संजय क्षीरसागर
मी सगळ्यात पहिल्यांदा हेच
In reply to योगीराज! by संजय क्षीरसागर
शक्यव्च नाही!!
In reply to योगीराज! by संजय क्षीरसागर
अगागागा!
In reply to अगागागा! by पैसा
तू ऊगा इकडे तिकडे लक्ष नको
In reply to तू ऊगा इकडे तिकडे लक्ष नको by स्पंदना
एक
In reply to एक by vikramaditya
संवाद असा असेल का?
In reply to संवाद असा असेल का? by vikramaditya
हाहाहाहा!
In reply to तू ऊगा इकडे तिकडे लक्ष नको by स्पंदना
बेक्कार टोलावलाय.
In reply to योगीराज! by संजय क्षीरसागर
योगी आहात, जमले तुम्हाला. गुड
२००+
धागा वाचून होईतोवर २००
अजून चितळेंकडे जाण्याचा योग
In reply to अजून चितळेंकडे जाण्याचा योग by खटपट्या
+१
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- U.S. passes $18 trillion in debt, and nothing’s being done about it Billionaire Tells Americans to Prepare For 'Financial Ruin' Economists Caution: Prepare for 'Massive Wealth Destruction'In reply to +१ by मदनबाण
या फोटोमधे आहेत त्या कोण ?
In reply to या फोटोमधे आहेत त्या कोण ? by खटपट्या
तुमची वहिनी. माझी सून.
In reply to तुमची वहिनी. माझी सून. by रेवती
(No subject)
In reply to (No subject) by खटपट्या
तुमची वहिनी. माझी सून.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dard Dilo Ke Kam Ho Jaate, Main Aur Tum Agar Hum Ho Jaate..In reply to तुमची वहिनी. माझी सून. by मदनबाण
भाग्यवान अहात बाणराव तुमच्या
In reply to भाग्यवान अहात बाणराव तुमच्या by ज्ञानोबाचे पैजार
असं मॉडल आमच्या नशिबी कुटं !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dard Dilo Ke Kam Ho Jaate, Main Aur Tum Agar Hum Ho Jaate..In reply to असं मॉडल आमच्या नशिबी कुटं ! by मदनबाण
आयमाय स्वारी.
In reply to तुमची वहिनी. माझी सून. by मदनबाण
अच्छा! असे आहे काय? बघतेच आता
चितळेच्या दुकानासमोर मोठी
In reply to चितळेच्या दुकानासमोर मोठी by कंजूस
हा हा हा
In reply to चितळेच्या दुकानासमोर मोठी by कंजूस
. . .
मला सोबत नेले आणि दुकानदार
In reply to मला सोबत नेले आणि दुकानदार by गवि
अरे बापरे..
अप्पा ब. चौकात पुस्तके खरेदी
In reply to अप्पा ब. चौकात पुस्तके खरेदी by टिल्लू
"..काय झालं" इतके दोन शब्द
In reply to "..काय झालं" इतके दोन शब्द by गवि
फोनवर बोलून झालं का? असं
In reply to फोनवर बोलून झालं का? असं by खटपट्या
फोन करून विचारा, मग सांगतो.
In reply to फोनवर बोलून झालं का? असं by खटपट्या
"काही नाही, वाचून झालं" अस
योगीजी, पुढच्या वेळेस जाताना
योगीश्री, यानिमित्तानं दोन्ही गोष्टी लक्षात आल्या असतील
In reply to योगीश्री, यानिमित्तानं दोन्ही गोष्टी लक्षात आल्या असतील by संजय क्षीरसागर
राग..
अन्याय सहन करु नका