Skip to main content

दुकानदाराकडून अपमान..

लेखक योगी९०० यांनी मंगळवार, 09/12/2014 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षभरात दोन प्रसंग असे आले की दुकानदाराने अतिशय अपमान केला.. दोन्ही प्रसंग बोरीवलीच्या एकाच मॉल मधील दोन वेगवेगळ्या दुकानात घडले.. प्रसंग एक : हिच्यासाठी ड्रेस मटेरीयल घ्यायचे होते. मला तितका उत्साह नव्हता. कारण म्हणजे १०-१५ मिनिटाचे काम नव्हते तर चांगले दोन-तीन तास जाणार हे ओळखून होतो. त्यामुळे बोरीवलीच्या मॉलमधील एका चांगल्या दुकानात शिरल्या-शिरल्या एक मोक्याची जागा बसायला पकडली आणि शांतपणे मोबाईलवर गेम खेळू लागलो. अर्थात अगदीच निरूत्साही नव्हतो. मध्ये मध्ये तिला हा ड्रेस बघ, तो बघ तुला चांगला दिसेल असे सांगत सुद्धा होतो. हिला माझा हा स्वभाव माहित होता म्हणून तिने माझे मध्ये मध्ये बाजूला जाऊन बसणे तितके काय मनावर घेतले नव्हते (असे मला वाटले). अशीच १०-१२ मिनिटे गेल्यावर तिने चला म्हणून मला सांगितले. मी आश्चर्याने खरेदी झाली का असे विचारला. त्यावर तिने नजरेनेच दुसर्‍या दुकानात बघू या असे सांगितले. मी लगेच "इथले ड्रेस मटेरीयल नाही का आवडले?" असे तिला विचारले. यावर लगेच दुकानदार माझ्यावर डाफरला " कसे आवडेल ड्रेस मटेरीयल? आख्खे दुकान जरी दाखवले तरी त्यांना आवडणार नाही. तुम्हीच इंटरेस्ट घेत नाही मग त्या कितीही भारी कापड दाखवले तरी नाहीच म्हणणार...आमच्या दुकानात एसी खायला, आराम करायला आलात तुम्ही. तुम्ही काय खरेदी करणार?" असे इतक्या मोठ्यांनी म्हणाला. की मी एकदम अवाक झालो. दुकानातले सर्वजण माझ्याकडे पहायला लागले. त्यातल्या काही बायका माझ्याकडे विचित्र नजरेने आणि काही माझ्या मिसेसकडे सहानभुतीने पहात आहेत असे वाटले. खरतरं मला माझ्यावर कोणी असे ओरडेल असे मुळीच वाटले नव्हते त्यामुळे दुकानदाराच्या त्या अचानक झालेल्या शाब्दीक हल्याने माझी बोलती बंद झाली होती. मदतीसाठी मी तिथल्या एका पुरूषाकडे पाहिले पण त्याने माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले. आणि आपल्या बायकोच्या खरेदीकडे लक्ष घातले. माझ्या बाजूला बसलेला एकजण हळूच उठला आणि त्याच्या बायकोच्या बाजूला उभा राहीला. मी पण मग मुकाट्याने उठलो आणि खाली मान घालून हिच्याबरोबर बाहेर पडलो. नंतर घरी दुकानदाराने केला नसेल त्याच्या शतपटीने आमचा पाणउतारा केला गेला पण बाहेरची कोणी मंडळी पहात नसल्याने त्याचे तितके काही वाटले नाही. दुकानदाराला "अरे बाबा तुला तुझ्याकडच्या कापडाचे मार्केटींग करता येत नाही किंवा तुझ्याकडे तितकी variety नाही याचा दोष मला का देतोस? किंवा मी काय तुझा नोकर आहे काय की तुझ्या कापडांचे मार्केटींग करावे?" असे काहीतरी म्हणायला पाहिजे होते असे वाटत राहीले. पण हे त्यावेळी अजिबात सुचले नाही. प्रसंग दोन: वरील प्रसंग घडल्यानंतर साधारणपणे एक वर्षानंतर त्याच मॉलमध्ये हिच्याबरोबर जायचा योग लादला गेला. यावेळी साडी खरेदी होती. आधीचा अनुभव मॉलमध्ये शिरल्या-शिरल्या डोळ्यासमोर आला आणि उगाचच उसना उत्साह चेहर्‍यावर आणला. एका साडीच्या दुकानात गेलो. तिथे १०-१५ मि. साड्या बघण्यात गेली. एखादी साडी हिला जरा आवडत आहे असे दिसल्या-दिसल्या घे घे तुला छान दिसेल, एकदम सुरेख साडी आहे असे बोलून तिला पटवायचा प्रकार चांगला दोन-तीन वेळा केला. दुकानातल्या साड्या दाखवणार्‍या माणसाला आम्ही आता काहीतरी घेणारच अशी आशा लागली. त्याने लगेच आणखी साड्या दाखवायचे थांबवले आणि तो ही दोन-तीन जरा बर्‍यापैकी आवडलेल्या सांड्यांमधली साडी घ्या असा मागे लागला. पण हिला आणखी variety पहायची होती आणि दुकानातल्या माणसाला अजुन दाखवायचा कंटाळा आला होता. त्या दोघांचा थोडा-फार वाद सुरू झाला. मी सुद्धा थोडा दमल्याने बाजूला बसलो आणि झाले. हिने एकदम निर्णय घेतला की दुसर्‍या दुकानात पाहून घेऊ. तसेच पहिल्याच दुकानात साडी काय घ्यायची चांगले दोन-तीन दुकानात पाहून काय ते ठरवू असाही विचार तिने केला. पण या मुळे तो दुकानातला माणूस माझ्यावर एकदम ओरडला, "टाईमपास करायला आलात काय? काही घ्यायचे नाही तर कशाला उगाच बसून राहीलात?". मी यावेळी हिच्यावर जरा ओरडलो," तुला आवडली असेल तर घे ना साडी. कशाला यांचे शिव्याशाप ऐकतेस?". हिचा मात्र दुसर्‍या दुकानात जायचा ठाम निश्चय होता. त्या माणसाच्या अशा बोलण्याने हीने भडकून सांगितले की एक तर अजुन variety दाखवत नाही आणि वर असे बोलता. आता काही झाले तरी तुमच्या दुकानात परत येणार नाही. मग निघालो तेथून. परत घरी आमचे भांडण झालेच. मी थोडावेळ बाजूला बसलो आणि त्या दुकानातल्या माणसाला variety दाखवायला नाही सांगितली याचा राग माझ्यावर निघाला. मी उसना उत्साह चेहर्‍यावर आणला होता हे सुद्धा हिने बरोबर ओळखले होते. (हा राग त्यानंतर दोन-तीन दिवसांनी नल्ली साडी घेतल्यावर कमी झाला). वरील दोन्ही प्रसंगात मला एक गोष्ट सारखी वाटली की दोन्ही वेळेस दुकानदारांनी नवर्‍यास (म्हणजे मला) दोषी ठरवले. ही त्यांची Strategy असावी काय? दोन्ही वेळेस "एसीची हवा खायला किंवा टाईमपास करायला आलात" अशा प्रकारची अपमान होईल अशी वाक्ये बोलली गेली. खरे तर दोन्ही प्रसंगात आम्ही दुकानदाराचा १०-१५ मिनीटांपेक्षा जास्त वेळ घेतला नव्हता. उगाच एखादा तास-दीड तास घालवला आणि असे वागलो तर समजण्यासारखे आहे. पण असे त्यांचे बोलणे बरोबर नाही वाटले. नवर्र्‍यांना हुसकवून किंवा त्यांचा पुरूषी अहंकार जागवून त्यांनी बायकोला खरेदी करण्यास भाग पाडावे असे त्यांचा हेतू असावा काय? असा अनुभव आपल्याकडील कोणाला आला आहे काय? तसेच बायकोबरोबर उत्साहाने खरेदीस कसे जावे? काय करावे म्हणजे उत्साह टिकून राहील किंवा उत्साही आहोत असे दिसेल. यावरही जाणकारांनी प्रकाश टाकावा.

वाचने 102604
प्रतिक्रिया 313

प्रतिक्रिया

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रगो साहेब हजार हिस्श्यानि पटेल अशी गोष्ट दुकानदाराने कधीही आमच्या कुटुंबाला उलट बोलण्याची हिम्मत दाखवली असता त्यांचे दात सव्याज त्यांच्या घशात घातलेले आहे भांडण करून वर माल विकत न घेत बाहेर पडलो आहे. पुण्यातील लक्ष्मी रोड वरील एका प्रथितयश तीन मजली दुकानात एक साडी विचारली असता एका दीड शहाण्या नोकराने उद्धट शब्दात तुमच्या बजेटच्या बाहेर आहे म्हणून सांगितले. मी त्याच्या म्यानेजरला बोलावून त्याची कडक शब्दात हजेरी घेतली वर अगोदर पसंत केलेल्या पाच साड्या सुद्धा तेथेच ठेवून बाहेर निघालो. माझ्या मेहुण्याचे लग्न असल्याने बरीच खरेदी करायची होती. हे पाहून त्या दुकानाचा मालक येउन विचारू लागला काय झाले म्हणून. मी हकीकत सांगितल्यावर तो मला समजावू लागला कि साहेब गावाकडचे लोक असे बोलल्यावर आमच्यकडे पण पैसे आहेत हे दाखवण्यासाठी दुप्पट खरेदी करतात. त्यावर मी त्याला कडक शब्दात ( खास लष्करी आवाज काढून) सुनावले कि ग्राहकाचा उपमर्द करण्याची तुमची पद्धत अत्यंत टाकाऊ आहे आणी माझे बजेट कितीही होते आणी मला पूर्ण लग्नाची खरेदी करायची होती. पण आता मी तुमच्याकडे एकही साडी घेणार नाही. आमची बायकोच काय पण सासू सासरे सुद्धा एक शब्द न बोलता दुकानाच्या पायर्या उतरले. मग आम्ही कुमठेकर रस्त्यावर असलेल्या एका दुकानात तशाच साड्या साधारण २५ टक्के स्वस्त घेतल्या. ( तेंव्हा कुमठेकर रस्ता आता सारखा "मोठा" झालेला नव्हता). हे पाहून सासू आणी सासरे यांचा माझ्या व्यवहार ज्ञानावर विश्वास निर्माण झाला. कोणत्याही दुकानात दुकानदाराने उद्धटपणाने वागलेले मला सहन होत नाही. पैसे आम्ही मोजायचे आणी शहाणपणा त्याने करायचा हे मला सहनच होत नाही. हेच धोरण मी दवाखान्यात ठेवतो. जो रुग्ण आपल्याला पैसे देतो त्याच्याशी उद्धटपणे मी कधीच वागत नाही किंवा माझे सहाय्यक तसे करणार नाहीत हे मी कटाक्षाने पाळतो. जी गोष्ट शक्य नाही ती नम्रपणे सांगा.

In reply to by सुबोध खरे

१/२ वर्षापूर्वी लेख वाचला होता. मोठ्या दुकानात सेल्समन चे फंडे. अमेरिकेतील .. अगदी हाच. ग्राहकाचा अपमान करून त्याला प्रवूत करणे खरेदीला. उंची सेंट, घड्याळे , पर्सेस च्या विक्रीत .. आणि हा जोरदार चालतो !!

योगीजी, तुम्ही पहिले आपले मोराल आणि करेज वाढवा. यासाठी एक किलो पुणेकर, अर्धा किलो कोल्हापूरकर आणि छटाक सातारकर यांचा काढा उकळवून दोन कपाचा एक कप करावा व रोज सकाळी घ्यावा . अ

In reply to by सस्नेह

छटाक सातारकर
=)) हो सातारकर छटाकभरच ... जास्त झाले साइड इफ्फेक्ट होवु शकतात ... :D अवांतर : आमच्या महाराजांचा विडीयो पाहिला की नाई ? " हतबल जरी असलो तरी आमच्या मुसक्या बांधायची हिंमत आज नाय उद्यानाय अन भविष्यातही कुणाची होणार नाय ..... कॅमेरा आहे म्हणुन सांगतोय ... परत 'सांगितलं नाही' म्हणायचं नाही "

In reply to by टवाळ कार्टा

ऑफीसात यु ट्युब बॅन असल्याने लिन्क देता येत नाहीये . "Zee24Taas: Satara Udyenraje Bhosale Filmy Style - YouTube" गुगल करा लगेच सापडेल :)

In reply to by खटपट्या

"The server at howudekharch.com can't be found, because the DNS lookup failed." असा मेसेज येतोय. दुसर्‍या संस्थळावरून (शक्य असल्यास गुगलफोटो) फोटो डकवायचा प्रयत्न करा.

In reply to by शिद

बापरे... एवढेच म्हणेन मी...!! सातारा म्ह्णजे युपी/बिहारपेक्षाही खतरनाक area असावा असे वाटायला लागलयं...!! गंमत(?) म्हणजे माझा एक मित्र, ज्याने लोकसभेच्या निवडणूकी दरम्यान भाजपाचे समर्थन केले आणि भाजपा जिंकला म्हणून आनंदाने नाचत होता, तो नाचता नाचता असेही म्हणाला की दिंडोरीचा "हरिश्चंद्र चव्हाण" आणि सातार्‍याचे "उदयनराजे भोसले" यांच्या विजयाने मी खूपच जास्त खुष आहे कारण ते दोघेही माझ्याच जातीचे आहेत. या दोघांच्या कामाविषयी मी विचारले असता त्याला एकही गोष्ट सांगता आली नाही. मला (नेहमीप्रमाणे) त्याच्या या वाक्यावर काय बोलावे ते कळले नाही. अर्थात अशी प्रजा असेल तर काय कोणीही राजे होतील.

In reply to by सस्नेह

काही दिवसांपूर्वी एक "raudransh_27" ह्या आयडीने या परमपूज्य अशा महाराजांबद्दल काही लोक अनादराने बोलले म्हणून हा खालील लेख टाकला होता. http://misalpav.com/node/27899 आता साहेब हा विडो पाहून काय विचार करत असतील असा विचार करत होतो. ;) (अवांतर : यांच्याशी संबधित बर्‍याच चेपु पानांवर हा व्हिडो फिरत होता आणि दुर्दैवाने सांगायचे तर बर्‍याच टाळक्यांना ह्यात महाराजांची "ऐट", "शान" आणि "राजे-पण" दिसत होते आणि खरोखर अभिमान वाटत होता.. )

In reply to by बॅटमॅन

त्या मनुक्षात राजा असलेले एकही लक्षण दिसत नाही. म्हणजे जसे तेजपुंज चेहरा, एकप्रकारची आब, रुबाब........ह्यो तर तारवटलेला दिसतोय.८० च्या दशकात नायक खलनायक जसे हातवारे करायचे तसला परकार दिसतोय.

In reply to by बॅटमॅन

तुमी विडिओ पाह्यलाय (बरेच विडिओ पण आहेत तसे), आमी याला सातार्‍यात प्रत्यक्ष अनेकदा असे चाळे करताना पाहिलाय. दुर्दैव हे की हा शिवाजी राजांचे नाव वापरतो आणि याच्या आजूबाजूला बरेच लोक असे आहेत की ते याच्या नावाखाली स्वत:चे उखळ पांढरे करीत बसतात आणि गाडा सुरु राहतो. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट हीच म्हणायची की सातारच्या बहुतेक शिकल्या सवरल्या लोकांच्यात याच्यामुळे तेवढी व्यक्तीपूजा भिनली नसावी अशी आशा आहे.

In reply to by हाडक्या

त्यातल्या त्यात चांगली गोष्ट हीच म्हणायची की सातारच्या बहुतेक शिकल्या सवरल्या लोकांच्यात याच्यामुळे तेवढी व्यक्तीपूजा भिनली नसावी अशी आशा आहे.
हे आपलं लिहिण्यापुरतं. तसे दिसत नाही.

In reply to by बॅटमॅन

ह्म्म.. ते पण खरंच म्हणा. तसं या वर्षी यांच्या शहरी मतात (ग्रामीण भागाचा नक्की विदा नाही) भरपूर घट झाली आहे. त्यांचा चुलत-भाऊ (तो बराच सभ्य आहे) जो विधानसभेस निवडून येतो त्याच्याही शहरी मतांमध्ये भरपूर घट आलीये या वर्षी. म्हणून आशावाद फक्त.

नुकतेच मुंबईतल्या, मरीन लाईन्सच्या एका मोठ्या दुकानात, लग्नाच्या खरेदीसाठी जाण्याचा योग आला. सर्व बायका एकीकडे खरेदीत मग्न होत्या. आम्ही पुरुष, एकाबाजूला उभे होतो.दुकानातील एक वरिष्ठ सेल्समन, सारखा, थोड्या थोड्या वेळाने,'काय चाललंय काय?' असे म्हणत होता. आधी आम्हाला वाटलं की तो आम्हाला उद्देशूनच बोलतोय. पण नंतर त्याला तसे बोलायची संवयच असावी, हे लक्षांत आले. त्यामुळे आम्हीही दुर्लक्ष केले.

अशावेळी डोक शांत ठेउन नडायचे असते. माझ्या घराजवळ असलेल्या एका हार्डवेअर दुकानदाराने असाच माझा अपमान केला होता. मी त्याच्या दुकानातून खुर्चीला बसवायची रबरी बुचं घेतली होती. त्याची साईज चुकीची निघाली म्हणुन बदलायला गेलो तर त्याने माझी अक्कल काढली होती. त्या वेळी तर मी त्याला चांगले सणसणीत उत्तर दिलेच पण त्या नंतर जवळ जवळ महिना दोन महिने मी त्याच्या दुकानात जाउन विचारायचो "लोणी आहे का?" सुरुवातीला तो वैतागला. नाही म्हणायचा. मग नंतर नंतर तो भडकायला लागला. मी दुकानात येताना दिसलो तरी ओरडा अरडा करायला लागायचा. "पोलीस कंप्लेंट करेन असे म्हणायचा" तो भडकला तरी मी त्याला शांत पणे म्हणायचो "तुला माहित आहेना मला अक्कल नाहीये ते? मग कशाला चिडतोस. नाहिये लोणी तर नाही म्हणुन सांग" नंतर नंतर तर मी त्याच्या दुकानावरुन जाताना नुसते "लोणी" असे मोठ्यांदा म्हणुन पुढे जायचो आणि तो मला शिव्या देत बाहेर यायचा. हळु हळु गल्लीतल्या सगळ्या पोरांना पण हे कळले. मग तो दुकानदार कुठेही दिसला तरी "लोणी" असा आवाज यायचा. आणि तो दुकानदार वेड्यासारखा दिसेल त्याला शिव्यागाळ करत सुटायचा. बरेच दिवस हा प्रकार चालला होता. त्याने माझ्या घरी सुध्दा तक्रार केली होती व माझ्या बाबांनी पण मला या वरुन ताकीद दिली होती पण तो पर्यंत फार उशीर झाला होता, त्या तक्रारीचा काहिही उपयोग झाला नाही, मी चिडवायचा बंद झालो तरी बाकिचे बरेच दिवस त्याला चिडवतच होते. तुम्ही पण असेच काहीतरी करा. त्या दुकानात जाउन "लंगोट आहेत का" अशी चौकशी त्याच माणसाकडे करा. तो नाही म्हणाला की कसले फालतु दुकान आहे म्हणुन त्याचा जमेल तेवढा पाणउतारा करायचा. शेवटी त्याने समजा कंटाळुन लंगोट मागवले तर "हे असे नको रेशमी हवेत" किंवा "पांढरे नकोत लाल हवे" असे सांगायचे. पाणउतारा करण्याचा कार्यक्रम चालुच ठेवायचा. वाटल्यास तुमच्या मित्रमंडळींना सुध्दा या मज्जे मधे सामिल करुन घ्या. त्याचा संताप एनजॉय करा आणि चिकाटीने त्याला सतावत रहा. बघा एक दिवस तो तुमची बिनशर्त माफी मागेल. निदान परत अशा पध्दतीने कोणाशी बोलायची हिम्मत तरी करणार नाही. (एका रिक्षावाल्यालाही असाच एकदा धडा शिकवला होता पण ते पुन्हा केव्हा तरी) पैजारबुवा,

In reply to by लॉरी टांगटूंगकर

=))
"हे असे नको रेशमी लंगोट हवेत"
=)) रेशमी लंगोट 'इमॅजिन' करुन पहायला पाहिजे एकदा ... फंडा भारी आहे , आपण व्हिक्टोरीया सिक्रेटच्या धर्तीवर "बाबुराब सिक्रेट" नावाची मेन्स लिंगर चेन सुरु करु ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

नाय बा ... माझ्याकडे ६/७ प्याक नायत स्पाला विचार त्येच्याकडे हायेत म्हन्त्यात लोक

In reply to by vikramaditya

तुमच्या मॉडेलला काही पॅक? असे कुणी विचारले नाही उद्या म्हणजे झाले. ;)

In reply to by vikramaditya

मॉडेलच्या अंगभुत गुणांचा मिसमॅच होत आहे
असे कोणते कोणते "अंगभूत" गुण लागतात जे आपल्या स्पा कडे नाहित =))

In reply to by प्रसाद गोडबोले

अगायायायायाया =)) =)) बाकी मेन्स लिंगर चेन म्हणजे नाव लिटरली आणि फिगरेटिव्हली देखील कसं चपखल बसतंय नै ;) तदुपरि जुन्या काळी राजेमहाराजे लहान असताना रेशमी लंगोट वापरत असतील की. जरा पाहू काही जुन्या ग्रंथांत वा पत्रांत तसा उल्लेख सापडतोय का ते ;)

In reply to by टवाळ कार्टा

तर मग बॅट्या हे रेशमी लंगोट घालून एक नवा ईतिहास रचेल....(बॅट्या हलके घेशीलच हो...खात्री आहे)

In reply to by दिपक.कुवेत

तर तर...आणि मग बॅटमॅनला त्याच्या गणवेशाच्या बाहेर घालायला रेशीमवस्त्र मिळेल =)) रच्याकने...बॅट्याचा "तसा" फोटो मचाकवर लावून त्याला मचाकचा "ब्रँड अँबेसेडोर" करायचा का? ;)

In reply to by टवाळ कार्टा

मचाकवर 'आनंदी' लोक किती आहेत ते माहिती नाही. समजा बहुसंख्य असले तरी त्यांच्यापुढे माझा बळी का म्हणून? जोकरादि व्हिलन माझं डोकं खातात ते पुरेसं नाय वाटतं. की तुमचाच फटू लावू तिथे ;) काय राव, एखादा चांगला फटाका लावायचा सोडून हे काय चालवलंय?

In reply to by सस्नेह

हे सतवायचे उपाय नक्कि ध्यानात ठेवीन आणि योग्य त्या ठिकाणी त्याचा जरुर वापर करीन. लंगोटाची आयडिया तर मस्तच!!!

In reply to by मोदक

माझा एक मित्र प्रथमच पुण्यात आला होता. त्याला रिक्षावाल्याने मुद्दामून फिरव फिरव फिरवला. मग मित्र ज्या इमारतीत जायचं होतं तिथे पोहोचल्यावर म्हणाला इथेच थांबा मी पाच मिनिटात येतो असं म्हणून इमारतीत शिरला. आणि त्याच्या मित्राच्या घरी काम झाल्यावर घराला मागून दार होतं तिथून सटकला. :D

In reply to by मोदक

लै म्हणजे लईच लक्षात ठेवता राव तुम्ही… चारएक वर्षांपूर्वी डेक्कन क्वीन ने स्टेशनला उतरलो आणि रिक्षावाल्याला विचारले सिंहगडरोडला येणार का? तो म्हणाला अडिचशे रुपये होतील. मी नेहमीच सगळ्या रिक्षावाल्यांना मठ्ठ आणि बावळट वाटत असेन बहुतेक कारण प्रत्येक वेळी अशीच् सुरुवात होते. पण या वेळी मला तिकडे हुज्जत घालायचा कंटाळा आला होता. मी हो नाही काही म्हणालो नाही आणि सरळ रिक्षात बसलो. त्याने मिटर टाकलेच नाही. मी मनात म्हणालो चला बरेच झाले. घराजवळ आल्यावर मी त्याला रिक्षा सोसायटीच्या आवारात घ्यायला सांगितली. खाली उतरलो बॅग वॉचमनच्या केबीन मधे ठेवली आणि वॉचमनला सोसायटीचे गेट लाउन टाकायला सांगीतले. रिक्षावाल्याला ऐकु जाईल अशा आवाजात वॉचमनला म्हणालो “मी सांगेपर्यंत ही रिक्षा सोसायटीच्या बाहेर गेली नाही पाहिजे.” आमचा त्या वेळाचा वॉचमन पण जरा टग्याच होता. त्याने घाईघाईने दार लावले आणि माझ्या मागे येउन उभा राहिला. मग रिक्षावाल्याला विचारले किती पैसे झाले. तो म्हणाला “आपले अडीचशे रुपये ठरले होते.” मी खिशातुन सत्तर रुपये काढुन त्याच्या हातात ठेवले आणि सांगीतले “मिटर प्रमाणे एवढेच होतात तेवढेच मिळतील” तो माझ्याशी जोरजोरात ओरडाआरडा करत वाद घालायला लागला. “ते आधिच ठरवायचे होते’ “आता जेवढे ठरले तेवढे दे नाहीतर बघुन घेइन” वैगेरे धमक्या द्यायला लागला. “मी त्याला म्हणालो जास्त शहाणपणा केलास तर तुझी रिक्षा रात्रभर सोसायटी बाहेर जाउ देणार नाही. बघ तुला काय परवडतय ते.” आमचा वॉचमन पण माझ्या बरोबरीने रिक्षावाल्याशी हुज्जत घालु लागला. तो पर्यंत सोसायटी मधेही लोकं जमायला सुरुवात झाली होती. जशी गर्दी जमा होउ लागली तसा त्याचा स्वर नरम् पडत गेला. कारण गर्दीमधल्या कोणीच त्याला सहानुभुती दाखवत नव्हत. मग तो दिडशे रुपयां पर्य्ंत खाली आला, त्यानंतर मग शंभर तरी द्या असे म्हणायला लागला. पण मी सत्तर रुपयांवर ठाम होतो. शेवटी अर्धापाउण तासा नंतर त्याल बहुतेक ते सगळे असहाय्य झाले. त्याने रागारागाने माझे सत्तर रुपये पण परत केले आणि म्हणाला “जा भिकारड्या तुला फुकट सोडल अस समज.” मी शांतपणे सत्तर रुपये खिशात टाकले. वॉचमनला गेट उघडायला सांगीतले. गेट उघडल्या बरोबर तो घाईघाईने रिक्षा घेउन निघुन गेला मी त्या सत्तर रुपयातले पन्नास रुपये वॉचमनला बक्षीस म्हणुन दिले, माझ्या पाठीमागे येउन उभा राहिला म्हणुन आणि घरी गेलो. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अरे बापरे.. बरंच डेअरिंग केलत की!! मी पण एका रिक्षावाल्याने असं वाट्टेल त्या गल्ली बोळातुन फिरवल्यानंतर त्याला "पैसे देत नाही जा" असं सांगितलं होतं. तो ही रागारागाने निघुन गेला होता!! तरी मी त्याला १५०/- देत होते.. त्याला २५० हवे होते. मी तर मीटर वगैरेपण वाद घातला नाही. फक्त तू इतकं का फिरवत होतास हेच विचारलं. तर येडं आहे ते १५०/- पण न घेता गेलें. वर म्हणे ओवाळणी तुम्हाला. मी धन्यवाद म्हणाले!

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

लै म्हणजे लईच लक्षात ठेवता राव तुम्ही… ह्या ह्या ह्या... बाकी तुमचा लोणीवाला किस्सा जबरदस्त स्ट्रेसबर्स्टर आहे. त्यामुळे रिक्शावाल्याचा किस्सा पेंडींग आहे ते लक्षात राहिले होते.