✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ५: "भूक"

स
संपादक मंडळ यांनी
Mon, 12/08/2014 - 09:48  ·  लेख
लेख
http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 http://www.misalpav.com/node/28931 http://www.misalpav.com/node/29297 ******************************************** नमस्कार मंडळी! प्रकाशाच्या उत्सवानंतर छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त पाचवी स्पर्धा सुरू करूया! यावेळचा विषय आहे 'भूक' ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे! प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक २१ डिसेंबर २०१४ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम मात्र आधीच्या स्पर्धेप्रमाणेच राहतील! सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
जीवनमान
तंत्र
छायाचित्रण
स्थिरचित्र

प्रतिक्रिया द्या
51214 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

माझी प्रवेशिका

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 12/08/2014 - 12:05 नवीन
Image removed. हा फोटो एकदा मिपा वर ख.फ. वर टाकला होता. नियमात बसत असेल तर ठेवावा. पैजारबुवा,

मस्त आहे.आवडले.

गवि
Mon, 12/08/2014 - 12:11 नवीन
मस्त आहे.आवडले.
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

एकदम परफेक्ट

स्पा
Mon, 12/08/2014 - 12:13 नवीन
एकदम परफेक्ट पैजार ब्वा विषय हटके आहे हे नक्की
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

हे दोन असेच आवडले

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 12/08/2014 - 12:21 नवीन
या तिनही फोटों मधला कोणता निवडावा असा प्रश्र्ण पडला होता. Image removed. Image removed.
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

पहिलं वासराचे आवडले आणि दुसरे

सखी
Fri, 12/19/2014 - 18:20 नवीन
पहिलं वासराचे आवडले आणि दुसरे माकडाचे यातला मिश्किल भाव आवडला -हातात ३ पार्ले-जी असुनही त्याची नजर पुड्याकडे आहे :)
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

मस्त

नंदन
Sat, 12/13/2014 - 01:14 नवीन
फोटो आवडला.
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

झारखंड मध्ये प्रवास करताना

आतिवास
Mon, 12/08/2014 - 13:04 नवीन
झारखंड मध्ये प्रवास करताना झुमरी तलय्या नावाचं गाव लागलं. तोवर हे गाव मला रेडिओ स्टेशनने निर्माण केलेलं काल्पनिक गाव वाटत होतं :-) तिथं एका प्रचंड पुलाचं काम चालू होतं आणि त्या सगळ्या गोंगाटात हा युवक मग्न होता स्वतःच्या (आणि घरच्यांच्या) भुकेची तजवीज करण्यात. Image removed.

आवडेश.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/09/2014 - 17:59 नवीन
एकावेळी एका हुकाला मासा लागल्यावर कळेल पण एकाच वेळी तीन तीन ? मस्तच. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: आतिवास

ताम्हिणी घाटात.

प्रचेतस
Mon, 12/08/2014 - 13:27 नवीन
ताम्हिणी घाटात. Image removed.

खतरा फाडू ...कातील

स्पा
Mon, 12/08/2014 - 13:31 नवीन
खतरा फाडू ...कातील
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कहर..

चिगो
Tue, 12/09/2014 - 16:42 नवीन
कहर म्हणजे कहरच फोटो, वल्लीशेठ.. काय जबरदस्त पकडलाय, बॉस, भक्ष्य आणि क्षण दोन्हीपण..
↩ प्रतिसाद: प्रचेतस

जब्रा हं वल्लीशेठ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/09/2014 - 17:56 नवीन
लंबर एक. लाईक. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: प्रचेतस

जबरदस्त

अनुप कोहळे
Fri, 12/19/2014 - 10:30 नवीन
जबरदस्त. हे सरपटणारे जीव फार क्वचितच कॅमेर्‍यामधे टिपता येतात. त्यांच्या आजुबाजुच्या वातावरणात ते एकदम मिसळून जातात.
↩ प्रतिसाद: प्रचेतस

गेल्या आठवड्यात गावी गेले होते तेव्हा काढलेला फोटो

_मनश्री_
Mon, 12/08/2014 - 13:50 नवीन
.......... Image removed.

भूक.

एस
Mon, 12/08/2014 - 23:59 नवीन
'भूक' म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर येते एक आर्त खोल जाणीव. एक खिन्न प्रश्नचिन्ह. भकास. भावनाशून्य. असं काही टिपणारं छायाचित्र आहे का कोणाकडे? छायाचित्रण ही मुळात एक संवादाचे माध्यम आहे. कुठल्याही इतर कलेप्रमाणेच, पण तुलनेने जास्त वास्तव. संवादाची मूळ प्रेरणा अभिव्यक्ती. त्या दृष्टीने विचार करणारी काही छायाचित्रे येतील अशी मला अपेक्षा आहे. म्हणजे, इथे ते अपेक्षित असेल किंवा नसेल, मी फक्त मला काय वाटले ते सांगितले.

'भूक' म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर येते एक आर्त खोल जाणीव.....

मुक्त विहारि
Tue, 12/09/2014 - 00:21 नवीन
"एक खिन्न प्रश्नचिन्ह. भकास. भावनाशून्य. असं काही टिपणारं छायाचित्र आहे का कोणाकडे? छायाचित्रण ही मुळात एक संवादाचे माध्यम आहे. कुठल्याही इतर कलेप्रमाणेच, पण तुलनेने जास्त वास्तव. संवादाची मूळ प्रेरणा अभिव्यक्ती." +१... बाकी व्यनि मध्ये बोलूच.
↩ प्रतिसाद: एस

मलाही तसेच वाटले म्हणून धागा

रेवती
Tue, 12/09/2014 - 01:08 नवीन
मलाही तसेच वाटले म्हणून धागा उघडला नव्हता. त्यातून लहान मुले, अगदी हाडाचे सापळे झालेली वगैरे बघवत नाहीत. नकोच तसे फोटू. त्यांना प्रथम क्रमांक देववणार नाही.
↩ प्रतिसाद: एस

असेच म्हणते

सखी
Tue, 12/09/2014 - 19:30 नवीन
मलाही अगदी असेच वाटले होते म्हणुन भीतभीतच धागा उघडला, पण पहिल्या दोन फोटोंनी ती दुर केली. तसेच वल्लींनी खाली दिलेला फोटोही लगेच आठवला, केविन कार्टरला याच फोटोसाठी Pulitzer अ‍ॅवार्ड मिळाले होते आणि नंतर त्याने आत्महत्या केली....:(
↩ प्रतिसाद: रेवती

ह्यावरुन केविन कार्टर चा हा

प्रचेतस
Tue, 12/09/2014 - 09:14 नवीन
ह्यावरुन केविन कार्टर चा हा गाजलेला फोटो आठवला. चित्र आंतरजालावरुन. Image removed.
↩ प्रतिसाद: एस

हे घ्या एक प्रकाशचित्र!

आतिवास
Wed, 12/10/2014 - 18:15 नवीन
हे घ्या एक प्रकाशचित्र! असे क्षण आठवले की त्रास होतो, म्हणून आधी नव्हता दिला हा फोटो. Image removed.
↩ प्रतिसाद: एस

(No subject)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/14/2014 - 10:47 नवीन
:(
↩ प्रतिसाद: आतिवास

माझी प्रवेशिका

श्रीरंग_जोशी
Tue, 12/09/2014 - 02:28 नवीन
Image removed. तीन वर्षांपूर्वी टू हार्बर्स मिनेसोटा येथील सहलीच्यावेळी तेथील लाईटहाऊसजवळ Mini Pretzel खाताना हि खारूताई दिसली. खरं तर हे तिच्यासाठी Junk food आहे. EXIF: Canon SX30 IS; Exposure: 1/320; F Stop: f/5.8; ISO: 400 अवांतर - "भूक लागल्यावर खाणे ही प्रकॄती, भूक नसताना खाणे ही विकॄती, भूक असतानाही आपल्या वाटच्या भाकरीतली अर्धी दुसर्‍या भुकेल्याला देणे ही सत्कृती". हे वचन यानिमित्ताने आठवले. बहुधा विनोबा भावे किंवा व पु काळे यांचे ते वचन आहे.

असेच.

विलासराव
Tue, 12/09/2014 - 13:01 नवीन
असेच. Image removed. Image removed.

माणसाला

टवाळ कार्टा
Tue, 12/09/2014 - 19:18 नवीन
माणसाला प्राण्यांहून वेगळेपण देणारी भूक....सहजीवनाची...प्रेमाची...आनंदाची भूक Image removed.

हा फोटो विषयाला धरुन नसेल तर

टवाळ कार्टा
Tue, 12/09/2014 - 20:09 नवीन
हा फोटो विषयाला धरुन नसेल तर कळवावे...दुसरा शोधेन :)
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

माझी प्रवेशिका

हुकुमीएक्का
Tue, 12/09/2014 - 23:44 नवीन
माझी प्रवेशिका . . . Image removed.

फोटो नाहीये पण एक ताजी आठवण

किसन शिंदे
Wed, 12/10/2014 - 10:29 नवीन
फोटो नाहीये पण एक ताजी आठवण आहे. आत्ता काही महिन्यांपूर्वी पुण्यात शिरूरला लग्नाला गेलो होतो. लग्न संध्याकाळचं होतं, त्यामुळे साहजिकच जेवणावळी दुपारी ठेवलेल्या होत्या. आम्ही कार्यालयात पोचेपर्यंत संध्याकाळचे चार वाजले होते तेव्हा जेवणाची शेवटची पंगत सुरू होती. आमचे दुपारचे जेवण बाहेरच झाले होते, त्यामुळे लग्नात जेवणार नव्हतो. तिथे कार्यालयात सहज फिरता फिरता काही वेळाने जेवणाच्या हॉलबाहेर येऊन पोचलो. तिथे कचर्‍याच्या ठिकाणी ताटात उरलेल्या अन्नाचा प्रचंड मोठा ढिग जमा झाला होता. साहजिकच एवढा मोठा ढिग पाहून धक्का बसला आणि त्याहूनही मोठा धक्का बसला जेव्हा नजर त्या ढिगापलीकडच्या नेहमी बंद असणार्या गेटवर गेली. तिथे गेटच्या पलीकडे त्या फेकून दिलेल्या अन्नाच्या ढिगार्‍याकडे आशाळभूतपणे पाहणारी फासेपारध्यांची म्हणा वा भटक्या जमातीतली पाच ते दहा वर्षांची काही मुले उभी होती. प्रचंड मोठा विरोधाभास! जेवणाची वेळ टळून गेली होती तरीही, 'लग्नाला आलोय ना? मग आहेराच्या पाकिटाचे पैसे वसूल करायचेच या मानसिकतेतून काही लोकं बळेच जेवत होती. पाच वर्षाचे मुल, ज्याला स्वत:च्या हाताने नीट खाताही येत नाही त्यासाठी वाढप्यांना बायका वेगळं ताट वाढायला सांगत होत्या. दोन पदार्थ खाल्ले की, बाकीचे सगळे वायाच! एकीकडे मिळतंय म्हणून सारासार विचार न करता वाया घालवण्याची प्रवृत्ती, तर दुसरीकडे एकावेळचं जेवणही पोटभर मिळत नाही म्हणून मातीतल्या अन्नालाही उचलून खाण्याची लाचारी. :( ते सगळं चित्र आता या स्पर्धेच्या निमित्ताने डोळ्यासमोर उभं राह्यलंय.

(No subject)

टवाळ कार्टा
Wed, 12/10/2014 - 11:10 नवीन
:(
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मागच्याच आठवड्यात एक लग्न

सूड
Wed, 12/10/2014 - 17:51 नवीन
मागच्याच आठवड्यात एक लग्न अटेंड केलं. बुफे होता म्हणून लोक अक्षरशः ताटात ढीग भरुन घेत होते. खरंच हवंय का, आपल्या नेहमीच्या जेवणात तरी आपण इतकं जेवतो का हा विचार अजिबात दिसला नाही. अशी लग्नं पाह्यली की 'मिष्टान्नं इतरे जना:' हे पटकन आठवतं. लग्न आपल्यासाठी नाही 'लोकांसाठी' करतात की काय असा प्रश्न पडतो. असो, धागा हायजॅक व्हायचा.
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

+१

नाखु
Tue, 12/16/2014 - 09:51 नवीन
बुफेचा वेगळाच अर्थ आपल्याकडे घेतला आहे "होऊदे खर्च (जाउ दे वाया अन्न) थोडीच आहे आप्ल्या घरचं" लहान लहान पोरांना "द्रोणागिरि" पर्वतासारखा "थाळीभार" उचलताना पाहून आणि फक्त उष्टावताना पाहून खरच नक्की भूक कसली हा प्रश्न सतावत आहेच!!
↩ प्रतिसाद: सूड

मला पण भूक लागलीये गं! का

असंका
Fri, 12/12/2014 - 19:23 नवीन
Image removed. मला पण भूक लागलीये गं! का एकटीच खाणारेस सगळं? घराच्या गॅलरीतून काढलेला फोटो असल्याने गज वगैरे मधे येत होते. तेवढा भाग क्रॉप केला आहे. बाकी exif data म्हणजे गेल्या वेळप्रमाणे property मधून देत आहे- Camera Make and Model- Fujifilm FinePix HS25EXR F-stop - f/4.5 Exposure Time- 1/350 sec. ISO Speed- ISO 640 एवढे बास का? कारण अजून बरंच काय काय दिसतंय Properties मध्ये....

..एकदम सही... डोळ्यातले भाव

गवि
Sun, 12/14/2014 - 08:52 नवीन
..एकदम सही... डोळ्यातले भाव खासच..
↩ प्रतिसाद: असंका

@डोळ्यातले भाव खासच..>>> +१

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/17/2014 - 00:28 नवीन
@डोळ्यातले भाव खासच..>>> +१
↩ प्रतिसाद: गवि

सुरेख नजर आहे.

स्पंदना
Tue, 12/16/2014 - 17:20 नवीन
सुरेख नजर आहे.
↩ प्रतिसाद: असंका

क्लास

नंदन
Wed, 12/17/2014 - 00:42 नवीन
नेमकं छायाचित्र! श्रीनिवास विनायक कुलकर्णींच्या 'डोह' ह्या पुस्तकातल्या एका लेखात चिंब भिजून पिलासकट घराच्या आश्रयाला आलेल्या वानरीचं वर्णन करणारं एक वाक्य आहे, ते अचानक आठवून गेलं -
तिच्या डोळ्यांच्या टिंबांत एक केविलवाणी इच्छा तेवे.
↩ प्रतिसाद: असंका

सुंदर !!!

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 12/17/2014 - 00:46 नवीन
सुंदर !!!
↩ प्रतिसाद: असंका

खुपच छान

अनुप कोहळे
Fri, 12/19/2014 - 10:27 नवीन
हे खुपच छान चित्र आहे. पिल्लाच्या डोळ्यातले भाव सुंदर टिपले आहे.
↩ प्रतिसाद: असंका

प्रवेशिका

मधुरा देशपांडे
Tue, 12/16/2014 - 23:06 नवीन
Image removed.

खारुताई चा खाऊ

मस्तानी
Wed, 12/17/2014 - 21:48 नवीन
थंडीच्या दिवसांमध्ये एकदा संध्याकाळी उरलेला ब्रेडचा तुकडा गॅलरिच्या कठड्यावर ठेवला होता. रात्रीतून मस्त बर्फ पडला तरीही सकाळी खारुताई नाश्ता करायला हजर ! बर्फात लडबडलेला ब्रेड खाणारी खारुताई मी मात्र घरात बसून गरमागरम चहा घेत काचेच्या आडून टिपली :) स्थळ : मिशिगन Image removed. ( information as per the file data from Google Photo album, no processing at all) Dimensions 2048 x 1536 File name DSC03897.JPG File size 256.25K Camera DSC-H10 Lens - Focal Length 63mm Exposure 1/60 F Number f/4.4 ISO 400 Camera make SONY Flash Not used

नाही नाही!! आम्ही नाही बघितलं

असंका
Wed, 12/17/2014 - 21:56 नवीन
नाही नाही!! आम्ही नाही बघितलं...चालू ते तुमचं मंमं!! हे बघ आम्ही गेलो!! __/\__ कहर केला आहे!
↩ प्रतिसाद: मस्तानी

भारीये

टवाळ कार्टा
Wed, 12/17/2014 - 22:53 नवीन
भारीये :)
↩ प्रतिसाद: मस्तानी

ब्रेडी खारुतै

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/18/2014 - 20:49 नवीन
ब्रेडी खारुतै मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त! Image removed.
↩ प्रतिसाद: मस्तानी

सगळेच फोटो मस्त आहेत

मोक्षदा
गुरुवार, 12/18/2014 - 19:57 नवीन
सगळेच फोटो मस्त आहेत

माझी प्रवेशिका

मोक्षदा
गुरुवार, 12/18/2014 - 20:34 नवीन
खिडकीतल्या गांडूळखताच्या पेटीवरील फणसाच्या आठळीचा आस्वाद घेताना खारूताई Image removed.

माझी प्रवेशिका

अनुप कोहळे
Fri, 12/19/2014 - 07:18 नवीन
मध्यप्रदेशातल्या जंगलात झाडांच्या खोडांवर सिंगडा नावाचा किडा सापडतो. पक्ष्यांचे तो आवडते खाद्य आहे. एक सिंगाडा तोंडात उडवताना. Image removed.

माझी प्रवेशिका

वेल्लाभट
Fri, 12/19/2014 - 08:19 नवीन
'द वॉक ऑफ लाईफ' Image removed. Sony Cybershot DSC-W50 Aperture - F 4.5 Shutter Speed 1/400 ISO 80 Focal Length 14mm Exposure Comp 0

वा!

पैसा
Fri, 12/19/2014 - 09:48 नवीन
मस्त चित्र येताहेत! ४ दिवस आहेत. अजून काही कल्पक चित्रे येऊ द्या!

माझी पण प्रवेशिका - आणखी एक खारुताई

मोहन
Fri, 12/19/2014 - 12:48 नवीन
Image removed. ह्या बाईसाहेब नायगारा धबधब्या जवळ फलाहार करत होत्या. EXIF details Nikon Coolpix 800 C f/5.6 1/30 34mm 200 ISO

सगळीच छायाचित्रे सुंदर , मला

गौरी लेले
Fri, 12/19/2014 - 13:53 नवीन
सगळीच छायाचित्रे सुंदर , मला कन्फ्युजड अकाउंट चे चित्र विशेश आवडले :)

एक से एक बढिया फोटुज आहेत !

मदनबाण
Fri, 12/19/2014 - 19:08 नवीन
एक से एक बढिया फोटुज आहेत ! :) सवड मिळताच जुने काढलेले फोटो शोधतो... पाहतो काही सापडतय का या विषयाला... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : Make In India
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा