लोकहो,
आज अशी एक घटना घडली की हातून एक ’उपदेशात्मक’ कविता लिहून झाली.
ही कविता आमच्या अत्यंत आवडत्या छंदात ८/६/८/६ मध्ये लिहिलेली आहे. या छंदाची लय आम्हाला फार फार आवडते. पहा तुम्हाला आवडते का?
(लयीत वाचणे सुलभ जाऊन काव्याचा चांगला आस्वाद घेता यावा, म्हणून जिथे पॉझ घ्यायचा तिथे स्वल्पविराम दिला आहे. स्वल्पविरामाला क्षणभर थांबून पुढचे वाचावे.)
भुलण्याचे वय तुझे, सावर सावर.....
अवखळ नको होऊ, स्वत:ला आवर.....
नुकतीच आली तुला,
तारूण्याची जाण
देहामध्ये गवसली,
मोतियाची खाण
भुलण्याचे वय तुझे, सावर सावर..........
भरलेल्या कणसाला,
पाखरांची भिती
हाती आल्या पिकाला गं,
जपायचे किती?
भुलण्याचे वय तुझे, सावर सावर...........
गावातल्या मुलींना का,
हडळीचा शाप?
केवड्याच्या झाडाखाली,
असतोच साप
भुलण्याचे वय तुझे, सावर सावर.......
उष्टावल्या नैवेद्याने,
देवाचाही कोप
भांगेसंगे जगते का,
तुळशीचे रोप?
भुलण्याचे वय तुझे सावर सावर.......
बोललो जे काही त्याचा,
नको मानू राग
थेंब थेंब इंधनाने,
भडकते आग
भुलण्याचे वय तुझे, सावर सावर.......
अवखळ नको होऊ, स्वत:ला आवर.....
आपला,
(काव्यात्मक) धोंडोपंत
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5658
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है
तुळस नि भांग
+१
In reply to तुळस नि भांग by बेसनलाडू
सुंदर
मस्त
तुज्या उसाला लागल कोल्हा
विचारांच्या दिशेतील फरक
In reply to तुज्या उसाला लागल कोल्हा by प्रकाश घाटपांडे
साम्य
In reply to विचारांच्या दिशेतील फरक by धोंडोपंत
पंत
खुपच सुंदर !
शहानिशा कसली?
In reply to खुपच सुंदर ! by sanjubaba
सहमत
In reply to शहानिशा कसली? by धोंडोपंत
शहानिशा
In reply to खुपच सुंदर ! by sanjubaba
क्या बात है प्रकाशराव
In reply to शहानिशा by प्रकाश घाटपांडे
भरलेल्या
मस्त
क्या बात है !!!
बोललो जे
व्वा!
अप्रतिम!
वा वा धोंडोपंत!
सुरेख
वा!
वा:!
मस्तच.. भरल