उत्कृष्ट लेख.
सुंदर लेखनशैली, आणि अप्रतिम छायाचित्रण.
अशी मेजवानी दिल्याबद्दल धन्यवाद.
(माझी जरा चूकच झाली, जेवण झाल्यावर नेटवर बसलो!
हे वर्णन वाचून आणि फोटो बघून भूक आणखी चाळवल्यासारखं झालं!
आता पुढच्या वेळी जेवणाआधीच नेट चालू करून, आधी बघून घेत जाईन!!)
अजिंक्य.
आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा jet lag गृहित धरतोच नां! पहिले काही दिवस आपल्या आजुबाजूचं जग शांत झोपलेल असताना आपण जागे असतो. आणि त्यांची कामाची वेळ झाली की आपले डोळे मिटायला लागतात. पण म्हणून “मी माझ्या वेळेप्रमाणेच वागणार!” असा आडमुठेपणा न करता आपणच आपलं घड्याळ लावून घेतोच ना! माझ्यामते ह्या jet lag च्या हातात हात घालून taste lag ही येतोच. त्यामुळे आता मी घड्याळाबरोबरच माझी जीभही इथल्या चवींशी लावून घेतली आहे. आजही घरची वेळ माझ्या कॉंप्युटरच्या कोप-यात सतत जागी असते तशाच घरच्या सगळ्या चवी माझ्या मनाच्या एका कोप-यात अजूनही जाग्या आहेत.
उदरभरणाचा सुंदर लेखाजोखा.
वर दिलेला परीच्छेद इतका आवडला की वारंवार वाचला.
"सुबक ठेंगणी"ने लिहिलेला सुंदर आणि सचित्र लेख वाचायला जरा उशीरच झाला. पण आज वाचला व धन्य वाटलं. तिनं व्य.नि. वर तिचा असा मनसुबा मला कळविला होता, पण अनेक लेखांच्या महापुरात (delugeमध्ये) मी तो मिस केला खरा.
लेख खरंच अप्रतिम आहे. जपानी जेवण न जेवलेल्यांनासुद्धा तिची अतीशय सहजसुंदर व ओघवती भाषा व अनेक सहज वाटणार्या उपमा मोहवून टाकतातच, पण माझ्यासारख्या जपानी जेवण "पचविणार्या"ला तर पुनःप्रत्ययाचा आनंद देतात. माझा हा प्रतिसाद माझ्या स्वानुभवांवर आधारित असून "सुबक ठेंगणी"ला आलेले अनुभव आणि माझे अनुभव बरेचसे सारखे वाटले.
लेख वाचताना १९७२ सालच्या पहिल्या भेटीत आलेल्या जपानी जेवणापासून ते आज आवडीने जपानी रेस्टॉरंट्सना भेट देण्यापर्यंतची प्रगती डोळ्यासमोरून गेली.
आमची मुकुंद कंपनीतील सहा इंजिनियर्सची "टोळी" जपानला गेली. पैशाचा ठणठणाट असल्यामुळे हॉटेल परवडण्यासारखे नव्हते व आमची सोय त्या-त्या कंपन्यांच्या र्यो (ryo) मध्ये (म्हणजे ब्रह्मचारी कर्मचार्यांसाठीचा आश्रम) मध्ये केली गेली होती. अर्थातच जेवणाच्या बाबतीत "आनंद"च होता.
वाफाळलेल्या भातावर कच्चे अंडे फोडून गुरगुटून खाणे म्हणजे न्याहारी होती. आम्हा सहाजणात एकमत झाले होते की जपानी जेवणाचे दोन प्रकार असतात: (१) बेचव व (२) अत्यंत बेचव.
पण हळू-हळू रामेन (ramen)/उदों (udon) पासून आवड निर्माण होऊ लागली. मग लक्षात आले की एकदा का सोयसॉसचा वास आवडायला लागला की मग ते जेवण आवडू लागते. व तसेच झाले.
आमच्याकडे दरवर्षी दोनदा जपानी इंजिनियर्स येत. (हो, अगदी आषाढी-कार्तिकी). एकाद्या आठवड्यानी त्यांचं, "आम्ही 'मिसो' सूप मिस करतोय" सुरू व्हायचं. हे न्याहारीला घ्यायचं अगदी (जपानी) बाबाआदमच्या काळापासून प्यालं जाणारं सूप आम्हीही चाखलं होतं आणि आमच्या मनात यायचं की "च्या मारी, त्यात मिस करण्यासारखं काय आहे?"
पण पुढच्या ३-४ भेटीत आम्ही चांगल्या हॉटेल्समध्ये राहिलो व चांगले जपानी जेवण जेवलो. आज या नवीन चवींवर ("सुबक ठेंगणी"प्रमाणेच) मी मात केली आहे. आज सगळे जपानी पदार्थ मी व माझी पत्नी-मुले आवडीने खातो (मिसो सूपसह). त्यातल्या खुब्याही माहीत झाल्या आहेत. 'वासाबी' कितीही गोंडस दिसत असलं तरी ते आपल्या हिरव्या दिसणार्या चटणीसारखं खाल्लं तर नाकाच्या आतल्या पदराची वास घेण्याची शक्ती ५-१० मिनिटं नाहीशी होते, ते अगदी "टिकलीसारखं"च लावायचं असतं, तेही शक्य तो सोय सॉसबरोबर वगैरे!
आज सुकीयाकी, शाबू-शाबू, टेंपूरा (बरोबरच्या मुळ्यावर आधारित सॉसबरोबर), Japanese fried rice (नाव विसरलो, कदाचित याकीमिशी), सुशी व साशीमी (raw-fish based), sea weed... सगळं मला आवडू लागलं आहे. "तेप्पन याकी"च्या सर्कसपटू बल्लवचार्याच्या अनेक लीलाही आवडतात.
माझा "फूड लॅग" कधीच गेला आहे व आता बर्याचदा "अरे, बर्याच दिवसांत जपानी जेवलो नाही" असं मनात येतं.
"सुबक ठेंगणी"चा लेख वाचताना हा सर्व प्रवास डोळ्यासमोरून गेला व खूप आनंद झाला. "सुबक ठेंगणीचे इतका सुंदर लेख व माहितीपूर्ण लिहिल्यबद्दल मनःपूर्वक आभार.
जपानबद्दलच्या अशा लेखांचे मिपाकर खूप-खूप स्वागत करतील यात शंका नाही.
जाता जाता: माझ्या माहितीतल्या जपानी लोकांना भारतीय जेवण खूप आवडते व "ओइशी देस" करत ते त्यावर ताव मारतात.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
फारच अप्रतिम लिखाण केलं आहे ... किती रसाळ आणि जिवंत.. मला पहिला परिच्छेद वाचून मी लहानपणी एकत्र कुटुंबामधे अनुभवलेली सगळ्यांची पंगत आठवली.. तीची आठवण करून दिल्याबद्धल लेखिकेला शतशः आभार.
प्रतिक्रिया
केवळ अप्रतिम!!!
तु काय
!!
उत्कृष्ट!
'सुंदर' लेख.
आपण जेव्हा
छान
"र्यो"मधील कदान्नापासून जपानी जेवणाशी झालेले प्रेमप्रकरण!
अप्रतिम
उत्खनन :-
उत्खनक महोदय शतशः धन्यवाद.
पुन्हा वाचलं पुन्हा तेवढच