✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अत्तरायण..! भाग - १

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Tue, 12/02/2014 - 18:17  ·  लेख
लेख
अत्तर म्हटलं..की.. रमझानचे दिवस आहेत. संध्याकाळची वेळ आहे.शाळेतल्या मित्रांच्या कंपूनी "दिवट्या...चल..आज मोमिनपुर्‍यात जायचय..यायचं हां तू...ते भटजी वगैरे गेलं तेल लावत.लै नाटकं नाय करायची" ..अशी धमकी मैत्री खात्यात दिलेली आहे.मी ही आज ते तहुरा कोल्ड्रिंक्स,तो इराणी श्टाइल चाय, ती मोठ्ठी तळलेली पोळि/पुरी आणि तो सत्यनारायणाच्या प्रसादाशी स्पर्धा करणारा शिरा, काळेजामुन्,डब्बल का मिठ्ठा,वेगवेगळे अरेबिक खजुर-(काहि अत्यंत गोड,पण तोंडात सालं चिकटवणारे,तर काहि अत्यंत मधाळ चवीचे..खाता खाता 'बी' कधी तोंडातून बाहेर आली,याचा पत्ताहि न लागू देणारे..), असं भरपूर चरल्यावर नंतर साधं पत्ता तंबाखुचं अत्यंत सालस किक देणारं पान चघळून झालेलं आहे..अश्यात पुढे एक सुरम्याचा श्टॉल लागतो आहे. मग साधा नाहितर स्पेशल सुरमा डोळ्यांना चढवून्,दोन्/तीन मिनिटं त्याच खुर्चीत डोळ्यांना थो......डं झोंबत गार गार वाटवत्,निपचीत त्या खुर्चीत पडून रहातो आहे..कडेनी मिनारावर लावलेल्या भोंग्यातून.... असदुल्ल लल्ला...आ...हु..अकबर... असे काहि तरी सूर कानावर पडत आहेत..सुरमेवाला पुढची गिर्‍हाइकं पाहाता..मला, अब उठो भै! ..म्हणतो आहे...

आणि....

तिथुन उठल्यावर पुढे मला एक अत्तराचा स्टॉल बोलावतो आहे.. हे चित्र अजुनंही दिसतं. माझी अत्तरांशी ओळख तशी सर्वसामान्यपणे लहानपणी होते ती झालेली होतीच. त्यातंही कोकणातल्या घरगुती सोहळ्यांमधले..लावलेल्या (आणि ल्यालेल्या.. ;) ..) अत्तरांचे काहि खास वास, मेंदूत रजिस्टरंही झाले होते.अजुनंही आहेत. पण अत्तरांशी दोस्ती सुरु झाली ती आमच्या न्यू इंग्लिश स्कूल मधल्या मित्रांच्या टोळक्यामुळेच. म्हणजे आमच्या टोळीत कुणिही अत्तरांचा खासा शौकिन नाही. रमझानच्या सिझनला सगळे मोमिनपुर्‍यात जायचे ,ते प्रामुख्यानी खाटखुट खायलाच. पण त्यांचं खाणं,आणि माझं अत्तरांबरोबर गाणं,त्याच एका वक्ताला सुरु झालं.नंतर पुढे अशीच ३/४ वर्ष गेली. बाकिचे सर्व मित्र अनेक कारणानी बंद झाले.पण मी सुरु-राहिलो ते अत्तरांमुळेच. मोमिनपुर्‍यात मध्यभागी डाव्या बाजुला एक अत्तरांचा भला मोठ्ठा स्टॉल तेंव्हा लागायचा. अताही तो आहे,पण एका बाजुच्या कोपर्‍यात पानटपरी सारखा तो दिवंगत झालाय. बाँबस्फोट/हल्ले इत्यादी प्रकरणं सुरु झाल्यापासून,मोमिनपुर्‍यातला सगळाच तो जोस एकंदरीतच ओसरलेला आहे. पण तेंव्हा मात्र तो स्टॉल एखाद्या फटाक्यांच्या स्टॉल इतका मोठ्ठा असायचा. असाच एकदा मी रात्री ११ नंतर ,करंट आल्यासारखा मोमिनापुर्‍यात गेलो होतो.दिवस रमझानचेच होते..आधी गेल्या गेल्या ते तहुरा कोल्ड्रिंक्स वाल्याकडचं एक दाट दुध कोल्ड्रिंक लावलं,आणि बार मळत मळत..अत्तर वाल्याकडे गेलो. त्यानी गेल्या गेल्या पहिलं मजमुआचं फ्री सँपल माझ्या हातावर चढवलं. मीही मग ते गा....र श्वासासह ,बिडीचा झुरका मारवा तसं मनगटावरून नाकात-घेतलं आणि पहिली किक बसली. मग क्क्काय??? माझे दोन्ही हात भरेपर्यंत त्यानी त्या काचेच्या शलाकेनी माझ्या अंगावर मस्त रंगपंचमी केली. (करणार का नै मेला!? ;) मी त्याचं दरवर्षीचं ,संपूर्ण रमझान-मिळून्,चांगलं पाचशे ते हजाराचं-गिर्‍हाइक होतो! ) मग मी हिना ,जन्नत उल फिरदोस, मस्क, अशी काहि अत्तरं घेतली. और तब से ये सिलसिला शुरु रहा है,वो आजतक. त्यानंतरच्या दहा ते बारा वर्षांचा हिशेब पहाता मी अत्तरांच्या प्रांतात आज आहे, तो ही केवळ हौशी! शौकिन नाही..अट्टल शौकिन तर मुळीच नाही. कारण अत्तरांशी दोस्ती जमते..तशीच जमवत जावी.उगीच नसती सलगी करायला जाऊ नाही. नाहितर अत्तरांची नावं कळतात..अत्तरं काहि कळत नाहीत अशी अवस्था होते. अत्तरं हुंगावी नाकानी,वेध घ्यावा तो मेंदुनी आणि जानपेहेचान करवावी ती स्मृतींनी.. म्हणूनच मी माझी अत्तर ओळख मांडणार आहे ती स्मृतींच्या आधारे. :) १) हीना:- हे एक अत्यंत कॉमन अत्तर आहे. दाट वास असलेलं.त्यामुळेच ह्याचे जितके शौकिन सापडतात्,तितकेच तिरस्कार करणारेही अढळतात. माझ्या एका मित्रानी तर या अत्तराची 'पेश्ट कंट्रोलचं औषध" अशी संभावना केलि होती. त्यावर त्याची कंपुतल्या इतरांकडून..नरकात जाशील रे मेल्या... किडे पडतील किडे ( =)) ) अशी उलट संभावना झालेलीही मला अठवते. मी मात्र पहिल्यांदा हे अत्तर टेस्ट केलं ते एका खास प्रसंगात. पुणे वेदपाठ शाळेत शिकत असताना एकदा संध्याकाळी आमचा एक असाच अत्तरवेडा मित्र माझ्या समोर आला. आणि मला दम दिल्या सारखं.."हात कर पुढे!!!" असं म्हणाला मी गपगुमान मनगट त्याच्या कडे रोखलं. त्यानी एक अ‍ॅल्युमॅनिअमची छोटी बुधली काढली,आणि वरचं काळं-रबरी बुच बाजुला करून चांगलं बोटभर अत्तर माझ्या दोन्ही हातांना लावलं. मी ती बुधली उघडल्यापासूनच डोळे मिटले होते...असा काहि धुं................................द करणारा वास श्वासातून वहायला लागला होता,की बा...स! नंतर ते हाताला लागलेलं अत्तरं मी भुकेलेल्या माणसानी भराभरा गरम अन्नावर तुटून पडावं, तसं ५ मिनिटं नाकावरनं दोन्ही हात फिरवत आत घेतच राहिलो होतो. नंतर आमचा तो मित्र - " एकदम जहरी माल आहे,मला माहित होतं तुला लागू पडणार!" - असं म्हणून हसत हसत(तो हसला का ते माहित नाही अजुनंही..दुष्ष्ट! :-/ ..) तो तसाच निघून गेला. नंतर मला कळलं की ते 'हीना' त्यानी खास लखनौ का कुठून तरी मागवलं होतं. अजुनंही मला थंडीचे दिवस आले की ज्या अत्तरांची अठवण होते..त्यातलं हे एक आहे.. हीना... ग्गार हवेवर याचा भरभरून वास घेतल्या नंतर का कोण जाणे प्रचंड उबदार वाटतं... आणि तो उबदारपणा कसा? तर पहिल्या प्रेमातल्या मंदधुंद मिठी इतका आश्वासक... काहि तरी कायमचं..असं देणारा... इसीलिये हीना अपना पेहेला प्यार है। वो जिंदगी के आखरी दम तक चलता रहेगा। ==================== क्रमशः....
  • अत्तरायण..! भाग - २
  • अत्तरायण..! भाग - ३

Book traversal links for अत्तरायण..! भाग - १

  • अत्तरायण..! भाग - २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
29837 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

मस्तच

प्रशांत
Tue, 12/02/2014 - 18:19 नवीन
आवडल्या गेला आहे. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

खान गुर्जी झकास लिवलय भो.....

विजुभाऊ
Tue, 12/02/2014 - 18:37 नवीन
खान गुर्जी झकास लिवलय भो......
  • Log in or register to post comments

आवडल....

जेपी
Tue, 12/02/2014 - 18:45 नवीन
आवडल....
  • Log in or register to post comments

अत्तरायणाच्या प्रवासाला

जे.पी.मॉर्गन
Tue, 12/02/2014 - 19:10 नवीन
अत्तरायणाच्या प्रवासाला आम्हीपण तयार आहोत! वेगळा विषय रोचक ठरणार! जे.पी.
  • Log in or register to post comments

सगळ्यात आवडता प्रकार आहे हा

Mrunalini
Tue, 12/02/2014 - 19:17 नवीन
सगळ्यात आवडता प्रकार आहे हा माझा... परफ्युम, अत्तर खुप आवडतात. खुप छान लिहले आहे. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच भारी.

प्रचेतस
Tue, 12/02/2014 - 19:26 नवीन
नेहमीप्रमाणेच भारी. मोमीनपुर्‍यात रमझानात तुमच्याबरोबरच एक चक्कर झाली होती तेव्हा हे उत्सवी आतावरण अनुभवलेच होते. बाकी आमच्या सध्या गायब असलेल्या एका मित्राला पाण्यात मिसळण्यासाठी हवे असलेल्या अत्तराचाही किस्सा येऊ द्यात.
  • Log in or register to post comments

भारी लिहिलयत.

रेवती
Tue, 12/02/2014 - 19:29 नवीन
भारी लिहिलयत.
  • Log in or register to post comments

आवडलं अत्तरायण.पुभाप्र.

अजया
Tue, 12/02/2014 - 19:37 नवीन
आवडलं अत्तरायण.पुभाप्र.
  • Log in or register to post comments

मस्तच!

किसन शिंदे
Tue, 12/02/2014 - 19:46 नवीन
मस्तच!
आणि तो उबदारपणा कसा? तर पहिल्या प्रेमातल्या मंदधुंद मिठी इतका आश्वासक... काहि तरी कायमचं..असं देणारा...
आँ!! लब्बाड गुरूजी...याचा अनुभव कुठे तरी घेतलेला दिसतोय. ;) :P
  • Log in or register to post comments

खिक्क !!

सूड
Tue, 12/02/2014 - 19:56 नवीन
खिक्क !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

आँ!! लब्बाड गुरूजी...याचा

स्पा
Wed, 12/03/2014 - 10:47 नवीन
आँ!! लब्बाड गुरूजी...याचा अनुभव कुठे तरी घेतलेला दिसतोय.
ये लगा दनदनाता छक्का !!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

एक गमतीचा भाग

सुबोध खरे
Tue, 12/02/2014 - 20:56 नवीन
चामड्याच्या वासाचे अत्तर पण मिळते आणि ते भरपूर खपते. कारण बर्याच थंड आणि दमट देशांमध्ये चामड्याला बुरशी लागते किंवा कुबट वास येऊ लागतो. आपल्याकडे न खपलेला माल पावसाळ्यानंतर बाहेर काढल्यावर तसेच होते. (किंवा पावसाळ्यात चार महीने माळयावर टाकलेले चामड्याचे बूट जसे होतात) परत ती पादत्राणे किंवा पर्सेस साफ करून त्याला पॉलीश लावून हे अत्तर मारून एकदम चकाचक नवीन बूट (किंवा पर्सेस) म्हणून तुम्हाला विकता येतात.
  • Log in or register to post comments

अत्तर आवडत नाही परंतु तुमचा

कंजूस
Tue, 12/02/2014 - 21:03 नवीन
अत्तर आवडत नाही परंतु तुमचा अनुभव वाचणार आहे. पहिलेच "अत्तरांशी दोस्ती -- जान पहेचान करावी स्मृतिंनी" या वाक्याने उत्सुकता वाढवली आहे .या सूचनेवजाआज्ञा शिरसावंद्य प्रमाण मानून दक्षतेने वाचणार आहे. पहिलाच धडा जड जाणार असं दिसतंय. पहिली मिठी वगैरेच्या स्मृतिंना आठवल्याशिवाय हीनाचा वास चुकलो गंध नाकातून मेंदूपर्यंत जाणार नाही. दुसरं म्हणजे उर्दु फारसी शब्दही समजवा. आता आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना अत्तर गळी उतरवणे पेक्षा नाकाने गंधज्ञान करवणे म्हणजे अरसिकेशु कवित्व -- असो यापुढे हाताची घडी तोंडावर बोट आणि नाक उघडे. अत्तरायण +१०
  • Log in or register to post comments

@यापुढे हाताची घडी तोंडावर

अत्रुप्त आत्मा
Tue, 12/02/2014 - 21:19 नवीन
@यापुढे हाताची घडी तोंडावर बोट आणि नाक उघडे.>>> =)) __/\__ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

बुवांचा प्रवास

तुषार काळभोर
Tue, 12/02/2014 - 21:35 नवीन
सत्यनारायण ते अत्तरायण :)
  • Log in or register to post comments

यह महफिल (इतर मेहफिलींच्या

प्यारे१
Tue, 12/02/2014 - 21:48 नवीन
यह महफिल (इतर मेहफिलींच्या वरचढ) रंग जमायेगी. मान गये बुवा!
  • Log in or register to post comments

वाचतोय !!

खटपट्या
Wed, 12/03/2014 - 00:02 नवीन
वाचतोय !! माझ्या एका मित्राचे आड्नाव "अत्तरदे" आहे. हे अत्तराच्या व्यवसायावरुन पड्ले असावे का? त्याला याबद्द्ल काहीच माहीती नाही.
  • Log in or register to post comments

"अत्तरदे' - हे ठाण्याचे का?

वाचक
Wed, 12/03/2014 - 00:42 नवीन
आम्हाला एक प्रोफेसर होते अत्तरदे नावाचे, मॅथ्स का फिजिक्स काहीतरी शिकवायचे, त्याच्याआधी आणि त्यानंतर कुणाचेच हे आडनाव ऐकले नाही, आज तुम्ही लिहिपर्यंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

नाही ते प्रोफेसर नाहीत. आणि

खटपट्या
Wed, 12/03/2014 - 05:43 नवीन
नाही ते प्रोफेसर नाहीत. आणि माझे मित्र डोंबिबली (मध्यवर्ती ठीकाण) येथे राहतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक

तुम्ही ठाण्याच्या बांदोडकर

सुबोध खरे
Wed, 12/03/2014 - 09:52 नवीन
तुम्ही ठाण्याच्या बांदोडकर कॉलेजचे का? आम्हाला पण अत्तरदे सर अकरावी बारावी ला (१९८२) भौतिकशास्त्र( फिजिक्स) शिकवायला होते. अत्तरदे आणी आढळी सर असे दोन प्राध्यापक होते आणी फार छान शिकवत असत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक

अत्तारदे/अत्तारडे

तुषार काळभोर
Wed, 12/03/2014 - 20:35 नवीन
माझा एक मित्र होता इंजिनियरिंगला.. जळगावचा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

मस्त...

मुक्त विहारि
Wed, 12/03/2014 - 02:41 नवीन
मदनबाण ह्यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

आवडेश..

नाखु
Wed, 12/03/2014 - 08:52 नवीन
"अत्रंगी"## मनुक्श आणि अतरंगी निरूपण. ## "अत्रंगी" ची शब्दफोड: अत्तरासारखी फक्कड दोस्ती जमवणारा आणि "रंगीला"(पुण्यातल्या खादाडीच्या अनवट पण एक वेगळी ऐट असलेल्या जागांचा शौकिन मनुक्श) उगा नवीन अर्थ काढून "संध्यानंद" करू नये.
  • Log in or register to post comments

मस्तच बुवा! एकदम सुगंधी लेख!

बोका-ए-आझम
Wed, 12/03/2014 - 09:21 नवीन
मस्तच बुवा! एकदम सुगंधी लेख!
  • Log in or register to post comments

अत्तरायण मस्तच.

सौंदाळा
Wed, 12/03/2014 - 10:12 नवीन
अत्तरायण मस्तच. मी काही अत्तराचा शौकीन नाही पण लेख मात्र एकदम कडक घारापुरी कट्ट्याला बोटीत अत्तराची कुपी काढुन अत्तर तुम्ही सर्वाना लावले होते ते आठवलं मिपा कट्टा, समुद्रातली सफर गप्पाटप्पा आणि त्या अत्तराचा सुगंध मस्त माहौल होता.
रमझानच्या सिझनला सगळे मोमिनपुर्‍यात जायचे ,ते प्रामुख्यानी खाटखुट खायलाच
अजुनही जातो. तीन का चार? वर्षापुर्वी स्वाईन फ्लुच्या साथीच्या वेळी रमजानला हे स्टॉल लागले नव्हते ते वर्ष सोडले तर माझा पण हा सिलसिला (खाण्याचा) चालु आहे. तंदुरी चिकन, मटन दालचा, बिर्यानी, बटेर मसाला आणि नंतर फालुदा, फिरनी आणि शाही तुकडा खाऊन डुलत डुलत ईस्ट स्ट्रीट्वर यायचे निवांत १-२ तास गप्पांचा अड्डा जमवुन मध्यरात्रीनंतर घरी पोचायचे
  • Log in or register to post comments

आई शप्पथ!!

स्पंदना
Wed, 12/03/2014 - 10:27 नवीन
आई शप्पथ!! सुरुंग लावला तुम्ही गुर्जी तुमच्या प्रतिमेला. चक्क चक्क भटजी शेंडी सांभाळत मोमिनपुर्‍यात? चरण कमल इकडे करा गुर्जी, माझा नवरा मुंबईत सुद्धा मला त्या मुस्लिम हलवायाच्या दुकानात जाउ देत नव्हता. पण माझ मन ओढायच त्या भल्या मोठ्या पुर्‍या पाहून. एकदापण नाही मिळालं खायला, अन मज्जा बघायला. नेक्सट टाईम गुर्जी तुम्ही टुर काढा असल्या सगळ्या गोष्टींची. आपण मनसोक्त हादडत फिरु. अत्तरांबद्द्ल काय सांगावं? तरीही "मिट्टी" हा सुगंध कुणाला माहित आहे का?
  • Log in or register to post comments

लेखन आवडले...

मदनबाण
Wed, 12/03/2014 - 10:36 नवीन
गंधाचा आणि स्मॄतीचा अगदी गाढा संबंध आहेच...पण त्या बरोबरच तो एक अनुभव सुद्धा आहे. :) अत्तरांचा आणि माझा संबंध नरसोबाच्या वाडीमुळेच आला... महापुजेच्या वेळी दत्तपदकमलांना लावले गेलेल्या अत्तरांचा घमघमाट काय वर्णावा ? माझे वडिल मांटुंग्याला आणि इतर ठिकाणी जाउन उदबत्या घेउन येतात,दादर ला फुलाबाजारातुन फुले घेउन येतात आणि याच प्रमाणे अत्तरे देखील. हे सर्व वाडीला दत्त चरणी अर्पण करण्यासाठीच { त्यांचा हा अनेक वर्षाचा क्रम आजही चुकलेला नाही.} आपल्याला जर सर्व उत्तम गोष्टी लागतात, तर मग देवालाही का नको ? ही त्यांची मूळ भावना... त्यांमुळेच चांगली अत्तर वापरण्याची,अनुभवण्याची आणि शोधण्याची सवय मला देखील लागली. :) आणि तो उबदारपणा कसा? तर पहिल्या प्रेमातल्या मंदधुंद मिठी इतका आश्वासक... काहि तरी कायमचं..असं देणारा... काय गुरुजी ? ही संथा कधी मिळाली तुम्हाला ? जर सांगा बर... ;) हीना हे प्रकॄतीला आणि गुणाला थंड आहे बरं का... ;) त्यातही हीना+मुश्क {कस्तुरी} असलेले अत्तर वापरलेत तर त्याचा प्रभाव अजुनही उच्चकोटीचा वाटतो... एकदा मुश्कहीना वापरलेत की मग फक्त हीना त्यापुढे काहीच वाटेनासे होते. {अर्थात हा माझा व्यक्तीगत अनुभव आणि आवड आहे.} तसेच उत्तम दर्जाचे मजमुआ लावले असेल तर त्याचा गंध स्त्रीयांना लगेच कळतो आणि आवडतो असा माझा आजवरचा अनुभव आहे. मजमुआ हे केवडा अत्तर+ खस अत्तर आणि दोन /तीन वेगळ्या अत्तरांचे प्रभावी मिश्रण आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वे
  • Log in or register to post comments

बाणसाहेब, तिकडे आल्यावर एक

खटपट्या
गुरुवार, 12/04/2014 - 06:26 नवीन
बाणसाहेब, तिकडे आल्यावर एक मजमुआची बाटली घेतो तुमच्याकडून. (अर्थात जे काही होतील ते पैसे दीले जातील)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मस्तच लिहिलय....पुभाप्र

Maharani
Wed, 12/03/2014 - 10:46 नवीन
मस्तच लिहिलय....पुभाप्र
  • Log in or register to post comments

गुर्जी...

सविता००१
Wed, 12/03/2014 - 10:53 नवीन
मस्तच सुरुवात हो..........
  • Log in or register to post comments

मजमुवा अत्तर म्हणजे बहुतेकदा

विजुभाऊ
Wed, 12/03/2014 - 10:59 नवीन
मजमुवा अत्तर म्हणजे बहुतेकदा शिल्लक राहीलेल्या सर्व बाटल्यातले अत्तर एकत्र करतात आणि विकतात असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

मजमुवा अत्तर म्हणजे बहुतेकदा

मदनबाण
Wed, 12/03/2014 - 11:12 नवीन
मजमुवा अत्तर म्हणजे बहुतेकदा शिल्लक राहीलेल्या सर्व बाटल्यातले अत्तर एकत्र करतात आणि विकतात असे मला वाटते. अत्तराचा फाया कानात घातलेले लोक कापुस बाहेर आलेल्या गादीसारखे दिसतात असे तुम्हाला वाटत असल्याने मजमुवा बद्धल असे का वाटते ते समजु शकतो ! ;) जाता जाता :- जरा गुगुलबाबाला विचारुन तरी पहायचे होते...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मस्तं लिहिलय! खूप आवडलं...

अनुप ढेरे
Wed, 12/03/2014 - 11:00 नवीन
मस्तं लिहिलय! खूप आवडलं...
  • Log in or register to post comments

वा बूवा

लीलाधर
Wed, 12/03/2014 - 11:25 नवीन
उत्तम असा लेख वाचायला मिळणार अगदी अत्तरासारखाच आवडेल
  • Log in or register to post comments

मी लहान असतांना आमच्या घरी एक

क्रेझी
Wed, 12/03/2014 - 12:33 नवीन
मी लहान असतांना आमच्या घरी एक गृहस्थ आले होते.माझ्या बाबांचे सहकारी ते, घरामधे आल्या आल्या आमच्या सगळ्यांच्या नाकातून डोक्यात एक जोरदार गंध गेला..नंतर त्या गृहस्थाने बाबांना एक अत्तराची लहानशी कुपी दिली, ते गेल्यावर बाबांनी स्वतःच्या हातावर ते लावलं आणि परत एकदा आम्हा सर्वांचं डोकं त्या वासाने गरगरलं...नावाचा शोध घेता कळालं ते अत्तर 'मजमुआ' होतं!! आजतागायत आम्ही सगळेजण डोक्यात जाणा-या कोणत्याही वासाला 'मजमुआ'च म्हणतो ;)
  • Log in or register to post comments

आहा! इतके कधी एक्स्प्लोअर

बॅटमॅन
Wed, 12/03/2014 - 12:39 नवीन
आहा! इतके कधी एक्स्प्लोअर केले नाही परंतु सुगंधाचे चाहते आहोत आपणही (पन सो नॉट इंटेंडेड). तस्मात मजा येतेय!
  • Log in or register to post comments

आजतागायत आम्ही सगळेजण डोक्यात

मदनबाण
Wed, 12/03/2014 - 12:43 नवीन
आजतागायत आम्ही सगळेजण डोक्यात जाणा-या कोणत्याही वासाला 'मजमुआ'च म्हणतो हा.हा.हा... प्रत्येकाला प्रत्येक गंध सहन /सुट होइलच असे नाही. { विशेषतः ते केमिकल बेस्ड असेल तर असा त्रास होतो.} बाकी फार पूर्वी मी वसईला नोकरीला असताना ठाणे-मिरा-रोड बस पकडायचो, त्या बस मधे कधी तरी एक मुसलमान युवक चढायचा, तो चढला की संपूर्ण बस मधे कधी हिना तर कधी खस चा सुगंध दरवळायचा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वे
  • Log in or register to post comments

बाय द वे, तुम्ही न्यु इंग्लिश

आनंदराव
Wed, 12/03/2014 - 13:11 नवीन
बाय द वे, तुम्ही न्यु इंग्लिश स्कूल मधले म्हणजे टिळक रोड कि रमणबाग ? आणि कोणती ब्याच?
  • Log in or register to post comments

{प्रोफेसर अत्तरदे यांना ओळखतो

कंजूस
Wed, 12/03/2014 - 21:59 नवीन
{प्रोफेसर अत्तरदे यांना ओळखतो आणि ते दुसरे डोंबिंवलीचे त्यांचे सख्खे बंधू आहेत पण आता अधिक वैयक्तिक माहिती नाही देत.} अत्तराकडे वळूया.
  • Log in or register to post comments

सुपर्ब

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 12/04/2014 - 15:30 नवीन
अप्रतिम लेखन बुवा ! पुढील लेखाच्या प्रतिक्षेत !! - ऑफीसडेस्कच्या ड्रॉवरच्या कोपर्‍यात 'नाकारलेली' एक फर्फ्युमची कुपी बाळगुन असणारा प्रगो
  • Log in or register to post comments

वल्ली

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/04/2014 - 17:17 नवीन
वल्ली @बाकी आमच्या सध्या गायब असलेल्या एका मित्राला पाण्यात मिसळण्यासाठी हवे असलेल्या अत्तराचाही किस्सा येऊ द्यात.>>> सदर व्यक्तिनी आमचे कडून विवाहित होणेचे ४ दिवस आधी,नीट तेहेकिकात करून ३ अत्तरे नेली होती. तिन्ही अत्तरांचा कसा कसा आणि केंव्हा योग्य वापर करावा? यासंबंधी चर्चाहि केली होती. आंम्ही त्यांना आमच्या (केवळ ;) ) अंदाजा नुसार बरेच मार्ग-दर्शन केले होते. त्यानंतर (म्हणजे लग्न झाल्यानंतर!) पुन्हा ४ महिन्यांनी सदर व्यक्तिस आमची अठवण झाली. भेटी अंती आंम्ही उत्सुकतेने त्यांना सदर विषयावर छेडले असता,त्यांनी अत्यंत शिताफिने त्या विषयास फाटा दिला! :-/ आणि फक्त माझे बरोबर जेवणास नजिकच्या एका हाटिलात आले. --------------------- प्र-कटन समाप्त! ===================================================== किसन शिंदे (आणि मदनबाण यांचे साठिही..! ह्ही! ह्ही! ह्ही! Image removed. ) @आँ!! लब्बाड गुरूजी...याचा अनुभव कुठे तरी घेतलेला दिसतोय.>>> मुरली-धर महाराज...आपला औत्सुक्यपूर्ण संशय दाद देण्याजोगा आहे. तरिही मी स्वतः (अजुनंही!!!) असा अनुभव कुठेही-घेतलेला नाही. आपण आंधी नावाचा एक प्राचीन चलचित्रपट मण लाऊन पहा. प्रेमातल्या हरेक(आलेल्या/राहिलेल्या) अवस्थेची आत्मप्रचीती आल्यासारखे वाटेल.आजही हा चित्रपट पहाताना,आमचेही तसेच काहिसे होते. शिवाय पीरेम...,या इषयावर पाहिलेल्या काहि चित्रपटांमधे तर ,ही पहिल्या प्रेमातली मंदधुंद मिठी इतकी सुरेख उलगडून दाखविली जाते..की प्रत्यक्षाहुनी........... असो!!! :D ==================================================== स्पा ये लगा दनदनाता छक्का !!! >> अस्सं!!! :-/ ============================== सौंदाळा मी आणि अजुन १ जण वजा जाता..आमच्याही त्या कंपुतले..बाकिचे सगळे खाटखुट प्रेमीच आहेत! यथेच्छ हादडत असतात.. :D ==================================== aparna akshay @सुरुंग लावला तुम्ही गुर्जी तुमच्या प्रतिमेला. चक्क चक्क भटजी शेंडी सांभाळत मोमिनपुर्‍यात? चरण कमल इकडे करा गुर्जी, >>> =)) @नेक्सट टाईम गुर्जी तुम्ही टुर काढा असल्या सगळ्या गोष्टींची. आपण मनसोक्त हादडत फिरु.>> नक्किच. अत्तरांबद्द्ल काय सांगावं? तरीही "मिट्टी" हा सुगंध कुणाला माहित आहे का? >> लिहिणार आहे. =========================================================== मदनबाण हीना हे प्रकॄतीला आणि गुणाला थंड आहे बरं का... Wink त्यातही हीना+मुश्क {कस्तुरी} असलेले अत्तर वापरलेत तर त्याचा प्रभाव अजुनही उच्चकोटीचा वाटतो... एकदा मुश्कहीना वापरलेत की मग फक्त हीना त्यापुढे काहीच वाटेनासे होते. >>> ऐसा इच है..मेरा हणुभव भी! आगे लिख्खुंगा..इस के बारे मे। ================================================================ अत्तरायणातील सहभागीतांचे आणि सर्वांचे आभार! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

भेटी अंती आंम्ही उत्सुकतेने

खटपट्या
गुरुवार, 12/11/2014 - 02:19 नवीन
भेटी अंती आंम्ही उत्सुकतेने त्यांना सदर विषयावर छेडले असता,त्यांनी अत्यंत शिताफिने त्या विषयास फाटा दिला! Beee आणि फक्त माझे बरोबर जेवणास नजिकच्या एका हाटिलात आले.
याचा अर्थ अपेक्षीत परीणाम साधला गेला आहे. याची पावती मिळाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

.. ..

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/11/2014 - 06:41 नवीन
=)) .. =)) .. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

सुंदर लेख!

पैसा
Wed, 12/10/2014 - 08:22 नवीन
अत्तराचा दरवळणारा सुगंध असतो तसा सुंदर लेख! मलाही मंद वासाची नैसर्गिक अत्तरे आवडतात. सिंथेटिक 'सेंट"चा वास उग्र असेल तर मात्र सायनसचा अटॅक येतो!
  • Log in or register to post comments

वाह.. एकदम सुगंधी लेख ..

वेदांत
गुरुवार, 07/28/2016 - 16:12 नवीन
वाह.. एकदम सुगंधी लेख ..
  • Log in or register to post comments

अतीव सुंदर लेखमाला.

पद्मावति
गुरुवार, 07/28/2016 - 17:43 नवीन
अतीव सुंदर लेखमाला. अत्तरांविषयी इतकी माहिती पहिल्यांदाच वाचतेय. तिसरा कस्तुरिविषयीचा भाग केवळ अप्रतिम. चौथा भाग दिसला नाही:(
  • Log in or register to post comments

गुरुजी

झेन
गुरुवार, 07/28/2016 - 19:51 नवीन
गुरुजी मजा आली. माणसाचा जन्म आणि रस रंग आस्वाद घेतला नाही तर पेरमेश्वराला तोंड कसे दाखवणार. वरती पैसा तैनी म्हटल्या प्रामाणे नैसर्गिक वासच जास्त चांगले वाटतात. कुणीतरी कृपया बाकीचे भाग कसे शोधायचे सांगाल का.
  • Log in or register to post comments

भाग २

वेदांत
Fri, 07/29/2016 - 09:50 नवीन
http://www.misalpav.com/node/29709
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन

भाग ३रा

वेदांत
Fri, 07/29/2016 - 09:53 नवीन
http://www.misalpav.com/node/29787
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदांत

धन्यवाद

झेन
Fri, 07/29/2016 - 10:17 नवीन
धन्यवाद वेदांतजी
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा