अत्तरायण..! भाग - १
अत्तर म्हटलं..की..
रमझानचे दिवस आहेत. संध्याकाळची वेळ आहे.शाळेतल्या मित्रांच्या कंपूनी "दिवट्या...चल..आज मोमिनपुर्यात जायचय..यायचं हां तू...ते भटजी वगैरे गेलं तेल लावत.लै नाटकं नाय करायची" ..अशी धमकी मैत्री खात्यात दिलेली आहे.मी ही आज ते तहुरा कोल्ड्रिंक्स,तो इराणी श्टाइल चाय, ती मोठ्ठी तळलेली पोळि/पुरी आणि तो सत्यनारायणाच्या प्रसादाशी स्पर्धा करणारा शिरा, काळेजामुन्,डब्बल का मिठ्ठा,वेगवेगळे अरेबिक खजुर-(काहि अत्यंत गोड,पण तोंडात सालं चिकटवणारे,तर काहि अत्यंत मधाळ चवीचे..खाता खाता 'बी' कधी तोंडातून बाहेर आली,याचा पत्ताहि न लागू देणारे..), असं भरपूर चरल्यावर नंतर साधं पत्ता तंबाखुचं अत्यंत सालस किक देणारं पान चघळून झालेलं आहे..अश्यात पुढे एक सुरम्याचा श्टॉल लागतो आहे. मग साधा नाहितर स्पेशल सुरमा डोळ्यांना चढवून्,दोन्/तीन मिनिटं त्याच खुर्चीत डोळ्यांना थो......डं झोंबत गार गार वाटवत्,निपचीत त्या खुर्चीत पडून रहातो आहे..कडेनी मिनारावर लावलेल्या भोंग्यातून.... असदुल्ल लल्ला...आ...हु..अकबर... असे काहि तरी सूर कानावर पडत आहेत..सुरमेवाला पुढची गिर्हाइकं पाहाता..मला, अब उठो भै! ..म्हणतो आहे...
आणि....
तिथुन उठल्यावर पुढे मला एक अत्तराचा स्टॉल बोलावतो आहे.. हे चित्र अजुनंही दिसतं. माझी अत्तरांशी ओळख तशी सर्वसामान्यपणे लहानपणी होते ती झालेली होतीच. त्यातंही कोकणातल्या घरगुती सोहळ्यांमधले..लावलेल्या (आणि ल्यालेल्या.. ;) ..) अत्तरांचे काहि खास वास, मेंदूत रजिस्टरंही झाले होते.अजुनंही आहेत. पण अत्तरांशी दोस्ती सुरु झाली ती आमच्या न्यू इंग्लिश स्कूल मधल्या मित्रांच्या टोळक्यामुळेच. म्हणजे आमच्या टोळीत कुणिही अत्तरांचा खासा शौकिन नाही. रमझानच्या सिझनला सगळे मोमिनपुर्यात जायचे ,ते प्रामुख्यानी खाटखुट खायलाच. पण त्यांचं खाणं,आणि माझं अत्तरांबरोबर गाणं,त्याच एका वक्ताला सुरु झालं.नंतर पुढे अशीच ३/४ वर्ष गेली. बाकिचे सर्व मित्र अनेक कारणानी बंद झाले.पण मी सुरु-राहिलो ते अत्तरांमुळेच. मोमिनपुर्यात मध्यभागी डाव्या बाजुला एक अत्तरांचा भला मोठ्ठा स्टॉल तेंव्हा लागायचा. अताही तो आहे,पण एका बाजुच्या कोपर्यात पानटपरी सारखा तो दिवंगत झालाय. बाँबस्फोट/हल्ले इत्यादी प्रकरणं सुरु झाल्यापासून,मोमिनपुर्यातला सगळाच तो जोस एकंदरीतच ओसरलेला आहे. पण तेंव्हा मात्र तो स्टॉल एखाद्या फटाक्यांच्या स्टॉल इतका मोठ्ठा असायचा. असाच एकदा मी रात्री ११ नंतर ,करंट आल्यासारखा मोमिनापुर्यात गेलो होतो.दिवस रमझानचेच होते..आधी गेल्या गेल्या ते तहुरा कोल्ड्रिंक्स वाल्याकडचं एक दाट दुध कोल्ड्रिंक लावलं,आणि बार मळत मळत..अत्तर वाल्याकडे गेलो. त्यानी गेल्या गेल्या पहिलं मजमुआचं फ्री सँपल माझ्या हातावर चढवलं. मीही मग ते गा....र श्वासासह ,बिडीचा झुरका मारवा तसं मनगटावरून नाकात-घेतलं आणि पहिली किक बसली. मग क्क्काय??? माझे दोन्ही हात भरेपर्यंत त्यानी त्या काचेच्या शलाकेनी माझ्या अंगावर मस्त रंगपंचमी केली. (करणार का नै मेला!? ;) मी त्याचं दरवर्षीचं ,संपूर्ण रमझान-मिळून्,चांगलं पाचशे ते हजाराचं-गिर्हाइक होतो! ) मग मी हिना ,जन्नत उल फिरदोस, मस्क, अशी काहि अत्तरं घेतली. और तब से ये सिलसिला शुरु रहा है,वो आजतक. त्यानंतरच्या दहा ते बारा वर्षांचा हिशेब पहाता मी अत्तरांच्या प्रांतात आज आहे, तो ही केवळ हौशी! शौकिन नाही..अट्टल शौकिन तर मुळीच नाही. कारण अत्तरांशी दोस्ती जमते..तशीच जमवत जावी.उगीच नसती सलगी करायला जाऊ नाही. नाहितर अत्तरांची नावं कळतात..अत्तरं काहि कळत नाहीत अशी अवस्था होते. अत्तरं हुंगावी नाकानी,वेध घ्यावा तो मेंदुनी आणि जानपेहेचान करवावी ती स्मृतींनी.. म्हणूनच मी माझी अत्तर ओळख मांडणार आहे ती स्मृतींच्या आधारे. :) १) हीना:- हे एक अत्यंत कॉमन अत्तर आहे. दाट वास असलेलं.त्यामुळेच ह्याचे जितके शौकिन सापडतात्,तितकेच तिरस्कार करणारेही अढळतात. माझ्या एका मित्रानी तर या अत्तराची 'पेश्ट कंट्रोलचं औषध" अशी संभावना केलि होती. त्यावर त्याची कंपुतल्या इतरांकडून..नरकात जाशील रे मेल्या... किडे पडतील किडे ( =)) ) अशी उलट संभावना झालेलीही मला अठवते. मी मात्र पहिल्यांदा हे अत्तर टेस्ट केलं ते एका खास प्रसंगात. पुणे वेदपाठ शाळेत शिकत असताना एकदा संध्याकाळी आमचा एक असाच अत्तरवेडा मित्र माझ्या समोर आला. आणि मला दम दिल्या सारखं.."हात कर पुढे!!!" असं म्हणाला मी गपगुमान मनगट त्याच्या कडे रोखलं. त्यानी एक अॅल्युमॅनिअमची छोटी बुधली काढली,आणि वरचं काळं-रबरी बुच बाजुला करून चांगलं बोटभर अत्तर माझ्या दोन्ही हातांना लावलं. मी ती बुधली उघडल्यापासूनच डोळे मिटले होते...असा काहि धुं................................द करणारा वास श्वासातून वहायला लागला होता,की बा...स! नंतर ते हाताला लागलेलं अत्तरं मी भुकेलेल्या माणसानी भराभरा गरम अन्नावर तुटून पडावं, तसं ५ मिनिटं नाकावरनं दोन्ही हात फिरवत आत घेतच राहिलो होतो. नंतर आमचा तो मित्र - " एकदम जहरी माल आहे,मला माहित होतं तुला लागू पडणार!" - असं म्हणून हसत हसत(तो हसला का ते माहित नाही अजुनंही..दुष्ष्ट! :-/ ..) तो तसाच निघून गेला. नंतर मला कळलं की ते 'हीना' त्यानी खास लखनौ का कुठून तरी मागवलं होतं. अजुनंही मला थंडीचे दिवस आले की ज्या अत्तरांची अठवण होते..त्यातलं हे एक आहे.. हीना... ग्गार हवेवर याचा भरभरून वास घेतल्या नंतर का कोण जाणे प्रचंड उबदार वाटतं... आणि तो उबदारपणा कसा? तर पहिल्या प्रेमातल्या मंदधुंद मिठी इतका आश्वासक... काहि तरी कायमचं..असं देणारा... इसीलिये हीना अपना पेहेला प्यार है। वो जिंदगी के आखरी दम तक चलता रहेगा। ==================== क्रमशः....Book traversal links for अत्तरायण..! भाग - १
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्तच
खान गुर्जी झकास लिवलय भो.....
आवडल....
अत्तरायणाच्या प्रवासाला
सगळ्यात आवडता प्रकार आहे हा
नेहमीप्रमाणेच भारी.
भारी लिहिलयत.
आवडलं अत्तरायण.पुभाप्र.
मस्तच!
खिक्क !!
आँ!! लब्बाड गुरूजी...याचा
एक गमतीचा भाग
अत्तर आवडत नाही परंतु तुमचा
@यापुढे हाताची घडी तोंडावर
बुवांचा प्रवास
यह महफिल (इतर मेहफिलींच्या
वाचतोय !!
"अत्तरदे' - हे ठाण्याचे का?
नाही ते प्रोफेसर नाहीत. आणि
तुम्ही ठाण्याच्या बांदोडकर
अत्तारदे/अत्तारडे
मस्त...
आवडेश..
मस्तच बुवा! एकदम सुगंधी लेख!
अत्तरायण मस्तच.
आई शप्पथ!!
लेखन आवडले...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वेबाणसाहेब, तिकडे आल्यावर एक
मस्तच लिहिलय....पुभाप्र
गुर्जी...
मजमुवा अत्तर म्हणजे बहुतेकदा
मजमुवा अत्तर म्हणजे बहुतेकदा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वेमस्तं लिहिलय! खूप आवडलं...
वा बूवा
मी लहान असतांना आमच्या घरी एक
आहा! इतके कधी एक्स्प्लोअर
आजतागायत आम्ही सगळेजण डोक्यात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वेबाय द वे, तुम्ही न्यु इंग्लिश
{प्रोफेसर अत्तरदे यांना ओळखतो
सुपर्ब
वल्ली
भेटी अंती आंम्ही उत्सुकतेने
.. ..
सुंदर लेख!
वाह.. एकदम सुगंधी लेख ..
अतीव सुंदर लेखमाला.
गुरुजी
भाग २
भाग ३रा
धन्यवाद