Skip to main content

राधा

लेखक दिपक विठ्ठल ठुबे यांनी सोमवार, 01/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
या शब्दांना दे, सुर तुझे संगीत दरवळू दे गीत, स्वरांच्या लाटेवर जणू दिवाणी राधा, शोधिते कान्हा होऊनी बावरी, प्रीतीच्या वाटेवर || धृ || दाटले मेघ अन तरी लालिमा क्षितिजी मनी भावनांची दाटी अन एकांताची भीतीहि तू समीप येऊन नेत्रांतून बस हृदयी ध्वनी कानी अन, नाव बसू दे तुझेच या ओठांवर || १ || तू श्वास तुझी मज आस अन तुझा ध्यास घेतला मनी... सर्वस्व आणि हे स्वत्व पाचही तत्व वाहते, मी तुझ्या चरणी.. मी शरण सोडूनी मरण आजही जगण्याचीही आस मनी ना उरली || 2 ||
लेखनविषय:

वाचने 3070
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

जुना मोड ऑन- प्रतिसाद किती आले हे पाहु नका.वाचन किती झाले ते पहा.उदा.तुमच्या कवितेचे आतापर्यंत 27 वाचने झालीत प्रत्येक जण प्रतिसाद देणार नाही. लिहायच आन 'मिर्पापण नमस्तु 'म्हणायच.-जुना मोड ऑफ. आवडल.

In reply to by जेपी

नक्कीच आपला सल्ला मोलाचा आहे यात शंकाच नाही

छान

ठीक!

उत्तम आपुले काव्य दिसे हे मजला मिपावरी ! नाही पाहीली या कवितेतील अजून मी-पावरी !! उदंड लिहावे आणि हाणावे काव्य रसा माजी ! नसेच भंगली अजून तृष्णा मिपावरी माझी !! खासच मिळतील तुम्हास आमुचे उत्तम प्रतिसाद ! नकाच विसरु मात्र देण्या अन्य लेखना साद !! करा खुशाल व्यासपिठाचा चकटफु व्यवहार ! कितेक आले आणिक गेले नाही मिपा - हार !! माय मराठी आणिक आम्ही तिचे शिलेदार ! तुम्हाचसाठी मिपा उघडे सताड हे दार !! ऊस लागला मुळापासूनी नका गोड खाऊ ! काव्यशास्त्र अन विनोदनाचा फुकट मिळे खाऊ !! @ ठुबे साहेब, गृहपाठ : आता या कवितेचे रसग्रहण करावे

मिपाच्या नेहमीच्या पद्धतीने आगोदर प्रतिसाद दिला आणि आता कविता वाचली .... पाचही तत्व वाहते, मी तुझ्या चरणी.. ही पाच तत्वे कोणती ?

In reply to by विटेकर

सर्वस्व आणि हे स्वत्व पाचही तत्व वाहते, मी तुझ्या चरणी.. पाचही तत्व ज्या पंच तत्वाने जग आणि मानवी शरीर बनले असा वेदात उल्लेख आहे ती पाच तत्वे जल पृथ्वी आकाश वायु आणि अग्नी

In reply to by विटेकर

लिमिटेड मालकी हक्काची पाच तत्त्वं वाहायला काय हरकत आहे हो काका? ;) 'देहे तव पांचा भूतांचा' मधली. कविता आवडली ओ!

हो सामान्यपणे राधा कृष्णाच्या कवितेत बासरीचा उल्लेख असतोच यात बासरीचा उल्लेख नाही