या शब्दांना दे, सुर तुझे संगीत
दरवळू दे गीत, स्वरांच्या लाटेवर
जणू दिवाणी राधा, शोधिते कान्हा
होऊनी बावरी, प्रीतीच्या वाटेवर || धृ ||
दाटले मेघ अन तरी लालिमा क्षितिजी
मनी भावनांची दाटी अन एकांताची भीतीहि
तू समीप येऊन नेत्रांतून बस हृदयी
ध्वनी कानी अन, नाव बसू दे तुझेच या ओठांवर || १ ||
तू श्वास तुझी मज आस
अन तुझा ध्यास घेतला मनी...
सर्वस्व आणि हे स्वत्व
पाचही तत्व वाहते, मी तुझ्या चरणी..
मी शरण सोडूनी मरण
आजही जगण्याचीही आस मनी ना उरली || 2 ||
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3106
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
जुना मोड ऑन-
जुना मोड ऑन-
प्रतिसाद किती आले हे पाहु नका.वाचन किती झाले ते पहा.उदा.तुमच्या कवितेचे आतापर्यंत 27 वाचने झालीत प्रत्येक जण प्रतिसाद देणार नाही.
लिहायच आन 'मिर्पापण नमस्तु 'म्हणायच.-जुना मोड ऑफ.
आवडल.
नक्कीच
In reply to जुना मोड ऑन- by जेपी
नक्कीच
आपला सल्ला मोलाचा आहे
यात शंकाच नाही
राधा कृष्णाच्या कवितेत नेहमी
राधा कृष्णाच्या कवितेत नेहमी बासरीचा उल्लेख वाचायची सवय आहे. तो यात नाही असे दिसते.
हो
In reply to राधा कृष्णाच्या कवितेत नेहमी by रेवती
हो
सामान्यपणे राधा कृष्णाच्या कवितेत बासरीचा उल्लेख असतोच
यात बासरीचा उल्लेख नाही
छान
छान
ठीक!
ठीक!
नवोदितांस .....
उत्तम आपुले काव्य दिसे हे मजला मिपावरी !
नाही पाहीली या कवितेतील अजून मी-पावरी !!
उदंड लिहावे आणि हाणावे काव्य रसा माजी !
नसेच भंगली अजून तृष्णा मिपावरी माझी !!
खासच मिळतील तुम्हास आमुचे उत्तम प्रतिसाद !
नकाच विसरु मात्र देण्या अन्य लेखना साद !!
करा खुशाल व्यासपिठाचा चकटफु व्यवहार !
कितेक आले आणिक गेले नाही मिपा - हार !!
माय मराठी आणिक आम्ही तिचे शिलेदार !
तुम्हाचसाठी मिपा उघडे सताड हे दार !!
ऊस लागला मुळापासूनी नका गोड खाऊ !
काव्यशास्त्र अन विनोदनाचा फुकट मिळे खाऊ !!
@ ठुबे साहेब,
गृहपाठ : आता या कवितेचे रसग्रहण करावे
ह्म्म
मिपाच्या नेहमीच्या पद्धतीने आगोदर प्रतिसाद दिला आणि आता कविता वाचली ....
पाचही तत्व वाहते, मी तुझ्या चरणी..ही पाच तत्वे कोणती ?
सर्वस्व आणि हे स्वत्व
In reply to ह्म्म by विटेकर
सर्वस्व आणि हे स्वत्व
पाचही तत्व वाहते, मी तुझ्या चरणी..
पाचही तत्व
ज्या पंच तत्वाने जग आणि मानवी शरीर बनले असा वेदात उल्लेख आहे
ती पाच तत्वे
जल पृथ्वी आकाश वायु आणि अग्नी
__/\__
In reply to सर्वस्व आणि हे स्वत्व by दिपक विठ्ठल ठुबे
__/\__
पाची तत्वे तुझ्या चरणी ...
In reply to सर्वस्व आणि हे स्वत्व by दिपक विठ्ठल ठुबे
च्यायला, पाचही तत्त्वे काय तिच्या ( की त्याच्या? ) बापाची आहेत का ? चरणी वहायला.....
@ विटुकाका-
In reply to पाची तत्वे तुझ्या चरणी ... by विटेकर
@ विटुकाका-
=))
लिमिटेड मालकी हक्काची पाच
In reply to पाची तत्वे तुझ्या चरणी ... by विटेकर
लिमिटेड मालकी हक्काची पाच तत्त्वं वाहायला काय हरकत आहे हो काका? ;)
'देहे तव पांचा भूतांचा' मधली.
कविता आवडली ओ!
काका,कविला वाचवा
=))
काका,कविला वाचवा =))
ओके
ओके
हो
हो
सामान्यपणे राधा कृष्णाच्या कवितेत बासरीचा उल्लेख असतोच
यात बासरीचा उल्लेख नाही