Skip to main content

धोतर आणि तांब्या

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 23/11/2014 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
हाति घेतला तांब्या वेळ पहाटेची रेल्वे ट्र्ॅकही पाहतो वाट आमच्या आगमनाची सावरुन बैसोनि धोतर होते सोडलेले अचानक गुडगुड आवाज कानी पडले कालचे जेवण बहुतेक नव्हते पचलेले पण पुन्हा ट्र्ॅकही थरथरताना दिसले रेल्वे मजकडे येताना अखेरीस पाहिले धोतर जीव तांब्यापैकी काय वाचवावे गुंडाळुनि धोतर बाजुस उडि ठोकली त्यांब्याने माझ्या रेल्वेखाली मान दिली उडुनी त्यांब्याने मस्तकाचे चुंबन घेतले त्याचक्षणी शौचालय बांधण्याचे मी ठरवले त्वरेने बाजारात जावोनि नवे तांब्ये आणले नव तांब्यासमवेत शौचालयात आगमन केले आजवर कैकवार धोतर बाहेर सोडले एका अपघाताने शहाणपण आज सुचल
लेखनविषय:

वाचने 10856
प्रतिक्रिया 68

प्रतिक्रिया

धोतर आणि तांब्या हे शीर्षक वाचून आमच्या एका मित्रांची आठवण झाली. पुढे कविता वाचून पाहता त्यावर शिक्कामोर्तबच झाले.

In reply to by खटपट्या

"राखीव" जागेतील आगंतूक घूसखोरी "क्षणभंगूर" ठरो हीच अगोबा चरणी प्रार्थना.. समस्त हा.मुक्त्.ओसाडवाडी मित्रमंडळ. स्(दा) गावडे (आ)सूड नाखु(ष) वाघुळ्बुवा शब्द्फोडे

In reply to by बॅटमॅन

प्रार्थना कुणाच्या चरणी केली आहे बघा की! वल्लीसहस्त्रनामांपैकी अग्रक्रमानं येणारं अगोबा हे नाम भक्तांना अत्यंत प्रिय असून त्याच्या जपाने आनंद प्राप्त होतो असा अनुभव आहे ;)

In reply to by स्वप्नज

रुळावर तांब्या घेऊन जायचे साहजिकच सवय लागली असेल ताब्यांची, आता लागलेल्या सवयी मुळे ताब्यां न नेल्या प्रेशर येत नसेल. *wink*

In reply to by स्वप्नज

शौचालतही तांब्या तंब्रेल लागेलच की. न्हाइतय फव्वारा किंवा कागदी बोळे ठेवायला हवेत

शिव शिव ! 'जे न देखे रवी' ते आम्ही का बरे वाचतो ?

चर्चा आणि कवितेचा संबंध यावर पीएचडी होऊ शकेल.....गरजवंतांनी विचार करावा

In reply to by सूड

रावजी अवं नवं पाहुणा हाय जी....... काहि महिन्यांपुर्वी ज्या एकोणीस वर्षीय मुलाने गोंधळ घातला तोच मी .. .....शब्दानुज.....

In reply to by जेपी

नेमके कशाच्या आडुन??? कवितेच्या प्रतिक्रियेच्या इतर मुळात 'ही' प्रक्रीयाच आडुन आडुन करण्याची असल्याने संभ्रम आहे......

In reply to by शब्दानुज

रावजी अवं नवं पाहुणा हाय जी....... काहि महिन्यांपुर्वी ज्या एकोणीस वर्षीय मुलाने गोंधळ घातला तोच मी .. .....शब्दानुज..... याच्या आडुन........

In reply to by जेपी

काही विषेश नाही फक्त नवा भिडु लिंबुटींबु असल्याचे कळावे आणि लोकांनी सांभाळुन घ्यावे यासाठी.... (गुप्त हेतु कुतुहलातुन जुन्या कविता परत वाचल्या जाव्यात यासाठी)

सहज "सुलभ" लिहितेल. "गुड!गुड!"

In reply to by vikramaditya

"गु!गु!"
क्याप्स लॉक चुकून ऑन होतं काय ओ ;)

In reply to by बॅटमॅन

त्यांनी कवितेत वापरलेल्या 'गुडगुड' शब्दावर एक कोटी करण्याचा एक (आता निष्फळ म्हणावा लागेल असा) प्रयत्न होता.

नमो नमो नमो स्वछता अभियान धोतर आणि तांब्या = घरात शौचालय - बाहेर करायची घाण अखेर घरात करू लागले ....कुठे आणून ठेवला महाराष्ट्र माझा....

अरे अरे मोकळ्यावर शौचास बसण्याची महान परंपरा चालवणारा अजून एका वीराला आपण कायमचे मुकलो आहोत. केवळ एक तांब्या रेल्वेगाडी खाली आला म्हणुन चार भिंतीत कोंडुन घेउन मलविसर्जन करण्याचा निर्णय घेणे केवळ भेकड पणाचे निदर्शक आहे. अरे असे हजार तांब्ये कुरबान झाले तरी बेहत्तर. उघड्यावर शौच करण्याची महान परंपरा खंडीत करण्याचे धाडसच कसे होते म्हणतो मी. कलियुग आहे हे घोर कलियुग. अशा वागण्याने आपण आपले स्वर्गातले स्थानही गमावतो याची खंत नाही वाटत कोणाला. किंबहुना चार भिंतींमधे मलविसर्जन करुन आपण या भुतलावरच नरकयातना भोगण्यास सुरुवात करतो आहोत याची कोणाला जाणिव का होत नाही? मोकळ्या जागेवर शौचास बसण्याची महान परंपरा आता इतिहास जमा होण्याच्या मागावर आहे. आठवा सिंहगड एक्सप्रेसने मुंबै ला जाताना खिडकीतुन दिसणारे ते अविस्मरणिय दृष्य. रेल्वे रुळांच्या कडेला बसणार्‍या महात्म्यांचे दर्शन सकाळी सकाळी व्हावे आणि दिवस चांगला जावा या उद्देशाने अनेक जण रोज पुणे मुंबई अपडाउन करतात. स्वतःला पुरोगामी म्हणवून घेण्यासाठी सरकारही या परंपरेची मुस्कुटदाबी करण्यास प्रोत्साहन देत आहे. काय तर म्हणे घरात शौचालय नसेल तर निवडणुकीस उभे रहाता येणार नाही. मी थुंकतो अशा निवडणुकीवर जी असल्या अनैसर्गिक अटींवर आधारीत असेल. एखाद्याच्या नैसर्गिक अधिकारांची गळचेपी करणारे नियम करायचे आणि मग आमच्या देशाला एक महान लोकशाही परंपरा आहे असे मिरवायचे हे परस्परविरोधी नाही का? निसर्गाचे दान निसर्गाला परत देण्यासाठी निसर्गात बसण्या ऐवजी आता अजून एक जण चार भिंतींच्या आत स्वतःला अक्रसून घेउन, घूसमटत, गुदमरत, दरवाजावर कोणाची थाप पडते आहे का या विचाराने भेदरत मलविसर्जन करणार. ही महान परंपरेच्या जपणूकी साठी संवर्धनासाठी मी काही सुध्दा करु शकत नाही याची, माझी मलाच फार शरम वाटते आहे. उत्तीष्ठत - जाग्रत - प्राप्यवरान्निबोधत पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

त्या विराच्या सन्मानार्थ आदरांजलीचा सोहळा आहे. तरी उपस्थिती दाखवावी..... क्रुपया आहेर आणु नये आपला तांब्या हाच खरा आहेर........ चला ऊठा....तांब्या चळवळ चालु करुया

In reply to by शब्दानुज

चला ऊठा....तांब्या चळवळ चालु करुया
तांब्याचे अधिष्ठान असलेली चळवळ चालू करावी लागत नाही. निसर्गकृपेने ते काम आपोआप होते.

In reply to by शब्दानुज

स्थळ सांगायचे राहिले हगणदारी'युक्त" गाव शिश्याची काटेवाडी

गाड्या बंद पडल्यावर, अशा रुळांमधून चालताना अगदी, 'केकवॉक' चा आनंद मिळायचा.

हाफशेंचुरी केल्यानिमीत्त श्री.बॅटमॅन आणी धागाकर्ते श्री.शब्दानुज यांचा सत्कार एक एक धोतर आणी तांब्या देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-सगळ्या संघटनेचे अध्यक्ष जेपी आणी तमाम कार्यकर्ते

In reply to by प्रसाद गोडबोले

हस्तांय कांय? अवघडलेल्या अवस्थेत वरील दोहोंचे महत्त्व कळेल हो, नायतर असे कळायचे नाही. तस्मात अशा सत्कारात शाल आणि श्रीफळाऐवजी शाल आणि श्रीपात्र अशी जोडी सुचवतो. =))

In reply to by बॅटमॅन

इतक्या लवकर इतके 'अभूतपुर्व' यश मिळेल असे वाटले नव्हते....... 'त्या " सत्काराबद्दल मी 'आजन्म उपक् त(टाइप करता येइना हो तो शब्द) झालो....... या लिंबुटींबुला सामील केल्याबद्दल मी पुन्हा आभारी आहे

अर्धशतकोत्तर वाटचालीनिमित्त हबिणंदन व शतकासाठी शुभेच्छा... स्वगत-च्या मारी, 'धोतर,तांब्या आणि ५०+ प्रतिसाद'??? कसा मेळ लावायचा याचा?

ट्रॅककडे जाताना तांब्या लपवु नये. (नवी म्हण)

ज्यांच्या घराजवळ ट्रैकच नाही त्यांना उपरती कधी होणार ?शौचालय बांधण्यासाठी सबसिडी किती मिळाली ?शौचालय ज्याचे घरी लक्ष्मी तेथे वास करी चे जनक कोण ?

एका गोष्टत कुणीच लक्ष घातले नाही ..इथे रेल्वे प्रशासनावही ताशेरे ओढले आहेत....नेहमीचा वेळ रेल्वेने न पाळल्याने अपघात झाला असता... असो घराशेजारी रुळ असल्यास लोक सुधारतिल का हो????मुद्दाम असे तांबे उडवायचे पहाटे...