एलिझाबेथ एकादशी
परवाच 'एलिझाबेथ एकादशी' पाहिला, थोडयाफार त्रुटी असल्या तरी एकूण चांगला आहे. कर्जामुळे वडिलांनी बनवलेली सायकल 'एलिझाबेथ' विकावी लागणार आणि तिला वाचवण्यासाठी त्या दोन्ही मुलांचे प्रयत्न, त्यातला अस्सल प्रामाणिकपणा हा चित्रपटाचा प्राण - आणि त्यात येणारे पंढरपूरच्या छोट्या गल्ल्या-बोळांचे, लहान घरांचे आणि त्यांच्या भावविश्वाचे दर्शन हा भाग मस्त जमून आला आहे. ते घर एखादे पात्रच असल्यासारखे कथेत फिट्ट बसले आहे! "आईचा हात लागतो का?" किंवा ती आज्जी, ती घर-मालकीण हे अगदी तपशीलांसकट मस्त जमलेत आणि कुठेही ओढून-ताणून आणलेले किंवा कृत्रिम संवाद वाटत नाही. छोटे-छोटे प्रसंग जसे - संत न्युटन, दाभोळकरांची हत्या आणि जादूटोणा कायद्याविषयी गैरसमज आणि ते गण्याचे शिव्या देणे, आणि तसेच त्याच्या वडिलांचे शिव्या देणे, रक्त तपासणीच्या वेळेस कुठे उच्चारही न होता त्यांना कशाची काळजी वाटते हे आपल्याला कळतं! 'डेंजर वस्तीतून' कॉट आणण्याचा प्रसंग किंवा शेवटी एकादशीला "यंदा 'आमचा' धंदा चांगला झाला" हे त्या गणिकेने म्हणणे - हे खास परेश मोकाशीचे स्पेशल टच. अगदी सहज आणि सुचकपणे (subtly) तो बरेच काही सुचवून जातो.
नाही म्हणायला सायकल 'एलिझाबेथ' आणि ज्ञानेशचे नाते अजून फुलवायला हवे होते, आणि एलिझाबेथ फारच नवीन (न वापरलेली) दिसते, अगदी रोज स्वच्छ केली तरी सायकलचे टायर झिजतातच!:P आणि उंचावलेल्या अपेक्षांच्या तुलनेत शेवट अगदी सपाट वाटतो. पण तरीही एकूण मस्त जमला आहे - थोडा वेगळा विषय, कोणीही नावाजलेला/ली अभिनेता/अभिनेत्री नसतांनाही छान जमून आलेला सगळ्याच मुलांचा अभिनय, त्यांची ती उर्जा आणि धमाल, तसेच अगदी अस्स्ल वाटणार्या आई, आज्जी आणि व्यापारी हेही खासच! चित्रपटातला हायलाईट आहे मुलांचे पैसे कमविण्याचे प्रयत्न, त्यांचा तो बांगड्या विकायचा छोटा स्टॉल, आणि ती सगळी धावपळ बाहेर पडल्यावरही लक्षात राहते!(रेटींगः ३.५/५)
हो! ह्यात काही काडीमात्रही आक्षेपार्ह नाही. देवांचा, संतांचा किंवा न्युटनचा कसलाही अपमान होत नाही! कशाला विरोध आहे नक्की?? कशानेही भावना दुखावतात का?
याद्या
7264
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
छान परिक्षण !!!
+१
In reply to छान परिक्षण !!! by सतिश गावडे
वारकरी पंथातील "वारकर्यांच्या
In reply to छान परिक्षण !!! by सतिश गावडे
चित्रपट परिचय त्रोटक वाटला पण
त्रोटक झालाय खरा!
In reply to चित्रपट परिचय त्रोटक वाटला पण by प्रचेतस
चित्रपट परिक्षण असेच त्रोटक
In reply to त्रोटक झालाय खरा! by मनिष
मी पाहीन ब्वा....
In reply to चित्रपट परिचय त्रोटक वाटला पण by प्रचेतस
चित्रपट पाहिला .....
अनावश्यक उल्लेख..
म्हणने बरोबर आहे, परंतु
In reply to अनावश्यक उल्लेख.. by प्रभाकर पेठकर
आता एडवर्ड शिमगा येईल
वा
In reply to आता एडवर्ड शिमगा येईल by कंजूस
कशाला विरोध आहे नक्की??
...
...
प्रत्येक
In reply to ... by आशु जोग
चांगलं लिहिलंय
परीक्षण त्रोटक आहे, पण सिनेमा
एकदम मान्य!
In reply to परीक्षण त्रोटक आहे, पण सिनेमा by सुहास झेले
छान परिक्षण !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floodsसामान्य सिनेमा आहे. मराठी
तुमच्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत
In reply to सामान्य सिनेमा आहे. मराठी by प्रसाद१९७१
कैच्याकै
In reply to तुमच्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत by कपिलमुनी
तुमचा पक्षाच्या
In reply to कैच्याकै by अनुप ढेरे
सिनेमा हा केव्हडा मोठा
In reply to तुमचा पक्षाच्या by कपिलमुनी
काय हवे ते सांगा
In reply to सिनेमा हा केव्हडा मोठा by प्रसाद१९७१
उत्तम आहे
कुणाच्या भावना कशाने
पिक्चर चांगला आहे हे ऐकतोच
चित्रपट नाही आवडला
तितका नाही भावला
कालच एलिझाबेथ एकादशी पाहिला !