Skip to main content

स्मार्ट फोन आणि त्यांचे स्मार्ट नखरे

लेखक स न वि वि यांनी बुधवार, 19/11/2014 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता सगळिकडे samsung phone चा सुळ्सुळट झाला आहे . मला तुम्ही कोणते फोने वापरता आणि त्यात काही irritating गोष्टी अनुभवताय का हे माही करायचं . माझा Samsung galaxy grand २ आहे. घेतल्या पासून जेव्हा software update चे notification आले तेव्हा लगेच WI - FI zone मधेय जाऊन update केले आणि तेव्हा पासून फोन चे नखरे चालू झाले. Android मधेय म्हणे virus पकडत नाही … खरे आहे का हे? कारण माझा फोन update केल्यावरच नखरे करायला लागला आहे. नखरे काहीसे असे…. १. अचानक बंद होतो २. गडद निळा रंग होतो स्क्रीन चा ३. अचानक mute मोड मधेय जातो ४. फोन घेताना hang होतो. ५. wallpaper वेगवेगळा दिस्तो. (म्हणजे जर मी home आणि lock स्क्रीन साठी चे option select करून एखादा wallpaper ठेवला तरी home आणि lock स्क्रीनला वेगवेगळा च दिसतो . तुम्ही कोणते फोन वापरता आणि त्यात काय काय गुण-दोष आहेत आणि त्या वर काय उपाय केले आहेत हे माहित करून घ्यायचे आहे.

वाचने 34688
प्रतिक्रिया 126

प्रतिक्रिया

In reply to by पिशी अबोली

५व्या मजल्यावरून लिफ्टच्या गॅपमधून उडी मारली.. पण बॅक कव्हर ला २ स्क्रॅच सोडल्यास अजूनतरी काही प्रॉब्लेम दिसलेला नाही.. बाब्बो... अरे हा फोन काय अंबुजा सिमेंट वापरु बनवलाय काय ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }

शेवटी सर्व आपल्या वापरण्यावर अवलंबून असते.

आजचा सुविचार: स्मार्ट फोनमुळे वेळेचा अपव्यय होतो. स्मार्ट फोनचा वापर टाळा, वेळेचे महत्व पाळा. - सं. पाषाणभेद (मृ. श.के. १५१५)

माझ्याकडे सॅमसंग गॅलेक्सी एस ५ आहे. त्याच्यावर मी एकूण ३६० च्या अप्प्लीकेशन्स डाउनलोड केली आहेत. तरी ना बॅटरीचा प्रॉब्लेम, ना स्पीडचा प्रोब्लेम, ना नेविगेशनचा (२-पेज ओल्नी). पण हे काहीतरी कौतुकास्पद आहे असं ऐकायला , मानायला कोणी नाही. असो. ;)

स्वस्तात मस्त. जुलै २०१४ मध्ये स्मार्टफोन नामे भूत घेतले (निरिच्छेने). सुरुवातीला भयंकर त्रास झाला. काँटॅक्ट्स घेतांना, वाचवतांना...अर्रर्रर्रर्र...काही विचारू नका. एक तर मला गेम्स, अ‍ॅप्स वगैरे मध्ये काही खास रस नाही. शिवाय कॉल झाला की फोन बंद करण्यासाठीची लाल पट्टी यायचीच नाही. स्क्रीन ऑन करून कॉल कट करावा लागायचा. मग बदलून घेतला. पण त्यातही हा प्रॉब्लेम आहेच. आता स्क्रीन ऑन करून फोन बंद करण्याची सवय झालीये. अ‍ॅप्स नसल्याने लोकं अस्पृश्य समजतात ते वेगळे. उप्दते वगैरेच्या फंदात अजून तरी पडलेलो नाही. :-) असलं काही आलं की मी नकार कळवतो. गरजा खूप कमी असल्याने मोटो ई सात हजारात बेष्ट वाटला. खूप हेवी वापर नसल्याने फोन ओक्के सुरू आहे (फोन बंद करण्याचा प्रॉब्लेम सोडून). बाकी आपल्या काही फार अपेक्षादेखील नाहीत म्हणा. फोन करणे, घेणे, कधीमधी एखादा एसेमेस, थोडीफार गाणी ऐकणे, रेडिओ ऐकणे...बस्स्स...

xiaomi redmi 1s मी स्वतः मोबाईल वापरत नाही पण भार्येनं हट्ट धरलायं. फ्लिपकार्टवर २४ तारखेला सेल आहे आणि तो ४/५ सेकंदात संपतो. काही जणांकडे, फोन एक्स्ट्रा झाल्यानं ६,२०० ते ७,००० अशा विविध किंमतीला सध्या बाजारात उपलब्ध आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

डेटा चोरीबद्दलच्या या बातम्या वाचता भारतात कोणीच वापरू नये. http://gadgets.ndtv.com/mobiles/news/indian-air-force-reportedly-issues… http://trak.in/tags/business/2014/11/03/xiaomi-security-related-investi…

In reply to by संजय क्षीरसागर

डेटा म्हणजे काही मिलिटरी सिक्रेट्स नव्हेत. अँड्रॉईड फोनवर २४/७ गुगलवर लॉग्ड इन रहावे लागते. त्याशिवाय फोन चालत नाही. शिओमीवाले त्यानी बनवलेल्या सगळ्या फोनमधील असला गूगलचा, आणि फोन नंबरांचा डेटा गोळा करत आहेत आणि दुसरी बातमी नीट वाचलीत तर त्यात म्हटल्याप्रमाणे ते कोणाच्याही फोनवरून कसलेही कॉल्स करू शकतील. हाँगकाँगमधल्या एकाच्या फोनवरोन प्रचंड प्रमाणात डेटा बाहेर पाठवला जात होता अशी तक्रार आहे. त्याला डेटा चार्जेस तर लागलेच असणार. शिवाय चीनमधून मार्केटिंग कॉल्स येत होते असंही म्हटलं आहे. बघा ब्वा.

In reply to by संजय क्षीरसागर

अँड्रॉईडपेक्षा विंडोज OS वाले फोन वापरायला सोपे आहेत का? हो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }

In reply to by पैसा

तिला काय वाट्टेल ते झालं तरी 8 MP कॅमेरा हवायं. Wnidows OS + 8 MP Camera मिळाला की तीचं काम झालं! बाकी त्यात इतर कोणतीही अ‍ॅप्स (वॉट्स अ‍ॅप) सोडून नसली तरी चालेल!

In reply to by संजय क्षीरसागर

या दोन लिंक्स बघा. http://www.misalpav.com/node/29100 http://www.misalpav.com/node/28688 या लिंकवर तुम्हाला पाहिजे तसे ८ मेग्यापिक्सेलवाले अ‍ॅण्ड्रॉईड आणि विंडोज फोन किंमतीप्रमाणे सॉर्ट केलेले आहेत. हवा तो घ्या!

In reply to by संजय क्षीरसागर

आणि मुलीला मेगापिक्षेल चा बाऊ करू नकोस असं समजवायचा प्रयत्न करा जमल्यास. प्रत्यक्ष फोटो काढून बघा मग कळेल. लुमिया चा कॅमेरा खलास असतो. अगदी बेसिक मॉडेल पासून.

In reply to by वेल्लाभट

मोबाईल फोनचा कॅमेरा आपण खरे तर फार वापरत नाही. जास्त मेगॅपिक्सेल्स म्हणजे जास्त मोठ्या आकाराचे फोटो. ते आपण कधी प्रिंट करतो? शिवाय ५/७ हजारात बरे डिजिटल कॅमेरे मिळतात. त्यामुळे मी तर मोबाईलचा कॅमेरा किती मेग्यापिक्सेल आहे हे बघत पण नाही. बॅटरी कपॅसिटी आणि इंटरनेटवरचे रिव्ह्यु सगळ्यात महत्त्वाचे.

In reply to by पैसा

तिला फोटो चांगलेच आले पाहिजेत आणि झालंच तर HD Recording पण हवंय (आणि ते बहुदा) वॉट्स अ‍ॅपवर अपलोड करायचंय. तिला बाकी कशाशी काही घेणंदेणं नाही. घरी Cannon-550 DSLR आहे पण स्त्री हट्टापुढे इलाज नाही!

In reply to by संजय क्षीरसागर

संक्षी सर विंडोज च्या फोन ( नोकिया ल्युमिया वगैरे) वर व्हाटस एप चालत नाही बहुधा. त्यासाठी तुम्हाला अन्ड्रोईड असलेला फोन घ्यावा लागेल. अगोदर खात्री करून घ्या

In reply to by संजय क्षीरसागर

बजेट चा प्रॉब्लेम नसेल तर ल्युमिआ १०२० घ्या. त्या कॅमेर्‍याला फोनची सगळी फिचर्स आहेत. परत लै भारी बॅटरी बॅकअप.

In reply to by संजय क्षीरसागर

हा खरं तर वैयक्तिक मुद्दा असू शकतो, पण मी विंडोज वापरतो, व अँड्रॉईडही वापरलेत (स्वत:चे नाही) तेंव्हा माझ्या मते हो १०१ टक्के

In reply to by पैसा

अँड्रॉईड फोनवर २४/७ गुगलवर लॉग्ड इन रहावे लागते. त्याशिवाय फोन चालत नाही.
साफ चूक. तुम्ही फोन सेट-अप करताना गूगल अकाउंटची माहिती विचारली जाते पण ते स्किप करून फोन वापरता येतो. अर्थात तुम्हाला गूगल प्ले स्टोअर मधून काही अ‍ॅप्स डाऊनलोड करायची असल्यास गूगल अकाउंट लागतेच.

In reply to by पैसा

पैसा ताई अँड्रॉईड फोनवर २४/७ गुगलवर लॉग्ड इन रहावे लागत नाही. जेंव्हा पाहिजे तेंव्हा डेटा प्लान ऑन करा आणि नको असेल तर ऑफ करा. माझ्या कडे कार्बन चा टायट्यानीयम एस ५ + गेल्या ८ महिन्यापासून आहे. व्यवस्थित चालू आहे. दिवसात(रात्री) एकदा चार्ज करावा लागतो. अगोदर बायकोसाठी घेतला होता पण तो बिघडला बरीच आटा आटी करून बदलून घेतला त्यानंतर आता तो माझ्याकडे आहे आणि तिने samsung galaxy grand २ घेतला आहे. आमच्या घरीसार्वांचे android फोनच आहेत. ( माझा सर्वात स्वस्तातील आहे) फोन बद्दल एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते ती म्हणजे दुसर्याला स्थळ सुचवण्यासारखे आहे. ते त्याला लाभेल कि नाही हे सांगता येत नाही तसेच तुम्ही सुचवलेला फोन खराब निघाला तर फुकटच्या शिव्या खाव्या लागतात. त्यामुळे मी कुणालाही स्थळ किंवा फोन सुचवत नाही.

In reply to by सुबोध खरे

लॉग्ड इन नसाल तर बर्‍याच सुविधा वापरता येणार नाहीत. जीमेल आणि चॅट बंद करून फक्त मॅप्स आणि क्रोम चालू ठेवता येते का? मला वाटत नाही. चालू ठेवता असेल तर कोणीतरी उपाय सांगा. डाटा बंद केला तर स्मार्टफोन आणि साधा ६०० रुपयाचा फोन यात काय फारसा फरक राहिला नाही ना! मी म्हणतेय ते डेटा बंद करण्याबद्दल नाहीये. नवा फोन ऑन केला की तो ताबडतोब गूगल लॉग इन स्क्रीनला जातो. नंतर गूगलचीच बरीचशी अ‍ॅप्स वापरत रहावं लागतं आणि ती बॅकग्राउंडला रन होत रहातात आणि रोज सकाळी उठून चहा प्यायच्या आधी फोन चार्जिंगला लावावा लागतो त्याचा वैताग आहे. ही जीमेल, गूगल चॅट, गुगल म्युझिक वगैरे सिस्टिम अ‍ॅप्स नको असतील तर फोन रूट करावा लागतो आणि मग वॉरंटी जाते. विंडोज फोनवर वॉट्स अ‍ॅप चालते. माझ्याकडे चालते आहे. कधी कधी मेसेजेस एकदम बरेच येतात. पण अ‍ॅप चालू आहे.

In reply to by पैसा

गूगल मॅप्सची डायरेक्शन्स फ्रॉम होम वगैरे फीचर्स चालणार नाहीत (भारतात ही फीचर्स जी मुख्यतः गूगल नाउचा भाग आहेत ती गूगलने सुरू केली आहेत का मला कल्पना नाही).

In reply to by लंबूटांग

माहितीसाठी धन्यवाद!

In reply to by संजय क्षीरसागर

कशाला चायनाच्या नादी लागता? त्यापेक्शा भारी फोन त्याच किमतीला उपलब्ध आहेत. मोटो ई चा वरच उल्लेख झाला. बर, कार्यालयात एकाने घेतला आहे हा झिओमी का काय ते. गरम होतो सॉलिड. डोकेदुखी सुरू झालीय त्याला म्हणाला. खरी खुरी हं, 'त्रास' या अर्थी नाही. तेंव्हा हे सगळं ऐकत असता नकाच घेऊ असा सल्ला देईन. मायक्रोसॉफ्ट कॅनव्हास युनाईट २ मस्त आहे असं वाचून ऐकून आहे. किंवा इन्टेक्स अ‍ॅक्वा कर्व्ह चांगला आहे. मी वापरून बघितलाय.

In reply to by वेल्लाभट

मोटो ई माझ्या मुलीचा आहे. फोन चांगला आहे. पण त्याच्यावर कॉलेज बॅगेतल्या वह्या पडल्या आणि डिस्प्ले फुटला. त्याची किंमत ४००० सांगत होते. मी भांडून १८०० मधे मिळवला. मायक्रोमॅक्स युनाईट२ माझ्या मुलाकडे आहे. मायक्रोमॅक्स फोन चांगल्या क्वालिटीचे नसतात असे हुच्च लोक म्हणतात. मात्र हा फोन चांगलाच दणकट आणि रफ-टफ निघाला आहे.

आक्ख्या जगात बर्‍यापैकी माहिती 'नाही' असं काहीतरी आहे ब्वा! आज मी किमान साखर तरी खावी म्हणतो.

In reply to by प्यारे१

त्याच्यापुढे इतर गोष्टी यथावकाश माहिती होतात! त्याचं विषेश काही वाटत नाही.

झेनफोन ४ (४५०) ४.५" १़ जीबी/८जीबी, ८मेपि, बॅटरी ओके, स्क्रीन ब्राईटनेस ३०-४०% केला तर ऑफिसात आणि घरात काहीच प्रॉब्लेम न येता बॅटरी आणखी जास्त चालते. सध्या दिवसभर ३जी डाटा चालू ठेवूनही १२-१४ तास आरामात जातो. (माझे फोन कॉल दिवसभर चालू असतात. दिवसभरात ६०-९० मिनिटे कॉल) @७००० (+कॉर्निंग गोरिला ग्लास३ झक्कास आहे. आज ३ महिन्यानंतर नुसती स्क्रीन पुसली, तरी नव्यासारखा दिसतो)

मायक्रोम्याक्स किंवा झोलो चे विंडोज फोन वापरलेत काय कोणी ? कसे आहेत ? विंडोज आणी करवंद यापैकी कोणता मोबाईल घ्यावा यावर खुप डोके खाजवले पण अजून विचार पक्का होत नाही. दोन सिमवाले विंडोज फोन्सचे (लुमिया) फिचर चांगले आहेत पण स्क्रीन साईज छोटी आहे. (४.५ ते ४.७" पर्यंत). करवंदाचा झेड ३ चांगला वाटतो आहे आहे पण एकच सिम वापरता येते. काय करावे काही कळत नाही.

बरेच दिवस नोटीफिकेशन येत असूनही अँड्रॉइडचा अपडेट घेतला नाही -- कारण केवळ आळशीपणा. पण आता बर्‍याच लोकांना झालेला त्रास बघून जाणवतं की आळशीपणामुळे फायदाच झाला - बराच त्रास वाचला.

karbonn a18+ वापरत आहे, १ वर्ष झाले . ४-५ वेळेस आपटला आहे आत्तापर्यंत . प्रत्येक वेळेस आपटल्यावर बंद पडला, नेहमी पडल्यावर भीती वाटायची की आता हा कधीच चालू होणार नाही . पण हा मात्र switch on केल्यावर पुन्हा पहिल्यासारखा सुरळीत चालू झाला . अजून काही प्राॅब्लेम नाही .

सोनीचा एक्स्पेरिया टी टु अल्ट्रा आहे. अजुनपर्यंत काही अडचण नाही. ;)

आजकाल स्मार्टफोन विश्वात तीन महिन्यात फोन, त्याचे स्पेक्स ,त्याची OS जुने वाटू लागतात. त्यासाठी सात आठ हजारात फ्लॅगशीप फोनची स्पेक्स देणारे चिक्कार फोन बाजारात आहेत, असे फोन डाऊनमार्केट नसतात ,यात लेटेस्ट OS ,पाच इंची डीस्पले ,1GB रॅम येते. असे फोन घ्यावेत, दोन वर्षांनी बदलावे. जास्त पैसे गेल्याचे दुखः नाही. चायना कंपनी खराब असतात असे काही नाही. लेनोवो, झायोमी स्टँण्डर्ड आहेत. सगळ्या कंपन्या चीन तैवानातुन फोन बनवुन घेतात व फक्त ब्रँण्डनेमखाली विकतात. अगदी apple iphone ही तैवानची एक कंपनी बनवते.

मागच्याच विकमधे आयफोन ६ प्लस घेतला. लाइटवेट आणि फास्ट आहे. बरेचसे नविन अ‍ॅप्स आलेत फोन बरोबर. लुक पण भारी आहे. फक्त हा फोन ठेवता येइल असा खिसा असलेली पॅन्ट शोधायची आहे :)

नोकिआ फोन(माझा साधाच आहे)ची एक मजा म्हणजे ५मेगापिक्सेलचे फोटो २एमबी एवढे कंप्रेस होऊन मेमरीत जातात. हेच अपलोड करताना नोकिआ ब्राउजर त्याला आणखी ५०ते७०केबी एवढा लहान करतो. तरीही मोठ्या स्क्रीनवर चांगले दिसतात. परवाच्या कटट्याचे लुमिआतून ब्लूटूथने घेतलेले २एमबीचे(6.7MB) अपलोड करतांना २०केबी झाले !इतके भन्नाट सॉफ्टवेर आहे.

मझ्या बर्‍याच मित्रांकडे सॅमसंग फोन आहे.माझ्यामते सॅमसंग फोनला हा प्रॉब्लेमच आहे तरी तुम्ही फोनचा ब्रॅन्ड बद्लुन पाहा.

सेल फोन घेण्यासाठी सर्वांनी केलेल्या मनःपूर्वक मदतीबद्दल आभार. . सगळ्या उहापोहानंतर अनेक उलट-सुलट मतप्रवाहातून मार्ग काढत शेवटी Redmi 1S घेतला (म्हणजे FilpKart वर नेमकं पावणे दोन वाजता लॉग-इन होऊन (नशिबानं) मिळाला!). फोन कार्टमधे आल्यावर पत्नीनं (झंजावाती) वेटो वापरला, पण संध्याकाळी सहाच्या आत पेमंट करायचं होतं, त्यामुळे `तू दोन-तीन दिवस वापरुन पाहा, नाही पटला तर मी कुणाला तरी गिफ्ट देईन' या बोलीवर ती तयार झाली. दरम्यानच्या काळात, OS, Battery, Apps, Android Vs Windows, Ram, Internal Memory, Camera, Mega Pixel, Swipe Key Board, Processors, Settings, Devanagari Script, Whats App असल्या अगम्य गोष्टींची भारंभार माहिती (स्वतःला नको असतांना) झाली. आता मात्र तो फोन तिचा जिवलग झालायं. हे सांगण्याचा उद्देश इतकाच की (स्वतः जरी सेल फोन वापरणार नसलो तरी); तो फोन तुम्ही कंप्युटरसारखा वापरणार नसलात तर, दिलेल्या किंमतीला (Rs 5,999) एकदम बेस्ट आहे. कॅमेरा अती उत्तम आहे, बॅटरी ड्रेन होणं किंवा तापणं वगैरे काहीही होत नाही, सर्व अप्लिकेशन्स फक्त दोन स्क्रीन्सवर आणि आयकॉन बेस्ड असल्यानं वापरायला अत्यंत सहज आहे, इंटरफेस एकदम सुरेख आहे. थोडक्यात ज्यांना गेम्स किंवा इतर काही भारी अ‍ॅप्लिकेशन्ससाठी न वापरता, एक फोन विथ ऑलमोस्ट ऑल कन्विनीयन्सेस (मराठी टायपींग धरुन) असा डिवाइस वापरायचा आहे त्यांना इटज अ लव्हली बाय.