✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्मार्ट फोन आणि त्यांचे स्मार्ट नखरे

स
स न वि वि यांनी
Wed, 11/19/2014 - 13:08  ·  लेख
लेख
आत्ता सगळिकडे samsung phone चा सुळ्सुळट झाला आहे . मला तुम्ही कोणते फोने वापरता आणि त्यात काही irritating गोष्टी अनुभवताय का हे माही करायचं . माझा Samsung galaxy grand २ आहे. घेतल्या पासून जेव्हा software update चे notification आले तेव्हा लगेच WI - FI zone मधेय जाऊन update केले आणि तेव्हा पासून फोन चे नखरे चालू झाले. Android मधेय म्हणे virus पकडत नाही … खरे आहे का हे? कारण माझा फोन update केल्यावरच नखरे करायला लागला आहे. नखरे काहीसे असे…. १. अचानक बंद होतो २. गडद निळा रंग होतो स्क्रीन चा ३. अचानक mute मोड मधेय जातो ४. फोन घेताना hang होतो. ५. wallpaper वेगवेगळा दिस्तो. (म्हणजे जर मी home आणि lock स्क्रीन साठी चे option select करून एखादा wallpaper ठेवला तरी home आणि lock स्क्रीनला वेगवेगळा च दिसतो . तुम्ही कोणते फोन वापरता आणि त्यात काय काय गुण-दोष आहेत आणि त्या वर काय उपाय केले आहेत हे माहित करून घ्यायचे आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34233 वाचन

💬 प्रतिसाद (126)

प्रतिक्रिया

आमच्या नव्या lumia याने

जेपी
Wed, 11/19/2014 - 13:14 नवीन
आमच्या नव्या lumia याने नुकताच नाल्यात जिव दिला. काय जास्त नखरे नव्हते.धाग्यानिमीत्त तो आठवला आणी डोळे पाणावले.
  • Log in or register to post comments

नुकताच नाल्यात जिव दिला.

स न वि वि
Wed, 11/19/2014 - 14:12 नवीन
नुकताच नाल्यात जिव दिला. *LOL* *LOL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

+१

वेल्लाभट
Wed, 11/19/2014 - 14:24 नवीन
हसायला आलेलं आहे हे वाचून ! लोळ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स न वि वि

ड्वाळे पाणावले..

योगी९००
Wed, 11/19/2014 - 14:28 नवीन
आमच्या नव्या lumia याने नुकताच नाल्यात जिव दिला. ड्वाळे पाणावले....(वाचून की फक्त मोबाईलने जीव दिला...मालकाला नाही घेतले बरोबर.....)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

ह.घ्या. लिवायचे राहीले..

योगी९००
गुरुवार, 11/20/2014 - 09:11 नवीन
ह.घ्या. लिवायचे राहीले....गैरसमज करून घेऊ नका..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

आमच्या नव्या lumia याने नुकताच नाल्यात जिव दिला.

धर्मराजमुटके
Wed, 11/19/2014 - 18:01 नवीन
आमच्या नव्या lumia याने नुकताच नाल्यात जिव दिला.
तुम्ही लेझीम तर खेळत नव्हता ना ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

लेझिम प्रकरण कळाला नाय

जेपी
Wed, 11/19/2014 - 18:06 नवीन
लेझिम प्रकरण कळाला नाय.जमल्यास व्यनी करुन सांगावा. नाला आमच्या व्यवसायाचा भाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

तुला कल्ला की मला पनं कलव

टवाळ कार्टा
Wed, 11/19/2014 - 20:38 नवीन
तुला कल्ला की मला पनं कलव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

लेझीम खेळणे

धर्मराजमुटके
Wed, 11/19/2014 - 20:53 नवीन
जास्त दारु पिऊन झिंगलेला व्यक्ती दोन पाऊल पुढे तर एक पाऊल मागे येतो. त्याची चाल लेझीम खेळल्याप्रमाणेच दिसते. तसेच पुर्वी दारु पिऊन गटारे / नाल्यात पडणार्‍या व्यक्तींचे प्रमाण लक्षणीय होते. (आताचे माहित नाही.) अवांतर : प्रतिसाद केवळ मजेमजेत दिलेला आहे. कोणताही आरोप करण्याचा हेतू नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

(No subject)

टवाळ कार्टा
Wed, 11/19/2014 - 21:01 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

आमच्या lumia ने जीव दिलेला

जेपी
Wed, 11/19/2014 - 21:06 नवीन
आमच्या lumia ने जीव दिलेला नाला वेगळा होता. एक जेसीबीला त्याने गिळायचा प्रयत्न केला.पोकलेन पण आर्धि गिळली होती. गडबडीत वरच्या खिशातील मोबल्याने उडी मारली. दोष आमचा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

कोणताही फोन नखरे करू लागला की

कंजूस
Wed, 11/19/2014 - 14:15 नवीन
कोणताही फोन नखरे करू लागला की त्याअगोदरच्या दोन एक दिवसात काय काय केले हे पाहावे. त्यातली कोणती गोष्ट आतापर्यँत कधी केली नव्हती तिथेच पाणी मुरतंय हे ओळखावे. सर्दी झाली की मी काल पावसात भिजलो/आइसक्रीम फार खाल्ले/जुनी पुस्तके झटकली इ॰ आठवतो तसे. तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे ओएस अपडेट नीट झाली नाही आहे/थोडी RAM ब्लॉक झाली आहे. माझ्या मते जेलिबिन नंतर ओएसच्या आर्किटेक्चरमध्ये सुधारणा झाली नाहीये फक्त वरवरचे दिखाऊ(cosmetics) अपडेटस आलेले आहेत. जुनीच ओएस ठेवली असती तरी चालले असते पण आता परतही जाता येणे अशक्य आहे.आता एकेक ओझे कमी करा. १)क्लिअर ऑल पासवर्डझ ,कुकिज २)सिक्यु लॉक ३)डिलिट प्लेलिस्ट ४)रेडी इमेल बॉक्स आणि नोटिफिकेशन्स बंद करा. ५)दोन दिवसांत ब्लुटुथने घेतलेली फाईल काढा. करून पाहा सुधारणा होते का?
  • Log in or register to post comments

Android मधेय म्हणे virus पकडत

वेल्लाभट
Wed, 11/19/2014 - 14:22 नवीन
Android मधेय म्हणे virus पकडत नाही … खरे आहे का हे?
साफ चूक. उलट त्यात जास्त धोका असतो व्हायरस चा. तुलनेत विंडोज फोनला व्हायरसचा धोका खूप कमी असतो. मी विंडोज वापरतो. लुमिया. नखरे आहेत त्याचेही. १) फोन वाजला की टच ऑपरेट होत नाही मग पटकन स्क्रीन ऑफ ऑन केला की फोन उचलता येतो. २) क्वचित हँग होतो. आत्तापर्यंत एका वर्षात १०-१५ वेळा झालेला आहे. ३) माझा फोन मध्यंतरी असंख्य वेळा रिबूट होत असे. काही कळेना. बॅटरीला पॅकिंग लावलं, की बॅटरी लूज बसत असावी इत्यादी. पण दोन महिने हे सहन केल्यावर, 'तरी मी म्हणत होते सॅमसंग घे', 'बघितलंस, लुमिया! सध्या अँड्रॉईडचंच मार्केट आहे रे' असे अनेक शेरे ऐकल्यावर एक दिवस जेंव्हा बसवलेल सिलिकॉन कव्हर काढलं, तेंव्हा फोन सुसाट नीट सुरू राहिला. एक दिवस, दोन दिवस, एक आठवडा झाल्यावर पुन्हा कव्हर घातलं, फक्त बघण्यासाठी की त्यामुळेच तर....?... आणि काय विचारता? पुन्हा रिबूट. लोचा कव्हरच्या डिजाईन मधे होता ज्यामुळे पॉवर ऑन चं बटण अर्धवट कसंतरी दाबलं जायचं आणि रिबूट व्हायचा फोन. मग कायमचं काढून टाकलं सिलिकॉन कव्हर. निष्कर्षः चटकन निष्कर्ष काढू नये, आणि लुमिया/विंडोज फोन उत्तम आहे. या व्यतिरिक्त लुमियाने फारसा त्रास दिलेला नाही. पूर्णपणे समाधानी आहे मी विंडोज फोनने.
आमच्या नव्या lumia याने नुकताच नाल्यात जिव दिला
अरे अरे. माझ्या फोन ने दोन आठवड्यापूर्वी थोबाड फोडून घेतलं. खिशातून बसमधे पडला खाली. फुटला स्क्रीन. नंबर ३ मधे म्हटल्याप्रमाणे सिलिकॉन कव्हर काढलं होतं ना... आता नवा बसवला. लोकल दुकानातून. १५०० मधे.
  • Log in or register to post comments

सहमत...लुमिया लै भारी.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 11/19/2014 - 23:57 नवीन
सहमत...लुमिया लै भारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

आता नवा बसवला. लोकल दुकानातून

शिद
Sat, 11/22/2014 - 10:23 नवीन
आता नवा बसवला. लोकल दुकानातून. १५०० मधे.
हे कुठं दुरुस्त करुन घेतलं साहेब? मला पण माझ्या सॅमसंग एस३ मिनीची स्क्रीन ग्लास बदलायची आहे. चौकशी केल्यावर बरेच जणं म्हणाले की फक्त ग्लास बदलून देता येणार नाही तर टच-स्क्रीन सकट बदलून घ्यावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

ठाण्यात प्रभात टॉकिज च्या

वेल्लाभट
Mon, 11/24/2014 - 13:02 नवीन
ठाण्यात प्रभात टॉकिज च्या मागच्या रस्त्यावर प्रभात (आता गोल्ड डिजिटल) च्या बाजूने बारकासा बोळ जातो त्यात तिसरं दुकान सिद्धिविनायक टेलिकॉम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

धन्यवाद.

शिद
Wed, 11/26/2014 - 08:42 नवीन
धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

हे

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 11/19/2014 - 14:43 नवीन
आमचा नॉकिया(१०५-नॉकिया) अनुभव चांगला आहे.हल्ली तर बरेचसे लोक सॅमसंगीच झाल्याने त्याचा दर्जा उत्तम असेल असा समज होता. "Android मधेय म्हणे virus पकडत नाही" मग कठीण आहे रे.तुमच्या त्या लिनक्सबद्दल असे वाचले होते. " जेव्हा software update चे notification" ही एक डोकेदुखी आहे असे माझे मत.नोटिफिकेशन पाठवणार्यांची गचांडी धरावयास हवी.
  • Log in or register to post comments

नोकिया

संचित
Wed, 11/19/2014 - 14:58 नवीन
माझ्याकडेही नोकिया आहे. सुरुवातीला बराच हंग व्ह्याचा. पण विन ८.१ ची उप्डते आल्यापासून बर आहे. क्वचित फोने घेताना टच ऑपरेट होत नाही. पण तेव्हढ सोडलं तर ठीक आहे..
  • Log in or register to post comments

पण विन ८.१ ची उप्डते

बॅटमॅन
Wed, 11/19/2014 - 18:20 नवीन
पण विन ८.१ ची उप्डते आल्यापासून बर आहे.
देवा परमेश्वरा, गमभनच्या कृपेने कायकाय वाचायला लावशील. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संचित

हहपुवा

योगी९००
Wed, 11/19/2014 - 21:23 नवीन
त्यांना अपडेट म्हणायचे आहे.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

==))

लॉरी टांगटूंगकर
Wed, 11/19/2014 - 21:54 नवीन
==))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आमचा अँड्रॉईड सोनी

विजुभाऊ
Wed, 11/19/2014 - 14:59 नवीन
आमचा अँड्रॉईड सोनी एक्ष्पीरीया १)फोन आल्यावर घेण्यासाठीचे स्लाईड बटन वापरले तरी दोन तीन रिंगा वाजतातच. २) सकाळी गजर बंद करताना जरा काही चूक झाली की गजर बंद करायचे बटन गायबच होते ते कुठेच सापडत नाही. शेवटी फोन ऑफ्फ केल्यावरच गजर बंद होतो.
  • Log in or register to post comments

आमचा सॅमसंग s2

मोहनराव
Wed, 11/19/2014 - 17:53 नवीन
आमचा सॅमसंग s2 1) बराच वेळा हॅंग होतो 2) अप्लिकेशन नेविगेट करताना स्लो होतो 3)कधीकधी अचानक रिसटार्ट होतो
  • Log in or register to post comments

सगळ्यात बेष्ट आय-फोन..!!

हाडक्या
Wed, 11/19/2014 - 18:09 नवीन
सगळ्यात बेष्ट आय-फोन..!! ढीगभर बंधने घालतो तो तुमच्यावर )खासकरून भारतीय लोकांना फार त्रास होतो त्याचा ;) ) पण प्रॉब्लेम नाय येनार कसलाच.
  • Log in or register to post comments

शामसंग ग्याल्याक्षी आहे.

रेवती
Wed, 11/19/2014 - 18:17 नवीन
शामसंग ग्याल्याक्षी आहे. कधीही चालू न केलेली अ‍ॅप्लीकेशने कशी चालू झाली माहित नाही. त्यामुळे ब्याटरी लवकर संपू लागली. आधी ती अ‍ॅप्लिकेशने बंद केली. मग काही दिवस बरे गेले. पंधरा दिवसांपूर्वी अचानक ब्याटरी एका दिवसात डिस्चार्ज व्हायची म्हणून (१ अठवडा वाट बघून) नवी मागवली. त्या दिवसापासून पहिली ब्याटरी शिस्तीत वागू लागली. आता नवी ब्याटरी येऊन पडलीये आणि जुनी व्यवस्थित आहे.
  • Log in or register to post comments

यंत्रांनाही भावना असतात बहुदा

वेल्लाभट
Wed, 11/19/2014 - 20:34 नवीन
यंत्रांनाही भावना असतात बहुदा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

(No subject)

मोहनराव
Wed, 11/19/2014 - 20:45 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

असेच म्हणावेसे वाटतेय आता!

रेवती
Wed, 11/19/2014 - 21:04 नवीन
असेच म्हणावेसे वाटतेय आता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

हे त्या गाण्यातल्या सारखं झालं म्हणायचं

बहुगुणी
गुरुवार, 11/20/2014 - 01:03 नवीन
मैं दूजा ब्याह रचाऊंगा मैं तेरी सौतन लाऊंगा तू दूजा ब्याह रचाएगा? हाये मेरी सौतन लाएगा? मैं मायके नही जाऊंगी तुम देखते रहियो :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अगदी अगदी! जुने फोनच बरे

रेवती
गुरुवार, 11/20/2014 - 04:51 नवीन
अगदी अगदी! जुने फोनच बरे म्हणायची वेळ आलीये. मिस्ड कॉल ठसठशीतपणे दाखवायला हा फोन लाजतोय असं वाटतं. अगदी बारीक चिन्ह कोपर्‍यात! कधी दिसायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

Android मधेय म्हणे virus पकडत

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 11/19/2014 - 21:05 नवीन
Android मधेय म्हणे virus पकडत नाही … खरे आहे का हे?
अगदी खोटी गोष्ट. कुठलीही ऑपरेटींग सिस्टीम १००% व्हायरस फ्री नाही. अँड्रोईड विशेषकरुन नाही. कारण अँड्रॉईड ही ओपन सोर्स ऑपरेटींग सिस्टीम आहे. ओपन सोर्स ऑपरेटींग सिस्टीम्स व्हायरस ला बळी पडायचं प्रमाण तुलनेनी जास्त आहे.
  • Log in or register to post comments

माझा ब्लॅकबेरी झेड १० चा अनुभव

श्रीरंग_जोशी
Wed, 11/19/2014 - 21:50 नवीन
मी ब्लॅकबेरी झेड १० हा चतुरभ्रमणध्वनी वापरतो. धाग्यात वर्णिलेल्या समस्यांइतक्या गंभीर समस्या कधीच जाणवल्या नाहीत. केवळ खिशातुन काढताना वगैरे कधी कधी स्वतःहून रिस्टार्ट होतो. माझ्या बायकोकडे पण झेड १० च आहे. तिला ही समस्या जाणवत नाही. वर वेल्लाभट यांच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे सिलिकॉन केसचा घटक यास कारणीभूत असावा असे वाटत आहे. माझ्या फोनला सिलिकॉन केस आहे तर बायकोच्या फोनला वेगळी केस आहे. काही दिवस विनाकेसचा वापरून बघतो.
  • Log in or register to post comments

मग ह्या परीस...

मुक्त विहारि
Wed, 11/19/2014 - 21:59 नवीन
आमचा, लीनोव्हा बर्‍यापैकी बरा चालत आहे. (किंवा आमचा फोन जरा जास्तच स्मार्ट असल्याने, आमच्या सारख्या "ढ" माणसाला सांभाळून घेत असेल.)
  • Log in or register to post comments

कंजूस यांनी सांगितलेले उपाय

पैसा
Wed, 11/19/2014 - 22:00 नवीन
कंजूस यांनी सांगितलेले उपाय करून बघा. काहीच माहिती नसेल तर प्रयोग करत बसण्यापेक्षा हॅण्डसेट सर्व्हिस सेंटरला नेला तर जास्त चांगले. माझा अ‍ॅण्ड्रॉईड फोन मध्यंतरी अचानक काही वाटेल ते अ‍ॅप्स ओपन करायला लागला. ते बंद न करता आणखी दुसरे सुरू व्हायचे. फॅक्टरी रिसेट केल्यावर तासभर बरा चालला. परत ये रे माझ्या मागल्या. मग आणखी २ दिवसांत फोनबुकमध्यल्या एका नंबरला आपोआप कॉल लागला. माझ्या आईने तो नंबर बंद करून २ वर्षे झाली आहेत म्हणून बरे. रेवतीला फोन लागला असता तर माझे काही खरे नव्हते. एअरटेलवाल्यांनी एका कॉलसाठी महिन्याच्या लँडलाईन बिलाइतके बिल फाडले असते. ताबडतोब फोन बंद करून सिमकार्डे एका ६०० रुपयाच्या फोनमधे घातली आणि हॅण्डसेट दवाखान्यात भरती केला. वॉरंटीमधे आहे, मात्र बरा व्हायला किमान २० दिवस लागतील असे कळताच दुसरा फोन मागवून मोकळी झाले. आता तो कधीही घरी येवो. तात्पर्य, वॉरंटी संपली असेल आणि फोनचे नखरे सुरू झाले की दुसरा फोन आणायला हवा आहे हे समजावे. आताचे स्मार्ट फोन जुन्या नोकिया ३३१० किंवा मोटोरोला सी ३५० ई सारखे दहा दहा वर्षे विनातक्रार काम करत नाहीत.
  • Log in or register to post comments

नोकिया ३३१०

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/20/2014 - 07:54 नवीन
नोकिया ३३१० हा स्वसंरक्षणार्थ्सुध्धा वापरता येतो...फेकून मारायला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हैला! खरच की! माझीही अ

रेवती
गुरुवार, 11/20/2014 - 08:01 नवीन
हैला! खरच की! माझीही अ‍ॅप्लीकेशने अशीच चालू न करताही व्हायची. मुलाने ती सगळी बंद केली. सांगते काय, आता मीच फोन तयार करणारे. आणि हा फोनही मी घेतलेला नव्हता . फ्री आलाय तो! यापुढे बाबा आदमाच्या जमान्यातला घेणारे! नकोच नस्ती कटकट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ह्म्म

अमित खोजे
गुरुवार, 11/20/2014 - 02:03 नवीन
नवीन फोनबाबत कल्पना नाही. गेली ४ वर्षे आपला सफरचंद मी भ्रमणध्वनी क्रमांक ४ स (Apple iPhone ४ S - अजून जास्त फाडता नाही आले याला) अति उत्तम स्थितीमध्ये चालू आहे. काहीही तक्रार नाही. आलेले सगळे फोन घेता येतात तसेच फोन करता येतात. सकाळी गजर व्यवस्थित मी बंद केल्यावरच बंद होतो. (मात्र सुरु आपला आपण तो पण वेळेवर होतो बरं का! ) अगदी नवीन OS ला जरी उप्डते *lol* केले तरीही बुंगाट पळतो आहे. $२०० कामी लागले म्हणायचे.
  • Log in or register to post comments

सुक्ष्मकमाल

स्वप्नज
गुरुवार, 11/20/2014 - 08:31 नवीन
'सुक्ष्मकमाल' वापरत आहे..१ वर्ष झाले. सुक्ष्मकमालाने कमालच केली..एक सुक्ष्म बिघाडदेखील झाला नाहीय... अजूनतरी स्मार्टली च वागतोय..
  • Log in or register to post comments

Galaxy S3... दोन वर्षे होतील

थॉर माणूस
गुरुवार, 11/20/2014 - 09:02 नवीन
Galaxy S3... दोन वर्षे होतील आता. कसलाही त्रास नाही. नव्या अपडेटस मुळे ६ एक महिन्यांपुर्वी काँटॅक्टस उघडताना २-३ सेकंदांचा डीले यायला लागला कधी कधी. पण तो सॅमसंग च्या इंटरफेसचा घोळ असल्याचे कळले. बाकी आज वर फोनने कधीही तक्रार केलेली नाही. २-३ वेळा माझ्यामुळे डोक्यावरसुद्धा पडलाय बिचारा पण तरीही कसलेच नुकसान नाही झालेले.
  • Log in or register to post comments

@ जेपी

मदनबाण
गुरुवार, 11/20/2014 - 09:34 नवीन
@ जेपी नाले नाले पे लिख्खा होता है गिरनेवाले स्मार्ट फोन का नाम... ;) @ कंजूसमामा अगदी योग्य सल्ला ! :) @मुवि अहो डोंबिवलीकरांशी पंगा घेण्याचा "ओव्हर स्मार्टपणा" कोणता फोन करेल ? ;) @पैसा ताई कृपया आपण माझ्या मोबाईलचे स्मार्ट अनुभव असे पुस्तक प्रकाशित करावे ! वाचकांना एकदम टेक्नोसॅव्ही लेखन वाचनाचा आनंद मिळेल बघा. ;) जाता जाता :- या स्मार्ट फोनच्या स्पर्धेत आता टी-सिरीज ही उतरले आहे, एका चीनी कंपनी बरोबर यांचा टाउअप आहे. { व्हेअर इज मेक इन इंडिया कॉन्सेप्ट ?} तर नोकिया हे नाव संपले नसुन त्यांचा एन-१ हा टॅबलेट लवकरच "चीन" मधे लॉन्च केला जाणार आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }
  • Log in or register to post comments

अगदी अगदी!

पैसा
गुरुवार, 11/20/2014 - 09:52 नवीन
पण खरं सांगू बाणा, दहा वर्षापूर्वीचा घेतलेला पहिला मोबल्या हामेरिकन बनावटीचा मोटोरोला C350e सिमकार्ड आणि बॅटरी घातली की अजून चालू होतो. दहा वर्षात फक्त एक बॅटरी बदलली. आता गेली तर परत मिळणार नाही बहुतेक. तो इतका मट्ठ आहे की त्याला FM सुद्धा नाही. पण तरी त्याच्याइतका कोणताच फोन मला आवडत नाही खरे तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

c350e म्हण्जे तो अँटेना बाहेर

असंका
गुरुवार, 11/20/2014 - 11:13 नवीन
c350e म्हण्जे तो अँटेना बाहेर अस्ते तोच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नाय नाय!

पैसा
गुरुवार, 11/20/2014 - 12:52 नवीन
मट्ठ असला तरी अगदीच इतका काही "हा" नाही हो! Image removed. (चित्र आंतरजालावरून साभार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

पण तरी त्याच्याइतका कोणताच

मदनबाण
गुरुवार, 11/20/2014 - 09:54 नवीन
पण तरी त्याच्याइतका कोणताच फोन मला आवडत नाही खरे तर! पहिल प्रेम असचं असत बघ ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }
  • Log in or register to post comments

कितीही मठ्ठ असले तरीही

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/20/2014 - 10:24 नवीन
कितीही मठ्ठ असले तरीही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आय स्टिल लव्ह माय नोकिया ई ७१

वेल्लाभट
गुरुवार, 11/20/2014 - 14:29 नवीन
आय स्टिल लव्ह माय नोकिया ई ७१..... व्हॉट अ फोन इट वॉज ! मध्यंतरी ग्रे मार्केटमधून घेण्याचाही विचार केलेला... पण बाजूला ठेवला. कारण आधीही असा बंद झालेला फोन इथून तिथून मागवून झाला आहे. काही काळ वापरला. आता बंद आहे, पडून आहे. त्यामुळे पुन्हा नको तसं म्हणून सोडला तो विचार. आजवर वापरलेले व सगळेच यादगार असलेले फोन नोकिया ३३१० नोकिया ३१२०, नंतर नोकिया ३५००, नंतर ई ७१... आता लुमिया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ग्रे मार्केट काय असतं बॉ?

बॅटमॅन
गुरुवार, 11/20/2014 - 14:48 नवीन
ग्रे मार्केट काय असतं बॉ? शेड्स ऑफ ग्रे आणि ग्रे म्याटर माहिती आहे, पण ग्रे मार्केट काय प्रकार आहे? (अज्ञानी) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

हल्ली ब्लॅक मार्केट

प्यारे१
गुरुवार, 11/20/2014 - 15:17 नवीन
हल्ली ब्लॅक मार्केट (काळाबाजार) म्हणत नाहीत म्हणून ग्रे मार्केट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ओह अच्छा, धन्यवाद.

बॅटमॅन
गुरुवार, 11/20/2014 - 15:24 नवीन
ओह अच्छा, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा