२९ ऑक्टोबर २००८, जर्मनीमधल्या बॉन शहरातल्या 'आर्ट अँड एक्झिबिशन हॉल'ला जत्रेचं स्वरुप आलं होतं! सहाजिक आहे, दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी मधे पट मांडून एकमेकांसमोर बसलेले होते. बुद्धीबळाच्या जगज्जेतेपदाचा सामना सुरु होता. १२ डावांच्या ह्या मालिकेत जो कोणी ६.५ गुण मिळवेल त्याच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडणार हे नक्की होतं.
आनंद विश्वनाथन (भारत) २००७ चा जगज्जेता वि. व्लादिमीर क्रामनिक (रशिया) २००८ सालासाठी त्याला आव्हान देणारा असा हा सामना होता. आनंद ६ गुणांसह आघाडीवर होता, त्याच्या आणि विजेतेपदाच्या मधे फक्त अर्ध्या गुणाचं अंतर होतं. उत्सुकता शिगेला पोचली होती. पिछाडीवर असला तरी चिवट क्रामनिक जीव तोडून लढणार हे उघड होतं. आधीच्याच १० व्या डावात त्यानं निम्झो-इंडियन बचावातल्या रोमानिशीन व्हेरिएशनने अवघ्या २९ खेळ्यात आनंदला नमवलं होतं! त्या डावाचं दडपण आनंदवर असणं स्वाभाविक होतं. अशा घटकेला ११ व्या डावात एवढीही चूक आनंदला महागात पडू शकत होती.
आनंदकडे पांढरी मोहोरी असण्याचा फायदा असा झाला की डाव कोणत्या पद्धतीने सुरु करायचा हे त्याच्या हातात होतं. सिसीलियन बचावातलं नॅजडोर्फ व्हेरिएशन ह्या प्रसिद्ध प्रकारानं आनंदनं सुरुवात केली! गंमत बघा, हे व्हेरिएशन काळ्या मोहोर्यांसाठी प्रसिद्ध आहे, आणि आनंदची मोहोरी पांढरी आहेत. डावाच्या सुरुवातीलाच इथे एकप्रकारची मानसिक लढत आहे. "तुला फायदेशीर ठरु शकणारे वेरिएशन खेळतोय, पाहू काही करु शकतोस का?" अशी सुप्त आव्हानयुक्त चिथावणी आहे! अशा वेळी मानसिक संतुलन आणि संयम दोन्हीचा कस लागतो. क्रामनिक कसलेला खेळाडू आहे. पहिल्या सहा खेळ्या कॉपीबुक स्टाईल झाल्या. सातव्या खेळीत क्रामनिक पॉईझन्ड पॉन वेरिएशन खेळू शकतो पण त्यात धोका आहे आणि तो आधीच गुणात मागे पडला आहे! तो हा धोका पत्करणार की नाही?
दुसरी मानसिक लढाई सुरु. त्याने हा धोका पत्करला तर कसे लढायचे आणि नाही पत्करला तर कसे खेळायचे दोन्हीवर आनंदचा विचार सुरु आहे. सातव्या खेळीत क्रामनिक खेळतो ती गॅरी कास्पारोव आणि बोरिस गेल्फांड ह्यांनी खेळलेली वेरिएशन! ह्या मार्गाने त्या दोघांनी बरेच डाव जिंकलेले आहेत! आनंद तयार आहे, त्याचे लक्ष्य आहे अर्धा गुण आणि क्रामनिकचे १ गुण! त्यामुळे पुढच्या काही खेळ्यात झपाट्याने मारामारी करुन तो पटावरचा ताण हलका करतो आणि स्थिती सुटसुटीत करुन घेतो. क्रामनिक लढत निर्माण करु शकत नाही. २४ खेळ्यात बरोबरीचा प्रस्ताव होतो. आनंद जगज्जेता झालेला असतो!! जगभरातल्या सर्व भारतीयांच्या दिवाळी आनंदात अजून एका धमाकेदार आणि दैदीप्यमान अग्निबाणाची भर पडलेली असते!! :)
आनंदचे एक महत्त्वाचे वैशिष्ठ्य असे की तो अतिशय शांत असतो. जिंकल्यानंतरही अभिनिवेषपूर्ण हातवारे, हावभाव, प्रतिस्पर्ध्याला नजरेने आणि बॉडीलँग्वेजने कमी लेखणे हे प्रकार तो करत नाही! काय बोलायचे ते तो पटावरच बोलतो आणि मला हे फार महत्त्वाचे वाटते. त्याची नम्रता, त्याचा साधेपणा आणि संयम ह्याने त्याचे विजेतेपद अधिक झळाळून दिसते हे निश्चित!
पंधरा लाख यूरोज इतकी घसघशीत रक्कम आनंद आणि क्रामनिक दोघेही विभागून घेणार आहेत! बक्षीसाच्या रकमेकडे बघून का होईना पण भारतात बुद्धीबळाला आता क्रिकेटप्रमाणेच महत्त्व प्राप्त व्हायला हरकत नाही! ;)
आनंद हा एकमेव खेळाडू असा आहे की ज्याने बाद फेरी (नॉक ऑऊट), साखळी फेर्या (टूर्नामेंट) आणि थेट सामना (मॅच) ह्या तीनही प्रकारे खेळल्या गेलेल्या जागतिक स्पर्धात विजेतेपद मिळवून दाखवले आहे. हा पराक्रम गॅरी कास्पारोवलाही जमलेला नाही!
५ बुद्धीबळ ऑस्कर्स मिळवणार्या आनंदने तिसर्यांदा जागतिक विजेतेपदाचा मुकुट आपल्या डोक्यावर चढवला आहे!
त्याला सर्व भारतीयांतर्फे मानाचा मुजरा!!
फिडे अध्यक्षांकडून जागतिक अजिंक्यपद स्वीकारताना आनंद आणि बाजूला क्रामनिक.
चतुरंग
फिडे अध्यक्षांकडून जागतिक अजिंक्यपद स्वीकारताना आनंद आणि बाजूला क्रामनिक.
चतुरंग
वाचने
6151
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
आमचा ही मानाचा मुजरा..
ज ब रा
In reply to आमचा ही मानाचा मुजरा.. by शितल
चतुरंगजी..
आनंद
यू सेड इट तात्या!
In reply to आनंद by विसोबा खेचर
अभिनंदन..
सुरेख
मस्त आणि समयोचित लेख!
अभिनंदन आनंद!
वावा..
छान
असेच म्हणतो
In reply to छान by मृदुला
+१
In reply to असेच म्हणतो by ऋषिकेश
आवडला लेख.
जाणकाराचे विश्लेषन
वा वा.. लगेच
सुंदर लेख
सुंदर ओळख...
बिपिनभौ धन्यवाद!
In reply to सुंदर ओळख... by बिपिन कार्यकर्ते
सुंदर वर्णन
"चला... हरलो बाबा एकदाचा!"
In reply to सुंदर वर्णन by एकलव्य
रविवारी शोधून पुरवितो!
In reply to "चला... हरलो बाबा एकदाचा!" by चतुरंग
थोडे धागेदोरे
In reply to रविवारी शोधून पुरवितो! by एकलव्य
अफाटच!!
In reply to थोडे धागेदोरे by एकलव्य
जगज्जेता