मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मॅटिनी

अविनाशकुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मॅटिनी आज रविवारचा दिवस आहे, गुलाबी थंडीचा महिना आहे मुले पण मामा कडे गेली आहेत आज जरा चुकारच मूड आहे............ . नाष्ट्यास कांदे पोह्याचा बेत आहे लिंबू पिळून बशी वाफाळते आहे का लाजतेस प्रिये ,भरव ना घास आज तर राजा राणीच राज्य आहे......... . किचन मधे जरा लुडबूड करु दे मदतीच्या बहाण्यानं तुला सतावू देत. गारठा जरा आज अंमळ जादा आहे स्वयंपाक घरातली उब जरा घेऊ देत........ . नको ति आज बेचव भेंडी अन गवार कोवळी मटार सोलण्यास घेतली आहे नारळ घालून उसळीचा फक्कड बेत आहे, अन्नपुर्णे, तुझ्या हाताची चव निराळीच आहे....... . आकंठ भोजन, सखे तन मन तृप्त आहे राहू दे आवरा आवरी, आज एकांत आहे. नाइट शो तर आपला नेहमीचाच आहे, आज भामिनी ,मॅटिनी चा मूड आहे.........

वाचने 6021 वाचनखूण प्रतिक्रिया 25

एस Sun, 11/16/2014 - 11:30
अरेरे... असा रविवार कधी मिळायचा.. फ्रिज साफ करायचाय, नवरा-कम-प्लंबर-कम-इलेक्ट्रिशिअन-कम-खिळेहातोडेवाला-कम-हमाल-कम-एव्हरीथिन्ग फ्री-... वगैरे वगैरे... आज रविवार आहे! ऑल-इन-वन चा रोल वाट बघत आहे! आलो...! (हाकेला ओ देत...) :-)

प्यारे१ Sun, 11/16/2014 - 12:35
छान आहे की कविता. मुख्य म्हणजे सूचक (सटल) आहे. ह्या पेक्षा सरळसोट नि थेट धोंडोपंतांची कविता होती जी अजूनही मिपावर आहे. (उत्खनन करणारांना संधी. लाभ घ्यावा.)

In reply to by टवाळ कार्टा

म्हैलांच्या "अनाहिता" सारखा पुरुषविभाग "बघा आता" होत नाही तोवर ब्यॅकप घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही :(

जेपी Fri, 11/21/2014 - 20:25
टक्या, खिशाला खार लावायचा नाय. बॅकप घेतला आहे.