मॅटिनी
लेखनविषय:
मॅटिनी
आज रविवारचा दिवस आहे,
गुलाबी थंडीचा महिना आहे
मुले पण मामा कडे गेली आहेत
आज जरा चुकारच मूड आहे............
.
नाष्ट्यास कांदे पोह्याचा बेत आहे
लिंबू पिळून बशी वाफाळते आहे
का लाजतेस प्रिये ,भरव ना घास
आज तर राजा राणीच राज्य आहे.........
.
किचन मधे जरा लुडबूड करु दे
मदतीच्या बहाण्यानं तुला सतावू देत.
गारठा जरा आज अंमळ जादा आहे
स्वयंपाक घरातली उब जरा घेऊ देत........
.
नको ति आज बेचव भेंडी अन गवार
कोवळी मटार सोलण्यास घेतली आहे
नारळ घालून उसळीचा फक्कड बेत आहे,
अन्नपुर्णे, तुझ्या हाताची चव निराळीच आहे.......
.
आकंठ भोजन, सखे तन मन तृप्त आहे
राहू दे आवरा आवरी, आज एकांत आहे.
नाइट शो तर आपला नेहमीचाच आहे,
आज भामिनी ,मॅटिनी चा मूड आहे.........
वाचने
6021
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
अन लवकर वाचून घ्या
मोबल्यावर हाय नायतर बॅकप
गाडी कारशेडमध्ये जाण्याचा
बहुतेक पब्लिक आणखीन सुस्तीत
बालदिन संपला वाटतं.
In reply to बालदिन संपला वाटतं. by प्रचेतस
पुढच्या बालदिनाच्या
In reply to पुढच्या बालदिनाच्या by मुक्त विहारि
(No subject)
अकुं ची लिबलिबीत जिल्बी!
प्रौढदिनाच्या शुभेच्छांची चान
छान रंगेल कविता..
ह्याव अ गुड डे...
मुलं मामाकडं गेलीत हे बरंच झालं.....
हम्म्...
आसा रविवार कधि यायचा.
छान आहे की कविता.
In reply to छान आहे की कविता. by प्यारे१
प्यारे १
आकंठ भोजन, सखे तन मन तृप्त
य न जॅा य
बास का...
ब्यॅकप घ्या ब्यॅकप घ्या
In reply to ब्यॅकप घ्या ब्यॅकप घ्या by प्रसाद गोडबोले
जेपी ...१ सर्वर ब्याकप वाल्या
In reply to जेपी ...१ सर्वर ब्याकप वाल्या by टवाळ कार्टा
म्हैलांच्या "अनाहिता" सारखा
In reply to म्हैलांच्या "अनाहिता" सारखा by प्रसाद गोडबोले
हाहाहा "बघा आता"
टक्या,
In reply to टक्या, by जेपी
मिपाचा अनमोल "ठेवा" सांभाळून