Skip to main content

रम्य एका सकाळी

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 01/11/2008 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
एक काल्पनिक कविता.... रम्य एका सकाळी तु वेचित होतीस बकुळी अर्ध्या मुर्ध्या श्रुंगारातही दिसत होतीस सोनकळी तुला पाहुन मावळणारा चंद्र जरा थबकला ढगांच्या गावाक्षातुन हळु हळु डोकावू लागला जेव्हा तुझी चाहुल लागली रवीराजांची तर झोपच उडाली धुक्याचा पडदा बाजुला सारुन स्वारी लगेच बघु लागली तुझ्या गुलाबी गालांना बघुन भुंगा सुद्धा फसला गुलाब समजुन गालांना क्षणभर विसावला तेव्हा वाटल मला जर मी असतो भ्रमर................
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2331
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

वा , सुरेख कल्पनाविलास . कविता आवडली.
रम्य एका सकाळी तु वेचित होतीस बकुळी अर्ध्या मुर्ध्या श्रुंगारातही दिसत होतीस सोनकळी
हे तर खासच.

तुझ्या गुलाबी गालांना बघुन भुंगा सुद्धा फसला गुलाब समजुन गालांना क्षणभर विसावला वा! नेहमीप्रमाणेच सुरेख, चित्रदर्शी कविता..! जियो गोखले साहेब.. तेव्हा वाटल मला जर मी असतो भ्रमर................ गोखलेसाहेब, या ओळी अनावश्यक वाटल्या. माझ्या मते त्या तर अध्यारुतच आहेत..! काय म्हणता? :) आपला, (भ्रमर) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कविता संपवावी कशी सुचेना म्हणुन अशी "काशी "करावी लागली

अर्ध्या मुर्ध्या श्रुंगारातही दिसत होतीस सोनकळी व्वा.. मस्तच.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

कविता खूप आवडली.
तेव्हा वाटल मला जर मी असतो भ्रमर................
ह्या कवितेचा शेवट ऐवजी, नवीन कवितेची सुरवात असू शकेल!

सुंदर कविता. ह्या कवितेचा शेवट ऐवजी, नवीन कवितेची सुरवात असू शकेल! हे पटलं.