एक काल्पनिक कविता....
रम्य एका सकाळी
तु वेचित होतीस बकुळी
अर्ध्या मुर्ध्या श्रुंगारातही
दिसत होतीस सोनकळी
तुला पाहुन मावळणारा
चंद्र जरा थबकला
ढगांच्या गावाक्षातुन
हळु हळु डोकावू लागला
जेव्हा तुझी चाहुल लागली
रवीराजांची तर झोपच उडाली
धुक्याचा पडदा बाजुला सारुन
स्वारी लगेच बघु लागली
तुझ्या गुलाबी गालांना बघुन
भुंगा सुद्धा फसला
गुलाब समजुन गालांना
क्षणभर विसावला
तेव्हा वाटल मला जर
मी असतो भ्रमर................
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2331
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा
तुझ्या
तुझ्या
In reply to तुझ्या by विसोबा खेचर
अर्ध्या
चित्रदर्शी कविता
नवीन कवितेची सुरवात?
रम्य एका सकाळी