Skip to main content

क्या अच्छे दिन आ गये ?

लेखक hitesh यांनी सोमवार, 10/11/2014 03:58 या दिवशी प्रकाशित केले.
अच्छे दिन आ गये .. ही जाहिरात करत मोदी सरकार सत्तेवर आले. सरकारवर टीका होताच मोदीप्रेमी म्हणायचे अरे थांबा. वाट पहा . पण आता पाच वर्षातील अर्धे वर्ष संपत आले. या सहा महिन्यात अच्छे दिन कुठे खरोखरच आलेत का ? १. महागाई कमी करु म्हणणार्‍या सरकारने महागाई वाढवुनच ठेवली आहे. पेट्रोल डिझेलचे दर सव्वा रुपयाने कमी झाले की मोदी प्रेमी आनंदाने चित्कारतात ! पण रिक्षाचे भाडे मात्र दोन रुपयानी का वाढले कुणी सांगेल का ? डायलिसिसचे दर जवळजवळ २० % ने वाढले. रक्ताच्या एका पिशवीचे दर आठशे हजारावरुन दोन हजारात गेले. प्लेटलेटही महाग झाले. सातशे वरुन एकदम पंधराशे ! इंटरनेटचे रिचार्ज दोन दिवस आधीच संपले . मोबाइलवाला बोल्ला , अच्छे दिन आ गये ! पूर्वी रिचार्ज ३० दिवस वॅलिड होते. आता दर तेवढाच . पण २८ दिवसच नेट पॅक वैध रहाणार ! मापात पाप करुन दर तितकाच ठेवण्याचा भासमान प्रयत्न कशाला ? सरळ दहा टक्के दरच वाढवायचा की ! औषधांच्या किमतीही भडकतील असा अMdaaj आहे. एटीएम मधुन पैसे काढण्यालाही आता ५ प्रयत्नांनंतर चाजेस भरावे लागतील. बुरी राते आ गयॅअ‍ॅ ...़कंडोम महागले ! २. मोदीप्रेमी लोकांचा एक मेसेज निवडणूक काळात फिरत होता. मोदी सरकार हे देश भ्रष्टाचारमुक्त कर्ण्यासाठी आम्ही निवडुन देणार आहोत. भले या सरकारने महागाई वाढवली तरी चालेल ! किती लब्बाड आणि हास्यास्पद वाक्य आहे हे ! भ्रष्टाचार प्रत्येक पातळीवर होत असतो म्हणुनच तर महागाई वाढते.. प्रत्येक पातळीवरचा भ्रष्टाचार जर सिग्निफिकंटली कमी झाला तर त्याचा दृश्य परिणामह्म्हणुन स्वस्ताई काही अंशी तरी यायलाच हवी ना ? ३. जनधन योजनेत दर अकाउंटला ५ हजार जमा होणार होते. आता मोदी सर्कार म्हणते फक्त ५०० च जमा होणार ! गेल्या सहा महिन्यात खरोखरच काही चांगले घडले आहे का ? एकुण कालावधीचा १/१० काल संपला ! मोदी सर्कारचा आढावा घेण्यासाठी हा धागा.

वाचने 22323
प्रतिक्रिया 107

प्रतिक्रिया

प्लेटलेटही महाग झाले. सातशे वरुन एकदम पंधराशे ! २००३ साली माझ्या पत्नीला डेंग्यू झाला होता त्यावेळी मला तिला ५ बॅग्ज प्लेटलेट्सच्या द्याव्या लागल्या किंमत प्रत्येकी ९०००/- ( रुपये नउ हजार प्रत्येकी) एकूण बरेहोण्याचा तेंव्हाचा खर्च होता रूपये बहात्तर हजार !!! अनेक गोष्टी अशा आहेत जे मोदींचेही सरकार करणार नाही. कारण त्यात प्रथम अडकतील ते इथले उद्योजक व राजकारणी.देशांतर्गत काळा पैसा बाहेर काढणे हे त्याचे महत्वाचे उदाहरण आहे.

In reply to by चौकटराजा

प्लेटलेटमध्ये सिंगल डोस आणि आरडीपी असे प्रकार असतात.. सिंगल डोनर खूप महाग असते. मी वर दिलेले रेट आरडीपीचे आहेत.

In reply to by बोका-ए-आझम

विसरलोच की ! रिक्षाचे दर वाढले ... काँग्रेस जबाबदार तेलाचे दर वाढले ... सौदी जबाबदार. रक्ताचे दर वाढले ... ब्लड ब्यान्क जबाबदार पपैचे दर वाढले .... शेतकरी आणि फळगाडीवाले जबाबदार. मोदींचा भाजपाचा संबंध म्हागाइशी येतोच कुठे नै का ?

In reply to by hitesh

महागाई दर ५% च्या खाली आहे आता पण आधीच एवढे दर वाढलेले आहेत की त्यात थोडासाही बदल लोकांना जास्त वाटतोय. बाकी जेव्हा ६० वर्षे देशाला हातोहात बनवणारे जेव्हा असले लेख लिहितात तेव्हा असं भरून येतं म्हणून सांगू! खरं सांगायचं तर काँग्रेस कशालाच जबाबदार नाही. हे या देशातले नालायक लोक आहेत ना त्यांनाी काही कळत नाही. १० वर्षे पण काँग्रेसच्या नावाखाली भाजपनेच देश चालवला. काँग्रेस जबाबदार? छे! भलतंच!

हितेशा, अरे जरा वेळ जाऊ दे की."परीक्षेत पहिला नंबर नक्कि मिळवीन' म्हंटले आहे.वार्षिक परीक्षेचा निकाल बघायचा असतो ना?अजून तर चाचणी परी़क्षाही झाली नाही आहे.

बाकी तुम्ही तिकडचे बोला.. आम्ही आपली साधी माणसे, आम्ही भाजी, कांदा, साखर वगैरे गोष्टी बघतो. बाकी मोबाईल वगैरे महागणे म्हणजे ते कधीतरी होणारच होते, किती दिवस तुम्ही खोटी स्वस्ताई दाखवणार? बाकी जाता जाता, माझा असा अंदाज आहे की जी काही दरवाढ झाली पाहिजे, त्याच्या दुप्पट दरवाढ ह्या वर्षी होईल, आणि त्यानंतर पुढची ५ वर्षे दर स्थिर राहतील.. राजकारण, दुसरे काय? ५ वर्षांनी कोणाला आठवणार आहे की पहिल्या वर्षी एव्हढी मोठी दरवाढ झाली होती म्हणून?

अहो माईसाहब, आधी ६० च दिवस झालेत म्हणाले, आता फक्त ६ च म्हीने झाले म्हणतात, भाजपचे आश्वासन म्हणजे लबाडाघरचे आवतानं असते ,वाट्ल्यास आठवलेँना विचारा. शेतकर्यांचे नेते आणि राज्याच्या प्रत्येक प्रश्नाची जाण असणारे पवारसाहेबच या देशाचे नेतृत्व करु शकतात ,भाजपातले चाळीस आमदार पवारसाहेबांच्या शब्दातलेच आहेत, शेवटी महाराष्ट्र पवारांच्या ताब्यातच राहिला.

In reply to by विश्वजीत भोसले पाटील

विश्वजीता, अरे शरदला जाण आहे पण नुसती जाण असून काय फायदा? राज्यात घाण करून ठेवली त्याचे काय? राज्याला ३ लाख कोटींचे कर्ज आहे असे चॅनेल्वाले म्हणते होते.कृषीमंत्री झाला खरा पण देशातल्या शेतकर्यांच्या १५-२० हजार रुपयांसाठी केलेल्या आत्महत्या?पीकांची नासाडी होत असताना शरदचे लक्ष स्टेडियमच्या हिरवळीवर.

In reply to by विश्वजीत भोसले पाटील

हो. बरोबर. पवारसाहेबच. तसंही आत्महत्यांमुळे शेतक-यांची संख्या कमी झालेलीच आहे. पवारसाहेबांच्या हातात प्रत्यक्ष सत्ता नाही तो एक प्रश्नच आहे. नाहीतर उरलेल्यांनी पणा आत्महत्य केल्या असत्या आणि हा प्रश्नच कायमचा निकालात निघाला असता!

वेळ जाऊद्या थोडा अजून.... तीन वर्षं तरी. सध्या प्रत्येक गोष्टीला 'कर्स द प्रिडिसेसर' हा उपाय असतो. त्यावरून एक ज्योक आठवला. एका कंपनीत नवीन संचालक येतो. जुना संचालक त्याला १, २, ३ असे आकडे घातलेले तीन लखोटे देतो आणि कानमंत्र देतो. "जेव्हा तू मोठ्या अडचणीत येशील तेव्हा एक लखोटा उघडून पहा. त्यात तुझ्या अडचणीचे उत्तर असेल". काही काळानंतर लवकरच नवा संचालक अडचणीत येतो. कंपनीची वाट लागलेली असते. संचालक क्र १ चा लखोटा उघडतो. त्यात लिहिलेले असते, "तुमच्या पूर्वसुरींना दोष द्या". संचालक त्याप्रमाणे सगळ्याचे खापर जुन्या संचालकावर फोडतो. कालांतराने बाजारातल्या घडामोडींमुळे क्रायसिस नाहीसा होतो. असाच काही काळ गेल्यावर पुन्हा तीच वेळ येते. संचालक क्र.२ चा लखोटा उघडतो. त्यात लिहिलेले असते, "पुनर्रचना करा". संचालक ताबडतोब कंपनीतल्या सगळ्या खात्यांमधल्या म्यानेजर लोकांना इकडे तिकडे हलवतो. ऑपरेशन्सवाला परचेसमध्ये, परचेसवाला एच आर मध्ये... पुन्हा तो क्रायसिस कदाचित आपोआपच नाहीसा होतो. परत काही काळाने मोठाच क्रायसिस येतो. बेजार झालेला संचालक क्र ३ चा लखोटा उघडतो. त्यात लिहिलेले असते..... "तीन लखोटे बनवा". :)

In reply to by नितिन थत्ते

भाजप्यांचे दोन लखोटे तयारच आहेत. एकावर गांधी लिवले आहे. दुसर्‍यावर नेहरु लिवले आहे.

नितिन, म्हणजे कुठलाहि पक्ष सत्तेत असला तरी विशेष फरक पडत नाही असे म्हणतो आहेस ना? काही अंशी खरे आहे असे आम्हालाही वाटते.नेहरू गेल्यानंतर 'आता देशाचे काय होणार?" ह्या काळजीने अनेक मध्यम्वर्गीय व डावे,कॉग्रेसवाले चिंतीत झाले होते.पण नंतर इंदिरा काय्,मोरारजी काय... किंवा नंतरचे अनेक पंतप्रधान वा पक्ष, देश चालतच होता आपल्या गतीने.

केजरीवाल यांनी दिल्ली च्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन १० दिवस पण होतात की नाही तेंव्हा त्यांच्या १० दिवसाच्या कारकीर्दीचा पंचनामा करणारा एक धागा उघडण्यात आला होता. आठवणीने ड्वाले पाणावले . बाकी चालू द्या . बाकी थत्ते यांचा प्रतिसाद जबराच

@ hitesh, क्ष पार्टी विरुद्ध य पार्टी अश्या अंध गदारोळात आम्हाला रस नाही... पण डोळे आणि कान उघडून पाहणे आणि त्याबाद्दल थोडाबहुत साधा समतोल विचार करायला आवडते. या लेखात विचारलेल्या गोष्टी विचारायला ६०-६५ वर्षे पूर्णपणे विसरलेले लोक गेल्या पाच-सहा महिन्यात रोज रोज त्या गोष्टी उगाळून विचारू लागले आहेत हे पाहून ड्वाले पानाव्ले ! :) असो. जागरूक नागरीक (मगे ते एकांगी का होईनात किंवा कागावाखोर का होईनात) हे जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे असे समजले जाते... तेव्हा लोकशाहीला जिवंत ठेवल्याबद्दल अभिनंदन ! आणि शुभेच्छाही !! आता एक सुजाण नागरीक म्हणून नविन सरकारच्या काही क्षुद्र गोष्टी म्हणजे कचरा न करणे (स्व:ता / दुसर्‍याने केलेला कचरा साफ करणे जरा जास्त कठीण आहे, म्हणून ते तुमच्यावर सोडतो), भ्रष्टाचारात (तेच ते हो, चिरीमिरी न देणे, इ इ) सहभागी न होणे वगैरेत सहभागी होऊन जर लोकशाहीत अजून जान ओतता आली तर पहा. सुरुवातीला इतके केलेत तर मग जरा अजून कठीण गोष्टी करायला पण मनाची तयारी होईल. काय म्हणता ? जागरूकता तेव्हाच फायद्याची, जेव्हा ती योग्य दिशेने चालत असते. तुम्ही एक जागरूक नागरीक असल्याचे वाटल्यानेच केवळ इतके लिहीले. बाकी तुमची मर्जी.

इतर बिन खर्चिक उपाय नाना सांगेल. असो. दादा कोंड़्के चे गाणे आठवले

मोदिशेठ प्रचारात सांगायचे कि ६० वर्षात झाले नाही ते ५ वर्षात करून दाखवणार मग जनतेने ६ महिन्यात थोड्या फार रिझल्टची अपेक्षा केली तर काय चुकल? अच्छे दिन आले अंबानी अदानींचे!

In reply to by hitesh

मनमोहनांसमोर कमरेत झुकून फारफार तर त्यांचा गुरखा राहात असेल. बाकी प्रत्येक जण त्यांच्यावर दादागिरीच करायचा. अगदी तो चाळीशीचा उनाड कार्टा राहुल पण. बरं, अंबानी असे झुकून उभे असल्याचा फोटो असल्यास तो टाकता का?

In reply to by hitesh

कमरेत झुकल्याचे दिसते आहे आपणांस? सर्वसाधारणपणे समोरची व्यक्ति बोलत असतांना, थोडे झुकून ऐकणे हा, सुसंकृत समाजात, सर्वसामान्य शिष्टाचाराचा भाग समजला जातो.

In reply to by प्रदीप

कंबरेत झुकणं म्हणजे अगदी काटकोनात झुकणं अपेक्षित नाही. पणसमोरच्या व्यक्तीला आदर देण्याची देहबोली दिसुन तेय आहे ना ?

In reply to by hitesh

थोडेसे झुकून आदर देणे...कंबरेत झुकून हुजरेगीरी करणे हे सारखेच आहे का?? असेल तर पप्पूचे जोडे उचलणेपण तुझ्यासाठी चांगलेच असणार

In reply to by टवाळ कार्टा

चला, इथे काही वैचारिक वाचण्यापेक्षा आपण आपले खफवरच भेटू या... (बादवे, वरील प्रतिसाद ट्का ह्यांच्यासाठीच आहे, हे सुज्ञ लोकांच्या लक्षांत आलेच असेल.)

In reply to by टवाळ कार्टा

काहीतरी गैरसमज होतोय. मनमोहन सिंग आणि अंबानी एकमेकाना योग्य तो आदर देत होते.. मोदी - अंबानीसार खे मिठ्या मारत जगाला आपला दोस्ताना दाखवत फिरत नव्हते. ंमला इतकेच सांगायचे होते. हे फोटो मोदीप्रेमींना पोटशूळ उठवणारे ठरणार याची कल्पना ह्प्तीच

In reply to by hitesh

हेच अंबानी मनमोहनांसमोर कंबरेत झुकुन उभे रहायचे.
मनमोहन सिंग आणि अंबानी एकमेकाना योग्य तो आदर देत होते
दोन्ही वाक्यांतला फरक समजतो का?

In reply to by टवाळ कार्टा

कंबरेत झुकुण , मान झुकवुन आदराने अंबानी उभे रहायचे. मनमोहन सिंगदेखील प्रतिनमस्कार करुन सुहास्य वदनाने वार्तालाप करायचे. :)

In reply to by टवाळ कार्टा

कसली कोलांटी ? त्या वार्तालाप शब्दात इतकं हसण्यासरखं काय आहे ?

In reply to by hitesh

मला नेमकं कळलं नाही की मोदी आणि अंबानी यांनी एकमेकांना मिठ्या मारल्या तर तुम्हाला का खुपतं? नंतर विचार केल्यावर तीन शक्यता जाणवल्या - १. मोदींनी तुमच्याऐवजी अंबानींना मिठी मारली. २. अंबानींनी तुमच्याऐवजी मोदींना मिठी मारली. ३. दोन पुरुषांनी एकमेकांना मिठी मारणे तुम्हाला खपत नाही. वरच्यापेक्षा काही वेगळे कारण असल्यास कळवावे.

In reply to by बोका-ए-आझम

अंबानी काहि झालं तरी शेवटी बिझनेसमॅन. समोरच्या व्यक्तीला काय आवडतं तेच तो विकणार. मोदिंना त्याने आलिंगन देताना बघितलं असेल म्हणुन तिथे झप्पी. ममो नेहमी मॅडम आणि युवराजांसमोर झुकलेले म्हणुन... हॅ हॅ हॅ.

ही गोष्ट मनमोहन सिंग यानी केली की नाही माहीत नाही पण त्यांच्या काळात ती केली गेली हे खरे आहे. आपल्याकडे एकेका घरात चार चार गॅस सिलिंडर्स ची नोंद होती. व त्यामुळे ज्यांच्या कडे ते नाही त्याना सिलिंडर मिळण्यास विलंब लागत असे. त्यावर सोनिया व मनमोहन यांची तीव्र टवाळी करणारी व्यंगचित्रे चेपू वर टाकण्यात आली होती. ही सर्व कनेक्शन शोधून रद्द करण्यात आली व आता त्यामुळे इंधनाचा पुरवठा नीट होत आहे. सामान्य माणसाला गव्हर्नन्स म्हणजे नक्की काय हवे आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे. असा एखादा मूलभूत सर्वस्पर्शी प्रश्न मोदीनी हाताळला आहे असे मला तरी दिसलेले नाही.

In reply to by चौकटराजा

ही सर्व कनेक्शन शोधून रद्द करण्यात आली व आता त्यामुळे इंधनाचा पुरवठा नीट होत आहे.
जास्तीचे कनेक्शन तुम्ही पुरवठा नीट होत नव्हता म्हणुनच घेत होता ना ? नंबर लावलेले सिलेंडर वेळच्यावेळी उपलब्ध झाले तर कोणि जास्तीचे कनेक्शन का घेतील ?

In reply to by अर्धवटराव

दोन कनेक्शनात सामान्य कुटुंबाचे भागते.

In reply to by अर्धवटराव

असे जास्तीचे घरगुती कनेक्शन व्यावसायिक लोक घेतात. खरे तर त्याना व्यावसायिक दराने मोठे सिलिंडर मिळु शकतात. माझ्याकडे सिलिंडरच नाही. इंडक्शनवरच संसार सुरु आहे.

इन्स्टंट फक्त मॅगी असतं हितेश साहेब. सरकार आणि एवढं वर्ष ढिसाळपणे काम करणार प्रशासन कामाला लावणं हे सोप्पं काम आहे का? आणि महागाई कोणाच्या काळात वाढली? निवडणुकांनंतर पेट्रोल डिझेल चे भाव किती वाढले? लोकांचा आशावाद किती वाढला?

कॅप्टन जॅक स्पॅरोचं वाक्य चोरतोय.. इन्स्टंट फक्त मॅगी असतं हितेश साहेब.. तुम्ही जो ममोंचा आणि अंबानीचा फोटो दिलाय त्यावरुन ते कुजबूज करताहेत असं दिसतंय. अश्यावेळी दोन्ही व्यक्ती एकमेकांकडे डोकं झुकवतात. (जसे फोटोत दिसत आहे.)
एटीएम मधुन पैसे काढण्यालाही आता ५ प्रयत्नांनंतर चाजेस भरावे लागतील.
हे जुनंच आहे.. ज्यावेळी कुठल्याही / दुसर्‍या बँकेच्या एटीएममधून पैसे काढणे फ्री केलं गेलं, त्याच्या सहा महीन्यांच्या आतच हा ५ प्रयत्नवाला रुल आला.. बाकी चालू द्या..

In reply to by चिगो

अश्यावेळी दोन्ही व्यक्ती एकमेकांकडे डोकं झुकवतात. (जसे फोटोत दिसत आहे.) (सह्याद्रीसारख्या वगैरे) ताठ मानेचे आणि कणखर कण्याचे मराठी लोक कुण्णाकुण्णासमोर मान तुकवत नाहीत, तेव्हा हे असले शिष्टाचार आम्हाला समजतच नाहीत.

In reply to by चिगो

आपल्याच बँकेच्या ATM मधून एका महिन्यात पाच पेक्षा जास्त व्यवहार- इथे शिल्लक रक्क्म बघणे हाही एक व्यवहार धरला गेला आहे- केल्यास, पूर्वीही शुल्क लागू होत होते?

In reply to by असंका

दुसर्‍या बँकेच्या एटीएम मधून पाचपेक्षा जास्त व्यवहार केल्यास (ज्यात माझ्या माहितीप्रमाणे शिल्लक रक्कम बघणे पण धरल्या जाते) शुल्क लागू होते. हा नियम "इतर कुठल्याही बँकेच्या एटीएममधून विनाशुल्क पैसे काढा" नियम लागल्याच्या सहाएक महिन्यातच लागू झाला, असे स्मरते.. आपल्याच बँकेच्या एटीएममधून पैसे काढायला हा पाच व्यवहारवाला नियम नाही, पण डेली मॅक्सिमम विथड्रॉवल लिमीट आहे..

मेरे अच्छे दिन आयेंगे..... मेरे अच्छे दिन आयेंगे..... करन अर्जुन सारखं.

मथितार्थाशी सहमती आहे. युपीएसरकारहून वेगळे नी विशेष असे अजून तरी या सरकारने काही भरीव केलेले पोचले नाही. काही सुधारणा आहेत पण या वेगात व लेव्हलच्या सुधारणा युपीएतही होत होत्या. जरा लहान मंत्रीमंडळ वगैरे होते, ते ही आता राहिले नाही. कदाचित सरकारने खरंच काही विशेष केले नसेल किंवा मग माझ्यापर्यंत पोचायला वेळ लागेल. अजुन एक लोकसभेचे पूर्णांशाने येणारे हिवाळी अधिवेशन होईपर्यंत वाट पाहणे उत्तम. त्यात सरकारची प्राथमिकता व दिशा स्पष्ट होईल

मुळातला प्रश्न मग हा होतो की युपीए सरकारचे ६ महिने पूर्ण झाल्यावर इतका आरडाओरडा झाला होता का? त्या सरकारचेही समर्थक असतीलच - त्यांना कोणी विचारलं का? तर नाही. हे असले प्रश्न फक्त भाजप सरकारला विचारले जात आहेत.स्वत:ला सुजाण मतदार म्हणवणा-यांनी फक्त एकाच पक्षाला टार्गेट करणं हे चुकीचं आहे. मग गोध्रा हत्याकांड अजून चघळणा-या आणि नंदीग्रामवर मूग गिळून बसणा-या 'सिक्युलर'पत्रकारांमध्ये आणि आपल्यात काहीच फरक राहिला नाही असा अर्थ होतो.

In reply to by बोका-ए-आझम

युपीए सरकारचे ६ महिने पूर्ण झाल्यावर इतका आरडाओरडा झाला होता का
त्यांनी १०० दिवसात यंव करू आणि त्यंव करू अशा बाता मारल्या नव्हत्या म्हणून नाही झाला

In reply to by कपिलमुनी

त्यांनी १०० दिवसात यंव करू आणि त्यंव करू अशा बाता मारल्या नव्हत्या म्हणून नाही झाला
मला वाटते युपीएने १०० दिवसात महागाई कमी करू असे आश्वासन दिले होते. १९९१ च्या जाहिरनाम्यात काँग्रेसने सत्तेत येताच १०० दिवसात अन्नधान्यांचे दर जुलै १९९० मध्ये होते त्या दराला आणू असे आश्वासन दिले होते असे आठवते. मला वाटते की नरेंद्र मोदी सरकारचे पहिले ५ महिने १०० पैकी १०० मार्क देण्याच्या योग्यतेचे नक्कीच नाहीत. तरीही मी स्वतः ७५ पर्यंत मार्क देऊ शकेन. ७५ मार्कच का १०० का नाही हा प्रश्न रास्त आहे.अपेक्षा १०० काय १२० मार्कांची ठेवा आणि ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर टिका जरूर करा.पण तेच करताना इतर पर्याय १० मार्क द्यायच्याही लायकीचे नाहीत हे विसरले जाऊ नये ही अपेक्षा. आणि २५ मार्क कुठे गेले म्हणून टिका करताना मुळात २५ मार्कही मिळवू शकणार नाही त्यांना नकळत पाठिंबा दिला जाऊ नये ही काळजी घेतली की झाले.

In reply to by बोका-ए-आझम

पूर्वीच्या काळी मिसळपाव मायबोली नव्हते. त्या काळात सामान्य माणसाला व्यक्त व्हायला एकच ठिकाण होते.. पेप्रातली वाचकांची पत्रे.. सारकारबर टीका करणारी पत्रे , मजकूर लिहायला तेंहा तीच स्पेस अवेलेबल होती. लोक त्यातही लिहित होतेच. आज हे नवेन माध्यम आल्याने लोक इथेही लिहु लागलेत. त्यामुळे काँग्रेसविरुद्ध लिहित नव्हता , साठ वर्षे लिहित नव्हता , आताच का लिहिता , असा पोरकट राज ठाकरी बाणा बाळगु नये.

In reply to by hitesh

उदयन. मायबोलीवरचा नवा आयडी काय आहे ?

In reply to by इरसाल

उदयन. मायबोलीवरचा नवा आयडी काय आहे ?
अच्छा म्हणजे 'मी कधीच हवेत लिहित नाही' असे अभिमानाने लिहिणारे तेच का हे? बरं मग वाजपेयी अफझलला फाशी न देताच सिंहासन सोडून पळून गेले असे हवेत कसे काय लिहू शकले बाबा हे?असो. सध्या पंतप्रधान पिकनिकवर तीन देशांच्या दौर्‍यावर गेले आहेत.बहुदा हे पण पिकनिकच्याच मूडमध्ये असावेत :)

काँग्रेसनेही २००४ मध्ये India Shining वर टीका करताना आपले सरकार आम आदमी ची काळजी घेईल, आपण शेतक-यसंच्या आत्महत्या थांबवू,अक्षरधाम, संसदगृह हल्ला, IC ८१४ विमान अपहरण यासारख्या घटना होऊ देणार नाही अशी जबराट आश्वासनं दिली होती. त्यातली किती पूर्ण झाली यावर काँग्रेसचे पाठीराखे म्हणवणारे किंवा भाजप सरकारवर टीका करणारे काय म्हणतात ते ऐकायला उत्सुक आहे.

In reply to by hitesh

असं होय? सर्वांच्या ज्ञानात अमूल्य भर टाकल्याबद्दल आभारी आहे.मला तर वाटत होते की कसाब आणि अफझल गुरूला भारतीय कायद्याने फाशी दिले.तो गैरसमज दूर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

कसाब भारतात इतक्या सहजपणे येऊ शकला कारण तटरक्षक दलाची सुरक्षा नव्हती. १९९३ मध्ये झालेल्या मुंबई बाँबस्फोटांसाठी जे RDX वापरण्यात आलं ते सहजपणे भारतात येऊ शकलं. दोन्ही वेळी देशाति आणि राज्यात काँग्रेस सरकार होतं. हा योगायोग आहे? कसाबच्या गोळ्यांना तीन कर्तबगार पोलिस अधिकारी बळी पडले कारण बुलेटप्रुफ व्हेस्ट्स नव्हत्या. देशात संरक्षणमंत्री आणि गृहमंत्री हे काँग्रेसचे होते. त्याचा जाब त्यावेळी विचारला का कोणी? आणि जेव्हा कोणीही अच्छे दिन कहां है असं विचारतो तेव्हा तो हे मान्य करतो की आत्ताचे दिवस चांगले नाहीत. त्याला जबाबदार कोण? गेली १० वर्षे राज्य करणारे की गेले ५ महिने राज्य करणारे ?

In reply to by बोका-ए-आझम

हो का ? जेंव्हा अफजलगुरुनं फटाका फोडला तेंव्हा हिंदुत्वाचे शिलेदार वाजपेयीजी प्रधानसेवक होते. अफजलगुरुची केस कोर्टात नेऊन त्याला शिक्षा सुनावण्ण हे काम करायला त्याना तीन वर्षे लागली. त्यानंतरही त्याला फाशी न देताच ते सिंहासन सोडुन गेले. फाशीवर पक्के शिक्केमोर्तब आणि प्रत्यक्ष फाशी हे काँग्रेसच्याच कारकिर्दीत घडले. बरोबर ना ? तपशिलात चुका असतील तर दुरुस्ती करावी.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

नाही. मलाही तसेच वाटते...कोण असावेत बरे हे ?? ग्रेट्थिन्कर, नानासाहेब.... मात्र सर्वांच्या आई माईच आहेत.