Skip to main content

Blue Print

लेखक सुहास.. यांनी शुक्रवार, 26/09/2014 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
काल चेपुवरचा मेलबॉक्स फुल झालाय, आज सकाळपासुन मेसेजेस, गबोल्यावर काही चर्चा, काही मेल्स चालु आहे. मी शक्य तसा प्रयत्न करतोय उत्तरे देण्याचा !! काही अभिनंदन पर, काही प्रश्नार्थक, काही खोचक, काही उगा टवाळी करणारे, काही सिरियसली जाणुन घेणारे, काही मनात आधीचीच अढी असुन ही अभ्यासाने परिपुर्ण, अश्या अनेक जणांना उत्तरे दिली आहेत. सर्वात महत्त्वाचे .. मी मिपावर मनसेचा किंवा कुठल्याही पार्टीचा प्रचारक म्हणुन कधी च काही लिहीले नाही. मी मिपावर येतो ते एक मिपाकर म्हणूनच, चार मित्र भेटावेत ,त्यांच्याशी जीवाभावाच्या गप्पा व्हाव्यात, थोडी माफक करमणुक व्हावी , थोडसं वास्तव इतरांना ज्ञात करुन द्यावे ( अर्थात दुसरं काही येत ही नाही मला, ग्रास रूट लाच काम करु शकतो मी ! ) या शुध्द हेतुने येतो ! हा धाग्या काढण्याचे कारण म्हणजे L0 लेव्हलच्या काही प्रश्नांना उत्तरे देणे. L1, L2 आणि L3 प्रश्नांकरिता कृपया मला व्यनी, मेल , फोन करावा. मिपाचा युएसपी, मान राखावा हि नम्र विनंती ! अर्थात , ऑफीस काम, प्रचार, वैयक्तीक कामे ही मागे आहेत ..जस जमेल तसे उत्तर देईन ..आणी शिव्या ही खाईल ( तेव्हढा हक्क मनसेवर अपेक्षा ठेवणार्‍यांचा आहेच, अर्थात we are not superman हे ही लक्षात ठेवावे ) अर्थात अभ्यास नसलेले, केवळ बातम्या बघुन स्फुरण चढलेल्यांनी, टवाळ, पुर्वग्रहदुषितांनी कृपया दुर रहावे ही पुन्हा विनंती करतो.... माझा हेतु - पाच वर्षांत एक चान्स मिळतो आपल्या सर्वांना ! त्यानंतर साधारण १८२५ दिवस , ४४४४८ तास हात चरफरत बसावं लागत ! योग्य तो निर्णय घ्या..मनसे असो वा ईतर कुठला ही पक्ष !! तु कोण रे बाजीराव... माझ नाव सुहास , होय फक्त सुहास ..मी आडनाव सांगत नाही आणि जे आवर्जुन सांगतात त्यांना फाट्यावर मारतो. त्याला कारण आहे आणी कारण सर्वपरिचित आहे. मी कॉलेजला असतानापासुनच राजच्या विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होतो. एकुण चार कॉलेज अंडर मध्ये होती सक्रीय राजकारणात आहे ( मला बाहेर उभ राहुन वा एसी त बसुन राजकारण वा समाजकारण करता येत नाही ) तेव्हापासुन ते आजपावेतो म्हणजे एक महिन्यापुर्वी नौकरी धरल्याने मला सध्याचा पदाचा राजिनामा द्यावा लागला आहे. सध्या मी हॉरीजॉन्टल मध्ये आहे . काय आहे हॉरिजॉन्टल ते ही सागंतोच आहे !! इतर परिचय माझ्या लेखांवरुन आजवर झाला असेल असे मी गृहीत धरतो ( स्वतः ची लाल नव्हे परिचय ) who the hell is Raj Thakare ? हाच प्रश्न जया भादुरी ला पडला काही वर्षांपुर्वी ...असो ....सेनेशी कट्टर असताना हळु हळु सेनेच विभाजन व्हायला लागल्यावर बाळासाहेबांपर्यंत पोहोचायची मुष्किली आमच्यासारख्यांवर आली, रस्त्यात बरेच खड्डे लागायला लागले, पहिला सर्वात मोठा खड्डा होता संजय, इतर तर काही विचारुच नका दोन अडीज वर्षे एक ही अ‍ॅन्डॉसमेंट ( बाळासाहेबांच सही असलेले शिफारस पत्र ) आली नाही..तेव्हा कार्यकर्ते झुंडीने राज ठाकरेंकडे जात होते, एव्हाना राज ठाकरे राजकीय सन्यास घ्यायच्या तयारीत होते. अध्यक्ष म्हणुन उध्दवांच नाव ही त्यांनीच सुचविले..त्यांना विनंती करत होते, तेव्हा राज ठाकरे कार्यकर्त्यांना, आमच्यासारख्या, कार्यकर्त्यांना समजावयचे , अरे त्याला थोडा वेळ द्या करेल तो ..बरच नंतर बिघडत गेलं ..राज ठाकरेंनी शेवटी पक्ष बनवायचा निर्णय घेतला. ( त्यावेळी त्यांच्या कडे स्वतःसाठी काहीतरी करायच असतं तर गप एखाद्या लिडींग पार्टीमध्ये जावुन मंत्रीपद घेवुन आयुष्यभराची सोय लावुन घेतली असती )...पाठीहुन राजकारण !! मनसे आणि ईतर पक्ष कम्पेर मांडतो आहे, हे खेदकारक आहे माझ्यासाठी ही ! मोठ्या पवांरानी हातान घालवुन घेतलय , हे कोणी ही मान्य करेल, महाराष्ट्राची (जी आहे ती ) प्रगती आणि अधोगती दोन्ही पण या राजकारणी घराण्यामुळे आहे, जितके प्लॅनींग त्याच्या दुप्पट पैसै खाणे आणि अंगात असलेली मुसद्दीगिरी ..एक उदाहरण सांगतो , मागच्या वर्षी देशमुख साहेब सोलापुरसाठी प्यायला पाणी मागत होते, तो मुद्दा सफाईदार पणे कोर्टात ढकलला गेला , जेणे करुन उजनी पर्यंत पाणी पोचण्यास वेळ लागावा ! खर तर एका सही मध्ये तो पास करत आला असता ..कारण घडले नंतर जेव्हा पाणी सोडले गेले..तेव्हा ते दौंड च्या धरणात अडले) अडणारच होते. त्यांनतर चा त्यातले १० % उजनी पर्यंत पोचले आणी ते पोचेपर्यंत पाउस ही पडला ..चांदी झाली ती दौंड च्या शेतकर्‍यांची !! राज्याला प्यायला पाणी नव्हते आणि तिथे शेतकर्‍यांना उसाला देखील पाणी , यातुनच समजा कसा चालतो तो पक्ष ..मुंबईत या पक्षाच्याकार्यालयात सहा एका पाठी एक अश्या सहा रुम्स आहेत..यामध्ये शेवटच्या खोलीत पैशाचे व्यवहार मी माझ्या डोळ्याने पाहिले आहेत. दुसरा त्यांचा सहकारी पक्षातली मॅडम आली होती दुष्काळी भागाचा दौरा करायला , तिला डांबरी रोड दिसला ओला झालेला, तिच्या त्या इटालियन-हिन्दी अ‍ॅक्सेन्ट मध्ये " पाऊस तर आहे इथे " ऐकताना वाटल एक सट्टदिशी ....असो .....ढेकळ फुटली की नाही कळत नाही....प्रश्न च कळत नाही..उत्तर कधी शोधणार ? ..अजुन आहे भाजपा आणी सेनेविषयी ..पण ते कदाचित नंतर आता नाही .. मनसेचे दोन भाग केलेले आहेत ..एक सक्रीय आणि दुसरा असक्रीय ..हा असक्रीय भाग म्हण्जे हिमनगाखालचा शिखर आहे...खुप बुध्दीवंत, प्रामाणिक आहे, त्यात खुप मंडळी आहेत, सोशल वर्कर्स पासुन उद्योजकांची एक खुप मोठी फळी आहे गी ..हा विभाग विचार देतो ..टोल विषयक आधी अभ्यास या विभागानेच मांडला सुरु केला. अर्थात देवेंद्र आणी सोमय्या आरोप करत होते , पण तसा अभ्यास नव्हता तिथे...केवळ एक दोन कार्यकत्यांची पत्र आणि त्यानंतर जनजागृती सक्रीय गटाकडे आली ..त्यांचा आडत्यांमुळे निर्माण झालेले प्रश्न आणी त्याच सोल्युशन बघुन मी खुप ईम्प्रेस झालो होतो, सरकार येवो न येवो , हा मुद्दा डिसेंबर च्या सुमारास सुरु करणार आहोत ( डिसेंबर का ? आत्ताशी कुठ सक्रीय गटाकडे निवेदनाच्या कॉप्या गेल्यात , विभागवार ) पक्ष बांधायला आणि Blue Print ला वेळ का ? ..पक्ष स्थापनेचा ज्या दिवशी विचार पक्का झाला त्यानंतर दोन वर्षांनी पक्ष स्थापन झाला, स्वतः राजच्या भाषेत सांगायचे तर ..काय तमाशाचा फड काढत होतो का गणेश मंडळ स्थापन करत होतो ? असो ...जेव्हा पक्षबांधणीच काम सुरु झालं तेव्हा त्याचे सरसकट दोन भाग केले गेल , सक्रीय आणि असक्रीय ( यालाच हॉरिझॉन्टल म्हणतात ) ..असक्रीय हा केवळ वैचारिक बाजु संभाळणार असे ठरले..खुप नामवंत मंडळी आहेत यात, उद्योगपतीही आहेत ..हि लोक्स सदोदित राज ला सल्ले ,फॅक्स संवाद आणी वेळ पडली की कानपिचक्या ही देत असतात, हा विकास आराखडा मांडणारे तेच !! Primary Blue Print त्या आधी एक वर्षे ..होय वेळ लागतो , इतका कचरा आणि कॉम्प्लिकेशस करून ठेवलं आहे की विचारु नका ..बर झाल ते आरटीआय तरी आल , नाहीतर घोळच होता ..एक साधी माहीती ...माझ्या वार्डामध्ये दरिद्री रेषेखाली किती जनता आहे ? हे माझ्यापर्यंत पोचण्यासाठी पंधरा दिवस लागावेत असा लेखी नियम आहे फक्त .. वास्तवात तीन ते चार महीने लागतात , ते ही दहा वेळा फॉलो-अप केल्यावर !! काल ती Blue Print रिलीज होईपर्यंत त्यात आजवर साधारण १०२ वेळा सुधारणा झाल्यात. बरेच जण म्हणताहेत की ती विकास आयोजन आराखड्याची कॉपी आहे , त्यांना दंडवत सांगा आमचा ..या सरकारी (तेच आयोजन वाले) कर्मचार्‍यांशी भेट घालुन देतो मी ! ( पुण्यात इथं मागं लाल देवळापाशी ' राजधानी बार ' मध्ये भर दुपारचे सापडतील तुम्हाला !! ) प्रत्येकाला एक कागद द्या आणी म्हणा की माझ्या इथुन गटार आहे ते शाळेच्या गेट मधुन जाते, शाळेतल्या विद्यार्थांना तिथल्या ड्रेनेज चा त्रास होतो, ते तिथुन दुसरीकडे हलवण्यासाठी व शाळा ड्रेनेज मुक्त करण्यासाठी दहा बुलेट पाँईंट्स लिहुन द्या ...शप्पथ्थ ! लिहीले तर मी राजकारण हा शब्द देखील काढणार नाही तोंडातुन !! बर्‍याच सुचना आल्या आहेत त्यात , मी स्वता: मागच्या वर्षी पुणे ग्रामीण फिरुन माहीती आणुन पोचवली आहे ..हा केवळ आराखडा आहे .बॅक ग्राऊंडमध्ये impletation plan चे कामकाज केव्हापासुन चालु आहे ..केवळ मुंबईच शांघाय करु, मेट्रो २००१ ते २०१० ते २०२० ते २०३० पर्यंत करूच अशी काही प्रतिज्ञा नाही ..विश्वास ठेवा ती पुर्ण अभ्यासाअंतीच मांडलेली आहे माझ सरळ-सरळ मत अस आहे की . राज्य कारभार करता येत नसेल तर तो किमान पारदर्शक ठेवावा .. चुका ... होय ! गंभीर चुका झाल्यात मनसे कडुन , पण कार्यकर्ते ते पोचवत नाहीत असे काही नाही राज कडे , व्हेरी फ्रॅन्कली !! ..पोचवितात ...अगदी आता जी महापौरपदासाठी राष्ट्रवादीची मदत ई. ..उत्तर मिळतात ...ज्यांनी मदत केली ते पक्ष बदलुन मनसे मध्ये प्रवेशासाठी उत्सुक आहेत. आता राजिनामा देवुन, पुन्हा निवडुन येवुन मग पांठिबा देण्यापेक्षा तिथल्या स्थानिक मनसेने त्याला होकार दिला. निवडणुका पाठिशी लावायच्या नव्हत्या . आणि दुसर काय ते खासदारकीच्या निवडणुका ...त्यावेळी माझ्यासकट एक खुप मोठा गट होता जो म्हणत की खासदारकी ला उमेदवार देवुच नका. मोदींना पांठिबा द्या आणि संपवा ..दुसरा गट मात्र , विषेशतः मुंबईवाले त्यांनी मात्र पारंपारिक सेनेच्या किमान उभ रहाण्यासाठी तरी उमेदवार द्याच असा आग्रह धरला , मत विरोधात गेली ..माझ मत अस आहे की ती गेली मोदींमुळे, सेनेमुळे नाही .असो ..ही खरोखरच घोडचुक होती .... अर्थात त्यातुन ही बाहेर येवु ...मात्र पुन्हा एकदा सांगतो ..तुमच मत मग ते कोणत्याही पक्षाला असो ..देताना फक्त विचार करा ...चेपुवर आंजावर दोन चार विनोदांचा आधारावर जावु नका ..अगदी आप चं असल तरी ... अरे हो, Blue Print बद्दल अजुन ही काही प्रश्न असतील तर तुम्ही मला बिनधोक पणे p9373991526@gmail.com वा 9665185564 ( हा व्हाट्स अ‍ॅप चा पण नंबर आहे ) विचारु शकता वा मिपावर व्यनी करा ...इथे उत्तर देवु शकणार नाही, देणार नाही ( मी इथे एक मिपाकर म्हणुनच वावरू इच्छीतो ) धन्यवाद !

वाचने 51423
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

पेटली होती मुंबई राक्षस होते वावरत... आया , बहिणी, लेकरांना आश्रू नव्हते आवरत... कधी जाईल जिव कुणाचा कुणा काही कळेना... उभी होती मुंबईसाठी फक्त तेव्हा "शिवसेना".............. actually...राजसाहेब ही तेव्हा शिवसेनेतच होते..... बाकी...लिहिलेत खूप छान...

मी blue print मधले मला महत्वाचे वाटणारे तिन मुद्दे आरोग्य महिला धोरण आणी रोजगार. मुद्दे पटतात पण.. रोजगारवरील मुद्दे जरा गोलमोल वाटतात खासकरुन स्वंयरोजगारबद्दल.

इम्प्लिमेंटेशन प्लॅन आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशनची वाट पहात आहे. तोपर्यंत मतप्रदर्शन करण्यातही अर्थ नाही.

ब्लु प्रिंट छानच आहे. अम्मलबजावणी कशी होते ते बघू या. काडीमोडांमुळं कव्हरेज कमी मिळालं ह्याबाबत दु:ख वाटत आहे. तरीही ब्लु प्रिंट सगळ्यांपर्यंत पोचेल अशी अपेक्षा आहे.

मित्र सुहास, दोन वचने : बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले !!! आणि आधी केले मग सांगितले !!! ह्यापैकी पहिले वचन खरे होवो ह्यासाठी मनसे शुभेच्छा (निळप्रत)!!! दुसरे वचन अपूर्ण आहे त्याचा विसर न व्हावा हि दोस्तीखात्यातील मागणी (खळफट्याक - मी मराठी. टोलनाके, मराठी युवक/युवतीं रोजगार प्राधान्य ई.ई. ) कळावे, मित्र.

छान लेख ! विशेष म्हणजे आपण हे सगळ जवळून पाहिलं आहे हे फार चांगलं. मी अजिबात पूर्वग्रहदुषित नाही मला एखाद्या गोष्टीतले चुकीचे किवा दम नसणारे मुद्दे लवकर दिसतात एवढंच. आता तुम्ही म्हणले कि मी मिपा वर काही बोलणार नाही म्हणून मला पडलेले प्रश्न मी विचारात नाही. इ मेल आणि नंबर घेतलाय. निवडणुकीनंतर नक्कीच भेटून बोलायला आवडेल.

मनसेचे दोन भाग केलेले आहेत ..एक सक्रीय आणि दुसरा असक्रीय ..हा असक्रीय भाग म्हण्जे हिमनगाखालचा शिखर आहे...खुप बुध्दीवंत, प्रामाणिक आहे, त्यात खुप मंडळी आहेत, सोशल वर्कर्स पासुन उद्योजकांची एक खुप मोठी फळी आहे
या बुध्दीवंत आणि प्रामाणिक लोकांना राज ठाकरे यांच्या कार्यपध्दतीमध्ये आणि वक्तव्यांमध्ये काहीच वावगे वाटत नसेल तर मात्र गॉड सेव्ह महाराष्ट्र!!

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

या बुध्दीवंत आणि प्रामाणिक लोकांना राज ठाकरे यांच्या कार्यपध्दतीमध्ये आणि वक्तव्यांमध्ये काहीच वावगे वाटत नसेल तर मात्र गॉड सेव्ह महाराष्ट्र!!
+१११११११११११११११११११११

In reply to by विलासराव

असेच माझे देखील काहीसे मत झाले आहे, मनसेकडून मला खूप व चांगल्या गोष्टींची अपेक्षा होती. अजून ही पर्याय म्हणून मी त्यांच्याकडे पाहायला तयार होतो. पण, ज्याचा निवडणूक होण्याआधी विरोध केला त्याचाच सपोर्ट घेणे-देणे समजले नाही.

In reply to by विलासराव

मनसेकडून टोलचा प्रश्न मार्गी लागेल होते असं वाटलं. अनेक टोलवरुन त्यांनी माहिती मागितली. डेटा जमा केला पण त्यातून आउटपूट काहीच निघालं नाही हे सर्व महाराष्ट्रानं पाहिलं. प्रश्न निवडला की तो धसास नेला पाहिजे ते मनसेला जमल नाही. नाश्कात माझा मित्र आहे तो म्हणतो नाश्कात काही अपेक्षा होत्या लोकांच्या त्या अजिबात उतरल्या नाही. बाळासाहेबांचं नेतृत्त्व पाहिलेल्यां ना तोच वारसा नेणारा एक माणुस पुढे आला असे वाटत होते. धमाकेदार वकृत्व आणि तरुण कार्यकर्त्यांची फळी होती. शिवसेनेच्या नेतृत्वावर नाराज असलेले लोक मनसेकडून मोठी अपेक्षा बाळगत होते. एक मतदार आणि एक महाराष्ट्रीयन माणुस म्हणुन ते फार अपेक्षा पूर्ण करु शकले नाहीत, असे मला वाटते. दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरांच्या संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. सुरूवातीच्या काही वर्षांनंतर मनसेने त्यांच्याकडे अपेक्षेने पाहणार्‍या महाराष्ट्रातल्या लोकांचा अपेक्षाभंगच केला.

पण मोदीमुळे कार्यक्षम नेता कोणाला म्हणावे याचा न भूतो असा बेंचमार्क सेट झालाय आज महाराष्ट्राला स्वत:चा मोदी हवाय पण... कोंग्रेसकड़े पृथ्वी बाबा, राकों कड़े सहकार, सेनेकड़े सहानुभूती अन मनसे कड़े आहे Blue Print जनता गोंधळली नाही तरच आश्चर्य. यावेळी मतदान जोरात होइल % वाटत नाही.

संपादित

तर साहेब, मागच्या निवडणुकीतील ( सर्वच ) मनसे च्या निवडुन आलेल्या आणि न आलेल्या उमेदवारांबद्दल पण बोला की. तुम्ही आता अगदी आतल्या गोटातले आहात तर हे ही सांगा गेल्या ५ वर्षात मनसे नगरसेवकांची संपत्ती कीती वाढली ( दाखवायची नाही खरी खरी ). हे नगरसेवक पोटापाण्यासाठी काय व्यवसाय करतात? आम्ही १० तास काम करुन आम्हाला दर सहा महीन्याला नविन चारचाकी का घेता येत नाही, पण त्यांना कशी येते?

पुर्वी एका प्रतिसादात लिहीले होते जेव्हा पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या बायकोला मनसेने तिकीट दिले होते आणि राज ठाकरेंनी त्याचे समर्थन केले होते (बायकोच्या नावावर गुन्हे असतील तर बोला म्हणे) तेव्हाच ठाकरे मनातुन उतरले. आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल बोलायचे तर पिंपरी चिंचवडमधे शिवसेनेचे तर गुंडच आहेत. राष्ट्र्वादीचे गुंड भाजपामधे गेलेत आणि राष्ट्रवादीत नविन गुंड आले आहेत. माझा सध्याचा कल तर काँग्रेस (ही वेळ येईल वाटले नव्हते), मनसेने जर चांगला उमेदवार दिला तर मनसे नाहीतर NOTA. भाजपाने त्यांच्या चांगल्यासाठी ही कचरा भरती थांबवावी अशी इच्छा आहे. बाकी जर मनसेने २०+ वगैरे जागा काढल्या तर त्यांची भुमिकादेखिल महत्वाची राहील असे वाटते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

केजरीवाल नी घोळ घालुन ठेवला. महाराष्ट्राच्या निवडणुका लढवल्या असत्या तर एक ऑप्शन तरी राहीला असता.

मला आवडली ब्लू प्रिंट... मराठीत इतकी टेक्निकली परफेक्ट साईट मी बघितली नाही. मी काल काही मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिल्या होत्या त्याच वेबसाईटवर.... त्यांनी आज फॉलो अप केला त्यावर... फक्त हे थोडे आधी म्हणजे निवडणुका जाहीर झाल्या तेव्हाच व्हायला हवे होते... पण असो. त्यांना अपेक्षित यश मिळो :)

In reply to by सुहास झेले

या ब्लू प्रिंटमध्ये आपल्या राज्याच्या संबंधीत समस्या व विकासासंबंधीत एवढे सारे विषय त्यात आहेत की त्याचा जेवढा अभ्यास करू तेवढे आपले ज्ञान वाढेल. कदाचित हेच काम मनसेने २००९ च्या निवडणुकींच्या आधी पूर्ण केले असते तर अधिक प्रमाणात सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या असत्या. किंवा हेच प्रकाशन अराजकिय संस्थेकडून झाले असते तरीही फरक जाणवला असता. ते काहीही असो, स्वतःसाठी म्हणून का होईना जमेल तेवढा अभ्यास करण्यासाठी एक चांगले साधन आहे.

सुहास राव. बरे झाले लिहिलेत. या निमित्ताने मनसेच्या आतल्या गोटातील माणसाचे मनोगत कळले. सुरवातीला मनसे बद्दल प्रचंड आकर्षण होते, आदर होता. पण जसजसा वेळ जावू लागला तसा आदराची जागा गोंधळाने घेतली आणि शेवटी आत्ता या घडीला तो पक्ष माझ्या मनात ५ व्या क्रमांकावर आहे. तुम्ही म्हणताय कि मी निळ्या प्रती संबधीच्या प्रश्नांना इथे उत्तरे देणार नाही आणि तुम्हाला एक मिपाकर म्हणून रहायचे आहे. तर मग एक कट्टा का होऊ नये. समोरा समोर प्रश्न उत्तरे होतील…. इच्छुक मिपाकर हजेरी लावतील. मिपावरील कट्टाकिंग सद्या देशाबाहेर आहेत तरी कोणत्याही मध्यवर्ती ठिकाणी आपण भेटू शकू :) बाकी निळी प्रत बनवण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत दिसून येते. माहिती काढतानाच बऱ्याच वेळेला मूळ समस्या माहित होतात. व उपाययोजना अमूर्त स्वरूपात तयार होतात. बाकी अंमलबजावणी बद्दल अन्य मिपाकारांशी सहमत.
बॅक ग्राऊंडमध्ये impletation plan चे कामकाज केव्हापासुन चालु आहे
हे दिसायला पाहीजे. आजकाल तर न केलेली कामेसुध्दा आपल्या नावावर खपवण्याचा जमाना आहे.

पुणे जिल्ह्यातल्या दोन बेसिक चुका १) गजा मारणे आणी २) संदिप भोंडवे ? याबाबत काय स्पष्टीकरण देवु शकाल ?पुणे जिल्ह्यातले टॉप लेव्हलचे लेटीकेशन प्रॉपर्टी व इंडस्ट्रियल स्क्रप हा यांचा खरा व्यवसाय, आता तो कसा चालतो हे तुम्हाला सांगायची गरज नाही.

In reply to by बाबा पाटील

आवो साहेबानू ,त्येचा अन आमच्या ब्ल्यू प्रिंटचा कसला संबंध हो ? आणि माणूस चुकातूनच शिकतो हे खरे नव्हे काय? आपणास असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वत्ता इचारून सोडा कि उमेदवारांना !

चांगली माहीती दिली आहे सुहासरावांनी

प्रचंड मेहनत दिसून येतेय ब्लू प्रिंट मधे......

In reply to by नन्दादीप

नुसती (नक्कल+बेरीज) केलीय ही भाषणांची. आणी हे आम्ही न्हाई म्हणत, मिपाचे थोर्र्$थोर्र विचारवंत "सोका(व्)जी नाना सांग्त्यात म्हंजी कस खोटं असेल बरं? चांगल्याला चांगल म्हणण्याची दानत असलेला चावडी बाहेरचा पांढरपेशा(बिगारी)

म.न.से बद्दल खुप आदर आहे. लोकसभेत त्यांनाच मत दिले होते ( ठाणे - अभिजीत पानसे) राज साहेबांना एकदा भेटायचे इच्छा आहे, बघू या जमते का अमोल केळकर बेलापूर

मागच्या विधानसभेत मनसेलाच मत दिले होते. अबु आझमीला उचलुन बाजुला केल्यामुळे वांजळेंना दिलेले मत सार्थकी लागले. मात्र राज ठाकरे नुसतेच बोल बच्चन आहेत असे लोकांचे मत बनले आहे. ती छबी मोडण्यासाठी राज ठाकर्‍यांना बरीच मेहनत करावी लागेल. संधी कशी मिळणार हे मात्र कळत नाही. बाकी राज ठाकर्‍यांच्या टोल आंदोलनाचे काय झाले ते काही कळेना.

In reply to by मृत्युन्जय

संधी कशी मिळणार हे मात्र कळत नाही.
संधी नाशकात मिळालेली...पण तिथे मनसे बाकीच्यांपेक्शा वेगळी नाहीये हेच दिसून आलेय
बाकी राज ठाकर्‍यांच्या टोल आंदोलनाचे काय झाले ते काही कळेना.
मांडवली झाली...आता थोडा हिस्सा तिथे पण जातो

In reply to by टवाळ कार्टा

जे राज ठाकरे वेडावुन छगन भुजबळांची नक्कल दाखवत्र होते तेच भुजबळांच्या दारात लाचार होऊन उभे राहिले. कश्यासाठी ? नाशिक मधे कुंभमेळ्यासाठी भक्कम निधी येतोय ! त्यावर कुणाचीही पाणी सोडण्याची तयारी नाही !कितेक नगरसेवकांनी कोट्यावधी रक्कम खर्च केली आहे या निवडणूकीसाठी ! ती दामदुपटीने वसूल करायची आहे.... विचका करुन ठेवलाय यांनी नाशिकचा. आणि परत कसलीही लाज नाही. काही करता आले नाही तरी चालेल पण महापौराच्या खुर्चीवर बसुन रहायचे. आता कुंभमेळ्याच्या वेळी दिसेलच ! जनता नक्कीच पार्श्वभागावर लाथ मारुन हाकलुन देईल !

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत कोठे उल्लेख आहे? मराठी अस्मिता या टॅबमध्ये नाही काही. (मला सांगितले असते तर कंटेंट राईट करून दिले असते.) :-)

In reply to by पाषाणभेद

तुम्ही चांगलाच पाषाणभेद केला ! पण महाराष्ट्र स्वायत्त होणार सांगितलन त्यांनी ! मंग त्यात शिमा प्रश्न कुठून घुस्वायलेन तुमी ? तुमी कान्शेप्ट नीट करत असाल तर बोला भौ. त्याची गरज हाय.

ब्लू प्रिंट एक उत्तम डॉक्युमेंट आहे यात शंकाच नाही. ('कुठल्या एजन्सीकडून करुन घेतलाय' असा एक खवचट प्रश्न नकळत मनात आला - पण सध्या तो बाजूला ठेवला आहे.) शंका आहे ती अंमलबजावणी करण्याच्या मनसेच्या क्षमतेबाबत. गेल्या दहा वर्षांत दिल्लीचे युवराज आणि मुंबईचे राज, यांपैकी कुणी जास्त अपेक्षाभंग केला, हे ठरवणं अवघड आहे माझ्यासाठी. बाकी, बजबजपुरीचा फायदा थोडाफार होईल मनसेला यावेळी - असा अंदाज आहे.

एकदा राजदीप सरदेसाई ने जेव्हा राज ची मुलाखत घेतली होती तेव्हा राजने पुरेशी प्रगल्भता दाखवली नाही. त्यामुळे पत्रकारांचा एक मोठा वर्ग हा राज मधील अरोगन्स हा राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण मानू लागला. पत्रकार हे खवचट प्रश्न विचारत असतात. त्याचा शांत व संयमी पणे सामना करता यायला पाहिजे. राजमधील आक्रमकता ही एका बाजूला धडाडी असली तरी दुसर्‍या बाजूला ती लोकशाही मूल्याला घातक असते. मिडियाचा रोष घेतला की ते अनुल्लेखाने मारायला सुरवात करतात. मनसे ची अकादमी हा एक संघटनेचा सशक्त मुद्दा आहे.अनिल शिदोरे ते समर्थपणे सांभाळतात. सुहास च्या या धाग्यानिमित्त एक चांगली चर्चा होईल असे अपेक्षित आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रतापः http://deshgujarat.com/2014/09/29/rajdeep-sardesai-attacked-a-person-hi… अशा भाट्-छू-मंतर पत्रकारांमुळे मिडिया किती विश्वासार्ह आणि नि:पक्ष आहे हे समजायला जनता दुध खुळी नाही. बाकी नमोंनाही "राक्षस्/हुकुमशहा/रक्ताळलेल्या हाताचा" असे मिपावर चघळले गेले आहेच त्यामूळे राज वर टीका काही नवल नाहीच.

L0 ............. L1, L2 आणि L3 हे काय असते ? -अनभिज्ञ माहितगार

In reply to by माहितगार

हे थोड्याफार फरकाने सगळ्याच पक्षांत असते... ळ० म्हणजे ० पैसा खाणारे...ळ१ म्हणजे थोडासाच पैसा खाणारे...जशीजशी ळ चा नंबर तसातसा पैसा पण वाढतो

In reply to by माहितगार

मा. तं. प्रकल्पांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर रोजचा वापर सुरू असताना त्यावर लक्ष ठेवणार्‍या व्यक्तिंची वा चमूंची हे वर्गीकरण असते. L0 म्हणजे सतत लक्ष ठेवणारा पण त्या अंमलबजावणीचे केवळ वरवर ज्ञान असणारा. जेव्हा अचानक उद्भवलेली समश्या समस्या L0 सोडवू शकत नसेल तर L1 ला संपर्क केला जातो. तसाच क्रम L2 आणि L3 चा लागतो. L3 वाल्यांचे उपाय शक्यतो दीर्घकालिन उपयोगाचे पण वेळखाऊ असतात.

ते बाकि तुमचे ब्लुप्रिंट वगैरे ठिकाय हो...पण यावेळि तुम्हास येवढ्यावरच मत कस काय द्यायच ..?? प्रश्नच आहे हो.... शिंचे भाजपा वाले काय करुन राह्य्ले कळला का काहि...??? धणुष्यबाण मात्र वेगात सुट्णार यावेळी.....

In reply to by आसुड

या भांडणात शिवसेनेचा फायदा होणार हे नक्की ! अगदी कालपरवा नाडीची गाट। बांधता न येणारे सुद्धा निवडुन येतील ! नंतर काही करता येणार नाही या बाजार बुणग्यांना घेऊन पण पुढील पाच वर्षे वाया जातील हे नक्की ! तथाकथित पुढारलेल्या महाराश्ट्राची शोकांतिका होणार हे नक्की ! उगीचच जोड तोड करुन भाजपने सरकारन्बनवण्याचा प्रयत्नं करु नये !नाहीतर महाराष्त्राची दिल्ली होईल !

सगळे थेरॉटिकल लिहिले आहे.

घोर निराशा केली मनसेने, तरुणाई मोठ्या आशेने पहात होती मनसेकडे, पण यांनी दाखवून दिले कि आम्हीही काही वेगळे नाही.

मिपावर चाललेल्या एका चर्चेत कोणीतरी " शिवसेना भाजपाला तोडघाशीपाडण्यासाठीच मनसेची स्थापना झाली होती , ते काम २००९ मधे करुन झालय , आता त्यांचा काही उद्देशच राहिलेला नाहीये, ह्या २०१४ च्या निवडणुकीत मनसेचे अवतारकार्य संपेल व गाशा गुंडाळण्यात येईल" अशी भविष्यवाणी केली आहे . मलाही मनसेचे ह्या निवडणुकीत काय होते ह्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे . राजसाहेबांबद्दल प्रचंड आदर आहे पण त्यांन्च्या मागे सेकंड लाईन ऑफ लीडरशीप जवळपास शुन्य आहे ... यंदा अन पुढेही मनसेचे अवघड आहे असे वाटते पण महायुती तुटल्याचा नक्कीच फायदा होईल . असो. (अवांतर : तुम्ही मनसे समर्थक आहात हे पाहुन आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे हे जाताजाता नमुद करतु इच्छितो )

एक उदाहरण म्हणुन ह्या निळ्या पुस्तकातला "पिण्याचे पाणी" हा महत्वाचा प्रश्न बघितला. प्रश्न ठीक लिहीला आहे, "असे का होते?" हे पण ठीक आहे ( जास्त खोलात जायला नको ). पण जे फार महत्वाचे होते की मनसे कडे ह्या प्रश्ना साठी काय उत्तर आहे, त्यासाठी "काय करायला हवं" हा पॅरॅ बघितला आणि पार निराशा झाली. ह्या कुठेही छॉटासा सुद्धा Action Plan नाही. ही काही वाक्य बघा, हे इतके तात्विक आहे आणि सगळ्यांना माहीती आहे, पण मनसे सरकार त्या गोष्टी प्रत्येक्षात आणण्यासाठी काय करणार आहे, कधी करणार आहे आणि त्यासाठी काय काय बदलांची गरज आहे हे कुठेच नाही. ही मोठी मोठी वाक्य बघा
पाण्यावरील सामुदायिक मालकी मान्य करण्याची गरज आहे. ग्रामीण व नागरी भागातील स्थानिक भागीदार व सार्वजनिक क्षेत्राचे परस्पर सहकार्य तसेच त्यांच्या क्षमता बांधणीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सोडविता येणे शक्य आहे. त्यासाठी गावपातळीवरील गरज पडताळणी, नियोजन, अंमलबजावणी व संनियंत्रण इ. विविध टप्प्यात भागीदारांचा विशेषत: महिला, तरुण व समाजातील सर्व घटकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याच्या सुविधांवर स्थानिक जनतेची स्वामित्वाची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. हंडामुक्त महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी, गावातील वा शहरातील प्रत्येक कुटुंब, अंगणवाडी व शाळेला शुध्द, पुरेशा, सुरक्षित व शाश्वत स्वरुपातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागेल.
म्हणजे नक्की काय करणार? कधी करणार. त्याला खर्च कीती येणार, तो पैसा कुठुन येणार? ७ वर्ष अभ्यास केल्यावर इतक्या बेसिक गोष्टी तरी अपेक्षीत नाहीत का? आणि नंतर मलकापूर चे उदाहरण देण्यात आले आहे. जे आत्ताच्या शासनानेच राबवले आहे. पण तसे काही मनसे ने नाशिक मधे केल्याचे ऐकीवात नाही. पाण्याला मिटर लावावेत असेही कुठे तरी म्हणले आहे, नाशिक ला कीती मीटर लावले आत्ता पर्यंत. पुण्यात पण कधी मनसे ने ही मागणी केल्याचे ऐकले नाही.

माझे विचार आणि कल इथे सर्वांनाच परिचित आहे. अर्थातच मनसेचा मी काही समर्थक नाही हे माहिती आहेच. मात्र ब्लु प्रिंट आणि वेबसाईट बघुन माझ्या मनात आलेले विचार मी फेसबुक वरही मांडले आणि इतरत्र मराठी संस्थळांवरही. इथे मांडले तर योग्य त्या व्यक्तीपर्यंत माझा अभिप्राय पोचेल म्हणून चोप्य पस्ते करतोयः ====== बर्‍याच उशीरा का होईना मनसेने महाराष्ट्राच्या विकासाची ब्लु प्रिंट सादर केली आहे. संपूर्ण आराखडा इथे वाचता येईल. मी बर्‍यापैकी मुद्दे वाचले, माझे मतः १. आतापर्यंत कोणत्याही पक्षाने इतकी स्वच्छ, तपशीलवार व आकडेवारीसह विदा प्रस्तुत करून आपली भुमिका मांडलेली मी बघितलेली नाही. चुकीचे ऐतिहासिक संदर्भ ते हवेत मारलेले तीर ते बाष्कळ दिग्विजयी बडबड प्रचलित असणार्‍या काळात अशी मांडणी, कंटेन्ट सारेच सुखावह आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्याबद्दल माझ्यातर्फे मनःपूर्वक अभिनंदन! अतिशय स्तुत्य पायंडा आहे. २. अनेक विषयावर मांडलेली मते व त्यासाठी दिलेला विदा वाचनीय आहे. (त्यातील प्रत्येक मताशी सहमती असेलच असे नाही, पण किमान भुमिका मांडलेली आहे) ३. प्रत्येक विषयात मनसेची प्रस्तावित योजना व त्या मागची कारणमिमांसा आहे. प्रत्येक योजना थोर्थोरच आहे असे नव्हे पण बर्‍यापैकी तपशीलात दिली आहे. नुसते बुलेट पॉइंट्स नाहीत. ४. संस्थळाची मांडणी, रंगसंगती वगैरे वेधक व सुंदर आहे. नॅविगेशन सोपे आहे. एक नव्या व दमदार सुरूवातीसाठी मनसेला मनसे शुभेच्छा! प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढणार असल्याने मनसेलाही कमी संधी नाही

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश, आपला वरील प्रतिसाद निवडणुकीपूर्व होता. विधानसभेच्या निवडणुकीत मनसेची जी वाताहात झाली ती पाहता लोकांना चकाचक महाराष्ट्र नकोय असं नव्हतं, ब्ल्यु प्रिंटमधे स्वप्नांचे मनोरे होते शिक्षण, रोजगार, पर्यटन, उद्योग, पायाभूत सुविधांचा विकास अशा खुप गोष्टी होत्या पण सर्वात मुख्य एकच गोष्ट होती ती म्हणजे या गोष्टी घेऊन कोण येतंय. लोकांचा राज ठाकरें यांच्यावरील काही सामाजिक प्रश्न तडीस न नेल्यामुळे विश्वास उडाला होता. नवीन मुद्दे राहीले नव्हते. गल्लो गल्ली मनसेचं ’काय खरंय’ अशी भाषा बोलली जात होती. पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही गेल्या काही वर्षात स्थानिक पातळीवर लक्षवेधक कामे केलेली दिसली नाही. नेतृत्वातही तो कस नव्हता. साहेबांनी बोलून सत्ता आणल्या तसं दिवास्वप्न आता कोणत्याच नेतृत्वाने पाहु नये. आणि म्हणुन मला वाटतं ’ब्ल्यु प्रिंट’ ना सुशिक्षित लोकांवर प्रभाव पाडू शकली ना अशिक्षित लोकांना उत्कंठा वाटावी असं काही त्यांच्याकडून घडलं. मनसेला आता एक तर ’हिंदु्त्व’ नै तर शिवसेनेत विलिनीकरण असा काही तरी लोकांच्या मनावर राज्य करणारा पर्याय आणावा लागेल आणि असंच काही झालं तर भविष्यात त्यांना काही संधी आहे, असं वाटतं नै तर मनसेचं काय खरं नाही. सत्तेच्या जवळ जाऊ शकत नाही ना ना सत्तेत असणा-यांवर काही ते प्रभाव टाकू शकतील. आणि हीच अवस्था राहीली तर हा पक्ष असा एकटाच राहील आणि निवडुन येणारे स्वबळावर एकटे दुकटेच निवडून येतील असेच वाटते. भविष्यात काय तरी धाड्सी निर्णयाशिवाय सध्या तरी त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही, असे मला वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्ल्यु प्रिंटमधे स्वप्नांचे मनोरे होते शिक्षण, रोजगार, पर्यटन, उद्योग, पायाभूत सुविधांचा विकास अशा खुप गोष्टी होत्या
विविध ब्रोकरेज हाऊसेस वेगवेगळ्या क्षेत्रांविषयी मधूनमधून असे रिसर्च रिपोर्ट प्रसिध्द करत असतात. असे १०-२० रिपोर्ट एकत्र केले की ब्लू प्रिंट बनवून ती आपल्या नावावर खपवता येणे फार कठिण नाही.मनसेने असेच केले आहे की नाही हे मला माहित नाही आणि केले असले/नसले तरी त्यात मला स्वतःला अजिबात इंटरेस्ट नाही.तरीही मनसे या पक्षाविषयी तो पक्ष कोणत्याही प्रकारचा अभ्यास करून काहीही विधायक करू शकेल अशा स्वरूपाचा विश्वास अजिबात वाटत नाही. आणि स्वतः आकंठ दारूत बुडलेल्या माणसाने दारूबंदीविषयी लेक्चरबाजी केली तरी 'कोण बोलत आहे' याकडे अजिबात लक्ष न देता 'तो काय बोलत आहे' याकडेच लक्ष देण्याइतका मी तरी भाबडा नाही. असो.
पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही गेल्या काही वर्षात स्थानिक पातळीवर लक्षवेधक कामे केलेली दिसली नाही.
नाही कशी? अमक्याचा गळा घोटू, तमक्याच्या नरडीचा घोट घेऊ,भय्यांचे तंगड तोडू याप्रकारची भाषा तुम्ही कधीच बघितली नाहीत याचेच आश्चर्य वाटत आहे. मनसेवाल्यांचे लक्षवेधक काम केवळ इतकेच.
भविष्यात काय तरी धाड्सी निर्णयाशिवाय सध्या तरी त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही, असे मला वाटते.
राजकारणात काही 'बेलवेदर' लोक असतात.म्हणजे एखादी गोष्ट चांगली आहे की नाही याविषयी आपल्या मनात काही संभ्रम असेल तर अशा लोकांची मते एखाद्या दीपगृहाप्रमाणे दिशादर्शनाचे काम करतात.अशांनी एखाद्या गोष्टीवर टिका केली तर ती गोष्ट बहुदा चांगलीच असते. अशा बेलवेदर लोकांमध्ये कम्युनिस्टांचा नंबर कोणी हिराऊन घेईल असे वाटत नाही.आणि दुसरा नंबर नक्कीच मनसेसारख्या गुंड पक्षाचा आणि त्या पक्षाच्या समर्थकांचा लागतो (माझ्या मते). या दिशादर्शक दीपगृहांचे स्थान भारतीय राजकारणात अगदी थोडेसे किंवा कमी महत्वाचे असले तरी कायम रहावे असेच मला वाटते :)

In reply to by क्लिंटन

च्यायला, तुम्ही काय पक्ष बंद करायला निघालात का काय ? एक गोष्ट चांगली बोलत नै तुम्ही ? मनसेनं भविष्यात काय करावं वगैरे ? बाय द वे, बुडत्या जहाजात कोणाची बसायची तयारी दिसत नै. नाश्कात १८ नगरसेवक आणि २०० पदाधिका-यांचे राजीनामे...अरेरे कुठे चालला हा पक्ष. कार्यकर्त्यांनाच ब्ल्यू प्रिंट समजली नै वाटतं.. देवा, बघ रे ज़रा मनसेकड़े आता तुच काही करू शकतो ! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, तुम्ही काय पक्ष बंद करायला निघालात का काय ?
छे हो. मला तर मनसे कोपर्‍यातला एखादा पक्ष म्हणून चालू राहिलेलाच हवा आहे. पूर्वी दूरदर्शी पक्ष होता त्याप्रमाणे :)
अरेरे कुठे चालला हा पक्ष.
काही कल्पना नाही. बहुदा कृष्णकुंजमध्येच असावा :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषि आता काय मत आहे ?
माझे मत अजूनही तसेच आहे. सदर ब्ल्यू प्रिंट हा वाचनीय दस्ताऐवज आहे व इतर कोणत्याही पक्षाने निवडणूकपूर्व काळात मांडलेल्या डॉक्युमेंट्सपैकी सर्वात व्यापक मुद्दे कव्हर करणारा तसेच तपशीलवार आकडेवारी देणारे डॉक्युमेंट अन्य वाचनात आले नाही. आता यावर आधारीत मत द्यावे का? वगैरे प्रत्येक मतदाराचा वैयक्तिक प्रेरॉगेटिव्ह आहे. त्यानुसार (माझ्यासकट अनेक)मतदारांनी हक्क बजावला आणि बहुमत समोर आहेच. बहुमताने एखाद्या पक्षाला नाकारले / स्वीकारले नाही म्हणजे त्याने सादर केलेला दस्ताऐवज लगेच बेकार होतोच असे नाही.

In reply to by ऋषिकेश

हा हा हा हा , लय शोधुन- शोधुन प्रतिसाद देणं चाललय ! तुम्हाला माझ्या कडुन विष्लेशन पाहिजे पानिपताच ...आमची चा आमची नोट पाचची होती हो ! मान्य करतो, फाटली ती नोट , पण तुमची तर १००० ची नवी कोरी होती , ती का फाटली , आधी पोट निवडणुका झाल्या राजस्थान आणि गुजरात मध्ये कॉंग्रेस निवडुन आले की , उत्तरे मध्ये सपा ला जास्त जाग्या मिळाल्या तुमच्या पेक्षा , त्याच विष्लेषन तर सोडा उन्माद च संपेना, यशाने हुरळुन गेलेल्या पक्षाला , कुबड्या वापराव्याच लागण्यार आहेच , कोणा एका तरी एकाच्या कुबड्या घ्याव्याच लागणार आहेत , मग कोणाच्या घेणार, ज्यांनी तुम्हाला अफजला खान म्हटले त्याच्या की ज्यांना तुम्ही करप्ट पार्टी म्हणत होतात त्याच्या ? हाईट म्हणजे , माझ्या पक्षाचा एकच निवडुन आलेल्या ला ही तुम्हाला विचारावं लागल, माणुस खरच शेर निघाला, भर कॅमेर्‍यासमोर , नाही म्हटला , हे ही म्हटला की हार-जीत चालुच असते !! ( किती एकत असतील राज च ? ) ! तुमच्या सारखं नाही , महाराष्ट्राचा भले होण्यासाठी आम्ही एकत्र येवु ... राहिली गोष्ट आंदोलनाची , मनसे हा एकच पक्ष आहे , जो आधी निवेदन देतो , प्रशासकीय अभ्यास करावा लागतो त्यासाठी , दिसेल त्याच्यावर आरोप करत नाही , जनतेची लुट चालु टोल च्या नावाने , त्याही वेळेस तेच केले होते, तुम्हाला माहीत नसेल तर अभ्यास वाढवा , कधी ना कधी त्या प्रकरणात ल सत्य बाहेर येईलच !! आज मिडियाचा ही रोष आहे आमच्यावर , कारण त्याला उथळ पत्रकारिता आवडत नाही ... @ बिरुटे सर, काळजी बद्दल धन्यवाद , अ‍ॅक्शन हॅज अलरेडी बिन टेक , जोवर सरकार चुका करत असते, अस्मितेवर घाला घालत असते , छोटे पक्ष , जिवंत रहातात , पण ज्यांच्या बरोबर आठवलें सारखा राजकीय मर्कट असतो , ते. स्वःता काहीतरी अद्भुभुत केलेय असे समज असणारे मोठे समजणारे पक्ष संपतात हा आजवरचा इतिहास आहे ..

In reply to by सुहास..

माफ करा पण आपला प्रतिसाद खूपच भाबडा आणि pointless आहे. हे म्हणजे माझ्या पेक्ष्या दुसरा किती वेडा आहे हे दाखवण्या सारखे झाले. ज्या पक्षाला जास्त जागा मिळतात तो पक्ष definitely मोठाच आणि त्यालाच जास्त जनाधार हे लोकशाही चे कटू सत्य आहे. जेंव्हा congress majority मध्ये होता तेंव्हा हि हेच कटू सत्य होते. मी कल्याण चा आहे आणि मला वाटते कि KDMC मध्ये मनसे आज विरोधी बाकांवारती बसला आहे. been in opposition is also a great responsibility. आज काय दिसते? SS, BJP, congress & MNS सगळे मिळून लूटच चालू आहे. :(

In reply to by सिद्धार्थ ४

तुम्हाला , जे म्हणायचे आहे तेच मला म्हणायचे आहे , पण छोट्याला अजुन छोटं दाखविण्यात काय मोठेपण मिळते आणी काय असुरी आनंद मिळतोय काय म्हणावे , राज ची ही बाजु घेतलेली नाही मी अजुन ..काय झाले ते कोणाला माहीत नसावे , तुम्ही करणार ते विश्लेषण आणि मी केले तर अ‍ॅन्टी-मोदी ...आणी देयर ईज नो its not a party with a difference , it's just a party !! ( आणि मला हक्क नाही का, मी आधी ही सांगीतलय , मी व्होट दिलयं लोकसभेला, घरातील सहा मते होती , वाटुन घेतलीत ) चुक दाखविली तर गैर काय ब्वा , मी व्यक्तीची पुजा करत नाही , पॉलीसी ची करतोय ...हे नमोरुग्नांच्या लक्षात येत नाहीये ...केडीएमसी त विरोधी बाकांवर आहे ना ? जेव्हा भाजपाचे नेते विरोधी पक्षात असतात, तर त्यांचा परफॉर्मन्स बघताय ना , मग फडणविसांच्या प्रश्नावर मला अजुन उत्तर दिले नाही इथे कोणी ? पुर्ती मध्ये शरद पवार आणि गडकरी याचीं भागीदारी वर कोणी दिलेले नाही ? मुद्दे टाळायचे , त्यावर उत्तर द्यायची नाहीत , मग दुसर्‍याला नावे ठेवणे म्हणजे शेण स्वःता खायचे आणि दुसर्‍याच्या तोंडातुन वास येतोय असे म्हणण्यासारखे .!

In reply to by सुहास..

तुम्ही खूप वयक्तिक घेत आहात. मी पण so called कुणाचा पंख नाही, पण मोदी जे करत आहेत ते मला खूप positive feel देतो. काहीतरी खरच चांगला बदल घडेल असे वाटते. (हेच तेंव्हा हि वाटले होते जेंव्हा MNS form झाला होता, पण आज इतक्या वर्ष नंतर खरच स्वप्नभंग झाल्या सारखे वाटते) मोदिनी पुढ्या ५ वर्षायात काही केले नाही तर मी आज जे MNS साठी बोलतो आहे तेच बोलीन (आणि मग आपल्याला खरेच Congress शिवाय काही पर्याय नसेल) (आणि काय हि तुमची भाषा ? मला वाटते म्हणूनच SS & MNS अजून हि जनासामाजात अजून पसरली नाही आहे, हे तुम्हाला वयक्तिक नाही पण आज काल कुठलाही नेता नुसते दुसर्यांच्या चुकांवर बोट ठेवतो आणि नुसती टीका करतो हे पटत नाही. आणि म्हणूनच मोदी वेगळे वाटतात. इथे जेंव्हा आले होते तेंव्हा मला आमच्या security न पण थांबून विचारले होते के हे कोण आहेत? that was a proud moment)

In reply to by सुहास..


आमची चा आमची नोट पाचची होती हो ! मान्य करतो, फाटली ती नोट , पण तुमची तर १००० ची नवी कोरी होती............... प्रिय सुहास आत्तापर्यंतचे तुमचे सर्व प्रतिसाद वाचतोय त्यात तुम्ही जे मनसेचं सोडुन दुस-बद्दल बोलताय तेच मुळात चुकतंय. मनसेबद्दल तुम्ही स्वत:च बोलायला धागा काढलाय तेव्हा दुस-याने काय केले ते मुद्दे गैरलागु आहेत. मनसेनं काय केलं ? मनसेच्या पनिपताचं योग्य कारण ? मनसेच्या भविष्यातल्य वाटा ? मनसेची अवस्था ? नेतृत्त्व ? विश्वास ? ब्ल्युप्रिंट ? भाषा ? उणिवा, प्रचारातील मुद्दे याबद्दल अजुनही तुम्ही मोकळेपणाने बोललेला नाहीत आणि कार्यकर्ता म्हणुन तुम्हाला ते जमणारही नाही, असं वाटतं. आणि तुमच्याकडुन तशी अपेक्षा करणं आता जवळ जवळ मी सोडुन दिलंय. मनसेला विकासाचं एक उत्तम मॉडेल बनविण्याची नाश्कात संधी होती. संपूर्ण महाराष्ट्र नाश्कात काय घडतं त्यावर लक्ष ठेवून होतं तुमच्या नेतृत्वाला तिथे विकासाचा कोणताही कस लावता आला नाही. महाराष्ट्रात सर्वात अगोदर नजरेत भरवणारी साथ मनसेला कोणी दिली असेल तर ती नाश्काने दिली तिथेच तुम्ही पहिली बाजी हरलात. महानगरपालिकेत तुम्ही काही पदांच्या मोहापाई तुम्ही शिवसेना- भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली. ( महिला व बालकल्याण उपसभापतीपद ) मुळात पक्षाला अजुन कळलंच नव्हतं की आपण स्वतंत्र राह्यचं की कोणाकडे जाऊन भांडीकुंडी घासायची. आणि मनसेचे पाय असे चिखलात रुतत गेले. नगरलाही तुम्ही महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीपक्षाशी घरोबा केला. औरंगाबादमधे जिल्हापरिषदेत तुम्ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी बरोबर संसार थाटला. कोणतीही स्वत:बद्दल ठोस भूमिका न घेता सत्तेशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात मनसेने स्वत:चे अस्तित्व असे हळुहळु गमावले अतिशय बेसलेस भूमिका गेल्या काही वर्षा बघायला मिळाली आणि तुमची ब्ल्यु प्रिंटही तुम्हाला कुठेच वाचवू शकली नाही. त्याचा निकाल संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला. सत्तेसाठी राष्ट्रवादीबरोबर घरोबा करायचा आणि जाहीर भाषणात शिवसेनेला नावं ठेवतांना आपलं नेतृत्व लोकसभेच्या भाषणात म्हणत होतं '' एकीकडे शरद पवार यांच्याशी चुंबाचुंबी करायची, तर दुसरीकडे उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून लाई चना आणि उत्तर प्रदेश दिन साजरे करायचे, हा मराठी माणसांचा विश्वासघात नाही का? '' अरे सत्तेसाठी चुंबाचुंबी कोणी केली, हे आता सर्वांना कळलं आहे. बाकी राहीली आमच्या अभ्यास वाढवायची गोष्ट. आमचा अभ्यास जेमतेमच आहे पण मनसेबाबत आता चांगला झाला आहे. आपल्या मनसेने राज्यात एकूण ४० ठिकाणी टोलबाबत माहिती संकलन केली काही मुद्दे आजही आपल्या सायटीवर बघायला मिळतात एकच मला सांगा मनसेने आणि त्यांच्या आमदारांनी विधानसभेत टोलबाबत भूमिका बदलली पाहिजे यासाठी नजरेत भरतील अशी कृती केली. (आमच्या आमदारांनी प्रशांत बंब यांनी लासुर रोडावरील रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे स्वतः तुरुंगात गेले आणि कागदोपत्री अभ्यास करुन तो टोल बंदच केला) आपल्या मनसेच्या आमदारांनी अशा किती अनाधिकृत टोल बंद करण्यासाठी पुढाकार घेतला. मनसेची गाडी आहे म्हणुन कितीतरी कार्यकर्त्यांनी टोल चुकवला हेच आपल्या आंदोलनाचे यश म्हणायचे का ? लोक साटं लोटं झालं म्हणतात त्याबद्दल माझ्याकडे काही माहिती नाही, त्याबद्दल मला बोलायचं नाही. कोणत्याही प्रशासकीय आंदोलनासाठी अभ्यास करावा लागतो ही गोष्ट मान्य. मनसेने किती आंदोलनाचा अभ्यास केला आणि किती आंदोलने यशस्वी केलीत. माझं निरिक्षण असं आहे, कोणत्याही आंदोलनाची हवा करायची आणि ते आंदोलन अर्धवट सोडायचं हाच एकमेव उद्योग मनसेने केला. दुकानाच्या पाट्या मराठीत लावा. (काही दिवस हवा केली सोडलं अर्धवट), मराठी भाषा अभ्यासक्रमात आवश्यक विषय असावा म्हणुन आपण शाळा महाविद्यालयांच्या संस्थाचालकांना पत्रे लिहिलीत. शाळा आणि महाविद्यालयामधे भाषा अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी अभ्यास मंडळे असतात आणि अभ्यास मंडळाच्या सदस्यांना शासनाने असा विषय अभ्यासक्रमात समावेश करावा असे शासनाने निर्णय घेतला पाहिजे त्यासाठी आमदारांनी मुख्यमंत्र्यावर दबाव आणला पाहिजे, यातली कोणती कृती आपल्या आमदारांनी केली. मुळात भाषा अभ्यासक्रमात समावेश करावी यासाठी संस्थाचालकांना पत्रे लिहिणे हेच मुळी हास्यास्पद होतं. हा मुद्दाही नंतर बाजुला पडला. रेशनकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, टॅक्सी-रिक्षाचे परवाने या बाबत बाहेरच्या लोंढ्याला रोखून नियमांची अंमलबजावणी व्हायला हवी यासाठी नुसती भाषणं केली. मला वाटतं टॅक्सी रिक्षा परवाने स्थानिकांना दिलं पाहिजे यासाठी काही दिवस आंदोलने केली आणि तेही अर्धवट सोडलं. सुहास एक नै शंबर गोष्टी मनसेने अशा अर्धवट सोडल्या. अजून एक गोष्ट सांगतो साहेबांना वाट्तं आपलं भाषण उत्तम होतं. लोक ऐकायला येतात. लोक ऐकायला येतात म्हणुन तुम्ही त्यांना काहीही बोललं पाहिजे का ? लोक गर्दी करतात, घोषणा देतात ते त्यांच्यावरील प्रेमाने त्यांच्यवर राग व्यक्त करण्यासाठी नाही. अतिशय मगरुरी वागण्यात दिसते. एक उदाहरण आठवलं आमच्या संभाजीनगरात कै. बाळासाहेबांचं भाषण होतं. सभेला ही गर्दी, नुसत्या घोषणा, साहेब भाषणाला उभे लोक आवरेचना. साहेब काहीच बोलले नाहीत नुसते शेतकर्‍यासारखी जागीच बैठक मारली दहा मिनिटे साहेब बोलले नाहीत आणि नंतर ते मैदान टाळ्यांनी दनाणुन गेलं. आपल्या साहेबांसारखे पाच मिनिटात व्यासपीठ सोडून गेले नाहीत. जाऊ द्या मनसेवर किती अन काय बोलणार. आणि आपल्याकडून कोणतही अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण येणार नाही, हे मला एव्हाना कळलं आहे. आता आडात नै तर पोहर्‍यात कुठून येणार. असो, लिहिण्यासारखं खुप आहे पण थांबतो. -दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Now this is really ridiculous !! हे सगळ अनुमान कशावरून काढलत आपण , मी आधी पासुन सांगतोय मला प्रशासन , मिडिया आणि राज आणि मी , या अनुषंगाने डिट्टेल मध्ये लिहायचय , मग तुम्ही कुठुन काढलात ? बातम्या वाचुन ? मी पक्षात काम करतोय दहा वर्षे !! एक दोन वर्षे नव्हे, तुम्ही नाही !! आणि लिहीणार होतो कारण रिक्वेस्ट आली होती, तुम्हाला कोणी विचारणा न करता , राज ने अपेक्षा-पुर्ती न केल्याने , राग काढायचा प्रयत्न केलाय आणि तुमची अनुमान काढण्याची पध्दत , रादर , मला वाटत, सवय हे तुमच्याच एका वैयक्तीक आठवणीने काढुन देतो तुम्हाला !! आठवा, मी रहायचो गंगापुर ला , पण 'कहार' समाजा विषयी मला नीटशी कल्पना नव्हती , एक दोनदा कायगांव टोक्याच्या मंदीरात गेलो होतो , पण, मंदीरात चक्कर मारून परत आलो. मामा वारले तेव्हा अस्थी- विसर्जन करायला गेलो तेव्हा पाहिलं ! इतके हाल !! एक वयात आलेली मुलगी, आपल्या भावाबरोबर अतिशय भिकार अवस्थेत, संपलेल्या जेवणाचा उष्टावळ कॅरी-बॅग मध्ये भरत होती , पलीकडे . पाणी कमी झाल्याने नदीकडेच्या घाणेरड्या गाळामध्ये, एक वयस्कर स्त्री छातीपर्यंत बुडुन हातात चाळणी घेवुन गाळ चाळत होती , मला अस्स कसतरीं झाल पाहुन !! मी तुम्हाला फोन लावला, विचारले, कोण आहेत ही लोकं ? तुमचं वाक्य काय होतं आठवतय का ? " हॅ हॅ हॅ !! , शंभर एक रू गोळा करतात त्या बायका " सॉरी फॉर द लग्वेज बिरुटे सर बट दिस इज बुलशीट !! ही तुमची एखाद्या विषयी अनुमान काढण्याची पध्दत , आठवा , मी नेटवर्क कट होतयं कट केला होता .....be a studious man, but Dont be a judge mental !! नसेल जमत तर सांगा , मी या धाग्यावर ही स्पष्ट लिहिले आहे की , मला मिपाकर राहु दे , मला इथे चर्चा नाही करायची, प्रश्न असतील तर व्यनी त विचारा , नंबर ही दिलाय ....पाण तुम्हाला बघतोय मी , भाजपा विषयी लिहिले तर , स्कोर सेटल करण्यासाठी ( एक संपादक असुन ही ) शोधुन शोधुन प्रतिसाद देताय , ते ही कोणाच्या जोडीला ? जे स्वःताच साधं नाव देखील जाहीर करीत नाहीत . स्वंय घोषीत राजकीय विश्लेषक म्हणे !!! एक दुसरा भाजपा समर्थक आहे इथे ! त्याच जर का सांगीतले ते तर लोक्स शेण घालतील त्याच्या तोंडात !! पुण्यात झालेल्या बलाक्ताराच्या चर्चेवर , कट्टा चालु असताना प्रतिक्रिया सांगु का ..............." तिला पन मजा आली असणार " मला माहीत आहे , बातम्या आणि दोन चार लेख वाचल्यावर लोक्स थेरॉटिकल गोष्टी लक्षात घेत नाहीत , मग , मी जेव्हा भाजपा च्या विरोधात, त्यांना दोन पक्षा पैंकी एकाची कुबडी लागणार आहे हे वास्तव का लक्षात घेत नाहीत, उलट मनसे च सांग, मनसे च सांग , भाजपा विरोधी बाकांवर होती तेव्हा बोलत नव्हती का ? मौनीबाबाला चोर म्हणे पर्यंत मजल गेली होती ना , मग मी का विचारायचे नाही ? एकाने तर पार पगार विचारला माझा, सांगु का ? मला इतरांच काही घेणे - देणे मालक, पण तुमच्या सारख्या एरवी बॅलन्ड माणसाकडुन ही अपेक्षा नव्हती ...( It's Not A Flattery !! ) तुम्हाला काय वाटते , जे तुम्ही विचारताय , मी विचारत नसेल राज ला , की टोल च काय झाल ? तुम्हाला काय वाटते, तेव्हढा बुळा आहे मी ? , तुम्हाला काय वाटते जो राज येव्ह्ढा हुशार आहे की अंबानी ला एक फोन करतो तर गोदा पार्क च बजेट आणतो ,एका फोनवर सचीन आणि लता ची भेट घडवून आणतो , टाटा घरी कावुन त्याला भेटतात, त्याला हे समजणार नाही की मी टोल आंदोलन, वा भुमीपुत्राच आंदोलन बंद केले वा राष्ट्रवादी चा सपोर्ट घेतला तर माझी आणि माझ्या पक्षाची प्रतिमा डागाळेल ...कुठल्या विश्वात रहाता मग तुम्ही ... शनीवारी होतो जवखेड्याला , विचारले हे सर्व !! मला नेमके काय झालं माहीत असुनही विचारले, लॅपटॉप घेवुन गेलो होतो , ते दाखवुन सांगीतले, हे असे चाललेय, लोक विचारताहेत काय करायचे ? त्यांनी जे उत्तर दिले ते .. ...सांगु !! नाय... नको...prejudice असलेल्या लोकांसमोर बोलायचे नाही असे ठरविले होते, धन्याच्या प्रतिसादावर च सांगीतले की मी हे !!! मी सरळ बघतोय , मोदी उल्लु बनवितोय पब्लीक ला , मला काँग्रेस नकोय परत , पण किमान क्लॅरिटी तर द्या , काल एका वकील मित्राने टाकलीय आरटीआय !! मोदींनी खर्च कुठुन केला ते ? अजुन मला मी भाजपा ला विचारलेल्या " काँग्रेसी छापात " एक श्रीगुरूजी शिवाय कोणाचंही उत्तर आलेले नाही !! गट्स आहेत माझ्यात, मनसे विषयी मी उत्तरे देण्यासाठी वेळ मागतोय...तुम्ही मात्र त्या गोष्टीचा स्कोर सेटलिंग साठी फायदा उचलायचा प्रयत्न करताय असे वाटले मला .....sir , plz don't do a catwalk, when you can't even properly .. !! बिरुटे सरांचा मित्र सुहास.. ( मी हा प्रतिसाद फक्त सरांना दिलाय, त्यात कोणीही काड्या वा आग लावण्याचा प्रयत्न करु नये हि नम्र विनंती )

In reply to by सुहास..

चला , मोदीशेठ, आता जरा सुरवाती पासुन सुरू करू यात का ? मला तुमच्या विषयी आदर नाही, अनादर ही नाही , रादर,काहीच भावना नाही, माझे मत असते ते ' पॉलीसीज' बद्दल, मला आवडल्या नाही की आपण बोलणारच, तात्या मध्यंतरी म्हणाले की तुम्हाला गाडी , बंगला, पगार, भारतातील सर्वोच्च पद हे मिळत ते ! ते कश्या साठी तर ते या पॉलीसीज बद्दलच ..मग चला करु यात का सुरुवात .. एक... हे अदानींना २६० एकर जमीन , तुमच्या वेळेस कशी काय मंजुर झाली, मौनीबाबा असताना का मिळाली नाही ? पर्यावरण खातं , लवासा घडल्यापासुन, गवत कापायला परवानगी देत नाहीये महाराष्ट्रात, या महाभागाला जंगल कापायला कशी काय दिली ? बर ! २६० एकर ? किती मेगा वॅट चा प्लॅन्ट आहे ? काय रेट ने दिलीत, आणि जंगलात का, ते जैतापुर सारखं २६,००० प्रती एकर ने दिलेली मग आंदोलन केल्यावर, ( आठवा, आमचे बाळासाहेब, जैतापुरचे मयतापुर करू ) २,००,००० करता न यावे कोणाला ही म्हणुन का ? गोंदिया चा कोळसा, भुगर्भ शास्त्रज्ञांनी केव्हाच निकृष्ट दर्जाचा ठरविलाय , तिथुन कोळसा नाय ? अदानीचा च कोळसा बाहेर निघेल, बर ! बर , राज्य सरकार अस्तित्वात नसताना, ( राज्यपाल तुम्ही आणुन बसविलाय) हे कुठल्या धारेत बसते ? ( पहिल्या धारेत का ? मग आमचा आक्षेप आहेच !! ) दोन ..त्या काळ्या यादीच जरा नीट ठरवुन घ्या , नेमके किती पैसै आणणार आहात ते ? निवडणुक जाहीर होताना आठ हजार करोड होते, संपल्यावर पंधरा लाख करोड, १०० दिवसांत आणणार होतात ! २०० दिवस होतील आता, त्यात आपले प्रिय म्हातारे होत असलेले , ब्रुसलींचे बंधुराज, ब्रेटली ...आपल हे ..जेटली ...निवडणुकांच्या आधी म्हणाले की सरकार स्थापन होताना म्हणाले की सब कॉग्रेस वालों के नाम है उस मैं , मग अर्णव प्रश्न विचारतो " किती नावे आहेत " तर एक नाव तर नक्की आहे असं म्हणतात ..अरे मग सांग की , नव्या नवरी सारखं, नवर्‍याच नाव घ्यायला काय लाजतो लेका !! जेटु लेका, एव्हाना आम्हाला कळलय की प्रत्येक बिझनेसमन्स चे प्रत्येक राजकारण्यांशे आर्थिक नाते असतेच, त्यात तुझी ही काही नातेवाईक असण्याची शक्यता नाकारता येत नाही , विषेशता: ज्यानी शाही इस्पितळात खांद्यावर हात ठेवला , त्या नुसार अजुन तीन माणसे असतीलच खांदा द्यायला !! तीन ..पेट्रोल आपल्यामुळे कमी झाल्याचे कळले , आपण आखाती देशांमध्ये मुत्र-विसर्जनासाठी जात असल्यामुळे बहुधा आपल्या भक्त-गंणांना असा पवित्र-समज झाला असावा , आम्हाला इतक्या दिवसांत माहीत नव्हते , आपल्याकडे गोमुत्र प्राशन करुन स्वःता ला पवित्र करुन घ्यायची प्रथा आहेच, आपले ही दोन एक थेंब इकडे, भक्तगंणासाठी टाकावेत हि नम्र विनंती !! आम्हाला अक्कल आहे , आम्हाला माहीत आहे की भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झाल्याने आपल्याकडे भाव कमी होतात ! आम्हाला कोणीतरी म्हणाले की " मौनीबाबा " असताना ही असे होत होते , त्यांना सांगावे की तेव्हा डॉलर चा भाव आमच्या इकॉनॉमीच्या पार्श्वभागात कायम होता, आज तो त्या मानाने खुप कमी आहे, आणि स्थिर ही आहे, तेव्हा व्यापारी निंयत्रणाच बुच काढुन, राजधानीच्या निवडणुकांची काळजी सोडुन, लवकरात लवकर ३६ ते ४० रु. लिटर करावा, नंतर आपण केलेत तर आम्हाला समजेल की आपण केवळ निवडणुकांसाठी मातेला पाचारण केले आहे , अहो पेट्रोल म्हणजे माता च ना , सगळे भाव त्यामुळेच वाढतात ,बाकी ते आम्हाला आवडणारे आख्खे मुग अजुन ३६००० रु, क्विंटल पर्यंत का पोचले ते काही कळले नाही , गुजरात मध्ये वाढतात की काय ? चार ...जपान ने आपला भारतातला अ‍ॅक्टिव्हा चा ११०० करोडचा चौथा प्रोजेक्ट , औरगांबाद च्या एवजी, अहमदाबाद ला का नेलाय हो , तुम्ही तर केला ना अहमदाबाद विकास जो काही करायचा तो , मग आमच्या गरीबांच्या औरगांबाद ने..माफ करा.. संभाजीनगर ने ...काय घोडं मारलय, मग मामासाहेब ( त्यांना हवे असते तर ) मॅक डॉव्हेल्स बॉटलिंग चा प्रोजेक्ट केव्हाच बारामतीत न नेता औ.बाद ला का नेला असेल , तिथे चंद्रकांत खैरै मुळे एक व्होट पडत नाही त्यांना १५ वर्षे , प्लस असे असुनही केरळ मध्ये युनियन च्या भांडणामुळे इकडे तिकडे न जाता, पास्ताबाई शी भांडुन, बिएमडब्ल्यु चा प्रोजेक्ट ही आणला की औ. बाद ला ( ४५०० मत मिळाली फक्त दर्डा ला राव ) ....सरसच !! पण कमनशिबी , आज या वयात अस्तित्वाची लढाई लढतय राव !! पाच ...केवळ बारा - हजार आणी काहीतरी शेकडा वितरकांसाठी गॅस चा दर दोन रूपये आणि काही पैसै वाढविण्याच आम्हाला काही समजले नाही , आपण कांदा इराण कडुन घेण्याचं ठरल तेव्हा सामान्य कांदा खाण्यार्‍यांच्या विचार केलात म्हणे, संख्येने कमी असलेला , कांदा उत्पादकांचा नाही केलात , मग आज काय केलेत ! कोणाचा विचार केलात ...असो ...स़काळी - सकाळी आमच्या आया बहीणी, ती वजनदार गॅस ची टाकी डोक्यावर घेवुन, लायनीत लवकर नंबर लागावा म्हणुन पाहिली नसेल आपण, या कधीतरी ! दाखविन मजा .... सहा ...ते , छोट्या कपड्यांमुळे बलाक्तार होतात म्हणणार्‍या हुड्डा ला हरियाना चा मुख्यमंत्री केलात ते आम्ही मर्जीतील माणसे पाहिजेत , हे आम्ही समजु शकतो पण हे " मेक इन इंडिया " चे काय खुळ घातलय पब्लीक च्या डोक्यात , अहो शेठ , ही परदेशी कंपन्या आपल्या इथे , जेव्हा कमी पैशात वस्तु बनवितात, रोजगार निर्माण करतात, तेव्हा एक प्रकारे आपण त्यांचे मिंधे होत असतो , एक तर जवळपास फुकटाची गुंतवणुक असते, पण जेव्हा , त्यांची कंपनी तोट्यात जाते ना, ते सर्वात पहिले आपली मारतात, इथले सर्व व्यवहार बंद करतात, आपल्या नौकर्‍या जातात, मग एमआयडीसी मध्ये तुलसी रामसे ब्रदर्स च्या भुतपटांच्या शुटींग कराव्या का ? तात्पर्य काय ? अम्ही अमित शहांचा चेहरा बघुन आधीच घाबरलोय, अजुन कशाला घाबरवताय ? इंटरनॅशनल इकॉनॉमी चा गेम कधी उलटेल सांगता येत नाही , कशाला रिस्का घ्यायच्या , त्या मौनीबाबा ने काळाची पावले केव्हाच ओळ्खली होती म्हणा की !! आणि अटलजी स्वदेशी बाबत काय सांगत होते हे कळलेच नाही म्हणायचे की तुम्हाला, ना राज धर्म कळला ना अटलजी !! सात ....आम्हाला रविवारी आपलं भाषण एकायचा योग आला ! हल्ली लय एकसुरी होत चाललाय , आम्ही सातवी - आठवी ला सावरकर, बाबासाहेब, अटलजी, टिळक, गोळवलगुर्जी , आनंदीबाई , गांधी असं एकत्र करुन निबंध ठोकायचो, जे ठोकायचो की आम्हाला कांबळे मास्तर १० पैंकी किमान आठ मार्क द्यायचे, क्षणभर आमचाच एखादा आठवी-नववी चा आपण आमच्या शाळेतुन वाचनासाठी मागविलाय असे वाटुन आमची भारतीय म्हणुन जी उरली-सुरली छाती फुगली की विचारू नका...सकाळपासुन आमच्या छातीच्या या फुगवट्या कडे पाहुन आमच्या मातोश्री आम्हाला विचारतहेत की तुझी छातीला सुज का आली आहे ............काय सांगु ? आमच्या छातीवर दळण दळुन, आमच्या भुमातेच्या अंगावर आणलेली ही आमच्यावरच डुख धरलेली , सुज, आधी कोण उतरवणार ? ( आता , जरा उद्या परवा, आमच्या पुण्याच, आमच्या महाराष्ट्राच राजकारण बघतो, २४ नोव्हेंबर पासुन हिवाळी अधिवेशन आहेच दिल्लीला, तेव्हा , ते बिहारच्या पुराच आणि तुमच्या त्या तुलसी भाभी ला एकदा बघतोच )

In reply to by सुहास..

२४ नोव्हेंबर पासुन हिवाळी अधिवेशन आहेच दिल्लीला, तेव्हा , ते बिहारच्या पुराच आणि तुमच्या त्या तुलसी भाभी ला एकदा बघतोच
जल्ला काय कल्ला नाय. मन्से चे लोकसभेत पण निवडून गेले आणि आमाला बातमीच नाय?

In reply to by काळा पहाड

सुहास साहेब, या वेळी मनसेची ब्ल्यु प्रिंट पाहून सुद्धा मनसेला मत न देता आल्या कारणानं अपराधी वाटत होतं. ती भावना दूर केल्या बद्दल धन्यवाद.

In reply to by सुहास..

सुहास साहेब, तुम्ही खरच काही लिहू नका. तुम्ही लिहुन तुमच्या पक्षाचे नुकसान करत आहात. मी ७-८ लोकांना तुमचे लिखाण दाखवले, त्यातले काही तर २००९ चे मनसे चे मतदार होते. तुमची सर्व मते वाचुन सर्वांनी आता काही झाले तरी भविष्यात मनसे ला मत देणार नाही असे ठरवले.

In reply to by प्रसाद१९७१

तुमची सर्व मते वाचुन सर्वांनी आता काही झाले तरी भविष्यात मनसे ला मत देणार नाही असे ठरवले.
मग तर सुहासरावांनी लिहिलेच पाहिजे असे मी म्हणेन. मनसेचा खरा चेहरा जगासमोर यायला हवा :)