Skip to main content

Blue Print

लेखक सुहास.. यांनी शुक्रवार, 26/09/2014 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
काल चेपुवरचा मेलबॉक्स फुल झालाय, आज सकाळपासुन मेसेजेस, गबोल्यावर काही चर्चा, काही मेल्स चालु आहे. मी शक्य तसा प्रयत्न करतोय उत्तरे देण्याचा !! काही अभिनंदन पर, काही प्रश्नार्थक, काही खोचक, काही उगा टवाळी करणारे, काही सिरियसली जाणुन घेणारे, काही मनात आधीचीच अढी असुन ही अभ्यासाने परिपुर्ण, अश्या अनेक जणांना उत्तरे दिली आहेत. सर्वात महत्त्वाचे .. मी मिपावर मनसेचा किंवा कुठल्याही पार्टीचा प्रचारक म्हणुन कधी च काही लिहीले नाही. मी मिपावर येतो ते एक मिपाकर म्हणूनच, चार मित्र भेटावेत ,त्यांच्याशी जीवाभावाच्या गप्पा व्हाव्यात, थोडी माफक करमणुक व्हावी , थोडसं वास्तव इतरांना ज्ञात करुन द्यावे ( अर्थात दुसरं काही येत ही नाही मला, ग्रास रूट लाच काम करु शकतो मी ! ) या शुध्द हेतुने येतो ! हा धाग्या काढण्याचे कारण म्हणजे L0 लेव्हलच्या काही प्रश्नांना उत्तरे देणे. L1, L2 आणि L3 प्रश्नांकरिता कृपया मला व्यनी, मेल , फोन करावा. मिपाचा युएसपी, मान राखावा हि नम्र विनंती ! अर्थात , ऑफीस काम, प्रचार, वैयक्तीक कामे ही मागे आहेत ..जस जमेल तसे उत्तर देईन ..आणी शिव्या ही खाईल ( तेव्हढा हक्क मनसेवर अपेक्षा ठेवणार्‍यांचा आहेच, अर्थात we are not superman हे ही लक्षात ठेवावे ) अर्थात अभ्यास नसलेले, केवळ बातम्या बघुन स्फुरण चढलेल्यांनी, टवाळ, पुर्वग्रहदुषितांनी कृपया दुर रहावे ही पुन्हा विनंती करतो.... माझा हेतु - पाच वर्षांत एक चान्स मिळतो आपल्या सर्वांना ! त्यानंतर साधारण १८२५ दिवस , ४४४४८ तास हात चरफरत बसावं लागत ! योग्य तो निर्णय घ्या..मनसे असो वा ईतर कुठला ही पक्ष !! तु कोण रे बाजीराव... माझ नाव सुहास , होय फक्त सुहास ..मी आडनाव सांगत नाही आणि जे आवर्जुन सांगतात त्यांना फाट्यावर मारतो. त्याला कारण आहे आणी कारण सर्वपरिचित आहे. मी कॉलेजला असतानापासुनच राजच्या विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होतो. एकुण चार कॉलेज अंडर मध्ये होती सक्रीय राजकारणात आहे ( मला बाहेर उभ राहुन वा एसी त बसुन राजकारण वा समाजकारण करता येत नाही ) तेव्हापासुन ते आजपावेतो म्हणजे एक महिन्यापुर्वी नौकरी धरल्याने मला सध्याचा पदाचा राजिनामा द्यावा लागला आहे. सध्या मी हॉरीजॉन्टल मध्ये आहे . काय आहे हॉरिजॉन्टल ते ही सागंतोच आहे !! इतर परिचय माझ्या लेखांवरुन आजवर झाला असेल असे मी गृहीत धरतो ( स्वतः ची लाल नव्हे परिचय ) who the hell is Raj Thakare ? हाच प्रश्न जया भादुरी ला पडला काही वर्षांपुर्वी ...असो ....सेनेशी कट्टर असताना हळु हळु सेनेच विभाजन व्हायला लागल्यावर बाळासाहेबांपर्यंत पोहोचायची मुष्किली आमच्यासारख्यांवर आली, रस्त्यात बरेच खड्डे लागायला लागले, पहिला सर्वात मोठा खड्डा होता संजय, इतर तर काही विचारुच नका दोन अडीज वर्षे एक ही अ‍ॅन्डॉसमेंट ( बाळासाहेबांच सही असलेले शिफारस पत्र ) आली नाही..तेव्हा कार्यकर्ते झुंडीने राज ठाकरेंकडे जात होते, एव्हाना राज ठाकरे राजकीय सन्यास घ्यायच्या तयारीत होते. अध्यक्ष म्हणुन उध्दवांच नाव ही त्यांनीच सुचविले..त्यांना विनंती करत होते, तेव्हा राज ठाकरे कार्यकर्त्यांना, आमच्यासारख्या, कार्यकर्त्यांना समजावयचे , अरे त्याला थोडा वेळ द्या करेल तो ..बरच नंतर बिघडत गेलं ..राज ठाकरेंनी शेवटी पक्ष बनवायचा निर्णय घेतला. ( त्यावेळी त्यांच्या कडे स्वतःसाठी काहीतरी करायच असतं तर गप एखाद्या लिडींग पार्टीमध्ये जावुन मंत्रीपद घेवुन आयुष्यभराची सोय लावुन घेतली असती )...पाठीहुन राजकारण !! मनसे आणि ईतर पक्ष कम्पेर मांडतो आहे, हे खेदकारक आहे माझ्यासाठी ही ! मोठ्या पवांरानी हातान घालवुन घेतलय , हे कोणी ही मान्य करेल, महाराष्ट्राची (जी आहे ती ) प्रगती आणि अधोगती दोन्ही पण या राजकारणी घराण्यामुळे आहे, जितके प्लॅनींग त्याच्या दुप्पट पैसै खाणे आणि अंगात असलेली मुसद्दीगिरी ..एक उदाहरण सांगतो , मागच्या वर्षी देशमुख साहेब सोलापुरसाठी प्यायला पाणी मागत होते, तो मुद्दा सफाईदार पणे कोर्टात ढकलला गेला , जेणे करुन उजनी पर्यंत पाणी पोचण्यास वेळ लागावा ! खर तर एका सही मध्ये तो पास करत आला असता ..कारण घडले नंतर जेव्हा पाणी सोडले गेले..तेव्हा ते दौंड च्या धरणात अडले) अडणारच होते. त्यांनतर चा त्यातले १० % उजनी पर्यंत पोचले आणी ते पोचेपर्यंत पाउस ही पडला ..चांदी झाली ती दौंड च्या शेतकर्‍यांची !! राज्याला प्यायला पाणी नव्हते आणि तिथे शेतकर्‍यांना उसाला देखील पाणी , यातुनच समजा कसा चालतो तो पक्ष ..मुंबईत या पक्षाच्याकार्यालयात सहा एका पाठी एक अश्या सहा रुम्स आहेत..यामध्ये शेवटच्या खोलीत पैशाचे व्यवहार मी माझ्या डोळ्याने पाहिले आहेत. दुसरा त्यांचा सहकारी पक्षातली मॅडम आली होती दुष्काळी भागाचा दौरा करायला , तिला डांबरी रोड दिसला ओला झालेला, तिच्या त्या इटालियन-हिन्दी अ‍ॅक्सेन्ट मध्ये " पाऊस तर आहे इथे " ऐकताना वाटल एक सट्टदिशी ....असो .....ढेकळ फुटली की नाही कळत नाही....प्रश्न च कळत नाही..उत्तर कधी शोधणार ? ..अजुन आहे भाजपा आणी सेनेविषयी ..पण ते कदाचित नंतर आता नाही .. मनसेचे दोन भाग केलेले आहेत ..एक सक्रीय आणि दुसरा असक्रीय ..हा असक्रीय भाग म्हण्जे हिमनगाखालचा शिखर आहे...खुप बुध्दीवंत, प्रामाणिक आहे, त्यात खुप मंडळी आहेत, सोशल वर्कर्स पासुन उद्योजकांची एक खुप मोठी फळी आहे गी ..हा विभाग विचार देतो ..टोल विषयक आधी अभ्यास या विभागानेच मांडला सुरु केला. अर्थात देवेंद्र आणी सोमय्या आरोप करत होते , पण तसा अभ्यास नव्हता तिथे...केवळ एक दोन कार्यकत्यांची पत्र आणि त्यानंतर जनजागृती सक्रीय गटाकडे आली ..त्यांचा आडत्यांमुळे निर्माण झालेले प्रश्न आणी त्याच सोल्युशन बघुन मी खुप ईम्प्रेस झालो होतो, सरकार येवो न येवो , हा मुद्दा डिसेंबर च्या सुमारास सुरु करणार आहोत ( डिसेंबर का ? आत्ताशी कुठ सक्रीय गटाकडे निवेदनाच्या कॉप्या गेल्यात , विभागवार ) पक्ष बांधायला आणि Blue Print ला वेळ का ? ..पक्ष स्थापनेचा ज्या दिवशी विचार पक्का झाला त्यानंतर दोन वर्षांनी पक्ष स्थापन झाला, स्वतः राजच्या भाषेत सांगायचे तर ..काय तमाशाचा फड काढत होतो का गणेश मंडळ स्थापन करत होतो ? असो ...जेव्हा पक्षबांधणीच काम सुरु झालं तेव्हा त्याचे सरसकट दोन भाग केले गेल , सक्रीय आणि असक्रीय ( यालाच हॉरिझॉन्टल म्हणतात ) ..असक्रीय हा केवळ वैचारिक बाजु संभाळणार असे ठरले..खुप नामवंत मंडळी आहेत यात, उद्योगपतीही आहेत ..हि लोक्स सदोदित राज ला सल्ले ,फॅक्स संवाद आणी वेळ पडली की कानपिचक्या ही देत असतात, हा विकास आराखडा मांडणारे तेच !! Primary Blue Print त्या आधी एक वर्षे ..होय वेळ लागतो , इतका कचरा आणि कॉम्प्लिकेशस करून ठेवलं आहे की विचारु नका ..बर झाल ते आरटीआय तरी आल , नाहीतर घोळच होता ..एक साधी माहीती ...माझ्या वार्डामध्ये दरिद्री रेषेखाली किती जनता आहे ? हे माझ्यापर्यंत पोचण्यासाठी पंधरा दिवस लागावेत असा लेखी नियम आहे फक्त .. वास्तवात तीन ते चार महीने लागतात , ते ही दहा वेळा फॉलो-अप केल्यावर !! काल ती Blue Print रिलीज होईपर्यंत त्यात आजवर साधारण १०२ वेळा सुधारणा झाल्यात. बरेच जण म्हणताहेत की ती विकास आयोजन आराखड्याची कॉपी आहे , त्यांना दंडवत सांगा आमचा ..या सरकारी (तेच आयोजन वाले) कर्मचार्‍यांशी भेट घालुन देतो मी ! ( पुण्यात इथं मागं लाल देवळापाशी ' राजधानी बार ' मध्ये भर दुपारचे सापडतील तुम्हाला !! ) प्रत्येकाला एक कागद द्या आणी म्हणा की माझ्या इथुन गटार आहे ते शाळेच्या गेट मधुन जाते, शाळेतल्या विद्यार्थांना तिथल्या ड्रेनेज चा त्रास होतो, ते तिथुन दुसरीकडे हलवण्यासाठी व शाळा ड्रेनेज मुक्त करण्यासाठी दहा बुलेट पाँईंट्स लिहुन द्या ...शप्पथ्थ ! लिहीले तर मी राजकारण हा शब्द देखील काढणार नाही तोंडातुन !! बर्‍याच सुचना आल्या आहेत त्यात , मी स्वता: मागच्या वर्षी पुणे ग्रामीण फिरुन माहीती आणुन पोचवली आहे ..हा केवळ आराखडा आहे .बॅक ग्राऊंडमध्ये impletation plan चे कामकाज केव्हापासुन चालु आहे ..केवळ मुंबईच शांघाय करु, मेट्रो २००१ ते २०१० ते २०२० ते २०३० पर्यंत करूच अशी काही प्रतिज्ञा नाही ..विश्वास ठेवा ती पुर्ण अभ्यासाअंतीच मांडलेली आहे माझ सरळ-सरळ मत अस आहे की . राज्य कारभार करता येत नसेल तर तो किमान पारदर्शक ठेवावा .. चुका ... होय ! गंभीर चुका झाल्यात मनसे कडुन , पण कार्यकर्ते ते पोचवत नाहीत असे काही नाही राज कडे , व्हेरी फ्रॅन्कली !! ..पोचवितात ...अगदी आता जी महापौरपदासाठी राष्ट्रवादीची मदत ई. ..उत्तर मिळतात ...ज्यांनी मदत केली ते पक्ष बदलुन मनसे मध्ये प्रवेशासाठी उत्सुक आहेत. आता राजिनामा देवुन, पुन्हा निवडुन येवुन मग पांठिबा देण्यापेक्षा तिथल्या स्थानिक मनसेने त्याला होकार दिला. निवडणुका पाठिशी लावायच्या नव्हत्या . आणि दुसर काय ते खासदारकीच्या निवडणुका ...त्यावेळी माझ्यासकट एक खुप मोठा गट होता जो म्हणत की खासदारकी ला उमेदवार देवुच नका. मोदींना पांठिबा द्या आणि संपवा ..दुसरा गट मात्र , विषेशतः मुंबईवाले त्यांनी मात्र पारंपारिक सेनेच्या किमान उभ रहाण्यासाठी तरी उमेदवार द्याच असा आग्रह धरला , मत विरोधात गेली ..माझ मत अस आहे की ती गेली मोदींमुळे, सेनेमुळे नाही .असो ..ही खरोखरच घोडचुक होती .... अर्थात त्यातुन ही बाहेर येवु ...मात्र पुन्हा एकदा सांगतो ..तुमच मत मग ते कोणत्याही पक्षाला असो ..देताना फक्त विचार करा ...चेपुवर आंजावर दोन चार विनोदांचा आधारावर जावु नका ..अगदी आप चं असल तरी ... अरे हो, Blue Print बद्दल अजुन ही काही प्रश्न असतील तर तुम्ही मला बिनधोक पणे p9373991526@gmail.com वा 9665185564 ( हा व्हाट्स अ‍ॅप चा पण नंबर आहे ) विचारु शकता वा मिपावर व्यनी करा ...इथे उत्तर देवु शकणार नाही, देणार नाही ( मी इथे एक मिपाकर म्हणुनच वावरू इच्छीतो ) धन्यवाद !

वाचने 51423
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

In reply to by क्लिंटन

पाच ...केवळ बारा - हजार आणी काहीतरी शेकडा वितरकांसाठी गॅस चा दर दोन रूपये आणि काही पैसै वाढविण्याच आम्हाला काही समजले नाही
डेमॉक्रसी चा अर्थ माहितिये का सुहास साहेब? डेमॉक्रसी म्हणजे मॉबॉक्रसी नव्हे. ज्याचे ज्यास्त लोक त्याचा न्याय असं नसतं. वितरकांच्या मागणी सरकारला जर योग्य वाटत असेल, तर त्यांनी दर वाढवणे चुकीचे कसे?

In reply to by सुहास..

एक... हे अदानींना २६० एकर जमीन , तुमच्या वेळेस कशी काय मंजुर झाली, मौनीबाबा असताना का मिळाली नाही ? पर्यावरण खातं , लवासा घडल्यापासुन, गवत कापायला परवानगी देत नाहीये महाराष्ट्रात, या महाभागाला जंगल कापायला कशी काय दिली ? बर ! २६० एकर ? किती मेगा वॅट चा प्लॅन्ट आहे ? काय रेट ने दिलीत, आणि जंगलात का, ते जैतापुर सारखं २६,००० प्रती एकर ने दिलेली मग आंदोलन केल्यावर, ( आठवा, आमचे बाळासाहेब, जैतापुरचे मयतापुर करू ) २,००,००० करता न यावे कोणाला ही म्हणुन का ? गोंदिया चा कोळसा, भुगर्भ शास्त्रज्ञांनी केव्हाच निकृष्ट दर्जाचा ठरविलाय , तिथुन कोळसा नाय ? अदानीचा च कोळसा बाहेर निघेल, बर ! बर , राज्य सरकार अस्तित्वात नसताना, ( राज्यपाल तुम्ही आणुन बसविलाय) हे कुठल्या धारेत बसते ? ( पहिल्या धारेत का ? मग आमचा आक्षेप आहेच !! )
हा पॅराग्राफ नक्की मराठीतच आहे का? कशाचा कशाला संबंध लागत नाहिये म्हणून म्हणतोय.
दोन ..त्या काळ्या यादीच जरा नीट ठरवुन घ्या , नेमके किती पैसै आणणार आहात ते ?
ते कसं ठरवणार? तो अंदाज आहे. नक्की किति पैसे आहेत हे स्विस किंवा जर्मन बँकांनी डिक्लेयर केलय का? नक्की किती खाती आहेत हे तरी कुठं माहितिय? पण अंदाज तर करावाच लागणार. बर त्याची प्रोग्रेस ही गुप्त असणार. ती ते तुम्हाला का सांगतील?
तीन ..पेट्रोल आपल्यामुळे कमी झाल्याचे कळले , आपण आखाती देशांमध्ये मुत्र-विसर्जनासाठी जात असल्यामुळे
वा! काय ती भाषा!!
अहो पेट्रोल म्हणजे माता च ना , सगळे भाव त्यामुळेच वाढतात
भाव डिझेल मुळे वाढतात सुहास साहेब. अभ्यास वाढवा.
आख्खे मुग अजुन ३६००० रु, क्विंटल पर्यंत का पोचले ते काही कळले नाही , गुजरात मध्ये वाढतात की काय ?
निदान ते व्यापारी तरी आहेत. ते त्यांचा फायदा पहाणारच. मराठी लोक एजंटगिरी, गुंडगिरी, दलाली यांच्याशिवाय दुसरं काही करतात का? मजूर सुद्धा परराज्यातून आणावे लागतात.
चार ...जपान ने आपला भारतातला अ‍ॅक्टिव्हा चा ११०० करोडचा चौथा प्रोजेक्ट , औरगांबाद च्या एवजी, अहमदाबाद ला का नेलाय हो , तुम्ही तर केला ना अहमदाबाद विकास जो काही करायचा तो , मग आमच्या गरीबांच्या औरगांबाद ने..माफ करा.. संभाजीनगर ने ...काय घोडं मारलय
अहो कामं करता का तुम्ही लोक? सारखं अस्मिता, शिवाजी महाराज, अफझल्खान, शाइस्तेखान, तोडून टाकू, खळ्ळ खट्याक, शूर मावळे असलं काहीतरी बडबडून कामं होतात का? वीज आहे का महाराष्ट्रात पूर्ण वेळ? सवलतीत तर जाऊच दे. त्या एम आय डी सी मध्ये सगळे मावळे जाऊन उद्योगपतींना धमक्या देतात की काँट्रॅक्ट त्यांनाच मिळाली पाहिजेत म्हणून. आता जा तिकडे अहमदाबादेत पाठ मोडून काम करायला. इथं सगळं होतं ते मोडून खाल्लं तुम्ही लोकांनी. आणि वर नाक करून विचारताय की उद्योग तिकडे का नेताय म्हणून?
सहा ...ते , छोट्या कपड्यांमुळे बलाक्तार होतात म्हणणार्‍या हुड्डा ला हरियाना चा मुख्यमंत्री केलात ते आम्ही मर्जीतील माणसे पाहिजेत , हे आम्ही समजु शकतो
अहो, हरियानाचा मुख्यमंत्री हुड्डा नाहिये, खट्टर आहे. काय हे!
हे आम्ही समजु शकतो पण हे " मेक इन इंडिया " चे काय खुळ घातलय पब्लीक च्या डोक्यात , अहो शेठ , ही परदेशी कंपन्या आपल्या इथे , जेव्हा कमी पैशात वस्तु बनवितात, रोजगार निर्माण करतात, तेव्हा एक प्रकारे आपण त्यांचे मिंधे होत असतो , एक तर जवळपास फुकटाची गुंतवणुक असते, पण जेव्हा , त्यांची कंपनी तोट्यात जाते ना, ते सर्वात पहिले आपली मारतात, इथले सर्व व्यवहार बंद करतात, आपल्या नौकर्‍या जातात, मग एमआयडीसी मध्ये तुलसी रामसे ब्रदर्स च्या भुतपटांच्या शुटींग कराव्या का ? [...] इंटरनॅशनल इकॉनॉमी चा गेम कधी उलटेल सांगता येत नाही , कशाला रिस्का घ्यायच्या , त्या मौनीबाबा ने काळाची पावले केव्हाच ओळ्खली होती म्हणा की !! आणि अटलजी स्वदेशी बाबत काय सांगत होते हे कळलेच नाही म्हणायचे की तुम्हाला, ना राज धर्म कळला ना अटलजी !!
तुम्ही आणि इंटरनॅशनल इकॉनॉमी वर बोलावं म्हणजे विनोदच म्हणा. नक्की कसल्या रिस्क बद्दल बोलताय तुम्ही? कारण जेव्हा मार्केट खराब होतं तेव्हा आउट्सोर्सिंगला जोर येतो. आणि हा गेम नाहीये सुहास साहेब, हा बिझनेस आहे. गेम-रिस्क हे सगळं तिकडं बोलायचं-ज्यांना "..की जय" म्हणायशिवाय काही समजत नाही त्यांच्यापुढे. बाकी तुमची व्होकॅब्युलरी सुधरा जरा "मिंधे होणं", "आपली मारतात", "खुळ घातलय पब्लीक च्या डोक्यात".. काय हे! बाकी "मेक इन इंडिया" ही संकल्पना जरा समजून घ्या आणि मग बोला.
सात ....आम्हाला रविवारी आपलं भाषण एकायचा योग आला ! हल्ली लय एकसुरी होत चाललाय
मध्ये मध्ये टॉप ट्वेन्टीतली गाणी लावायला सांगावं काय, "सैनिकां" च्या "श्रमपरिहारा" साठी?

In reply to by सुहास..

सुहास, आंधळेपणाने काम करणारे अनेक पक्षांमधे कार्यकर्ते असतात तसंच तुमचं झालं आहे, असं मला वाटायला लागलं आहे. तुम्ही काहीच नीट उत्तर दिलं नाही. मी जे काही लिहिलं आहे, मी जे काही अनुमान काढलं आहे. त्या अनुमानाला तुम्ही जे 'कहार समाजाबद्दल'चं खासगी बोलणं इथे जाहीर करुन उदाहरण म्हणुन लिहिलं आहे, ते पाहुन तुमची आता मला दया यायला लागली आहे. म्हणजे मी इथे विनाकारण लिहितोय असं मला वाटतंय. खासगी संभाषणाबद्दल आणि अवांतर. : आपल्या मामाच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला आपण गंगापूरला आलात आणि एक स्त्री पाण्यात बुडी मारुन गाळ जमा करत होते आणि मी म्हणालो की त्या शंभर एक रुपये जमा करतात त्यात हॅहॅहॅ करण्यासारखं काय आहे ? तुम्ही केवळ एका प्रसंगाने त्यांच्याबद्दल व्यथित होऊन माझ्या कोरडेपणाचा राग येऊन तुम्ही फोन कट केला म्हणतात, हे मला आत्ता तुमच्या बोलण्याहुन कळतंय. पहिली गोष्ट मला तुमच्याशी बोलण्यात कोणताही आनंद वाटत नाही. दुसरी गोष्ट तुम्ही माझा फोन कट करण्याने माझी कोणतीही जहागिरी बुडालेली नाही. हवा पाणी अन्न वस्त्र निवारा, फोन गप्पा, आणि सर्व गोष्टी वेळच्या वेळी अजून पूर्ण होत आहे. एका क्षणाने आपण जो अभ्यास केला व्यथित झालात त्याने माझे डोळे भरुन आले आहेत. मला स्वतःच काही सांगायचं जीवावर येत तरीही तुमच्यासाठी- www.kaharsamaj.com नावाचं माझं ड्रुपलवर आधारित एक मराठी संकेतस्थळ इथे जालावर चार एक वर्ष होतं. तिथे मी कहार समाजाच्या मुलांना लिहितं केलं होतं. समाजाचा इतिहास, रुढी, परंपरा, गीतं, सण, त्याबद्दल मी लेखन केलं आहे. त्यांची कामं त्यांचं जगणं याची मला उत्तम जाण आहे. माझ्या त्या संकेतस्थळावरील सर्व्हर क्रॅश झाल्याने सर्व डाटा गेला माझं संकेतस्थळ वाहुन गेलं. पाटोदा येथील मराठी विषयाचे प्रा.डॉ.रामनाथ वाढे यांच्याबरोबर मी 'कहार समाजातील लोकगीते' या विषयावर अभ्यास करतांना या समाजाचा नदीकाठावर फिरुन मी त्यांचा चांगला अभ्यास केला आहे. त्यामुळे त्या समाजाबद्दल मला जितकं अधिकारवाणीने बोलता येईल तितकं तुम्ही बोलूच शकत नाही, इतकेच सांगतो. समाजासाठी मी आंदोलन केली आहेत. ( विश्वास नसेल तर फोटू टाकायचा सांगा मी टाकेन) अजून एक सांगतो माझ्या संपूर्ण प्रतिसादात मी कोणत्याही पक्षाची बाजू घेतलेली नाही. मी फक्त अजूनही मनसेच्या पक्षाच्या वाताहाताची कारणं विचारत आहे, बाकी पक्षाबद्दल मी अजून कुठेही चकार काढलेला नाही. मनसे जे वागलं ते मी लिहिलं आहे. वरचा प्रतिसाद येईपर्यंत तुम्हाला स्पष्टीकरण जमलेलं नाही. बाकी, स्कोर सेटलिंग वगैरे माझं काही नसतं. एकतर मी हल्ली चर्चेत पडत नाही. जे असतं ते स्पष्ट आणि रोखठोक मग मानाचं असो की अपमानाचं. मला त्याचं काही वाटत नाही. आपल्याला इतर प्रतिसाद पाडण्यासाठी खुप वेळ आहे. मनसेच्या वाताहाताची कारणं लिहायला वेळ नै मोठी गम्मत आहे. कार्यकर्तेच असे तर पक्षाची वाताहात होणारच. बरं, आपला आवही असा आहे की (आपला वरचा प्रतिसाद) साहेब सर्व गोष्टी तुमच्याशी चर्चा करुन निर्णय घेतात असो, आपले प्रतिसाद वाचण्यात काही अर्थ नाही, आता वेळ घालवण्यात मला इट्रेष्ट नाही, तुमचं चालु द्या. मनसेला फिनिक्ससारखी झेप घेण्यासाठी शुभेच्छा...! (अजून एक सायंकाळी सहापर्यंत परिक्षेच्या कामात आहे. व्यक्तिगत लिहिलं तर मला ऑनलाईन मी जरी असलो तरी लिहायला लगेच जमणार नाही. म्हणजे तुम्ही लिहिलेलं मला पटलेलं आहे, असा अर्थ घेऊ नये म्हणजे झालं ) -दिलीप बिरुटे

In reply to by सुहास..

मुद्देसुद लिहा, विषयांतर करु नका. उत्सुकता आपल्या लेखनाची आहेच. -दिलीप बिरुटे

In reply to by लंबूटांग

बाकीच्या धाग्यांवर प्रतिसाद देताय म्हणून विचारले.
मागेच अशाच कुठल्यातरी धाग्यात-- स्पेसिफिकेश(न) देतो लवकरच म्हणून ८-१० दिवस हे अंतर्धान पावले.स्पेसिफिकेश कधी देताय म्हणून विचारल्यावर दिली आहेत की वर असे उत्तर दिले.अजून एकदा असेच काहीतरी झाल्यावर या मनुष्याच्या तोंडी लागण्यात अर्थ नाही हे लक्षात आले :)

In reply to by सुहास..

>>> आधी पोट निवडणुका झाल्या राजस्थान आणि गुजरात मध्ये कॉंग्रेस निवडुन आले की , उत्तरे मध्ये सपा ला जास्त जाग्या मिळाल्या तुमच्या पेक्षा , त्याच विष्लेषन तर सोडा उन्माद च संपेना, याचं विश्लेषण पूर्वी २-३ वेळा वेगवेगळ्या धाग्यांवर मी केलेले आहे. ते वाचलं असेलच. पोटनिवडणुका या स्थानिक मुद्द्यांवर लढल्या जातात. केंद्राचा त्याच्याशी फारसा संबंध नसतो. या पोटनिवडणुकात अजूनही एक महत्त्वाचा मुद्दा होता. तो म्हणजे उ.प्र.मध्ये बसपाने आपले उमेदवार केले नव्हते. त्यामुळे बसपाची मुस्लिम व दलित मते सपाकडे गेली व त्यामुळे सपाला ११ पैकी ८ जागा मिळाल्या. बसपाचे उमेदवार असते तर भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले नसते. २०१७ मध्ये उ.प्र. विधानसभेची निवडणुक आहे. त्यावेळी बसपा दूर रहाण्याची सुतराम शक्यता नाही व साहजिकच पोटनिवडणुकातील निकालाच्या पुनरावृत्तीची सुतराम शक्यता नाही. बिहार मधील पोटनिवडणुकीत संजद, राजद व काँग्रेसने युती केली होती व त्यामुळेच त्यांना १० पैकी ६ जागा मिळाल्या. २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यावेळी अशी युती होण्याची सुतराम शक्यता नाही व साहजिकच पोटनिवडणुकातील निकालाच्या पुनरावृत्तीची सुतराम शक्यता नाही. याविषयी अधिक सखोल विश्लेषण खालील लेखात वाचा. http://indianexpress.com/article/opinion/columns/arithmetic-not-love-ji… >>> यशाने हुरळुन गेलेल्या पक्षाला , कुबड्या वापराव्याच लागण्यार आहेच , कोणा एका तरी एकाच्या कुबड्या घ्याव्याच लागणार आहेत , मग कोणाच्या घेणार, ज्यांनी तुम्हाला अफजला खान म्हटले त्याच्या की ज्यांना तुम्ही करप्ट पार्टी म्हणत होतात त्याच्या ? कुबड्या न घेता सुद्धा सरकार चालू शकते या भीतिमुळे शिवसेना बावचळलेली आहे व त्यामुळेच ते सातत्याने अनिल देसाई व सुभाष देसाईंना दिल्लीच्या वार्‍या करायला लावून 'आम्हाला आत घ्या की हो' अशा मिनतवार्‍या करीत आहेत. ज्यांची संभावना अफझलखान, आदिलशहा, कुतुबशहा, दिल्ली की बिल्ली अशा शेलक्या शब्दांनी केली त्यांचेच या स्वाभिमानी मावळ्यांना आता पाय धरावे लागत आहेत.

मनसेला एक महापालिका धड सांभाळता आली नाही. अख्खे राज्य ते काय चालविणार? निळी प्रत ९ वर्षांनी आली. आता त्याची अंमलबजावणी व्हायला किमान ९०० वर्षे लागतील. राज ठाकरे खूपच चमत्कारीक भाषणे करीत आहेत. म्हणे इतकी वर्षे भाजप शिवसेनेला आतून पोखरत होता आणि बाळासाहेबांनी भाजपला पूर्वीच लाथ घालून हाकलला असता. अरे लेका, याच भाजपच्या जीवावर तुझा पहिला महापौर झाला ते लगेच विसरलास? तेव्हा नाही भाजपला लाथ घालाविशी वाटली. नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केलीस ते विसरलास वाटतं? नाशिकमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचीच मदत घेऊन त्यांनाच शिव्या देण्याइतका कृतघ्नपणा देखील तुझ्या अंगी आहे. ज्याचा गळा मफलरने आवळायला निघाला होतास त्याचीच मदत घेताना निदान मनाची तरी वाटायला हवी होती. मनसे आणि राज ठाकरे एकंदरीत भंपक काम आहे. नुसती बडबड आणि बडबडीच्या एकदम विरूद्ध कृती असे यांचे वैशिष्ट्य आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मनसेला एक महापालिका धड सांभाळता आली नाही. अख्खे राज्य ते काय चालविणार? अगदी खरं आहे. लोकांना लै बाता मारल्या यव करु अन त्यव करु. नाश्कात एक उत्तम संधी होती तिथे काहीच घडले नाही,टोलबद्द्ल तर विचारुच नका. मला स्वतःला वाटलं सालं काय वक्तृत्व आहे, साहेबांची आठवण यावी आणि साहेबांसारखाच हा माणुस मोठा होणार सालं मला खुप आनंद झाला होता तेव्हा आणि आता नामुष्किचा पराभव झाल्यावर असं वाटतं लोकांनी बरोबर जागा दाखवली. जाऊ द्या. -दिलीप बिरुटे

मस्त लेख, यंदा (काकाला तिकीट मिळाल्याने) आपण मनसे वाले

In reply to by मालोजीराव

काकांचे काय झाले ?

राज ठाकरे म्हणत होते .. एकहाती सत्ता द्या. ... म्हणुन त्यांचा एकच आमदार निवडुन आला.

In reply to by hitesh

लवकरच राठांना शून्यहाती सत्ता द्या असे म्हणायला लागले तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खूप चांगला दिवस असेल :)

In reply to by क्लिंटन

शून्य होण्याच्या मार्गावरच आहे. तो आमदार भाजपाच्या वाटेवर आहे म्हणे.

मनसे हे स्वतःच सेनेची कार्बन कॉपी - निळी प्रत आए. मूळ प्रत आनि निळी प्रत. दोनत फारसा फर्क नाही

आधी हे वाचलं. >>> मी कॉलेजला असतानापासुनच राजच्या विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होतो. एकुण चार कॉलेज अंडर मध्ये होती सक्रीय राजकारणात आहे ( मला बाहेर उभ राहुन वा एसी त बसुन राजकारण वा समाजकारण करता येत नाही ) तेव्हापासुन ते आजपावेतो म्हणजे एक महिन्यापुर्वी नौकरी धरल्याने मला सध्याचा पदाचा राजिनामा द्यावा लागला आहे. हा परिच्छेद वाचल्यावर सध्या तुमचे वय २५ च्या आत असावे असं वाटतंय. नंतर हे वाचलं. >>> सेनेशी कट्टर असताना हळु हळु सेनेच विभाजन व्हायला लागल्यावर बाळासाहेबांपर्यंत पोहोचायची मुष्किली आमच्यासारख्यांवर आली, रस्त्यात बरेच खड्डे लागायला लागले, पहिला सर्वात मोठा खड्डा होता संजय, इतर तर काही विचारुच नका दोन अडीज वर्षे एक ही अ‍ॅन्डॉसमेंट ( बाळासाहेबांच सही असलेले शिफारस पत्र ) आली नाही..तेव्हा कार्यकर्ते झुंडीने राज ठाकरेंकडे जात होते, एव्हाना राज ठाकरे राजकीय सन्यास घ्यायच्या तयारीत होते. अध्यक्ष म्हणुन उध्दवांच नाव ही त्यांनीच सुचविले..त्यांना विनंती करत होते, तेव्हा राज ठाकरे कार्यकर्त्यांना, आमच्यासारख्या, कार्यकर्त्यांना समजावयचे , अरे त्याला थोडा वेळ द्या करेल तो ..बरच नंतर बिघडत गेलं ..राज ठाकरेंनी शेवटी पक्ष बनवायचा निर्णय घेतला. ( त्यावेळी त्यांच्या कडे स्वतःसाठी काहीतरी करायच असतं तर गप एखाद्या लिडींग पार्टीमध्ये जावुन मंत्रीपद घेवुन आयुष्यभराची सोय लावुन घेतली असती )...पाठीहुन राजकारण !! राज ठाकर्‍यांनी २००५ मध्ये शिवसेना सोडली. तुमच्या वरील परीच्छेदानुसार २००३ पासून शिवसेना सोडण्याचे विचार त्यांच्या मनात घोळत होते. २००३-२००४ मध्येच तुमच्यासारख्यांना बाळासाहेबांपर्यंत पोहोचणे अशक्य झाले होते. तुमचे वय सध्या २५ च्या आत असेल तर २००३-०४ मध्ये तुम्ही १२-१३ वर्षांचे असणार. इतक्या लहान वयात तुम्ही बाळासाहेबांपर्यंत पोहोचत होता हे आश्चर्यच म्हणायचं!

राज आणि मनसे यांची खिल्ली उडव्नार्यांनी १०० दिवसात देशा बाहेरचा काळा पैसा वापस न आणणे , पाकिस्तान विरुद्ध कडक भूमिका न घेणे (सैनिक मरत असताना नवाझ शरीफ यांच्या आईला साडी पाठवणे ई .), रोबेर्ट वाध्रा वर काहीही कारवाई न करणे , अनेक राष्ट्रवादी 'बिभीषण ' पावन करून घेणे रेल्वे दरात भाववाढ करणे, मंत्री मंडळात कलंकित मंत्री घेणे , गंभीर गुन्हे असणार्या आणि स्वतहाच्या राज्यातून तडीपार असणार्या इसमाला पक्ष अध्यक्ष करणे आणि अनेक इतर गोष्टीवर कोलांटी उडी मारण्यावर भूमिका घेणे अपेक्षित आहे . म्हणजे आपला पक्ष सब से धुला हुआ , एकदम सफेद आणि बाकी सगळे घाण अशी भूमिका घेणार्यांच्या वैचारिक भाबडेपणा चे नेहमीच हसूच येत आले आहे . सगळेच पक्ष या हमाम मध्ये नंगे आहेत हे या भाबड्या लोकाना कधी कळेल हे ते अयोध्येचा राम च जाणो . अरे हो ! कारगिल मध्ये हारलेल्या भूभागाच आणि राम मंदीराच काय झाल हो ?

मनसे विषयी काही गंभीर आक्षेप मनसे ची स्थापना झाली तेव्हा राज्यभर दौरे करून चांगली वातावरण निर्मिती व मुहूर्ताची सभा गाजली मात्र राज ह्यांची भाषणे व कृती व आवेश पटला नाही , कारण ते त्यांचे मुद्दे व वक्तव्ये वास्तवापासून कोसो दूर होते. जे माझ्या काकाला , भावाला अगदी पवार ते इतर पक्षांना जमले नाही जो महाराष्ट्राचा पिंड नाही अशी एकहाती सत्ता त्यांनी जोशात मागायला सुरवात केली. त्यांना कोणी तरी समजाऊन सांगायला हवे होते. नवीन पक्ष आहे एक एक शिवरायांनी किल्ले ,प्रदेश घेऊन स्वराज्याची स्थापना झाली. एकदम दिल्लीच्या तख्ताला गवसणी घातली नाही व मैदानी युद्ध टाळली , पण राज ह्यांनी लोकसभा निवडणूक २००९ लढवली ती फक्त आपले उपद्रवमूल्य दाखविण्यासाठी. स्वतःच्या विजय झाला नाही पण युतीच्या दोन मोक्याच्या जागा पडल्यावर अपुन दे दो मारा हा फिल्मी डायलॉग त्यांच्या पुढील राजकारणातील दिशा दर्शवत होते. सेनेला सोडून भाजपने आपल्या नव्या पक्षाच्या सोबत येण्यासाठी भाजपला आपले उपद्रव मुल्य व अस्तित्व दाखविण्यासाठी राम नाईक सारखा हिरा पडून गोविंदा नामक दाउद दरबारी हजेरी लावणारा उमदेवार निवडणून आला पुढे तो तितक्यात वेगात राजकारणातून नाहीसा झाला नवीन पक्ष असतांना संपूर्ण महाराष्ट्रात दोन्ही प्रकारच्या निवडणुकीत उमदेवार उभे करण्याचा त्यांचा अट्टाहास हा केवळ आघाडीकडून सुपारी घेऊन जिंकण्यापेक्षा युतीला पाडण्यासाठी उभे केले आहेत असा समज दृढ झाला. वसंतसेनेचे आधुनिक रूप दिसले. ह्या वेळच्या लोकसभेत गडकरी ह्यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली व कश्यासाठी भाजपच्या विरुद्ध उमेदवार उभे केले नाही त्या बदल्यास राज व त्यांच्या पक्षाला भाजपकडून काय मिळाले. राम कदम ला भाजपने घेऊन चांगलीच परतफेड केली. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याचवेळी सेनेविरुद्ध उमेदवार देऊन द्वेषाचे राजकारण करत असल्याचे चित्र जनतेत उभे राहिले म्हणूनच ह्या निवडणुकीत मुंबई मधील ९ जागा बहुतांशी सेनेला मिळाल्या. आता सोशल मिडीयावर त्यांच्या पक्षाने इतर पक्षांच्या तुलनेत फारच कमी प्रमाणात अस्तित्व ठेवले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सध्या देशात दोन पद्धतीचे राजकारण होते. मोदी धाटणीचे व उर्वरित पक्षांचे सविस्तर सांगायचे तर मोदी ह्यांची राजकारण ,प्रचार करण्याची पद्धत भारतीय राजकारण नवीन आधुनिक काळाशी सुसंगत कॉर्पोरेट पद्धतीने शिस्तबद्ध व अत्यंत योजनाबद्ध रीत्या होते. त्यांची निवडणूक केंपेन मधून ओबामाच्या तोडीस तोड होती असे खुद अमेरिकन मिडिया कडून सांगण्यात आले , एकहाती सत्ता मागण्यासाठी १५ वर्ष राज्य चालविण्याचा अनुभव व सामान्य घरातून येउन आपला मार्ग आपल्या पद्धतीने आखणारे मोदी व उर्वरित पक्षात घराणेशाहीतून वर आलेले नेत्यांचे जुनाट कालबाह्य राजकारण मनसे बद्दल सांगायचे तर राज ह्यांना ठाकरे आडनावामुळे त्यांचे सहकारी व पक्ष उभा राहण्यात मदत झाली मात्र तडफदार भाषण नकला , आरोपांची आतिषबाजी ह्यात समस्येवर जालीमदेवालायापेक्ष्या शौचालये हवी हे आधुनिक काळाचे भान राखणारी तत्कालीन वास्तविक जनतेची नाळ जोडणारी विधाने राज ह्याच्याकडून आली नाही. उपाय नक्की काय आहे हे ब्लू प्रिंट येई पर्यंत जनतेला माहिती नव्हते. मोदी भाषणात नेहमीच गुजरात चा हवाला देतात ह्याचे एकमेव कारण जे एखाद्या भाषणात मला तुमच्या मतदार संघात उदा सौर उर्जा प्रकल्प आणायचा आहे असे सांगायचे असेल तर जनतेचा त्यांच्यावर विश्वास वसतो कारण गुजरात मध्ये असे अनेक प्रकल्प यशस्वीरीत्या उभे राहिले आहेत , आता अनेकांना गुजरात यश खरे वाटत नाही मात्र सामान्य जनतेसमोर गुजरात चा झाला तसा विकास आपला होईल हा विश्वास देण्यात मोदी यशस्वी ठरतात इतर पक्षांच्या सह खुद मनसे मध्ये मोदी गुजरात चे उदा देऊन जणू होय हे शक्य आहे हे जनतेच्या मनात ठरविण्यात इतर पक्ष नाकाम ठरले अजून एक मुद्दा म्हणजे ग्रामीण भारत सोडा पण सोशल नेटवर्किंग वर असणारे मतदार सुद्धा ब्लू प्रिंट जाऊन वाचण्याचे कष्ट घेणार नाही , मोदी ह्यांनी २०१२ पासून विविध प्रसंगी विविध स्थळी आपले धोरण जनतेसमोर मांडले तेव्हा कुठे त्यांची हवा निर्माण झाली , भाषणे खूप झाली आता हवी कृती तेव्हा कुठे स्वप्नातील भारत दिसेल ,आताही संपूर्ण महाराष्ट्र दौरा करण्याचे टाळून तुमच्या मोक्याच्या मोजक्या जागांवर लक्ष केंद्रित केले तर महानगर महापालिकेपासून परत पक्षाचे राजकीय पुनर्वसन शक्य होईल , सेनेची सध्याची वाटचाल पाहता दक्षिणेतील राज्यांच्या सारखे मुंबई मधील मराठी मतदार हा मनसे व सेना असे आलटून पालटून मतदान करणार असे वाटते तेव्हा आता अबकी बार मनसे सरकार पण त्यासाठी एका माणसाने सारा महाराष्ट्र सोडा आधी बालेकिल्ले परत मिळावा असे सांगावेसे वाटते आता तू नळी व इतर माध्यमांच्या मूळे लोकांना तुम्ही काय म्हणतात हे लोकांच्या लक्षात राहतो. काही सांगायचे आहे , निवडणूक लढवायची आहे व ती लढविणे आमच्या गुणसूत्रात नाही अशी वक्तव्ये पाहून खरेच संभ्रमित अवस्था निर्माण होते.

राठांचे एक नशिक मधले भाषण बघितले, त्यात मी अंबानीला सांगीतले, मी महिंद्राला सांगीतले. ते लगेच तयार झाले वगैरे असले डॉयलॉग होते. कशासाठी तयार झाले तर फ्लायओव्हर खाली बाग करायला. :-) त्यापेक्षा महानगर पालिकेच्या पैश्यानी रस्ते नीट केले असते आणि गुंङगीरी कमी केली असती तरी मते मिळाली असती. पाहीजेत कशाला अंबानी आणी महींद्रा, सरकार कडे भरपूर पैसे आहेत जर भ्रष्टाचार न करता वापरले तर.

Wed, 22/10/2014 - 15:50 - कचरत का असेना लिहिणार तर आहेच , लिहिन सावकाश ..भरारी पासुन ते पानिपत पर्यंत.. Wed, 05/11/2014 - 04:57 - मनसे विषयी मी उत्तरे देण्यासाठी वेळ मागतोय..
सुहास.. संपूर्ण इतिहास लिहायचा असेल तर थोडीथोडकी तरी सुरूवात कर. खूप दिवस झाले निकाल येवून आणि या गोष्टीला (ब्लू प्रिंटसारखा!) जितका वेळ लागेल तितके महत्व कमी होईल. माझ्यापुरते सांगतो - राज ठाकरे ज्या परिस्थितीमध्ये बाहेर पडले... किंवा घराणेशाही नाही नाही म्हणत चाललेला घराणेशाहीचा खेळ यातून "वेगळे काहीतरी होईल.. काहीतरी बदल घडेल" असेही वातावरण तयार झाले होते. लै इमोशनल नाही.. पण "आपल्या घरातील एखादा मेंबर नवीन धाडस करताना सर्वजण जसे काळजी करतात तशी काळजीही अनेकजण करत होते." त्या सर्वांचा भ्रमनिरास झाला हे मतपेटीतून सिद्ध झाले आहे. वेळोवेळी बदललेले पवित्रे.. अर्धवट सोडलेली आंदोलने.. अनेक गोष्टी वरती चर्चिल्या गेल्या आहेतच. अधिक आरोप प्रत्यारोपांवर वेळ न घालवता योग्य मुद्द्यांवर लवकर लिहिता हो - इतकेच सुचवत आहे.

अस्मिएच्या नावाने हिंसक आम्दोलने झाल्यावर जे सामाजिक नुस्कान होते , त्याच्या भर्पाईसाथी ब्लु प्रिंटात प्रोविजन आहे का ?

In reply to by hitesh

अगदी योग्य बोललास.कुठल्यातरि राज्यातल्या लोकांना दूषणे द्यायची."राहायचे असेल तर मुकाट्याने राहा","तुमच्या राज्यात निघून जा" असली भाषा वापरायची.असे बोलून आपण सत्ताधर्यांनाच अनुमोदन देत आहोत ह्याचे भान राहिले नाही.ह्या निवडणूकीतही मोदींवर टिका होती. धरणात मुतण्याची भाषा करणार्यांबद्दल,'आदर्श' लोकांबद्दल चकार शब्दही नाही. ह्यामुळे सुशिक्षित मध्यमवर्ग ह्या पक्षापासून दूर गेला.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आधी मोदीचेच फोटो लावुन हे फिरले. मग मोदी बोल्ले . सेना ओरोजिनल आहे , मनसे डुप्लिकेट आहे. दुसर्‍या दिवशीपासुन मनसेवाले मोदींच्या विरोधात बोलु लागले !

१० की कितेतरी नोव्हेम्बरला राज ठाकरे यांचे टोल विरोधी आंदोलन पुन्हा सू रु होणार आहे

सुहासराव मनसेची धरसोड वृत्ती (खरेतर राजची) मनसेला नडली असे म्हणावे लागेल. आणि जे गुरुजी भाजपाच्या बाबत करत आहेत तेच तुम्ही इथे करत आहात असे का ? अहो झाल्या चुका मनसेच्या तर तोंडावर कबुल कराना तुम्हाला काय कोण फाशी नाय देणार लगेच, ते सोडून तुम्ही इथे इतरांवर बिनकामाची चिखलफेक करत आहात ते योग्य आहे असे वाटते का तुम्हाला ? राजला नसेल इतका बिनकामाचा इगो आहे तुम्हाला कार्यकर्तेच जर असे असतील तर मग पक्षप्रमुखाला दोष कुठून देणार ? ब्लू प्रिंट यायला ८ वर्ष लागली आणि त्याचे कारण तर एके हास्यास्पद सांगत आहात तुम्ही लोक कि त्यापेक्षा त्या आठवलेंच्या रामदासची कविता परवडली हो. लोकसभेला भाजपाला पाठींबा दिला तेव्हा राजनाथ सिंहने पुण्यात येऊन यांची जाहीर तसली होती (“अरे काहे बिना मांगे समर्थन डे राहे हो”) हेच राजने लोकसभा न लढवता थेट युतीला पाठींबा दिला असता तर आज विधान सभेला मनसेच्या किमान १५/२० जागा कश्याही निघाल्या असत्या.(खरे तर आपले गडकरी उर्फ चाणक्य हेच सांगत होते राजला पण नाय ऐकल ) शेवटी याच गडकरीने विधानसभेला यांच्या राम कदमला पळविला आणि यांचे वस्त्र पूर्ण फेडले. साला भाषण पण काय असतात यांची म्हणजे शब्द बघा , एकहाती सत्ता काय, सुतासारखा सरळ काय हे सगळे त्या बाळासाहेबांनाच शोभायचे बाकी सगळे नुसते नकलाकार आहेत. एकूण काय आता वेळीच जर यांनी स्वतः मध्ये बदल घडवला नाही तर अवघड आहे सगळे यांचे...

In reply to by गजानन५९

खरे आहे गजानना. चुकांची कबुली देणे,मान्य करणे हे सुधारण्याचे पहिले लक्षण असते. खरे सांगयचे तर ह्यांचा कुठल्यातरी समाजाला लक्ष्य करण्याचा अजेण्डा कोणालाच आवडला नाही. तरूण पिढीला तर नक्कीच आवडला नसणार.ओबामाने मोदींना 'केम छो प्राय मिनिस्टर' म्हंटले म्हणून राज मोदींवर टिका करत होते की "बघा, मोदी गुजरातचे पंतप्रधान आहेत"!! उद्या राज पंतप्रधान झाले तर नक्कीच अमेरिकन अध्य़क्ष 'राम राम पाव्हनं' म्हणतील. आलेल्या पाहुण्याला खूष करणे ही जगभरची रीत आहे. भाषा,राज्याच्या आधारावर आता राजकारण करण्याची वेळ निघून गेली आहे हे त्यांना कळेल तो सुदिन. संघ्,नरेण्द्रने ,भाजपावाल्यांनी ते वेळीच ओळखले व आर्थिक विकास महत्वाचा हे ताडून राजकारण केले.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

उद्या राज पंतप्रधान झाले तर नक्कीच अमेरिकन अध्य़क्ष 'राम राम पाव्हनं' म्हणतील.
राज पंतप्रधान होणार? हहपुवा