Blue Print
In reply to ऋषि आता काय मत आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब्ल्यु प्रिंटमधे स्वप्नांचे मनोरे होते शिक्षण, रोजगार, पर्यटन, उद्योग, पायाभूत सुविधांचा विकास अशा खुप गोष्टी होत्याविविध ब्रोकरेज हाऊसेस वेगवेगळ्या क्षेत्रांविषयी मधूनमधून असे रिसर्च रिपोर्ट प्रसिध्द करत असतात. असे १०-२० रिपोर्ट एकत्र केले की ब्लू प्रिंट बनवून ती आपल्या नावावर खपवता येणे फार कठिण नाही.मनसेने असेच केले आहे की नाही हे मला माहित नाही आणि केले असले/नसले तरी त्यात मला स्वतःला अजिबात इंटरेस्ट नाही.तरीही मनसे या पक्षाविषयी तो पक्ष कोणत्याही प्रकारचा अभ्यास करून काहीही विधायक करू शकेल अशा स्वरूपाचा विश्वास अजिबात वाटत नाही. आणि स्वतः आकंठ दारूत बुडलेल्या माणसाने दारूबंदीविषयी लेक्चरबाजी केली तरी 'कोण बोलत आहे' याकडे अजिबात लक्ष न देता 'तो काय बोलत आहे' याकडेच लक्ष देण्याइतका मी तरी भाबडा नाही. असो.
पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही गेल्या काही वर्षात स्थानिक पातळीवर लक्षवेधक कामे केलेली दिसली नाही.नाही कशी? अमक्याचा गळा घोटू, तमक्याच्या नरडीचा घोट घेऊ,भय्यांचे तंगड तोडू याप्रकारची भाषा तुम्ही कधीच बघितली नाहीत याचेच आश्चर्य वाटत आहे. मनसेवाल्यांचे लक्षवेधक काम केवळ इतकेच.
भविष्यात काय तरी धाड्सी निर्णयाशिवाय सध्या तरी त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही, असे मला वाटते.राजकारणात काही 'बेलवेदर' लोक असतात.म्हणजे एखादी गोष्ट चांगली आहे की नाही याविषयी आपल्या मनात काही संभ्रम असेल तर अशा लोकांची मते एखाद्या दीपगृहाप्रमाणे दिशादर्शनाचे काम करतात.अशांनी एखाद्या गोष्टीवर टिका केली तर ती गोष्ट बहुदा चांगलीच असते. अशा बेलवेदर लोकांमध्ये कम्युनिस्टांचा नंबर कोणी हिराऊन घेईल असे वाटत नाही.आणि दुसरा नंबर नक्कीच मनसेसारख्या गुंड पक्षाचा आणि त्या पक्षाच्या समर्थकांचा लागतो (माझ्या मते). या दिशादर्शक दीपगृहांचे स्थान भारतीय राजकारणात अगदी थोडेसे किंवा कमी महत्वाचे असले तरी कायम रहावे असेच मला वाटते :)
In reply to :) by क्लिंटन
In reply to छान :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, तुम्ही काय पक्ष बंद करायला निघालात का काय ?छे हो. मला तर मनसे कोपर्यातला एखादा पक्ष म्हणून चालू राहिलेलाच हवा आहे. पूर्वी दूरदर्शी पक्ष होता त्याप्रमाणे :)
अरेरे कुठे चालला हा पक्ष.काही कल्पना नाही. बहुदा कृष्णकुंजमध्येच असावा :)
In reply to ऋषि आता काय मत आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऋषि आता काय मत आहे ?माझे मत अजूनही तसेच आहे. सदर ब्ल्यू प्रिंट हा वाचनीय दस्ताऐवज आहे व इतर कोणत्याही पक्षाने निवडणूकपूर्व काळात मांडलेल्या डॉक्युमेंट्सपैकी सर्वात व्यापक मुद्दे कव्हर करणारा तसेच तपशीलवार आकडेवारी देणारे डॉक्युमेंट अन्य वाचनात आले नाही. आता यावर आधारीत मत द्यावे का? वगैरे प्रत्येक मतदाराचा वैयक्तिक प्रेरॉगेटिव्ह आहे. त्यानुसार (माझ्यासकट अनेक)मतदारांनी हक्क बजावला आणि बहुमत समोर आहेच. बहुमताने एखाद्या पक्षाला नाकारले / स्वीकारले नाही म्हणजे त्याने सादर केलेला दस्ताऐवज लगेच बेकार होतोच असे नाही.
In reply to माझे विचार आणि कल इथे by ऋषिकेश
In reply to हा हा हा हा , लय शोधुन- शोधुन by सुहास..
In reply to लोल ! by सिद्धार्थ ४
In reply to खिक्क by सुहास..
In reply to आज जर मी मनसे चा काम करत नसतो by सुहास..
In reply to हा हा हा हा , लय शोधुन- शोधुन by सुहास..
आमची चा आमची नोट पाचची होती हो ! मान्य करतो, फाटली ती नोट , पण तुमची तर १००० ची नवी कोरी होती...............
प्रिय सुहास आत्तापर्यंतचे तुमचे सर्व प्रतिसाद वाचतोय त्यात तुम्ही जे मनसेचं सोडुन दुस-बद्दल बोलताय तेच मुळात चुकतंय. मनसेबद्दल तुम्ही स्वत:च बोलायला धागा काढलाय तेव्हा दुस-याने काय केले ते मुद्दे गैरलागु आहेत. मनसेनं काय केलं ? मनसेच्या पनिपताचं योग्य कारण ? मनसेच्या भविष्यातल्य वाटा ? मनसेची अवस्था ? नेतृत्त्व ? विश्वास ? ब्ल्युप्रिंट ? भाषा ? उणिवा, प्रचारातील मुद्दे याबद्दल अजुनही तुम्ही मोकळेपणाने बोललेला नाहीत आणि कार्यकर्ता म्हणुन तुम्हाला ते जमणारही नाही, असं वाटतं. आणि तुमच्याकडुन तशी अपेक्षा करणं आता जवळ जवळ मी सोडुन दिलंय.
मनसेला विकासाचं एक उत्तम मॉडेल बनविण्याची नाश्कात संधी होती. संपूर्ण महाराष्ट्र नाश्कात काय घडतं त्यावर लक्ष ठेवून होतं तुमच्या नेतृत्वाला तिथे विकासाचा कोणताही कस लावता आला नाही. महाराष्ट्रात सर्वात अगोदर नजरेत भरवणारी साथ मनसेला कोणी दिली असेल तर ती नाश्काने दिली तिथेच तुम्ही पहिली बाजी हरलात. महानगरपालिकेत तुम्ही काही पदांच्या मोहापाई तुम्ही शिवसेना- भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली. ( महिला व बालकल्याण उपसभापतीपद ) मुळात पक्षाला अजुन कळलंच नव्हतं की आपण स्वतंत्र राह्यचं की कोणाकडे जाऊन भांडीकुंडी घासायची. आणि मनसेचे पाय असे चिखलात रुतत गेले. नगरलाही तुम्ही महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीपक्षाशी घरोबा केला. औरंगाबादमधे जिल्हापरिषदेत तुम्ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी बरोबर संसार थाटला. कोणतीही स्वत:बद्दल ठोस भूमिका न घेता सत्तेशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात मनसेने स्वत:चे अस्तित्व असे हळुहळु गमावले अतिशय बेसलेस भूमिका गेल्या काही वर्षा बघायला मिळाली आणि तुमची ब्ल्यु प्रिंटही तुम्हाला कुठेच वाचवू शकली नाही. त्याचा निकाल संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला. सत्तेसाठी राष्ट्रवादीबरोबर घरोबा करायचा आणि जाहीर भाषणात शिवसेनेला नावं ठेवतांना आपलं नेतृत्व लोकसभेच्या भाषणात म्हणत होतं '' एकीकडे शरद पवार यांच्याशी चुंबाचुंबी करायची, तर दुसरीकडे उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून लाई चना आणि उत्तर प्रदेश दिन साजरे करायचे, हा मराठी माणसांचा विश्वासघात नाही का? '' अरे सत्तेसाठी चुंबाचुंबी कोणी केली, हे आता सर्वांना कळलं आहे.
बाकी राहीली आमच्या अभ्यास वाढवायची गोष्ट. आमचा अभ्यास जेमतेमच आहे पण मनसेबाबत आता चांगला झाला आहे. आपल्या मनसेने राज्यात एकूण ४० ठिकाणी टोलबाबत माहिती संकलन केली काही मुद्दे आजही आपल्या सायटीवर बघायला मिळतात एकच मला सांगा मनसेने आणि त्यांच्या आमदारांनी विधानसभेत टोलबाबत भूमिका बदलली पाहिजे यासाठी नजरेत भरतील अशी कृती केली. (आमच्या आमदारांनी प्रशांत बंब यांनी लासुर रोडावरील रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे स्वतः तुरुंगात गेले आणि कागदोपत्री अभ्यास करुन तो टोल बंदच केला) आपल्या मनसेच्या आमदारांनी अशा किती अनाधिकृत टोल बंद करण्यासाठी पुढाकार घेतला. मनसेची गाडी आहे म्हणुन कितीतरी कार्यकर्त्यांनी टोल चुकवला हेच आपल्या आंदोलनाचे यश म्हणायचे का ? लोक साटं लोटं झालं म्हणतात त्याबद्दल माझ्याकडे काही माहिती नाही, त्याबद्दल मला बोलायचं नाही.
कोणत्याही प्रशासकीय आंदोलनासाठी अभ्यास करावा लागतो ही गोष्ट मान्य. मनसेने किती आंदोलनाचा अभ्यास केला आणि किती आंदोलने यशस्वी केलीत. माझं निरिक्षण असं आहे, कोणत्याही आंदोलनाची हवा करायची आणि ते आंदोलन अर्धवट सोडायचं हाच एकमेव उद्योग मनसेने केला. दुकानाच्या पाट्या मराठीत लावा. (काही दिवस हवा केली सोडलं अर्धवट), मराठी भाषा अभ्यासक्रमात आवश्यक विषय असावा म्हणुन आपण शाळा महाविद्यालयांच्या संस्थाचालकांना पत्रे लिहिलीत. शाळा आणि महाविद्यालयामधे भाषा अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी अभ्यास मंडळे असतात आणि अभ्यास मंडळाच्या सदस्यांना शासनाने असा विषय अभ्यासक्रमात समावेश करावा असे शासनाने निर्णय घेतला पाहिजे त्यासाठी आमदारांनी मुख्यमंत्र्यावर दबाव आणला पाहिजे, यातली कोणती कृती आपल्या आमदारांनी केली. मुळात भाषा अभ्यासक्रमात समावेश करावी यासाठी संस्थाचालकांना पत्रे लिहिणे हेच मुळी हास्यास्पद होतं. हा मुद्दाही नंतर बाजुला पडला.
रेशनकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, टॅक्सी-रिक्षाचे परवाने या बाबत बाहेरच्या लोंढ्याला रोखून नियमांची अंमलबजावणी व्हायला हवी यासाठी नुसती भाषणं केली. मला वाटतं टॅक्सी रिक्षा परवाने स्थानिकांना दिलं पाहिजे यासाठी काही दिवस आंदोलने केली आणि तेही अर्धवट सोडलं.
सुहास एक नै शंबर गोष्टी मनसेने अशा अर्धवट सोडल्या. अजून एक गोष्ट सांगतो साहेबांना वाट्तं आपलं भाषण उत्तम होतं. लोक ऐकायला येतात. लोक ऐकायला येतात म्हणुन तुम्ही त्यांना काहीही बोललं पाहिजे का ? लोक गर्दी करतात, घोषणा देतात ते त्यांच्यावरील प्रेमाने त्यांच्यवर राग व्यक्त करण्यासाठी नाही. अतिशय मगरुरी वागण्यात दिसते. एक उदाहरण आठवलं आमच्या संभाजीनगरात कै. बाळासाहेबांचं भाषण होतं. सभेला ही गर्दी, नुसत्या घोषणा, साहेब भाषणाला उभे लोक आवरेचना. साहेब काहीच बोलले नाहीत नुसते शेतकर्यासारखी जागीच बैठक मारली दहा मिनिटे साहेब बोलले नाहीत आणि नंतर ते मैदान टाळ्यांनी दनाणुन गेलं. आपल्या साहेबांसारखे पाच मिनिटात व्यासपीठ सोडून गेले नाहीत.
जाऊ द्या मनसेवर किती अन काय बोलणार. आणि आपल्याकडून कोणतही अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण येणार नाही, हे मला एव्हाना कळलं आहे. आता आडात नै तर पोहर्यात कुठून येणार. असो, लिहिण्यासारखं खुप आहे पण थांबतो.
-दिलीप बिरुटे
In reply to आमची चा आमची नोट पाचची होती by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आमची चा आमची नोट पाचची होती by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बिरुटे सर, एक नंबर प्रतिसाद!! by बॅटमॅन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }In reply to आमची चा आमची नोट पाचची होती by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to एक मिनीट !! by सुहास..
In reply to आणि हे माझे नवीन प्रश्न !! by सुहास..
In reply to आणि हे माझे नवीन प्रश्न !! by सुहास..
२४ नोव्हेंबर पासुन हिवाळी अधिवेशन आहेच दिल्लीला, तेव्हा , ते बिहारच्या पुराच आणि तुमच्या त्या तुलसी भाभी ला एकदा बघतोचजल्ला काय कल्ला नाय. मन्से चे लोकसभेत पण निवडून गेले आणि आमाला बातमीच नाय?
In reply to २४ नोव्हेंबर पासुन हिवाळी by काळा पहाड
In reply to आणि हे माझे नवीन प्रश्न !! by सुहास..
In reply to सुहास साहेब, तुम्ही खरच काही by प्रसाद१९७१
तुमची सर्व मते वाचुन सर्वांनी आता काही झाले तरी भविष्यात मनसे ला मत देणार नाही असे ठरवले.मग तर सुहासरावांनी लिहिलेच पाहिजे असे मी म्हणेन. मनसेचा खरा चेहरा जगासमोर यायला हवा :)
In reply to मग तर लिहाच by क्लिंटन
पाच ...केवळ बारा - हजार आणी काहीतरी शेकडा वितरकांसाठी गॅस चा दर दोन रूपये आणि काही पैसै वाढविण्याच आम्हाला काही समजले नाहीडेमॉक्रसी चा अर्थ माहितिये का सुहास साहेब? डेमॉक्रसी म्हणजे मॉबॉक्रसी नव्हे. ज्याचे ज्यास्त लोक त्याचा न्याय असं नसतं. वितरकांच्या मागणी सरकारला जर योग्य वाटत असेल, तर त्यांनी दर वाढवणे चुकीचे कसे?
In reply to आणि हे माझे नवीन प्रश्न !! by सुहास..
एक... हे अदानींना २६० एकर जमीन , तुमच्या वेळेस कशी काय मंजुर झाली, मौनीबाबा असताना का मिळाली नाही ? पर्यावरण खातं , लवासा घडल्यापासुन, गवत कापायला परवानगी देत नाहीये महाराष्ट्रात, या महाभागाला जंगल कापायला कशी काय दिली ? बर ! २६० एकर ? किती मेगा वॅट चा प्लॅन्ट आहे ? काय रेट ने दिलीत, आणि जंगलात का, ते जैतापुर सारखं २६,००० प्रती एकर ने दिलेली मग आंदोलन केल्यावर, ( आठवा, आमचे बाळासाहेब, जैतापुरचे मयतापुर करू ) २,००,००० करता न यावे कोणाला ही म्हणुन का ? गोंदिया चा कोळसा, भुगर्भ शास्त्रज्ञांनी केव्हाच निकृष्ट दर्जाचा ठरविलाय , तिथुन कोळसा नाय ? अदानीचा च कोळसा बाहेर निघेल, बर ! बर , राज्य सरकार अस्तित्वात नसताना, ( राज्यपाल तुम्ही आणुन बसविलाय) हे कुठल्या धारेत बसते ? ( पहिल्या धारेत का ? मग आमचा आक्षेप आहेच !! )हा पॅराग्राफ नक्की मराठीतच आहे का? कशाचा कशाला संबंध लागत नाहिये म्हणून म्हणतोय.
दोन ..त्या काळ्या यादीच जरा नीट ठरवुन घ्या , नेमके किती पैसै आणणार आहात ते ?ते कसं ठरवणार? तो अंदाज आहे. नक्की किति पैसे आहेत हे स्विस किंवा जर्मन बँकांनी डिक्लेयर केलय का? नक्की किती खाती आहेत हे तरी कुठं माहितिय? पण अंदाज तर करावाच लागणार. बर त्याची प्रोग्रेस ही गुप्त असणार. ती ते तुम्हाला का सांगतील?
तीन ..पेट्रोल आपल्यामुळे कमी झाल्याचे कळले , आपण आखाती देशांमध्ये मुत्र-विसर्जनासाठी जात असल्यामुळेवा! काय ती भाषा!!
अहो पेट्रोल म्हणजे माता च ना , सगळे भाव त्यामुळेच वाढतातभाव डिझेल मुळे वाढतात सुहास साहेब. अभ्यास वाढवा.
आख्खे मुग अजुन ३६००० रु, क्विंटल पर्यंत का पोचले ते काही कळले नाही , गुजरात मध्ये वाढतात की काय ?निदान ते व्यापारी तरी आहेत. ते त्यांचा फायदा पहाणारच. मराठी लोक एजंटगिरी, गुंडगिरी, दलाली यांच्याशिवाय दुसरं काही करतात का? मजूर सुद्धा परराज्यातून आणावे लागतात.
चार ...जपान ने आपला भारतातला अॅक्टिव्हा चा ११०० करोडचा चौथा प्रोजेक्ट , औरगांबाद च्या एवजी, अहमदाबाद ला का नेलाय हो , तुम्ही तर केला ना अहमदाबाद विकास जो काही करायचा तो , मग आमच्या गरीबांच्या औरगांबाद ने..माफ करा.. संभाजीनगर ने ...काय घोडं मारलयअहो कामं करता का तुम्ही लोक? सारखं अस्मिता, शिवाजी महाराज, अफझल्खान, शाइस्तेखान, तोडून टाकू, खळ्ळ खट्याक, शूर मावळे असलं काहीतरी बडबडून कामं होतात का? वीज आहे का महाराष्ट्रात पूर्ण वेळ? सवलतीत तर जाऊच दे. त्या एम आय डी सी मध्ये सगळे मावळे जाऊन उद्योगपतींना धमक्या देतात की काँट्रॅक्ट त्यांनाच मिळाली पाहिजेत म्हणून. आता जा तिकडे अहमदाबादेत पाठ मोडून काम करायला. इथं सगळं होतं ते मोडून खाल्लं तुम्ही लोकांनी. आणि वर नाक करून विचारताय की उद्योग तिकडे का नेताय म्हणून?
सहा ...ते , छोट्या कपड्यांमुळे बलाक्तार होतात म्हणणार्या हुड्डा ला हरियाना चा मुख्यमंत्री केलात ते आम्ही मर्जीतील माणसे पाहिजेत , हे आम्ही समजु शकतोअहो, हरियानाचा मुख्यमंत्री हुड्डा नाहिये, खट्टर आहे. काय हे!
हे आम्ही समजु शकतो पण हे " मेक इन इंडिया " चे काय खुळ घातलय पब्लीक च्या डोक्यात , अहो शेठ , ही परदेशी कंपन्या आपल्या इथे , जेव्हा कमी पैशात वस्तु बनवितात, रोजगार निर्माण करतात, तेव्हा एक प्रकारे आपण त्यांचे मिंधे होत असतो , एक तर जवळपास फुकटाची गुंतवणुक असते, पण जेव्हा , त्यांची कंपनी तोट्यात जाते ना, ते सर्वात पहिले आपली मारतात, इथले सर्व व्यवहार बंद करतात, आपल्या नौकर्या जातात, मग एमआयडीसी मध्ये तुलसी रामसे ब्रदर्स च्या भुतपटांच्या शुटींग कराव्या का ? [...] इंटरनॅशनल इकॉनॉमी चा गेम कधी उलटेल सांगता येत नाही , कशाला रिस्का घ्यायच्या , त्या मौनीबाबा ने काळाची पावले केव्हाच ओळ्खली होती म्हणा की !! आणि अटलजी स्वदेशी बाबत काय सांगत होते हे कळलेच नाही म्हणायचे की तुम्हाला, ना राज धर्म कळला ना अटलजी !!तुम्ही आणि इंटरनॅशनल इकॉनॉमी वर बोलावं म्हणजे विनोदच म्हणा. नक्की कसल्या रिस्क बद्दल बोलताय तुम्ही? कारण जेव्हा मार्केट खराब होतं तेव्हा आउट्सोर्सिंगला जोर येतो. आणि हा गेम नाहीये सुहास साहेब, हा बिझनेस आहे. गेम-रिस्क हे सगळं तिकडं बोलायचं-ज्यांना "..की जय" म्हणायशिवाय काही समजत नाही त्यांच्यापुढे. बाकी तुमची व्होकॅब्युलरी सुधरा जरा "मिंधे होणं", "आपली मारतात", "खुळ घातलय पब्लीक च्या डोक्यात".. काय हे! बाकी "मेक इन इंडिया" ही संकल्पना जरा समजून घ्या आणि मग बोला.
सात ....आम्हाला रविवारी आपलं भाषण एकायचा योग आला ! हल्ली लय एकसुरी होत चाललायमध्ये मध्ये टॉप ट्वेन्टीतली गाणी लावायला सांगावं काय, "सैनिकां" च्या "श्रमपरिहारा" साठी?
In reply to एक मिनीट !! by सुहास..
In reply to सर्व व्यक्तिगत तरीही... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तयार रहा ! by सुहास..
In reply to तयार रहा ! by सुहास..
In reply to हा प्रतिसाद कधी प्रकाशित करणार आहात? by लंबूटांग
बाकीच्या धाग्यांवर प्रतिसाद देताय म्हणून विचारले.मागेच अशाच कुठल्यातरी धाग्यात-- स्पेसिफिकेश(न) देतो लवकरच म्हणून ८-१० दिवस हे अंतर्धान पावले.स्पेसिफिकेश कधी देताय म्हणून विचारल्यावर दिली आहेत की वर असे उत्तर दिले.अजून एकदा असेच काहीतरी झाल्यावर या मनुष्याच्या तोंडी लागण्यात अर्थ नाही हे लक्षात आले :)
In reply to हा हा हा हा , लय शोधुन- शोधुन by सुहास..
In reply to मनसेला एक महापालिका धड by श्रीगुरुजी
In reply to . by hitesh
In reply to शून्यहाती सत्ता by क्लिंटन
In reply to राठांचे एक नशिक मधले भाषण by प्रसाद१९७१
Wed, 22/10/2014 - 15:50 - कचरत का असेना लिहिणार तर आहेच , लिहिन सावकाश ..भरारी पासुन ते पानिपत पर्यंत.. Wed, 05/11/2014 - 04:57 - मनसे विषयी मी उत्तरे देण्यासाठी वेळ मागतोय..सुहास.. संपूर्ण इतिहास लिहायचा असेल तर थोडीथोडकी तरी सुरूवात कर. खूप दिवस झाले निकाल येवून आणि या गोष्टीला (ब्लू प्रिंटसारखा!) जितका वेळ लागेल तितके महत्व कमी होईल. माझ्यापुरते सांगतो - राज ठाकरे ज्या परिस्थितीमध्ये बाहेर पडले... किंवा घराणेशाही नाही नाही म्हणत चाललेला घराणेशाहीचा खेळ यातून "वेगळे काहीतरी होईल.. काहीतरी बदल घडेल" असेही वातावरण तयार झाले होते. लै इमोशनल नाही.. पण "आपल्या घरातील एखादा मेंबर नवीन धाडस करताना सर्वजण जसे काळजी करतात तशी काळजीही अनेकजण करत होते." त्या सर्वांचा भ्रमनिरास झाला हे मतपेटीतून सिद्ध झाले आहे. वेळोवेळी बदललेले पवित्रे.. अर्धवट सोडलेली आंदोलने.. अनेक गोष्टी वरती चर्चिल्या गेल्या आहेतच. अधिक आरोप प्रत्यारोपांवर वेळ न घालवता योग्य मुद्द्यांवर लवकर लिहिता हो - इतकेच सुचवत आहे.
In reply to Wed, 22/10/2014 - 15:50 - by मोदक
In reply to . by hitesh
In reply to अगदी by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to . by hitesh
In reply to . by hitesh
:)