Skip to main content

गजरा

लेखक सुर्या गार्डी यांनी रविवार, 02/11/2014 22:42 या दिवशी प्रकाशित केले.

नाजूक रेशीमगाठीनी फुला फुलां ना गुंफिले होते
तुझ्यासाठीच फुलांनी आयुष्य वेचिले होते ।।

ठाऊक त्यांना आयुष्य त्यांचे क्षण भंगूर होते
परी केसांवरी तुझ्या झुलायचे भाग्य थोर होते ।।

भाग्य कुणाचे कुणी जाणिले,ललाटावर लिहीलेले
तुझ्यासवे फिरायचे ते दिवस फुलांच्या गजर्‍याचे होते ।

नशीबाने ना साथ दिली फुल होऊनी फुलण्याची
गजर्‍यात गुंफूनी झुलण्याची केसांवरी तुझ्या झुलूनी
सौदर्य तुझं खूलवायची ।

नशिबाला ही ते उशीरा कळले फुल होउनी फुलायचे होते
गजर्‍यात गुंफूनी झुलायचे होते आयूष्यच माझे गजर्‍यात गुंफायचे होते ।।

»» सुर्या ««

लेखनविषय:

वाचने 2015
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

नशीबाने ना साथ दिली फुल होऊनी फुलण्याची
गजर्‍यात गुंफूनी झुलण्याची केसांवरी तुझ्या झुलूनी
सौदर्य तुझं खूलवायची ।

हं खरंय.. नशीब लागतं गजरा माळायला, तिच्या बटा सावरायला.

-दिलीप बिरुटे
(नशीबवान)


भाग्य कुणाचे कुणी जाणिले,ललाटावर लिहीलेले
तुझ्यासाठीच फुलांनी आयुष्य वेचिले होते

या ओळी खुपच छान .. एक्दम मस्त


कविता आवडली, भौंरा (भ्रमर) झाले असता, तर एखादे चुंबन मिळण्याची शक्यता होती, फक्त मध्ये कुणी दुष्यंत टपकला नाही पाहिजे.


In reply to by विवेकपटाईत

हो ना।। नाहितर
"भाग्य कुणाचे कुणी जाणिले,ललहाटावर लिहीलेले" अशी गत होयची।।।।