नाजूक रेशीमगाठीनी फुला फुलां ना गुंफिले होते
तुझ्यासाठीच फुलांनी आयुष्य वेचिले होते ।।
ठाऊक त्यांना आयुष्य त्यांचे क्षण भंगूर होते
परी केसांवरी तुझ्या झुलायचे भाग्य थोर होते ।।
भाग्य कुणाचे कुणी जाणिले,ललाटावर लिहीलेले
तुझ्यासवे फिरायचे ते दिवस फुलांच्या गजर्याचे होते ।
नशीबाने ना साथ दिली फुल होऊनी फुलण्याची
गजर्यात गुंफूनी झुलण्याची केसांवरी तुझ्या झुलूनी
सौदर्य तुझं खूलवायची ।
नशिबाला ही ते उशीरा कळले फुल होउनी फुलायचे होते
गजर्यात गुंफूनी झुलायचे होते आयूष्यच माझे गजर्यात गुंफायचे होते ।।
»» सुर्या ««
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2015
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडल.
आवडल.
हं. छान. लिहित राहा.
नशीबाने ना साथ दिली फुल होऊनी फुलण्याची
गजर्यात गुंफूनी झुलण्याची केसांवरी तुझ्या झुलूनी
सौदर्य तुझं खूलवायची ।
हं खरंय.. नशीब लागतं गजरा माळायला, तिच्या बटा सावरायला.
-दिलीप बिरुटे
(नशीबवान)
मस्त
भाग्य कुणाचे कुणी जाणिले,ललाटावर लिहीलेले
तुझ्यासाठीच फुलांनी आयुष्य वेचिले होते
या ओळी खुपच छान .. एक्दम मस्त
.
छान. लिहीत रहा. चांगले लिहताय.
कविता आवडली, भौंरा (भ्रमर)
कविता आवडली, भौंरा (भ्रमर) झाले असता, तर एखादे चुंबन मिळण्याची शक्यता होती, फक्त मध्ये कुणी दुष्यंत टपकला नाही पाहिजे.
हो ना।। नाहितर
In reply to कविता आवडली, भौंरा (भ्रमर) by विवेकपटाईत
हो ना।। नाहितर
"भाग्य कुणाचे कुणी जाणिले,ललहाटावर लिहीलेले" अशी गत होयची।।।।
छान
आवडली.
सुंदर
छान, आवडली
आभार
सर्व प्रतिसादकांचे मनपुर्वक आभार ।।