पोकळी
वेगळी नाहीस तू, का कोण जाणे, वाटले
सावली माझीच तू, का कोण जाणे, वाटले
व्हायचो कित्येकदा भवती तुझ्या मी कवडसे
एकदा बघशील तू का कोण जाणे वाटले
जाग आली चांदण्यांच्या मल्मली दुलईमधे
पांघरुन गेलीस तू का कोण जाणे वाटले
कोरडाच्या कोरडा पाऊस आला एकटा
वाटले येशील तू..का कोण जाणे..वाटले
पोकळी माझ्यातली का दरवळाया लागली?
(श्वासभर फुललीस तू का कोण जाणे वाटले)
शेवटी आलाच ऐकू हुंदका अस्पष्टसा
शेवटी चुकलीस तू! का कोण जाणे, वाटले
वा!
बेसनलाडू बघून धागा उघडला आणि
+१
+ २
छान गजल
खूप भारी. खास..
मस्तच !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हिंदी-चिनी.. नेमके काय?फारच सुंदर
बेसनलाडू लिहीता झालेला बघून
व्वा...
" जाग आली चांदण्यांच्या
व्वा!! एक नंबरच लिहिलेय.
बेला.. लिखाण खुप आवडलं.!!
का रं बाबा!!
आवड्ली !!! आवल्डी !!!
मस्त!!!! खूप आवडली
पोकळी वेगळी नाहीस तू, का कोण
पोकळी माझ्यातली का दरवळाया
वाह!
अप्रतीम!
पुन्हा वाचली. पुन्हा खूप
प्रत्येक शेर निव्वळ अप्रतिम !