Skip to main content

पोकळी

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 18/09/2014 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
वेगळी नाहीस तू, का कोण जाणे, वाटले सावली माझीच तू, का कोण जाणे, वाटले व्हायचो कित्येकदा भवती तुझ्या मी कवडसे एकदा बघशील तू का कोण जाणे वाटले जाग आली चांदण्यांच्या मल्मली दुलईमधे पांघरुन गेलीस तू का कोण जाणे वाटले कोरडाच्या कोरडा पाऊस आला एकटा वाटले येशील तू..का कोण जाणे..वाटले पोकळी माझ्यातली का दरवळाया लागली? (श्वासभर फुललीस तू का कोण जाणे वाटले) शेवटी आलाच ऐकू हुंदका अस्पष्टसा शेवटी चुकलीस तू! का कोण जाणे, वाटले
लेखनविषय:

वाचने 6572
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

मस्त!

In reply to by सखी

तंतोतंत.

चांगली झालीये. आवडली.

कोरडाच्या कोरडा पाऊस आला एकटा वाटले येशील तू..का कोण जाणे..वाटले व्वा...

" जाग आली चांदण्यांच्या मल्मली दुलईमधे पांघरुन गेलीस तू का कोण जाणे वाटले " व्वा क्या बात है! सून्दर !

व्वा!! एक नंबरच लिहिलेय. तुझ्या हळूवार लिखाणाचा चाहता आहे ब्वॉ, लिहित रहा नेहमीच.

आरं बायडीला धाडून दिलं देशात आन आत्ता हितं कविता लिवत बसलास व्हयंं रे

मस्त!!!! खूप आवडली :-) जाग आली चांदण्यांच्या मल्मली दुलईमधे पांघरुन गेलीस तू का कोण जाणे वाटले

आवडली प्रत्येक ओळ. खूप दिवसांनी लिहिलंत..

बघायचीच राहिली होती! प्रत्येक ओळ सुंदर! खूप खूप धन्यवाद!! :)