✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पोकळी

ब — बेसनलाडू, गुरुवार, 09/18/2014 - 13:30
वेगळी नाहीस तू, का कोण जाणे, वाटले सावली माझीच तू, का कोण जाणे, वाटले व्हायचो कित्येकदा भवती तुझ्या मी कवडसे एकदा बघशील तू का कोण जाणे वाटले जाग आली चांदण्यांच्या मल्मली दुलईमधे पांघरुन गेलीस तू का कोण जाणे वाटले कोरडाच्या कोरडा पाऊस आला एकटा वाटले येशील तू..का कोण जाणे..वाटले पोकळी माझ्यातली का दरवळाया लागली? (श्वासभर फुललीस तू का कोण जाणे वाटले) शेवटी आलाच ऐकू हुंदका अस्पष्टसा शेवटी चुकलीस तू! का कोण जाणे, वाटले

प्रतिक्रिया द्या
6533 वाचन

💬 प्रतिसाद (22)

वा!

पैसा
गुरुवार, 09/18/2014 - 14:30 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

बेसनलाडू बघून धागा उघडला आणि

सूड
गुरुवार, 09/18/2014 - 14:43 नवीन
बेसनलाडू बघून धागा उघडला आणि सार्थक झालं!! एकच नंबर !!
  • Log in or register to post comments

+१

सखी
गुरुवार, 09/18/2014 - 21:46 नवीन
बेसनलाडू बघून धागा उघडला आणि सार्थक झालं!! एकच नंबर !! - तीव्र सहमत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

+ २

मेघवेडा
Sat, 09/20/2014 - 15:06 नवीन
तंतोतंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

छान गजल

चाणक्य
गुरुवार, 09/18/2014 - 14:45 नवीन
चांगली झालीये. आवडली.
  • Log in or register to post comments

खूप भारी. खास..

गवि
गुरुवार, 09/18/2014 - 14:54 नवीन
खूप भारी. खास..
  • Log in or register to post comments

मस्तच !

मदनबाण
गुरुवार, 09/18/2014 - 15:10 नवीन
मस्तच !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हिंदी-चिनी.. नेमके काय?
  • Log in or register to post comments

फारच सुंदर

कवितानागेश
गुरुवार, 09/18/2014 - 16:55 नवीन
फारच सुंदर
  • Log in or register to post comments

बेसनलाडू लिहीता झालेला बघून

प्यारे१
गुरुवार, 09/18/2014 - 17:38 नवीन
बेसनलाडू लिहीता झालेला बघून मणाला आनंद झाला. (भावना सहीसोबत मांडणार्‍या बेसनलाडूचा पंखा) प्यारे
  • Log in or register to post comments

व्वा...

अजय जोशी
गुरुवार, 09/18/2014 - 20:04 नवीन
कोरडाच्या कोरडा पाऊस आला एकटा वाटले येशील तू..का कोण जाणे..वाटले व्वा...
  • Log in or register to post comments

" जाग आली चांदण्यांच्या

निरन्जन वहालेकर
गुरुवार, 09/18/2014 - 23:09 नवीन
" जाग आली चांदण्यांच्या मल्मली दुलईमधे पांघरुन गेलीस तू का कोण जाणे वाटले " व्वा क्या बात है! सून्दर !
  • Log in or register to post comments

व्वा!! एक नंबरच लिहिलेय.

किसन शिंदे
गुरुवार, 09/18/2014 - 23:12 नवीन
व्वा!! एक नंबरच लिहिलेय. तुझ्या हळूवार लिखाणाचा चाहता आहे ब्वॉ, लिहित रहा नेहमीच.
  • Log in or register to post comments

बेला.. लिखाण खुप आवडलं.!!

आनन्दिता
Fri, 09/19/2014 - 00:27 नवीन
बेला.. लिखाण खुप आवडलं.!!
  • Log in or register to post comments

का रं बाबा!!

नाटक्या
Fri, 09/19/2014 - 04:45 नवीन
आरं बायडीला धाडून दिलं देशात आन आत्ता हितं कविता लिवत बसलास व्हयंं रे
  • Log in or register to post comments

आवड्ली !!! आवल्डी !!!

खटपट्या
Fri, 09/19/2014 - 08:42 नवीन
आवड्ली !!! आवल्डी !!!
  • Log in or register to post comments

मस्त!!!! खूप आवडली

मनिष
Fri, 09/19/2014 - 11:37 नवीन
मस्त!!!! खूप आवडली :-) जाग आली चांदण्यांच्या मल्मली दुलईमधे पांघरुन गेलीस तू का कोण जाणे वाटले
  • Log in or register to post comments

पोकळी वेगळी नाहीस तू, का कोण

विलासराव
Sat, 09/20/2014 - 15:43 नवीन
पोकळी वेगळी नाहीस तू, का कोण जाणे, वाटले चिंचपोकळी आमचीच तू, का कोण जाणे, वाटले
  • Log in or register to post comments

पोकळी माझ्यातली का दरवळाया

अत्रुप्त आत्मा
Sat, 09/20/2014 - 23:48 नवीन
पोकळी माझ्यातली का दरवळाया लागली? (श्वासभर फुललीस तू का कोण जाणे वाटले)>>> सलाम!!!
  • Log in or register to post comments

वाह!

पद्मश्री चित्रे
Mon, 09/22/2014 - 10:19 नवीन
आवडली प्रत्येक ओळ. खूप दिवसांनी लिहिलंत..
  • Log in or register to post comments

अप्रतीम!

उत्खनक
Mon, 11/03/2014 - 18:29 नवीन
बघायचीच राहिली होती! प्रत्येक ओळ सुंदर! खूप खूप धन्यवाद!! :)
  • Log in or register to post comments

पुन्हा वाचली. पुन्हा खूप

कवितानागेश
Tue, 11/04/2014 - 08:47 नवीन
पुन्हा वाचली. पुन्हा खूप आवडली. :)
  • Log in or register to post comments

प्रत्येक शेर निव्वळ अप्रतिम !

psajid
Tue, 11/04/2014 - 14:54 नवीन
खूप चांगली गझल ! प्रत्येक शेर निव्वळ अप्रतिम ! खूप आवडली !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा