चहा व अंड (कोंबडीच यापुढे कों.च हे शार्टफ़ार्मात वाचावे) हे विधात्याने दिलेले मर्त्य मानवाच्या जीवनाच्या कठोर संघर्षात त्याच्या थकलेल्या मना-शरीराला दिलासा व विलक्षण आनंद देणारे दोन वरदान आहेत. या दोन वरदानाच्या सेवनाने मनुष्य भौतिक च नव्हे तर आध्यात्मिक जीवनातील अडथळे देखील सहज पार करु शकतो. म्हणजे ते इटसेल्फ़ अडथळे पार पाडत नाही मात्र यांचे सेवन मनुष्याला एनर्जाइझ करते व थकवा घालवुन तरतरी प्रदान करते. त्या तरतरी च्या तरफ़ेवर स्वार होउन मनुष्य भवसागर पार करु शकतो. वरचा आध्यात्मिक उल्लेख सीरीयस आहे. तिबेटी ध्यान धारणेच्या परंपरेत ध्यान करतांना झोप लागु नये यासाठी चहा पिउन ध्यानाला बसण्याची अतिप्राचीन परंपरा आहे. जपानी चहा चे अध्यात्मिक रीच्युअल्स तर प्रसिद्ध च आहेत. भारतातल्या एका विलक्षण प्रतिभाशाली शहरात चहा ची विक्री करणारया दुकानांत चहा चा उल्लेख अमृततुल्य असा सार्थ केला जातो. मात्र माझा याला आक्षेप असा आहे की याने चहा चे अवमुल्यन च होत नाही का? उलटपक्षी अमृताचा उल्लेख चहातुल्य असा व्हावयास हवा. कारण अमृताचे फ़ंक्शन बघा कीती मर्यादीत आहे. काय तर म्हणे त्याचे सेवन तुम्हाला अमर करते. म्हणजे अमृत प्राशन करुन काय करायचे तर अमर व्हायचे ? छ्या , आणि अमर झाल्यावर या भयावह जीवनात जगायचे कसे? ( ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है ) जीवन पुर्णपणे निरर्थक आहे या निहीलझम च्या तत्वज्ञानाचा पुर्ण डोलारा कोसळवण्याची ताकद एक हाफ़ चाय व एक हाफ़ फ़्राय मध्ये आहे. तर जगतांना अमृत कुठलाही आधार देत नाही. उलटपक्षी चहा जगतांना डेली बेसीस वर मदत करते. हमखास आनंदाची विरंगुळयाची शांततेची तरतरीची उत्साहाची अत्यावश्यक अशी मागणी ती सातत्याने पुर्ण करते. म्हणजे मानवाला अमृत जो अमर करुन जीवनाच्या तुमुल कोलाहलात निर्दयतेने ढकलुन देतो तेथेच चहा त्याच मानवाला रोज हात धरुन रस्ता ओलांडुन देते. एका प्रमुख भारतीय पक्षाचे प्रमुख नेते हे चहाचा वारंवार अपमान करतांना बघुन मला फ़ार वेदना होतात. ते सारख म्हणतात एक चायवाला प्रधानमंत्री क्यो नही बन सकता ? माझ म्हणण चायवाला सहज प्रधानमंत्री बनु शकतो मात्र एक प्रधानमंत्री चायवाला बनेगाइच ऐसा नही. असो तो आपला विषय नाही.
कोंच अंड ही असच आहे. त्या बद्दल काय म्हणाव कीती आनंदांच माहेरघर आहे कोंच अंड
जीवनाच सार आहे कोंच अंड
जे अंडी तेच ब्रम्हांडी
माझ्या उन्मत काव्यप्रतिभेला नाइलाजाने मुरड घालत मी मुळ मुद्यावर येतो. मतलब की बात करनेका वक्त आ चुका है. तर
चहा व कोंच अंड यांचा आनंद घेण्यासाठी मात्र त्यावर परीश्रम घेण्याची तयारी मात्र हवी, अर्थातच पाककौशल्य हवे. चहा व कोंच अंड या मधुन अफ़ाट आनंदाची निर्मीती होऊ शकते. मात्र गुरुशिवाय ज्ञान अशक्य मार्गदर्शनाशिवाय एक वेळ तुम्ही जीवनाचा अर्थ शोधु शकता. मात्र चहा व कोंच अंड यातुन आनंद निर्मीती करायची असेल तर तुम्हाला जाणकार बल्लवाचार्यांच खानदांनी शेफ़ांच वा शेफ़ारलेल्यांच ही मार्गदर्शन घेण अत्यावश्यक बाब असते.
मला स्वत:ला चहा बनवता येतो अंड्याची भुर्जी, आमलेट, हाफ़ फ़्राय, बिर्याणी, स्क्रॆम्बल्ड एग्ज, चीजी एग नुडल्स आदि प्राथमिक पातळीवरच्या डीश बनविता येतात. पण पातळी इतकी प्राथमिक आहे. की आनंदासाठी कायम इतरांवर अवलंबुन राहाव लागत. कंटाळा आलाय या परवशतेचा आता मला माझ्या पायावर उभ राहायच आहे.
मुझे चाय कैसे अलग अलग तरीकेसे बनायी जाती है
अंडो के अलग अलग पक्वान कैसे बनाए जाते है
ये सिखना है आणि आता मी संकल्प केलाय या पाडव्या पासुन की मी एक उत्कृष्ठ चायवाला बन वुन दाखवणार च आणी एक महान अंडाचारी बनणारच.
याची पहीली पायरी म्हणुन मी मिसळपाव या नावातच खाद्यसंस्कृतीला वाहीलेल्या संस्थळावर मदत मागण्यासाठी आलोय. मिसळपाव वर खाता खाता सहज चाळा म्हणुन इतर अनेक विषयांची चर्चा रुचिपालट म्हणून करण्याची उज्वल परंपरा आहे, मिसळपाव वर अनेक बल्लवाचार्य आहेत अनेक खाद्य रसिक आहेत, मी तर असे ही ऐकलेले आहेत की नाव बदलुन अनेक नामांकीत शेफ़ मिसळपाव वर लिहीत असतात.
इथे या खाद्यापिठात च मला
चहा व कोंच अंड या वर विवीध रेसीपी मिळतील यावरच चिंतन वाचावयास मिलेल अशी आशा मला आहे.
चहा हा चिंतनयोग्य विषय आहे जसे पत्ती चे विवीध प्रकार , उकाळी कीती घ्यावी, इतर उपघटकांचा जसे आलं इलायची आदिंचा मुळ घटकांवर होणारा परीणाम. दुध व पाण्याचे प्रमाण हा तर फ़्री विल की डीटरमीनीझम इतकाच महत्वाचा फ़िलॉसॉफ़ीकल परॊडॊक्स आहे. तसेच इराणी चहा व अमृततुल्य चहा त श्रेष्ठ कुठला चहा व का दोघांच्या पद्धतीत काय फ़रक आहे.
जस्मिन टी डंकन टी चा रीचनेस कशात आहे ?
ब्युटी लाइज इन द आइज ऑफ़ बिहोल्डर म्हणतात तसे टी ज टेस्ट डीपेंड्स अपॊन टीमेकर.
कोंच अंड ही तसच आहे. अक्षरश: हजारो संभावना यात लपलेल्या आहेत. जितका कुशल शेफ़ तितका तो त्यातुन आनंद निर्मीती करु शकतो स्काय इज द लिमीट असे कोंच अंड या संदर्भात आपण म्हणु शकतो.
तर सर्व खाद्यरसिकांना बल्लवाचार्यांना हात जोडुन विनंती आपले चहा व अंड्या विषयीचे जे काय अमुल्य ज्ञान असेल ते येथे मुक्त हस्ते उधळावे व मला उपकृत करावे. या अगोदर ही जालावर या संदर्भात कुठे ज्ञानाचे कण सांडलेले असतील तर तेथपर्यंत पोचण्याच्या लिंका पुरवाव्यात
ज्ञान साचवण्याने आटते वाटण्याने वाढते हे तर आपण जाणताच
तर तुम्ही चहा कसा बनविता ?
अंड्याचा कुठला छान पदार्थ तुम्हाला बनविता येतो याची रेसीपी कृपया शेअर करावी.
कळावे लोभ असावा ही विनंती
वाचने
30364
प्रतिक्रिया
85
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त धागा
अंड्याचा कुठला छान पदार्थ
रेग्युलर स्विमींग करायचो आधी
In reply to अंड्याचा कुठला छान पदार्थ by टवाळ कार्टा
बाकी पाकृ वगैरे जौद्या ... पण
कोण आनंदा ? __/\__ धन्यवाद !!
मी नव्हे - कारण मी आनन्दा आहे
In reply to कोण आनंदा ? __/\__ धन्यवाद !! by सूड
आनंदा आणि आनन्दा हे उच्चारी
In reply to मी नव्हे - कारण मी आनन्दा आहे by आनन्दा
अंड????
अरे टवाळांनो काय सुड उगवुन राहीलेत माझ्याव्रर
एक कॉक्रीट रेसीपी
In reply to अरे टवाळांनो काय सुड उगवुन राहीलेत माझ्याव्रर by मारवा
@ अंडाचारी >>
In reply to अरे टवाळांनो काय सुड उगवुन राहीलेत माझ्याव्रर by मारवा
थोड मोकळ करुन बोला की गडे
In reply to @ अंडाचारी >> by यसवायजी
अंडाचारीवरून आठवलं. मारवाशेठ,
In reply to थोड मोकळ करुन बोला की गडे by मारवा
७५ वेगवेगळ्या प्रकारचे अंड्याचे प्रकार हा माणूस देतो
In reply to अंडाचारीवरून आठवलं. मारवाशेठ, by बोका-ए-आझम
हवी तितकी अंडी घ्या....
तुम्ही उत्तेजक पेया कडे इशारा करत आहात का ?
In reply to हवी तितकी अंडी घ्या.... by मुक्त विहारि
धन्यवाद...
In reply to तुम्ही उत्तेजक पेया कडे इशारा करत आहात का ? by मारवा
मला चहा भरपूर लागतो, अंडे खात
अज्ञान फार च ठळक दिसेल तरी एक विचारतो भाऊ
In reply to मला चहा भरपूर लागतो, अंडे खात by कंजूस
चहाच्या बाबतीत मारामारी हा
In reply to अज्ञान फार च ठळक दिसेल तरी एक विचारतो भाऊ by मारवा
चहाच्या बाबतीत मारामारी हा
In reply to अज्ञान फार च ठळक दिसेल तरी एक विचारतो भाऊ by मारवा
चहा + कॉफी = मारामारी
In reply to चहाच्या बाबतीत मारामारी हा by बोका-ए-आझम
माझा एक अनुभव व सल्ला
आयुष्याच्या अंतापर्यंत मी तुमचा आभारी आहे आयुर्हीत जी !
In reply to माझा एक अनुभव व सल्ला by आयुर्हित
__/\__
In reply to माझा एक अनुभव व सल्ला by आयुर्हित
अध्यात्मामध्ये वातावरणाचे
रेसिपी - बर्मा टोस्ट्
चिजय धन्यवाद
In reply to रेसिपी - बर्मा टोस्ट् by विजय पिंपळापुरे
सेंट झेविअर काॅलेजच्या
In reply to रेसिपी - बर्मा टोस्ट् by विजय पिंपळापुरे
मारामारी =एक फुल +एक कटिंग चा
भारतातल्या एका विलक्षण
एका विलक्षण प्रतिभाशाली शहरात...
In reply to भारतातल्या एका विलक्षण by विजुभाऊ
उन लोगोंने पीईच नै
In reply to एका विलक्षण प्रतिभाशाली शहरात... by मुक्त विहारि
चा घेत नाय
ही घ्या अजून एक लिन्क
स्नेहांकीता छान धागा होता हा
In reply to ही घ्या अजून एक लिन्क by सस्नेह
दोन अंडी फोडून फेटा
गौरी जी धन्यवाद
हाहा!
ह्म्म...
In reply to हाहा! by पैसा
आयडियेसाठी धन्याचे वाद!
In reply to ह्म्म... by विटेकर
अय्या.... मिपाकरांच्या नावाने घास कावळ्याला ?
मारवा राजहंसांना घास भरवतांना
In reply to अय्या.... मिपाकरांच्या नावाने घास कावळ्याला ? by मारवा
अय्या नाही हो!! त्या अय्या
In reply to अय्या.... मिपाकरांच्या नावाने घास कावळ्याला ? by मारवा
अंड्यापासून निर्मितीचा आनंद हवा असेल तर...
एग फ्लिप करा की. अंड, दूध, मध
छान पाकृ!
In reply to एग फ्लिप करा की. अंड, दूध, मध by कवितानागेश
आणखी एक पाकृ
चहाच्या पाकॄंच माहित नाहि बुवा
दिपक साहब शुक्रीया !
In reply to चहाच्या पाकॄंच माहित नाहि बुवा by दिपक.कुवेत
दिपक साहब शुक्रीया !
In reply to चहाच्या पाकॄंच माहित नाहि बुवा by दिपक.कुवेत
इराणी
झाली का अधिक आनंदाची निर्मिती
अपर्ण अक्षय
In reply to झाली का अधिक आनंदाची निर्मिती by स्पंदना
वाक्याच्या शेवटी जे विराम
In reply to अपर्ण अक्षय by मारवा
हे म्हणजे मर्ढेकरांना अर्थ विचारावा तर त्यांनी अगोदर इलियट वाच
In reply to वाक्याच्या शेवटी जे विराम by स्पंदना
की हे
In reply to हे म्हणजे मर्ढेकरांना अर्थ विचारावा तर त्यांनी अगोदर इलियट वाच by मारवा
राजू आम्लेट वाला बडोदा
सुबोध जी अनेक अनेक धन्यवाद या लिंक साठी
In reply to राजू आम्लेट वाला बडोदा by सुबोध खरे
मनापासून धन्यवाद
In reply to राजू आम्लेट वाला बडोदा by सुबोध खरे
राजू आम्लेट वाला बडोदावाला.
राजू आम्लेट वाला बडोदावाला.ह्यो आपला फेवरीट आहे. काय बटर टाकतो. आणी बनवायची श्टाईल तर लय भारी.मारवाश्री...
सतिश भाऊ यात पुरोगामित्व कुठु न आल रे बाबा ?
In reply to मारवाश्री... by सतिश गावडे
>> हम शम्मा है रहते है मगर
In reply to सतिश भाऊ यात पुरोगामित्व कुठु न आल रे बाबा ? by मारवा
माझी भीती खरी ठरली सतिश
@ईश्वर तुझ्या होडीला तात्काळ
In reply to माझी भीती खरी ठरली सतिश by मारवा
मारवाश्री...
In reply to माझी भीती खरी ठरली सतिश by मारवा
चिजाळलेले अंडे
पाण्यावरचे अंडे
In reply to चिजाळलेले अंडे by सुनील
हैल्ला...हे नवीनच वाचतोय
In reply to पाण्यावरचे अंडे by सुनील
ईश्वराला होडी किनार्याला
ईश्वर
In reply to ईश्वराला होडी किनार्याला by विजुभाऊ
ईश्वराला तेवढा एकच उद्योग आहे
In reply to ईश्वराला होडी किनार्याला by विजुभाऊ
तुमच्या या प्रश्नावरुन
In reply to ईश्वराला तेवढा एकच उद्योग आहे by सतिश गावडे
सोपं आहे.
.
In reply to सोपं आहे. by एस
मस्तच. लईच आध्यात्मिक!
In reply to सोपं आहे. by एस
याला बहुतेक 'एग बास्केट' की
धन्यवाद.
In reply to याला बहुतेक 'एग बास्केट' की by असंका
नवीन रेसिपी
In reply to याला बहुतेक 'एग बास्केट' की by असंका
क्रीस्टल क्लीअर रेसीपीसाठी कन्फ्युज्ड अकौंटंट तुमचे आभार
एग बेनेडिक्ट
मुनिवर धन्यवाद !
हैद्राबादी खागिना
मस्त रेसिपी
In reply to हैद्राबादी खागिना by काकाकाकू