Skip to main content

चहा व कोंबडीच्या अंड्या पासुन अधिक आनंदा ची निर्मीती कशी करावी ?

लेखक मारवा यांनी शुक्रवार, 24/10/2014 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
चहा व अंड (कोंबडीच यापुढे कों.च हे शार्टफ़ार्मात वाचावे) हे विधात्याने दिलेले मर्त्य मानवाच्या जीवनाच्या कठोर संघर्षात त्याच्या थकलेल्या मना-शरीराला दिलासा व विलक्षण आनंद देणारे दोन वरदान आहेत. या दोन वरदानाच्या सेवनाने मनुष्य भौतिक च नव्हे तर आध्यात्मिक जीवनातील अडथळे देखील सहज पार करु शकतो. म्हणजे ते इटसेल्फ़ अडथळे पार पाडत नाही मात्र यांचे सेवन मनुष्याला एनर्जाइझ करते व थकवा घालवुन तरतरी प्रदान करते. त्या तरतरी च्या तरफ़ेवर स्वार होउन मनुष्य भवसागर पार करु शकतो. वरचा आध्यात्मिक उल्लेख सीरीयस आहे. तिबेटी ध्यान धारणेच्या परंपरेत ध्यान करतांना झोप लागु नये यासाठी चहा पिउन ध्यानाला बसण्याची अतिप्राचीन परंपरा आहे. जपानी चहा चे अध्यात्मिक रीच्युअल्स तर प्रसिद्ध च आहेत. भारतातल्या एका विलक्षण प्रतिभाशाली शहरात चहा ची विक्री करणारया दुकानांत चहा चा उल्लेख अमृततुल्य असा सार्थ केला जातो. मात्र माझा याला आक्षेप असा आहे की याने चहा चे अवमुल्यन च होत नाही का? उलटपक्षी अमृताचा उल्लेख चहातुल्य असा व्हावयास हवा. कारण अमृताचे फ़ंक्शन बघा कीती मर्यादीत आहे. काय तर म्हणे त्याचे सेवन तुम्हाला अमर करते. म्हणजे अमृत प्राशन करुन काय करायचे तर अमर व्हायचे ? छ्या , आणि अमर झाल्यावर या भयावह जीवनात जगायचे कसे? ( ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है ) जीवन पुर्णपणे निरर्थक आहे या निहीलझम च्या तत्वज्ञानाचा पुर्ण डोलारा कोसळवण्याची ताकद एक हाफ़ चाय व एक हाफ़ फ़्राय मध्ये आहे. तर जगतांना अमृत कुठलाही आधार देत नाही. उलटपक्षी चहा जगतांना डेली बेसीस वर मदत करते. हमखास आनंदाची विरंगुळयाची शांततेची तरतरीची उत्साहाची अत्यावश्यक अशी मागणी ती सातत्याने पुर्ण करते. म्हणजे मानवाला अमृत जो अमर करुन जीवनाच्या तुमुल कोलाहलात निर्दयतेने ढकलुन देतो तेथेच चहा त्याच मानवाला रोज हात धरुन रस्ता ओलांडुन देते. एका प्रमुख भारतीय पक्षाचे प्रमुख नेते हे चहाचा वारंवार अपमान करतांना बघुन मला फ़ार वेदना होतात. ते सारख म्हणतात एक चायवाला प्रधानमंत्री क्यो नही बन सकता ? माझ म्हणण चायवाला सहज प्रधानमंत्री बनु शकतो मात्र एक प्रधानमंत्री चायवाला बनेगाइच ऐसा नही. असो तो आपला विषय नाही. कोंच अंड ही असच आहे. त्या बद्दल काय म्हणाव कीती आनंदांच माहेरघर आहे कोंच अंड जीवनाच सार आहे कोंच अंड जे अंडी तेच ब्रम्हांडी माझ्या उन्मत काव्यप्रतिभेला नाइलाजाने मुरड घालत मी मुळ मुद्यावर येतो. मतलब की बात करनेका वक्त आ चुका है. तर चहा व कोंच अंड यांचा आनंद घेण्यासाठी मात्र त्यावर परीश्रम घेण्याची तयारी मात्र हवी, अर्थातच पाककौशल्य हवे. चहा व कोंच अंड या मधुन अफ़ाट आनंदाची निर्मीती होऊ शकते. मात्र गुरुशिवाय ज्ञान अशक्य मार्गदर्शनाशिवाय एक वेळ तुम्ही जीवनाचा अर्थ शोधु शकता. मात्र चहा व कोंच अंड यातुन आनंद निर्मीती करायची असेल तर तुम्हाला जाणकार बल्लवाचार्यांच खानदांनी शेफ़ांच वा शेफ़ारलेल्यांच ही मार्गदर्शन घेण अत्यावश्यक बाब असते. मला स्वत:ला चहा बनवता येतो अंड्याची भुर्जी, आमलेट, हाफ़ फ़्राय, बिर्याणी, स्क्रॆम्बल्ड एग्ज, चीजी एग नुडल्स आदि प्राथमिक पातळीवरच्या डीश बनविता येतात. पण पातळी इतकी प्राथमिक आहे. की आनंदासाठी कायम इतरांवर अवलंबुन राहाव लागत. कंटाळा आलाय या परवशतेचा आता मला माझ्या पायावर उभ राहायच आहे. मुझे चाय कैसे अलग अलग तरीकेसे बनायी जाती है अंडो के अलग अलग पक्वान कैसे बनाए जाते है ये सिखना है आणि आता मी संकल्प केलाय या पाडव्या पासुन की मी एक उत्कृष्ठ चायवाला बन वुन दाखवणार च आणी एक महान अंडाचारी बनणारच. याची पहीली पायरी म्हणुन मी मिसळपाव या नावातच खाद्यसंस्कृतीला वाहीलेल्या संस्थळावर मदत मागण्यासाठी आलोय. मिसळपाव वर खाता खाता सहज चाळा म्हणुन इतर अनेक विषयांची चर्चा रुचिपालट म्हणून करण्याची उज्वल परंपरा आहे, मिसळपाव वर अनेक बल्लवाचार्य आहेत अनेक खाद्य रसिक आहेत, मी तर असे ही ऐकलेले आहेत की नाव बदलुन अनेक नामांकीत शेफ़ मिसळपाव वर लिहीत असतात. इथे या खाद्यापिठात च मला चहा व कोंच अंड या वर विवीध रेसीपी मिळतील यावरच चिंतन वाचावयास मिलेल अशी आशा मला आहे. चहा हा चिंतनयोग्य विषय आहे जसे पत्ती चे विवीध प्रकार , उकाळी कीती घ्यावी, इतर उपघटकांचा जसे आलं इलायची आदिंचा मुळ घटकांवर होणारा परीणाम. दुध व पाण्याचे प्रमाण हा तर फ़्री विल की डीटरमीनीझम इतकाच महत्वाचा फ़िलॉसॉफ़ीकल परॊडॊक्स आहे. तसेच इराणी चहा व अमृततुल्य चहा त श्रेष्ठ कुठला चहा व का दोघांच्या पद्धतीत काय फ़रक आहे. जस्मिन टी डंकन टी चा रीचनेस कशात आहे ? ब्युटी लाइज इन द आइज ऑफ़ बिहोल्डर म्हणतात तसे टी ज टेस्ट डीपेंड्स अपॊन टीमेकर. कोंच अंड ही तसच आहे. अक्षरश: हजारो संभावना यात लपलेल्या आहेत. जितका कुशल शेफ़ तितका तो त्यातुन आनंद निर्मीती करु शकतो स्काय इज द लिमीट असे कोंच अंड या संदर्भात आपण म्हणु शकतो. तर सर्व खाद्यरसिकांना बल्लवाचार्यांना हात जोडुन विनंती आपले चहा व अंड्या विषयीचे जे काय अमुल्य ज्ञान असेल ते येथे मुक्त हस्ते उधळावे व मला उपकृत करावे. या अगोदर ही जालावर या संदर्भात कुठे ज्ञानाचे कण सांडलेले असतील तर तेथपर्यंत पोचण्याच्या लिंका पुरवाव्यात ज्ञान साचवण्याने आटते वाटण्याने वाढते हे तर आपण जाणताच तर तुम्ही चहा कसा बनविता ? अंड्याचा कुठला छान पदार्थ तुम्हाला बनविता येतो याची रेसीपी कृपया शेअर करावी. कळावे लोभ असावा ही विनंती

वाचने 30437
प्रतिक्रिया 85

प्रतिक्रिया

ईश्वराला होडी किनार्याला लावता आली असती तर जगाच्या इतिहासात कुणीच पाण्यात बुडून मेलं नसतं
ईश्वराला तेवढा एकच उद्योग आहे का?

In reply to by विजुभाऊ

नेमके काय उद्योग करीत असतो अशी आपली कल्पना/माहिती आहे ? (कृपया माहितीसाठी विदा द्यावा )

In reply to by विजुभाऊ

ईश्वराला तेवढा एकच उद्योग आहे का?
ते मला माहिती नाही. तुमच्या या प्रश्नावरुन तुम्हाला ते माहिती आहे असे दिसते. कृपया प्रकाश टाकावा.

In reply to by सतिश गावडे

तुमच्या या प्रश्नावरुन तुम्हाला ते माहिती आहे असे दिसते. कृपया प्रकाश टाकावा.
माझा खरेतर प्रश्न होता की इश्वराला तेवढे एकच काम असते का? की इतर आणखीही कामे असतात. उदा प्रत्येक मंदीरात अंघोळ करवून घेणे , नैवेद्य चाखणे , भक्तांचे नमस्कार स्वीकारणे , झालेच तर स्पेश्यल दर्शन तिकीट काढून आलेल्या भक्ताना स्पेश्यल दर्शन देणे , भक्तानी तयार केलेल्या कॅसेटी ऐकणे , प्रत्येकाच्या हाकेला ओ देणे , विटेवर उभे रहाणे , भक्ताना बोलावणे , लोकांच्या अंगात जाणे , मंत्र / जप ऐकून शाम्त होणे , वहीत लिहीलेले श्री राम जयराम जयजयराम वाचणे वगैरे.

चहा आपण प्यावा आणि अंडे कोंबडीला उबवायला द्यावे. त्यातून पिल्लू बाहेर आले की त्याला आनंदा असे नाव द्यावे. आनंदीपण चालेल. अशीच प्रोसेस दोनदा केल्यास अधिक आनंदाची निर्मिती आपसूकच होत राहील. कोंबड्यांना मराठी कळत नसल्याने सगळ्याच पिल्लांना एकच नाव दिले तरी ती आक्षेप घेणार नाहीत. शुभेच्छा!

याला बहुतेक 'एग बास्केट' की 'एग इन बास्केट' असे नाव आहे. नक्की काय नाव आहे ते माहित नाही कारण हा प्रकार कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, सातारा, कोपरगाव, कु़काणा (ताल. नेवासा, जिल्हा अहमदनगर), आणि भोपाळ, इत्यादी शहरातील/खेड्यातील गरीब आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांना परवडणार्‍या हॉटेलात मिळत नाही. वरच्या वर्गांना परवडत असणार्‍या हॉटेलात मिळत असल्यास मला कल्पना नाही. सर्वप्रथम मी हा पदार्थ पाहिला तो एका सिनेमात, त्याचे नाव 'V For Vendetta'. हे फार पूर्वी झाले. तो सिनेमा पाहिला, तेव्हा "नेट" च्या सर्वसमावेशकतेची मला एवढी कल्पना नव्हती. ती कल्पना आली सुमारे तीन वर्षांपूर्वी आणि मग मी सिनेमाचे नाव टाकून पाककृती शोधून पाहिली. पहिल्याच प्रयत्नात यश आले. साहित्यः एक ब्रेडचा जाडसर स्लाइस, एक लहान वाटी, आणि एक गावठी अंडे (लहान असते म्हणून घ्यायचे, चवीत मला काहीही फरक वाटलेला नाही.), थोडे तेल, चवीनुसार मीठ, तिखट व इतर मसाले. कृती: लहान वाटीने स्लाइसच्या मधोमध एक चकती कापून घ्यावी. चकतीचा एरवी काही उपयोग नाही, काही इतर प्रयोग करायचे असतील तर ठेवा नाहीतर टाकून द्या/लगेच खाउन टाका. मग मंद आचेवर एक तवा ठेवून त्यावर थोडे तेल घेऊन हा शिल्लक राहिलेला स्लाइस ठेवा. त्यावर एक अंडे फोडून हळूच ओता. थोडेफार बाहेर जातेच ते जाऊ द्या. मग पटकन मीठ, तिखट आणि मसाले घाला. खालून सेट व्हायला लागल्यावर उलटा. आजपर्यंत मला हे न सांडता उलटता आलेले नाहिये. त्यामुळे जाणकारांचे सल्ले येतायत का बघा... दोन्ही बाजूंनी सेट झाल्यावर गरम गरम खायला घ्या....

In reply to by असंका

अंडे हा आवडता पदार्थ आहे . येत्या विकांताला करून पहाण्यात येइल. @कंफ्युज्ड अकौंटंट तुम्हास धन्यवाद

अनेक अनेक धन्यवाद कन्फ्युज्ड अकौंटट जी या रेसीपी व त्यामागील इंटरेस्टींग माहीतीसाठी देखील धन्यवाद !

In reply to by काकाकाकू

हीच ऑम्लेट पॅन मधे केली आणि न हलवता तसाच शिजू दिला तर केक सारखा दिसता . खालच्या थराला परतलेला कांदा आणि मसाला आणि वरती अम्ड्याचा आवरण .. मस्त लागता.