मदत? (शतशब्द कथा)
लेखनप्रकार
रत्नांकीरीच्या जंगलात महाराज सिंहनासिकेतू येरझा-या घालीत होते. इथे ते सुरक्षीत होते. पण क्रूरकर्मा चकलासूर राजधानीत निरपराध लोकांना मारून टाकीत असतांना आपल्याला एकटे लपून रहावे लागत आहे! कोणाची मदत मिळेल?
महाराजांनी अमात्य सौव्रतांना विचारले- “ आपणाला कोण मदत देईल? “
अमात्य उत्तरले- “महाराज, जनता म्हणतेय, पश्चिमेच्या सामकोकेंद्र राजांकडे मदत मागावी. त्यांच्याकडे सामर्थ्यवान वायुयाने आहेत. ते चकलासुराला सहज पराजित करू शकतील.”
“जनता मूर्ख आहे अमात्य! चकलासूर निदान जनतेला मृत्यू तरी देत आहे. सामकोकेंद्र वायुयानातून रासायनीक गोळाफ़ेक करून निरपराधांना मरणापेक्षाही भयानक यातना देईल. नकोच अशी मदत! जनतेला सांगा “गोळ्यांनी मरत आहात, रसायनांने मृत्यू मागत आहात, त्यापेक्षा लढून मरायला तयार व्हा!” सिंहनासिकेतू निर्णायकपणे म्हणाले.
वाचने
2343
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
छान.
मला वाटतं दोन शब्द कमी आहेत
2-3 शब्द कमी हायती अस वाटतय
खूष?
In reply to खूष? by अरुण मनोहर
खुष म्हणून काय विचारता? अहो
In reply to खुष म्हणून काय विचारता? अहो by असंका
@धन्यवाद धन्यवाद धन्यवाद!!! >
आजच्या संदर्भात मस्त कथा,