Skip to main content

मदत? (शतशब्द कथा)

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 16/10/2014 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
रत्नांकीरीच्या जंगलात महाराज सिंहनासिकेतू येरझा-या घालीत होते. इथे ते सुरक्षीत होते. पण क्रूरकर्मा चकलासूर राजधानीत निरपराध लोकांना मारून टाकीत असतांना आपल्याला एकटे लपून रहावे लागत आहे! कोणाची मदत मिळेल? महाराजांनी अमात्य सौव्रतांना विचारले- “ आपणाला कोण मदत देईल? “ अमात्य उत्तरले- “महाराज, जनता म्हणतेय, पश्चिमेच्या सामकोकेंद्र राजांकडे मदत मागावी. त्यांच्याकडे सामर्थ्यवान वायुयाने आहेत. ते चकलासुराला सहज पराजित करू शकतील.” “जनता मूर्ख आहे अमात्य! चकलासूर निदान जनतेला मृत्यू तरी देत आहे. सामकोकेंद्र वायुयानातून रासायनीक गोळाफ़ेक करून निरपराधांना मरणापेक्षाही भयानक यातना देईल. नकोच अशी मदत! जनतेला सांगा “गोळ्यांनी मरत आहात, रसायनांने मृत्यू मागत आहात, त्यापेक्षा लढून मरायला तयार व्हा!” सिंहनासिकेतू निर्णायकपणे म्हणाले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2350
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

च्च्च्च! तीनच शब्द कमी पडले. पण चांगला प्रयत्न आहे.

कोणाची मदत मिळेल? ---> कोणाची मदत मिळू शकेल? जनतेला सांगा ---> जनतेला समजावून सांगा

आजच्या संदर्भात मस्त कथा, अमेरिकेची हवाई मदत मागण्यापेक्षा इस्लामिक आतंकवाद्यांशी दोन हाथ करत मारणे जास्त बरे. असेच काहीसे म्हणायचे आहे, असे वाटते.