✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नवराष्ट्र "पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे " चे राष्ट्रगीत

व
विजुभाऊ यांनी
Fri, 10/17/2014 - 12:43  ·  लेख
लेख
पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे या राष्ट्राचे राष्ट्र गीत कोणते असावे असे तुम्हाला वाटते? आमची कुठेही शाखा नाही. या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेच शाखा नाही. !! धृ !! जे का हिंडले बिंडले पत्ता शोधण्यात गुंगले ते उलटे जावोनी गंडले या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेही शाखा नाही सुजला सुफला मुळा मुठा अन दुथडी भरी नागझरी. सर्वांचे चितळे पोटभरी सदाशिव नारायण साहित्य मांसाहारी उण्या दुण्या चे काम नसे हे पुण्या गुण्याचे नाव असे हे. या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेही शाखा नाही. जय हे जय हे जय जय हे....... जय.पुणे......
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
बालकथा
प्रेमकाव्य
बालगीत
औषधोपचार
राहती जागा
मौजमजा
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
29482 वाचन

💬 प्रतिसाद (126)

प्रतिक्रिया

पुण्य नगरीचा झेंडा

काळा पहाड
Fri, 10/17/2014 - 15:11 नवीन
पुण्य नगरीचा झेंडा Image removed.
  • Log in or register to post comments

नाही हो हा काही जमत नाहीये

वेल्लाभट
Fri, 10/17/2014 - 15:17 नवीन
नाही हो हा काही जमत नाहीये बुवा झेंडा म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

राष्ट्रीय पक्षी - कावळा

प्रमोद देर्देकर
Fri, 10/17/2014 - 15:32 नवीन
राष्ट्रीय पक्षी - कावळा
  • Log in or register to post comments

प्रमोद देर्देकर -

विजुभाऊ
Fri, 10/17/2014 - 16:50 नवीन
प्रमोद देर्देकर - राष्ट्रीय पक्षी - कावळा
दर्दुकाका. तुमचे म्हणणे बरोबर आहे. तो तसा असण्याचे कारण म्हणजे पुणेकर म्हणतो समोर दिसणारा कावळाच बरा. दुसरा कोणता पक्षी बघण्यासाठी उगीचच " का वळा ?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

कावळा

हरकाम्या
Sat, 10/18/2014 - 12:16 नवीन
राष्ट्रीय पक्षी " कावळा " निवडलेला आहे. पण त्यावर शिक्कामोर्तब होण्यापुर्वी तो कावळा " काळा " का "गोरा" यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे. असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

राष्ट्रीय पक्षी..

चौकटराजा
Sat, 10/18/2014 - 14:34 नवीन
ओंकारेश्वरावरचा कावळा... च्यामायला इतरांचे बापाचे वेळी लवकर शिवणारा पण आपली येळ आली की सस्पेन्स !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या

चला आता घटना लिहायला घ्या बरं

प्रमोद देर्देकर
Fri, 10/17/2014 - 15:32 नवीन
चला आता घटना लिहायला घ्या बरं कुणीतरी.
  • Log in or register to post comments

अजून प्रतिज्ञा राहिलियेच.

काळा पहाड
Fri, 10/17/2014 - 15:37 नवीन
अजून प्रतिज्ञा राहिलियेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

पुण्याच्या नानावरूनच

चौकटराजा
Fri, 10/17/2014 - 15:34 नवीन
पुंण्याच्या 'नाना' पेठेवरूनच मुंबयच्या एका चे नाव नानासाहेब ठेवले काय ?
  • Log in or register to post comments

निषेध!

कंजूस
Fri, 10/17/2014 - 16:14 नवीन
निषेध! १९तारखेपर्यंत दुसरे कोणते चांगले विषय न मिळाल्यामुळे बिचाऱ्या पुणेकरांना लक्ष (TARGET) करण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments

लक्ष?????

बॅटमॅन
Fri, 10/17/2014 - 16:28 नवीन
लक्ष????? अरे कुठे नेऊन ठेवलं शुद्धलेखन माझं!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! १००१ वेळा लिहा. लक्ष नव्हे लक्ष्य. छ्या:!!!! पूर्वीचं पुणं राहिलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

चुकलंच लक्ष्य अक्षी. पण आता

कंजूस
Fri, 10/17/2014 - 18:25 नवीन
चुकलंच लक्ष्य अक्षी. पण आता बाण काय परत येणार आहे ? आणि TAR-GATE ही लिहिलं नाही चुकून TARGET लिहिलं. आता १९ तारखेपर्यंत १००१वेळा लिहित बसतो 'लक्ष्य'. अक्षम्य अपराध घडला तोही या पुण्यनगरीच्या लेखात.क्षमा असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

निषेध!

सुहास..
Fri, 10/17/2014 - 16:23 नवीन
निषेध! १९तारखेपर्यंत दुसरे कोणते चांगले विषय न मिळाल्यामुळे बिचाऱ्या पुणेकरांना लक्ष (TARGET) करण्यात येत आहे. >>> =)) =)) =)) हा आला टिपिकल पुणेरी प्रतिसाद !!
  • Log in or register to post comments

पण कंजूस काका तर मुंबैचे आहेत

जेपी
Fri, 10/17/2014 - 16:42 नवीन
पण कंजूस काका तर मुंबैचे आहेत. पुर्व इतिहास माहित नाही.
  • Log in or register to post comments

स्वतन्त्र "नळ स्टॉप" झालाच

विजुभाऊ
Fri, 10/17/2014 - 16:43 नवीन
स्वतन्त्र "नळ स्टॉप" झालाच पाहिजे :- बबन ( ई.नळस्टॉप वाला)
  • Log in or register to post comments

नळ स्टॉप.

हरकाम्या
Sat, 10/18/2014 - 14:08 नवीन
स्वतन्त्र " नळस्टॉप " झालाच पाहिजे. आणि तिथे "विजुभाउंचा " पुर्णाक्रुती पूतळा उभा राहिलाच पाहिजे. पाहिजे तर उपराजधानीत मी आत्तापासुन निधी गोळा करायला सुरुवात करतो. लवकरच तुम्हाला तिथ " निधी गोळा करण्यासाठी लावलेली. पुणेकरांचे संध्याकाळचे लाड्के खाद्य असलेली वडापावची गाडी दिसेल.तिथ " वडापाव " खाउनझाल्यानंन्तर डब्यात " वर्गणी " टाकण्यास विसरु नये ही नम्र विनन्ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हरकाम्या, विजुभाऊ हे

विजुभाऊ
Sat, 10/18/2014 - 14:34 नवीन
हरकाम्या, विजुभाऊ हे पुण्याबाहेरचे आहेत. ते ज्यानी पेषव्याची नेमणूक केली त्या छत्रपतींच्या गावचे आहेत. तसेच सध्या मुम्बईवासी असतात. पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे मधे परदेशी लोकांचे कसले पुतळे उभारताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या

वेगळ आनंद नगर झालच पायजे.

जेपी
Fri, 10/17/2014 - 16:50 नवीन
वेगळ आनंद नगर झालच पायजे. बबन( आनंदनगरवाला)
  • Log in or register to post comments

+१

सूड
Fri, 10/17/2014 - 17:00 नवीन
ह्याला सहमती!! (नव-आनंदनगरकर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

च्यायला , मग लोहगावनच काय

सुहास..
Fri, 10/17/2014 - 17:03 नवीन
च्यायला , मग लोहगावनच काय घोडं मारलय ;)
  • Log in or register to post comments

डॉलर पाउंड रुपया येन युरो

नानासाहेब नेफळे
Fri, 10/17/2014 - 17:22 नवीन
डॉलर पाउंड रुपया येन युरो वगैरे चलनांना टक्कर देण्यासाठी 'मोदक' नावाचे नवे राष्ट्रीय चलन सुरु करावे व त्यावर उकडीच्या मोदकाचे चित्र राष्ट्रीय चिन्ह याअर्थी छापावे ,सदर चित्रात मोदकावरचे तूप(साजुक) शोधूनही सापडले नाही पाहिजे,सापडल्यास तो राष्ट्रद्रोह समजावा व आरोपीस वसंतव्याख्यानमालेतील प्रत्येक पुष्प गुंफताना उपस्थीत राहण्याची क्षिशा देण्यात यावी व नंतर व्याख्यानावरील प्रश्नोत्तरे विचारावीत. पुरेपुर कोल्हापुर व रस्सामंडळास सांस्कृतीक राजधानीचा संयुक्त दर्जा द्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

मोदकच चलन

मित्रहो
Fri, 10/17/2014 - 23:18 नवीन
अहो नवीन चलन हवे तर मग छापील कशाला, मोदकच चलन. त्याने मोदक बनवायच्या पारंपीरीक व्यवसायाला चालना मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

च्यायला तर मग आमच्या से.बा.ला

यसवायजी
Fri, 10/17/2014 - 17:41 नवीन
च्यायला तर मग आमच्या से.बा.ला राष्ट्रीय महारस्ता आणी 'चतुरशिंगी'ला रा.पर्वत म्हणण्यात यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

आमच्या से.बा.ला राष्ट्रीय

विजुभाऊ
Fri, 10/17/2014 - 17:49 नवीन
आमच्या से.बा.ला राष्ट्रीय महारस्ता
अहो पुण्यात सगळेच महा असतं. ( पुण्यात सगळेच महापंडीत असतात .नुसते पंडीत असे म्हंटले तर ते आडनाव सजावे.::- संदर्भः पु.लं : _ तुम्हाला पुणेकर मुम्बैकर की नागपुरकर....... )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

लक्ष्मी

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 10/17/2014 - 17:28 नवीन
लक्ष्मी रोड्चा पुणेकरांना अतिशय अभिमान असतो.पुण्याची आर्थिक राजधानी तेथे होईल.हिंजवडी,खरडी,पिंपळे (गुरव्,सौदागर्,निलख) ह्यांना सिलिकॉन व्हॅली बनवता येईल. वाकडला तुमचा तो ईमिग्रेशन चेक पोस्ट होवू शकेल.
  • Log in or register to post comments

अन मिल्ट्रीचे केंद्र घोरपडी

बॅटमॅन
Fri, 10/17/2014 - 17:56 नवीन
अन मिल्ट्रीचे केंद्र घोरपडी-हडपसर. लक्ष्मीरोडचे तख्त राखतो हडपसर साचा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

नाना-मामा च्या धर्तीवर मी

जेपी
Fri, 10/17/2014 - 17:33 नवीन
नाना-मामा च्या धर्तीवर मी नविन चित्रपट बनवत आहे. शिर्षक आहे "नाना आणी माई" कलाकारांची ऑडीशन चालु आहे. ईच्छुकांनी व्यनी टाकावा. प्रोड्युसर-जेपी
  • Log in or register to post comments

(No subject)

स्वामी संकेतानंद
Fri, 10/17/2014 - 17:48 नवीन
=))
  • Log in or register to post comments

आणि हो, पुणे देशात रोज दुपारी

बॅटमॅन
Fri, 10/17/2014 - 17:58 नवीन
आणि हो, पुणे देशात रोज दुपारी १ ते ४ प्रवेश बंद असेल. कोणी बेकायदेशीर घुसखोरी केल्यास त्याला रामनाथची मिसळ खाऊ घातली जाईल.
  • Log in or register to post comments

रामनाथची मिसळ खाऊ घातली जाईल.

यसवायजी
Fri, 10/17/2014 - 18:06 नवीन
रामनाथची मिसळ खाऊ घातली जाईल. :)) च्यायचा त्या मिसळीच्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

बॅटमॅन
Fri, 10/17/2014 - 18:15 नवीन
अगदी अगदी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

रामनाथ मिसळ नकॅ तर

नानासाहेब नेफळे
Fri, 10/17/2014 - 18:18 नवीन
रामनाथ मिसळ नकॅ तर पीरीपुकरांना काय बेडेकरचे तिखट पाणी प्यायचे आहे काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

णाणाची धाव बेडेकरपर्यंत!!!

यसवायजी
Fri, 10/17/2014 - 18:22 नवीन
णाणाची धाव बेडेकरपर्यंत!!! :)) (फडतरेप्रेमी) SYG
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

एक घाईघाईत केलेला प्रयत्न

स्वामी संकेतानंद
Fri, 10/17/2014 - 17:58 नवीन
पुणे माझा देश आहे. सारे पुणेकर माझे बांधव नाहीत. माझ्या देशाचा मला जाज्वल्य अभिमान आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला जाज्वल्य अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी जन्मतः आहे. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा किमान शब्दांत कमाल अपमान करीन. आणि प्रत्येकाशी तुसडेपणाने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव ह्यांच्याशी फटकून वागण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचा अपमान आणि त्यांची फजिती ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे. ;)
  • Log in or register to post comments

हा हा हा, परफेक्ट!!!!

बॅटमॅन
Fri, 10/17/2014 - 18:05 नवीन
हा हा हा, परफेक्ट!!!! श्रीफल आणि महावस्त्रासकट शिक्रण व मटार उसळ या राष्ट्रीय २ कोर्स डिनरने स्वामींना सन्मानित केल्या जावे असा प्रस्ताव मी मजलिस-ए-शूरा-अल-पूना इथे पेश करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

शिक्रण व मटार उसळ घरी घेउन

यसवायजी
Fri, 10/17/2014 - 18:09 नवीन
शिक्रण व मटार उसळ घरी घेउन जाता येईल. श्रीफल आणि महावस्त्र कार्यक्रमानंतर परत घेतले जाईल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ठ्ठो !

स्वामी संकेतानंद
Fri, 10/17/2014 - 18:13 नवीन
ठ्ठो ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

हा हा हा. इदु पक्का पुणेरी

बॅटमॅन
Fri, 10/17/2014 - 18:14 नवीन
हा हा हा. इदु पक्का पुणेरी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

शिक्रण आणि मटारची उसळ ही

नानासाहेब नेफळे
Fri, 10/17/2014 - 18:16 नवीन
शिक्रण आणि मटारची उसळ ही पुणेरी चंगळवादाची कमाल परीसीमा आहे हे वाट चुकलेल्या पुणेकरांना समजावे यासाठी' पुरेपुर शिकरण'(शिकरण शब्दाची फोड करु नये) नावाची उपहारगृहं सरकारी कार्यालयात चालू करावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

या उपाहारगृहांत पोळ्या

बॅटमॅन
Fri, 10/17/2014 - 18:18 नवीन
या उपाहारगृहांत पोळ्या पुरवल्या जाव्यात की घरून घेऊन यावयास सांगावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

@महावस्त्र कार्यक्रमानंतर परत

अत्रुप्त आत्मा
Fri, 10/17/2014 - 19:20 नवीन
@महावस्त्र कार्यक्रमानंतर परत घेतले जाईल. >> का?? असे विचारल्यास विचारणाराचे जिवंतपणीच ओंकारेश्वरावर पिंडदान केले जाइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

(No subject)

टवाळ कार्टा
Fri, 10/17/2014 - 19:45 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हरे रामा!

पैसा
Fri, 10/17/2014 - 18:45 नवीन
मेले हसून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

लवली !

विटेकर
Fri, 10/17/2014 - 18:09 नवीन
ह ह पुरेवाट !
  • Log in or register to post comments

पुणे या विषयावर अजूनही चटकदार

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 10/17/2014 - 18:55 नवीन
पुणे या प्राचीन विषयावर अजूनही चटकदार चर्चा होऊ शकते हे पाहून (हह) ड्वाळे पाणाव्ळे. +D
  • Log in or register to post comments

करा चेष्टा लेकांनो!

तिमा
Fri, 10/17/2014 - 18:56 नवीन
आमचा 'परा' असता तर तुम्हा सार्‍यांना एकटा पुरुन उरला असता मोदींसारखा!
  • Log in or register to post comments

असता तर मंजे???

अत्रुप्त आत्मा
Fri, 10/17/2014 - 19:57 नवीन
असता तर मंजे??? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

म्हणजे

तिमा
Sat, 10/18/2014 - 09:53 नवीन
हजर असता तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

म्हणजे?? परा इथे नाही म्हणता?

सूड
Fri, 10/17/2014 - 19:57 नवीन
म्हणजे?? परा इथे नाही म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

परा

हरकाम्या
Sat, 10/18/2014 - 12:19 नवीन
तो काय पुणे राष्ट्राची हद्द ठरवायला गेला की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा